
हल्लीच मी आणि अजून काही मायबोलीकरांनीही आपापले युट्यूब चॅनेल्स सुरू केलेत. त्याबद्दल मायबोलीवर सांगावे यास्तव हा धागाप्रपंच. मी माझ्या चॅनेलंबद्दल सांगेन. बाकीचे आपापल्या चॅनेलबद्दल सांगतील.
मी गेले नऊ वर्ष तांब्यापितळ्याच्या तारांपासून स्वतः डिझाईन करून दागिने व कलाकृती बनवते आहे. साडेपाच वर्षे झाली नी याच नावाने माझा छोटासा ब्रॅण्डही आहे तारांचे दागिने आणि इतर वस्तूंचा. काही मायबोलीकरांशी माझा इतर ठिकाणी संपर्क आहे त्यामुळे त्यांना माझ्या या सगळ्या उद्योगांबद्दल माहिती आहेच.
1 ऑक्टोबर 2020 ला माझ्या तेव्हा येऊ घातलेल्या कलेक्शनची स्केचेस बघून एका नुकतीच ओळख झालेल्या मित्राला प्रश्न पडला की 'हे सगळे अश्याच प्रकारचे मला कुठून मिळणार दागिन्यांच्यात गुंफायला? ' मग त्याला माझ्या तारेच्या भेंडोळ्यांचा फोटो पाठवून सांगितले की "बाबारे यातून हे सगळे चित्रविचित्र आकार मी हाताने बनवते." त्याचा विश्वास बसेना. मग त्याला दाखवायला म्हणून एक पेंडंट बनवण्याची पूर्ण प्रक्रिया शूट करून युट्यूबवर टाकली आणि अश्या तऱ्हेने माझ्या युट्यूब चॅनेलची सुरुवात झाली.
माझ्या आर्ट क्राफ्ट डिझाईनबद्दल सांगणारा माझा ब्लॉग आहे नी मेक्स नावाचा. म्हणून मग युट्यूब चॅनेलचे नावही तेच ठेवायचे ठरवले.
तर हा माझा युट्यूब चॅनेल
नी मेक्स
त्या मित्राला दाखवण्यासाठी बनवलेल्या व्हिडिओची ही लिंक
Intro and a pendent
त्यानंतर अजून दोन व्हिडीओज झाले ते चॅनेलच्या लिंकवर दिसतीलच.
दोनच दिवसांपूर्वी माझा चौथा व्हिडीओ युट्यूबवर टाकला आहे. इथे धाग्यात जी मिक्स मेडिया आर्टची इमेज आहे त्या आणि अजून एका झाडाबद्दल सांगणारा व्हिडीओ.
झाडांची गोष्ट
जरूर बघा आणि कसा वाटतोय हा नवीन उद्योग त्याबद्दल नक्की सांगा.
(ह्या धाग्याने कुठल्या नियमाचा भंग होत नसावा अशी आशा आहे.)
अतिशय सुंदर व्हिडीओ आहेत.
अतिशय सुंदर व्हिडीओ आहेत. आभूषणे, कलात्मक आहेत. नी तुम्ही जेव्हा म्हणालात की तांबे (कॉपर), सॉफ्ट असते तेव्हा मी म्हटले येस्स्स्स!!! सोन्यासारखे garish नसते. एक सॉफ्ट ह्यु असतो तांब्याला. पण नंतर माझ्या लक्षात की तुम्हाला, melliable म्हणायचे आहे.
खूप शुभेच्छा टू काँकर अनदर स्काय.
हा हा हो मला malleable च
हा हा हो मला malleable च म्हणायचे होते. सोने तांब्याइतकेच किंवा त्याहून मऊ असते. म्हणून तर शुद्ध सोन्यात (२४कॅरट) सगळ्या वस्तू बनत नाहीत. Hardness साठी इतर धातू मिसळावे लागतात.
खूप शुभेच्छा टू काँकर अनदर
खूप शुभेच्छा टू काँकर अनदर स्काय. <<
थँक्यू!
हार्दिक अभिनंदन व पुढील
हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. झाडाची कथा तर एक काव्यात्मक अनुभव आहे.
पहिले 100 subscribers झाले
पहिले 100 subscribers झाले माझ्या चॅनेलचे. थँक्यू!
आवडले व्हिडिओज् नीधप. तुमची
आवडले व्हिडिओज् नीधप. तुमची कलात्मकता अशीच समृद्ध राहू दे ही शुभेच्छा. < कथा तर एक काव्यात्मक अनुभव आहे.em> अनुमोदन.
Pages