क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

आयपीएलच्या लिलांवावरचा राष्ट्रीय क्रिकेटचा व राष्ट्रीय संघ निवडीवरचा आयपीएलचा परिणाम बघतां, आयपीएल व देशाचं क्रिकेट यांचं एकमेकांशी असलेलं नातं आतां या अवस्थेला येवून पोचलं असावं -
'एकमेकां साह्य करू
अवघे धरूं सुपंथ II Wink

भाऊ, तुम्ही इंग्लंड क्रिकेट कितपत फॉलो करता ?

थोडा विचार केला तर चेन्नई ने हझेलवूड ला रीटेन न करणे पटत नाही. त्यांच्या बॉलिंगचा तो एस होता नि एकंदर तो जसा खेळतोय सध्या ते बघता टी २० मधल्या ५ टॉप बॉलर मधे सहज आहे. धोनीच्या जागी त्याला रीटेन करून धोनीला ऑक्शनमधे उचलायला हवे होते. गनरली इतर फ्रँचाईज चे ब्रेंड नेम नि मेन प्लेयर सेट असल्यामूळे धोनी नक्कीच परवडेल अशा किमत्तीमधे आणता आला असता.

बंगलोर चा पुढचा कप्तान मॅक्स्वेल असेल का ?

*तुम्ही इंग्लंड क्रिकेट कितपत फॉलो करता ?* - नाहीं. डोळ्यांवर फार ताण देणं टाळतों आतां. त्यामुळे, क्रिकेटसाठी फक्त मायदेश व मायबोली !! Wink
*धोनीच्या जागी त्याला रीटेन करून धोनीला ऑक्शनमधे उचलायला हवे होते *- क्रिकेटची गणितं व आयपीएल संघांच्या मालकांची गणितं जुळतीलच असं नाहीं ना ! Wink

"धोनीच्या जागी त्याला रीटेन करून धोनीला ऑक्शनमधे उचलायला हवे होते" - क्रिकेटींग लॉजिक आणि बिझनेस लॉजिक वेगळे असतात रे. धोनी हा सीएसके चा प्लेयरपेक्षा जास्त मोठा ब्रँड आहे असं मला वाटतं.

"बंगलोर चा पुढचा कप्तान मॅक्स्वेल असेल का ?" - जर त्यांना कुणी इतर कॅप्टन मटेरियल इंडियन प्लेयर मिळाला नाही तर मॅक्सवेल कॅप्टन होण्याची दाट शक्यता आहे. तसं झालं तर ह्या बाबतीत मॅक्सवेल आणि कार्थिकमधे साम्य असेल. आधी दोघंही सगळ्या टीम्स कडून टोलवले गेले आणि नंतर ज्या टीमकडे दोन वर्ष सलग राहिले तिथे कॅप्टन झाले. Happy

धोनीला लिलावात उतरायला लावणे म्हणजे त्याच्या करोडो चाहत्यांचा रोष ओढवणे. चेन्नईने असे केले तर संपला त्यांचा फॅनफॉलोईंग Happy
त्याचसोबत आयपीएलचा टीआरपी सुद्धा.
कारण चेन्नई जेव्हा चांगले परफॉर्म करते तेव्हा आयपीएलचा टीआरपीसुद्धा वाढतो असा लेख पाहिलेला त्यादिवशी. वाचायचा राहून गेला..

क्रिकेटींग लॉजिक आणि बिझनेस लॉजिक वेगळे असतात रे. धोनी हा सीएसके चा प्लेयरपेक्षा जास्त मोठा ब्रँड आहे असं मला वाटतं. >> हो ते मान्य आहेच. फक्त ब्रँड साठी ठेवले गेले असेल असे वाटत नाही पण. पुढच्या टीम ची घडी नीट बसवून द्यावी अशी अपेक्षा असेल. म्हणून त्याला न.२ वर रीटेन केले आहे कि पुढच्या आयपील नंतर रीटायर झाला तर १२ कोटी हातात येतील एकदम पुढे बिल्ड करायला. नुसते ब्रँडींग असते तर मेंटॉर वगैरे बनवलेच असते. पण हेझलवूड्ला हातातून जाऊन देणे घोडचूक आहे.

गिलने जेमिसनला पहिल्या दोन बॉलला दोन फोर मारून खाते उघडले.
बाऊन्स चांगला असला की चांगले शॉटही बघायला मिळतात

हे गेल्यावेळी मिसिंग होते..

लास्ट बॉलला अजून एक

पुढच्याच ओवरच्या पहिल्या बॉलला मयंक अग्रवालचा अजून एक..

भारतीय संघात ३ बदल :

-- कॅप्टन च्या जागी कॅप्टन
-- सरांना विश्रांती देऊन जयंत यादव इन
-- ईशांतच्या जागी सिराज

ऑल द बेस्ट टीम इंडिया... छान क्रिकेट खेळा, अन जिंका...

रच्याकने,
गेल्या ५ वर्षांमधे वानखेडेवर टेस्ट झाली नव्हती, जेंव्हा झाली होती तेंव्हा कोहलीनी २०० केले होते...
अन गेल्या खेपेला जेंव्हा (१९८८ मधे) भारत न्यूझिलंड टेस्ट वानखेडेवर झाली होती तेंव्हा कोहली अन विल्यमसन दोघंही जन्मले नव्हते...

मुंबैत दोन दिवस पाऊस होता. आज छान ऊन आहे. पीचवर काय परिणाम झाला आहे पहायचं. पहिल्या दिवशीं तरी पीच छान वाटतंय.

शुभमन बाद!
मयांकचे १०० चेंडू फलकावर! धावा ३२ खेळतोय अजून जोडीला पुजारा जो नुकताच शुन्यावर बाद...
२ बाद ८०

आता आजच्या सामन्याचा हिरो फलंदाजीस उतरणार. ताजातवाना होऊन आलाय आज नक्की खूप दिवस लांबलेले शतक झळकविणार!

माफ करा बहुप्रतिक्षित शतक केवळ १०० धावांनी हुकले...
बीन बाद ८० वरून भारत तीन बाद ८०

बहुतेक पहिल्या दिवशी एजाज पटेल एवढा चालतोय म्हणजे सामना २ अडीच दिवसांत संपणार!

कोहलीच्या शिरेपेचात अजून एक तुरा! कर्णधार म्हणून १० वेळा शुन्यावर बाद! जास्त वेळा शुन्यावर बाद होणार्‍या कर्णधारांच्या यादीत दुसरा क्रमांक!

*कोहलीच्या शिरेपेचात अजून एक तुरा! * -कोहलींच्या 'बाद' चा निर्णय जरा संशयास्पद वाटला. समोरून दाखवलेल्या 'रिपले'मधे चेंडू बॅटच्या कडेला लागून पॅडवर गेल्याचं दिसत होतं तरी पण ' साईड व्ह्यू' पाहूनच तिसर्या अंपायरने निर्णय दिला असं वाटलं. कोहली म्हणूनच अंपायरकडे नाराजी व्यक्त करत परत गेला असावा.

पीच सुरवातीला छान वाटलं पण तें रूप तसं नसून फसवं आहे, असं जाणवतं. काल-परवाचया पावसामुळे कीं नाहीं , हें निश्चित साःगणं कठीण.

साईड व्ह्यू' पाहूनच तिसर्या अंपायरने निर्णय दिला असं वाटलं.>>>

पण तिसरा अंपायर जर ठरवू शकत नसेल तर ऑन्फिल्ड पंचांचा निर्णय कायम राहतो ना! त्यामुळे त्यांनी बाद ठरविले असावे.

कोहलीची क्लीअर एज होती. पण आधी एज होती की बॅटपॅड एकाच वेळी होते याचा क्लीअर एविडन्स नसल्याने किंबहुना थर्ड अंपायरला न सापडल्याने ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला ईज्जत दिली.

पण तिसरा अंपायर जर ठरवू शकत नसेल तर ऑन्फिल्ड पंचांचा निर्णय कायम राहतो ना! त्यामुळे त्यांनी बाद ठरविले असावे.
/
ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला ईज्जत दिली.
>> येस्स...

५ वर्षांमधे वानखेडेवर टेस्ट झाली नव्हती, जेंव्हा झाली होती तेंव्हा कोहलीनी २०० केले होते... >>

ते मी 'प्रतेक्ष' स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. हरचंद पालवांच्या कपाटाची दुरुस्ती करायला जाताना. ते इथे असतील तर सांगतील. Proud

ते मी 'प्रतेक्ष' स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. हरचंद पालवांच्या कपाटाची दुरुस्ती करायला जाताना. ते इथे असतील तर सांगतील. Proud
>>
वाह उस्ताद...!!!

*आता रोहितवर संक्रांत! * - मला नाहीं वाटत तसं. रोहितवर संक्रांत आलीच तर ती त्याच्या स्वतःच्या वाईट कामगिरीमुळे ! संक्रांत आलीच तर पुजारा व रहाणेवर !
हा सामना अनिश्चिततेने पछाडलेला असणार असं दिसतंय.

पुजारा, रहाणे व कोहली या तिघांनाहि हाकलून द्यावे. पुरे आता.
नि रोहित शर्माचे काय झाले? तो कर्णधार होणार होता ना? आता संघातहि नाही!

आजचा दिवस एका मुंबईकरानेच गाजवला. Happy

मयंक चे शॉट्स, फूटवर्क, प्लेसमेंट आणि टायमिंग - सगळंच जबरदस्त होतं. दिवसातल्या शेवटच्या ओव्हरमधे पटेल ने लाँग-ऑफ चा फिल्डर मिड-ऑफ ला आणून दिलेल्या आव्हानाला त्याने ज्या आत्मविश्वासानं पुढे सरसावत सिक्स मारली ते पाहून डोळ्याचं पारणं फिटलं. एक चांगलाओपनर परत फॉर्म मधे येताना पाहून फार बरं वाटलं.

"आता रोहितवर संक्रांत!" - मला नाही वाटत रोहितच्या स्थानाला काही धोका असेल असं. ह्या सगळ्यात जर कुणावर जास्त दबाव असेल तर तो पृथ्वी शॉ वर. रोहित, गिल आणि मयंक जर ओपनिंग साठी तयार असतील, तर शॉ साठी प्रेशर सिच्युएशन आहे.

कोहलीची विकेट फारच 'टच अँड गो' होती. त्याची बॉडी लँग्वेज पहाता पुढच्या इनिंग ला त्याने एक इंपॅक्ट इनिंग खेळली तर नवल वाटायला नको.

शर्मा आणि कोहली नसतानाही शॉ टीम मध्ये नाही तर त्याच्यासाठी प्रेशर सिच्युएशन कशी काय असणार? सध्या पुजारा आणि राहणे प्रेशर सिच्युएशनमध्ये असणार. शर्मा आला की दोघांपैकी एक बाहेर जाणार हे नक्की.

शर्मा तर आता कॅप्टन आहे. 20-20 स्पर्धेत कॅप्टन असणे म्हणजे संपूर्ण जगाचा राजा असणे, वन डे मध्ये कॅप्टन म्हणजे देशाचा राजा आणि टेस्टमध्ये कॅप्टन म्हणजे जिल्ह्याचा राजा. त्यामुळे आता सर्वश्रेष्ठ खेळाडू रोहित आहे तो बाहेर जाणे शक्य नाही. उलट जिंकायचं असेल तर रोहितची बॅट चालली पाहिजे हे समीकरण आहे. तो संघात नसेल तर आपण फक्त दुबळ्या संघांना हरवू शकतो.

शर्मा आला की दोघांपैकी एक बाहेर जाणार हे नक्की. >> नाही. मयांक तिसरा ओपनर म्हणून जाईल. बॅकप मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून खेळेल. भारताबाहेर आपण पटकन प्रयोग करणार नाहि. एखाद्या इंजरीमूळे मयांक किंवा श्रेयस आत येतील फार तर.

मयंक चे शॉट्स, फूटवर्क, प्लेसमेंट आणि टायमिंग - सगळंच जबरदस्त होतं >> +१. स्टेटमेंट करायच्या उद्देशाने खेळला असे वाटले. जबरदस्त इनिंग होती एकदम.

जॅमिसनला हँडल करायचा गिल चा प्लॅन पण भारी होता. आज गिल मोठी इनिंग खेळेल असे वाटलेले.

भाऊ , श्रेयस, गिल दोघेही मस्त बाहेर येऊन खेळतात स्पिनर्स ना. मयांकचे नाव त्यात घतले तर डोमेस्टिक क्रिकेट खेळणार्‍यांंना झालेला फाय्दा दिसतो आहे सरळ सरळ.

"नाही. मयांक तिसरा ओपनर म्हणून जाईल. " - बरोबर. ओपनरसाठी मिडल ऑर्डर बॅट्समन नाही जाणार.

"आज गिल मोठी इनिंग खेळेल असे वाटलेले." - हो ना. त्याच्या खेळात एक सहजता आहे. मस्त खेळतो.

गिलच्या खेळात, रन्स बनवायच्या शैलीत अंडर नाईंटीनपासून एक सहजता आढळत आलीय. तेव्हापासून तो मला फ्युचर प्लेअर वाटायचा. पण डिफेन्स वीकनेसेसवर खूप काम करणे गरजेचे. वरच्या लेव्हलला आला तसे एक्स्पोज होत गेले.
हेच पृथ्वी शॉ बाबतही झाले. बॉल फोडायच्या हिशोबानेच खवडे मारतो. पण वीक पॉईंट सांभाळता येत नसल्यास अवघड होते. बाद झालात की खेळीच संपुष्टात येते.

मयंक खेळल्याने रोहीतला कसले टेंशन. चर्चाही व्यर्थ आहे. आज तो आपलाच नाही तर जगातला नंबर वन ओपनर आहे. ईंग्लंडमध्ये खेळल्याने तर भारतातच खेळतो म्हणणाऱ्यांचेही तोंड बंद केलेय त्याने. तसेच मयंकही आज भारतातच तर खेळलाय.
राहुलला मात्र कॉम्पीटीशनला राहील. किंवा पुजारा आणि रहाणे दोघांच्या जागा खाली होताच तिथे राहुल नंबर लाऊ शकतो. वन डाऊन वगैरे.. अय्यरने आता मिडलऑर्डरची एक जागा बूक केलीय असे वाटते पण आफ्रिकेत वेगळे चित्र दिसू शकते.

पूर्वीपेक्षा आतां सलामी फलंदाज म्हणून जागा टिकवणं खूपच कठीण झालंय. केवळ कसोटीच खेळून आतां चालत नाहीं ( बिचारा पुजारा !), व त्यामुळे संयमी बचाव व आक्रमक फटकेबाजी हया दोन्हीवर हुकमत असणं आवश्यक झालंय. असं प्रत्येक प्रकारच्या क्रिकेटसाठी गियर बदलून यशस्वीपणे खेळणं हें रोहितसारख्या प्रतिभावान खेळाडूलाही बर्याच आनुभवानंतर जमलं. म्हणून, राहूल, मयांक, गिल व शाॅ हे उत्तम फलंदाज असूनही यापैकी कोण या कसोटीला उतरतो हें इतक्या घाईने नाहीं ठरवता येणार.

285-6 !
मयांकला क्रिज सोडून पुढे येत आक्रमकपणे स्पीन खेळताना पाहून अजूनही आपली ती कला जीवंत आहे याचा सुखद अनुभव आला !!

भारताचा आत्ताचा स्कोर 308/7. सर्व विकेट्स पटेलनेच घेतल्या आहेत. कुंबळेच्या रेकॉर्डशी बरोबरी करू शकतो.

तसं झाल्यास होपफुली तो स्वतःच्या होम ग्राऊंडवर अशी कामगिरी लुजिंग कॉजमध्ये करणारा पहिला गोलंदाज ठरेल. Proud

Pages