Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
या कसोटीमालिकेने लोकांचा
या कसोटीमालिकेने लोकांचा कसोटीमध्ये ईंटरेस्ट पुन्हा आलाय. एखादी स्पोर्टसफिल्म बनावी अशी स्क्रिप्ट तयार झाली आहे. फक्त आता भारताचा विजय व्हावा या अखेरच्या कसोटीत म्हणजे उत्कंठावर्धक क्लायमॅक्स देखील साधला जाईल.
आता आधीच्या धाग्यावर ५-६ दिवस
आता आधीच्या धाग्यावर ५-६ दिवस कोणी काही बोललेलं नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा आनंद ओसरून आता आपण इंग्लंडबद्दल चर्चा इथे सुरू करायला हरकत नसावी. श्रीलंकेला त्यांनी भरपूर डिसिजिवली हरवलं. रूट फॉर्मात आहे. कोहली परत येतोय! मजा येणार आहे १० दिवसांनी! चेन्नई टेस्ट! काय डावपेच असावेत?
श्रीलंकेला त्यांनी भरपूर
श्रीलंकेला त्यांनी भरपूर डिसिजिवली हरवलं. रूट फॉर्मात आहे. कोहली परत येतोय! मजा येणार आहे १० दिवसांनी! चेन्नई टेस्ट! काय डावपेच असावेत? >> अँडरसन समोर असताना सिमिंग पिच नको. फास्ट नि बाऊन्स चालेल . गवत नको. बॉल जास्त रिव्हर्स होणार नाही शेवटच्या २-३ दिवसांमधे असे असले तर अजून चांगले. मनिंदर सिंग च्या म्हणण्याप्रमाणे भारत नि लंकेच्या पिचेस मधे फरक असल्यामूळे इंग्लिश स्पिनर्स ना अॅडजेस्टमेंट करावी लागेल. तेंव्हा बेदी, मुरली कार्तिक वगैरे (पाहुण्यांना अनाहुत सल्ले देणार्या इती) पोत्यात भरून दूर सोडून येण्यात यावे
"तेंव्हा बेदी, मुरली कार्तिक
"तेंव्हा बेदी, मुरली कार्तिक वगैरे (पाहुण्यांना अनाहुत सल्ले देणार्या इती) पोत्यात भरून दूर सोडून येण्यात यावे " -
अरे खरच रे. मला खरच आश्चर्य
अरे खरच रे. मला खरच आश्चर्य वाटते कि असे का करत असावेत ? बेदी चे ठीक आहे त्याचा ईगो त्याच्या टेलंट, मोठेपणा पेक्षा मोठा आहे पण मुरली कार्तिक ? कसला खुन्नस काढतात. अशी मदत भारतीय संघाला बाहेर मिळते का ?
बाकी ईंग्लंड चे प्लॅनिंग काय मस्त आहे. लंकेत खेळून आल्यामुळे ट्युन्ड असतील. जाडेजा ला मिस करणार आपण अॅश बरोबर.
लंकेचा सध्याचा संघ साधारण
लंकेचा सध्याचा संघ साधारण आहे.
भारताचा सिलॅबसच वेगळा आहे.
जो रूटचा तोडगा तेवढा आपल्याला शोधावा लागणार.
बाकी ईंग्लंड चे प्लॅनिंग काय
बाकी ईंग्लंड चे प्लॅनिंग काय मस्त आहे...
नवीन Submitted by असामी on 25 January, 2021 - 22:12
>>>>>>
जबरदस्त प्लॅनिंग.
पहिल्या सामन्यात त्यांनी अँडरसनला विश्रांती दिली.दुसऱ्या सामन्यात ब्रॉडला.
त्यांनी बेस आणि लीच हे दोन नवीन स्पिनर देखील आणलेत.
भारताला भारतात हरवणं
भारताला भारतात हरवणं अशक्यप्राय गोष्ट आहे.
1. विराट पुन्हा परत येतोय आणि आता तर कप्तानपदासाठी जोरदार स्पर्धक तयार आहेत. 2020 मध्ये एकही शतक नाही म्हणजे 2021 मध्ये इग्लंडची वाट लागणारच.
2. मायभुमीत तर पुजारा, रोहीत जास्त खतरनाक आहेत.
3. आपली गोलंदाजी तर विचारायलाच नको. कोण खेळणार आणि कोण नाही याने फारसा फरक पडणार नाही.
इंग्लंड विरुद्ध ची series
इंग्लंड विरुद्ध ची series भारताला फार सोपी जाणार नाही, भारतीय फलंदाजी स्पिन चांगली खेळतात हा भ्रम आहे, विशेषतः सध्याचे फलंदाज तसेच आता इंग्लंडचे बरेच फलंदाज फिरकी चांगले खेळतात, रूट, स्टोक्स, बटलर वगैरे. भारताला जडेजा ची अनुपस्थिती खूप जाणवेल.
इंग्लंड चा संघ संतुलीत आहे.
इंग्लंड चा संघ संतुलीत आहे. आर्चर , अँडरसन, ब्रॉड , सारखे फास्ट bowlers आणि मोईन, leach आणि बेस सारखे स्पिन bowlers आहेत आणि जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू स्टोक्स पण आहे
पहिली कसोटी चेन्नई ला आहे
पहिली कसोटी चेन्नई ला आहे त्यामुळे फिरकी ला मदत मिळू शकते. भारताने खालील संघ खेळवला पाहिजे
1 रोहित
2 गील
3 पुजारा
4 विराट
5 रहाणे
6 पंत
7 Axar पटेल
8 अश्विन
9 कुलदीप
10 बुमराह
11 इशांत / सिराज
सुंदर आणि अश्विन दोघेही offspinner असल्यामुळे axar पटेल ला खेळवावें लागेल
*भारताला भारतात हरवणं
*भारताला भारतात हरवणं अशक्यप्राय गोष्ट आहे.* - 32 वर्ष गाब्बावर कधीही न हरलेले ऑसीज एका नवोदित संघाविरुध्द सपशेल हरले, अगदीं आत्ता आत्तांच ! क्रिकेटमधे कांहीही गृहीत धरून आखाडे न बांधता, विरोधी संघाला जराही कमी न लेखतां, आपली सर्वोत्तम टीम सर्व तयारीनिशी खेळवणंच हितावह.
2012 मध्ये इंग्लंड ने भारताला
2012 मध्ये इंग्लंड ने भारताला भारतात हरवले होते तेव्हा पण भारताची फलंदाजी खूप स्ट्रॉंग होती आणि फिरकी चांगले खेळणारे होते. सेहवाग, गंभीर, पुजारा, सचिन, विराट, युवराज आणि धोनी अशी तगडी फलंदाजी होती तरी 2- 1 असा पराभव झाला होता त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नये.
गॅबा मॅच च्या आधीच्या
गॅबा मॅच च्या आधीच्या प्रेडिक्शन्स नंतर माझा साध्या माणसावर चा विश्वास दृढ झालाय.
त्यामुळे अक्षर पटेल विषयी त्यांची भविष्यवाणी खरी ठरेल असं मानू.
भारतात सिरीज असल्यामुळे रोहित एक-दोन मोठ्या इनिंग्ज खेळेल - किंबहूना त्याने खेळाव्या - असं वाटतंय. ऑस्ट्रेलियातल्या देदिप्यमान यशामुळे रोहित च्या टेम्परामेंट मधल्या त्रुटी तात्पुरत्या झाकल्या गेल्या आहेत. गिल ने सुद्धा शेवटच्या मॅच मध्ये दाखवलेलं टेंपरामेंट दाखवून मोठ्या इनिंग्ज खेळाव्या. इंग्लंड ची टीम जबरदस्त तगडी आहे आणी त्यांना टेल म्हणता येईल अशी जवळ जवळ नाहीये. त्यामुळे सातत्यानं सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
तेंव्हा बेदी, मुरली कार्तिक
तेंव्हा बेदी, मुरली कार्तिक वगैरे (पाहुण्यांना अनाहुत सल्ले देणार्या इती) पोत्यात भरून दूर सोडून येण्यात यावे >>
अगदी बरोबर
पिच कसे असतील त्यावर बर्याच गोष्टी अवलंबून असतील असे दिसते आहे. थंडी असल्याने सुद्धा सकाळच्या सत्रातल्या खेळामध्ये थोडे वेगळेपण असेल.
1 रोहित
1 रोहित
2 गील
3 पुजारा
4 विराट
5 रहाणे
6 पंत
7 Axar पटेल
8 अश्विन
9 कुलदीप
10 बुमराह
11 इशांत / सिराज
सुंदर आणि अश्विन दोघेही offspinner असल्यामुळे axar पटेल ला खेळवावें लागेल >> पटेल अहदाबादला जास्त कामाला येईल. पटेल च्या जागी जलज सक्सेना नि कुलदीप ऐवजी नदीम असा बदल करेन. (जेणे करून दोन्ही दिशांना बॉल नेऊ शकणारे स्पिनर्स पहिल्या टीयर मधले असतील. अक्षर पटेल टेस्ट मधे विकेटस घेण्याबाबत कितपत कामी येईल ह्याबाबत शंका वाटते.) पंत ऐवजी साहा असावा असेही वाटते (भारतात तरी साहा डिसेंट बॅटींग करतो नि किपिंग तर ...) हॉर्सेस फॉर द कोर्सेस असे करावे लागणार आहे.
अक्षर पटेल मलाही आवडतो . तो
अक्षर पटेल मलाही आवडतो . तो बेरकी ( चांगल्या अर्थाने) खेळाडू वाटतो , असं मी मागें इथे म्हटलं होतं. पण घरच्या खेळपट्टीवर मला कसोटीमध्ये संघात एक जेन्यूईन लेग स्पीनर असणं अधिक आश्वासक वाटतं.
फेसबूक व्हॉटसपवरही बघतोय,
फेसबूक व्हॉटसपवरही बघतोय, बरेच जणांच्या संघात पंत फर्स्ट चॉईस दिसतो.
एका सामन्याने किंबहुना मालिकेने जादू केली
पण मुळातच बाहेर खेळताना फलंदाजीला प्राधान्य देत पंतचा समावेश करणे आणि भारतात फिरकीसमोर साहाला आणने हाच आपला गेमप्लान होता. हेच आपले धोरण होते. ते अचानक का बदलायचे?
बर्र, पंतचे यष्टीरक्षणही काही अचानक सुधारलेय अश्यातला भाग नाही. सुधारेल, सरावानेच सुधारेल, पण अजूनही त्याने मायदेशात फिरकीसमोर चुका केल्या तर त्याची किंमत जास्त मोजावी लागेल हीच परीस्थिती आहे.
त्यामुळे मला तरी असे वाटते की सुरुवात साहासोबतच व्हावी. साहा भले फलंदाजीत चष्मा मिळवत असेल पण यष्टीरक्षण कमाल करत असेल, आणि आपले फिरकी गोलंदाज आपल्याला विजय मिळवून देत असतील तर साहाच कंटीन्यू व्हावा. पंतलाही यष्टीरक्षणाचे महत्व समजणे गरजेचे. ते एकदा समजले आणि सुधारले की त्याच्या फलंदाजीवरचा परफॉर्म करायचा अतिरीक्त दबावही आपसूक कमी होईल. छान तावून सुखावून म्हणतात तसे येऊ द्यावे त्याला. तिथून पुढे किमान दहा वर्षे मग त्याला देशाची सेवा करायची आहे.
माझा संघ
माझा संघ
1 रोहित
2 गील
3 पुजारा
4 विराट
5 रहाणे
6 के एल राहुल / अक्षर पटेल / वॉशिंग्टन सुंदर
7 साहा
8 अश्विन
9 कुलदीप
१० आणि ११ - बुमराह / इशांत / सिराज (यांना आलटून पालटून न दमवता खेळवणे उत्तम)
---------
जर सर जडेजा असता तर कुलदीपच्या जागी थेट आला असता आणि मग सहाव्या क्रमांकावर अक्षर की राहुल की एखादा सुंदर असा संभ्रम न राहता थेट राहुललाच घेतले असते.
कारण आश्विन जडेजा जोडी असताना आणखी कुठल्या पार्टटाईम/फुलटाईम फिरकीची गरज पडत नाही. दोघे एकेक इनिंग वाटून घेतात आणि गुंडाळतात समोरच्यांना. तसेच सोबत द्यायला दोन वेगवानही पुरेसे ठरतात.
er
अहो, पाहिलं कुणी माबोकराने तर घेतील ना संघात तुम्हाला ! बसाल मग बोंबलत ' सिक्युरिटी बबल'मधे !!

सगळं प्लॅनिन्ग हे आयसीसी
सगळं प्लॅनिन्ग हे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनल डोक्यात ठेऊन करायला पाहिजे (आणि असणारही).
२-०, ३-०, ३-१, ४-० यापैकी कुठलाही निकाल आपल्याला थेट लॉर्ड्सवर घेऊन जाईल.
पण त्याच बरोबर ०-३ किंवा ०-४ पराभव आपल्या क्वालिफाइंगच्या सर्व शक्यता धुळीला मिळवेल आणि इंग्लंडला फायनल मधे नेईल. ईंग्लंडकडे याहून दुसरी कुठलीही शक्यता नाही, त्यामुळे ते ही जोर लावणार हे नक्की.
डोकं शांत ठेऊन जास्ती जोशात न जाता किंवा दडपणही न घेता नॅचरल गेम खेळला (सिडनी, गॅबा स्टाईल) तर विजय नक्की.
माझा संघ :
रोहित - गिल
पुजारा - कोहली - रहाणे
पंत
सुंदर - अश्विन - अक्षर / कुलदीप
बुमरा - इशांत
इंग्लंडची टॉस जिंकून पहिली
इंग्लंडची टॉस जिंकून पहिली बॅटिंग...
माझ्या टीम मधले १० जण प्लेइंग ११ मधे. तिसरा स्पिनर अक्षर्/कुलदीप ऐवजी नदीम...
*माझ्या टीम मधले १० जण
*माझ्या टीम मधले १० जण प्लेइंग ११ मधे*- जॅकीजी, तुम्हाला मानतों हे अगदीं खरं . पण या संघात येणारे 9- 10 खेळाडू तर निश्चित होतेच. उरलेल्या 1-2 जणातही तुमचा अंदाज 100% अचूक नाहीय !
नदीम आला अक्षर जख्मी
नदीम आला अक्षर जख्मी झाल्याने. कुलदीपचा इथेही विचार नाही झाला...
मला वाटतं, ऑस्ट्रेलिया
मला वाटतं, ऑस्ट्रेलिया टूरप्रमाणे हा प्रयोग असेल, कदाचित कुलदीपला पुढच्या टेस्ट्स् साठी फ्रेश ठेवले असेल...
दुर्दैवाने अक्षर injured झाला
दुर्दैवाने अक्षर injured झाला. तो खेळला असता तर तिसरा स्पिनर कुलदीप ला खेळवले असते. पण अक्षर नसल्यामुळे सुंदर आला आणि मग सगळे गोलंदाज सारखे, म्हणजे right handed साठी offspiner ठरले असते म्हणून कुलदीप च्या जागी नदीम ला घेतले. पण त्यामुळे गोलंदाजी थोडी कमकुवत वाटते आहे
ही प्रॅक्टिस मॅच आहे की
ही प्रॅक्टिस मॅच आहे की खरोखरची मॅच आहे?
बुमराने यॉर्कर जबरदस्त काढला
बुमराने यॉर्कर जबरदस्त काढला लास्ट बॉल! व्हॉट अ प्लेयाआ!
मुळे धुतोय! लंकेला धुतले आता
मुळे धुतोय! लंकेला धुतले आता भारतीय गोलंदाजाना!
बुमराहने आज बरेच यॉर्कर
बुमराहने आज बरेच यॉर्कर टाकले. मेहनत घेत होता विकेट काढायला. रिव्हर्ससुद्धा झाला नाही फारसा आज बॉल. अपवाद लंच नंतर थोडेफार बघणेबल बॉलिंग स्पेल होते. पण ओवरऑल रटाळ झाला आजचा दिवस. स्पेशली नुकतेच जी कसोटी मालिका पार पडलीय त्या पार्श्वभूमीवर जास्त बोअर झाले.
Pages