विंडोशॉपिंग

Submitted by जाई. on 28 December, 2020 - 00:35

घरापासून जवळपास एक मॉल आहे. म्हणजे येण्याऱ्या जाण्याऱ्या रस्त्यावरच आहे. मॉल म्हटलं की दर्शनी भाग महत्वाचा. दर्शनी भागावर नेमकी कपड्याची छान छान दुकानं आहेत. मॉल जेव्हा पहिल्यांदा सुरू झाला तेव्हा मी कॉलेजात होते . दुपारी परतताना त्या कपड्यांच्या दुकानात असलेल्या सजवलेल्या मॅनेक्वीनवर नजर टाकणे हा छंद होता. काही काही ड्रेस खरंच सुंदर असायचे .इतके सुंदर की लगेच घेऊन टाकावेत आणि मिरवावेत असे. पण तेव्हा विद्यार्थीदशेत होते , मिळण्याऱ्या पॉकेटमनीत ड्रेस परवडणारे नव्हतेच आणि मातोश्री भलते लाड पुरवणाऱ्या नव्हत्याच. त्यामुळे विंडो ड्रेसिंगद्वारे नेत्रसुख हा एकच पर्याय होता.

*कट २*

पुढे यथावकाश नोकरी लागली. त्यामार्गे स्वतः ड्रेस विकत घेण्याची पतही आली. आजही त्या मॉलमध्ये ती दुकाने आहेत. दर्शनी भागात छान छान ड्रेस घातलेल्या मॅनेक्वीन आहेत . थोडक्यात मौका भी है और दस्तुर भी . पण आता ड्रेस विकत घ्यायची इच्छा होत नाही. तेव्हा त्या गोष्टीच अप्रूप होत. आजही त्या रस्त्यावरुन जाताना ते सुंदर ड्रेस दिसतात आणि छान वाटत . पण पुढे जायची इच्छा होत नाही . एखादी गोष्ट अस्पर्श राहावी , ती मिळून तिचं अप्रूपपण संपू नये असं काहीसे फिलिंग येते आणि त्यामुळे पाऊल पुढे टाकलं जात नाही. खूप सारी मेहनत करून एखादी गोष्ट मिळवावी नि हातात आल्यावर हातीच्या! एव्हढ्यासाठी अट्टाहास करत होतो होय अस काहीसं होत.

कदाचित काही गोष्टींची मजा विंडोशॉपिंगमध्येच असावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारएन्ड थँक्स आणि पर्फेक्ट !

बिस्कीटाच्या उदाहरणावरून आठवलं तर आमच्याइथे सुरभी नावाचे एक मिठाईच दुकान आहे. तिथे कलिंगडचे कापासारख्या मिठाई ठेवलेली असे. लहानपणी त्याच अप्रूप होत. पण ती मिठाई चांगले मार्क्स मिळाले तरच मिळे . पुढे ती विकत घ्यायची पत आली पण मग वो बात नहीं थी.

<<तुला शॉपिंगची इतकी आवड आहे की तू विंडो शॉपिंग करू शकत नाहीस. वस्तू पाहिली की तुला ती घ्यावीशी वाटते.>>
वा... काय परफेक्ट मानसिकता पकडली आहे..
हेच धाग्यांच्या संदर्भात आचरण तपासून पाहिलं की अगदी चपखलपणे लक्षात येईल.. "की धागा आपला असो की इतरांचा.. एखाद्याला तो घ्यावासाच वाटतो. येन केन प्रकारेण.." Proud

रिकामपण असले की मी तर ऑनलाईन शॉपिंग साईट वर जाऊन पण भरपूर उंडारतो. भरपूर शोधाशोध करतो. भरपूर वस्तु कार्ट मधे भरतो आणि नंतर खरेदी करतच नाही. पैसे न खर्च करता छान वेळ जातो.
>> दंडवत

रिकामपण असले की मी तर ऑनलाईन शॉपिंग साईट वर जाऊन पण भरपूर उंडारतो. भरपूर शोधाशोध करतो. भरपूर वस्तु कार्ट मधे भरतो>> हि इथ पर्यंतची प्रोसेस माझा नवरा देखिल करतो पण इथून पुढची प्रोसेस मी त्याच्यावतीने करते.. जसं की त्याने कार्टमधे टाकलेल्या वस्तू खरेदी न करू देणे Lol

विंडो शॉपिंग शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर तो माहीत करून न घेता आपल्याला वाट्टेल त्या random परिस्थितीला तो शब्द वापरणे आणि वर तेच कसं बरोबर आहे आणि शब्दकोशात लिहिलंय म्हणजे तेच थोडीच खरं! म्हणण्याचं आश्चर्य वाटून ही काळ लोटला.

शब्दकोशात लिहिलंय म्हणजे तेच थोडीच खरं!
>>>>
अमितव तेच थोडीच खरं नाही तर तितकेच थोडी खरे.. शब्दकोशापलीकडे काही नसते का? याचे उत्तर शब्दकोश बनतो कसा हे बघितले तर लक्षात येईल

कसा बनतो ते मला नेमकं माहिती नाही, पण कशासाठी बनतो ते माहिती आहे. (शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी)

विंडो शॉपिंगच्या शब्दकोशातल्या अर्थात 'without any intention of buying' असं स्वच्छ लिहिलंय. मी आणि माझ्यासारखे अनेकजण, जे विंडो शॉपिंग करतात, त्यांना तो अर्थ बरोबरच वाटतो. तू विंडो शॉपिंग करत नाहीस, कारण तुला 'intention of buying ' असतं, याचाच अर्थ तुलाही विंडो शॉपिंगचा हा अर्थ बरोबर वाटायला हरकत नाही.

हेतू नसतो पण मनात सुप्त ईच्छा असते अश्या वस्तूंचीच विंडो शॉपिंग होते.
हेतू नसतो असे आपण ठामपणे याचसाठी म्हणतो की तुम्ही विंडो शॉपिंग काही विकत न घ्यायच्या हेतूने गेलात आणि अचानक सुप्त ईच्छा उफाळून आली म्हणजे एखादी वस्तू ईतकी आवडली की घेतलीच तर मग आपसूकच ती विंडो शॉपिंग उरणार नाही आणि निव्वळ शॉपिंगच समजली जाणार. त्यामुळे विंडो शॉपिंगमागे शॉपिंगचा हेतू नसतो हे कायम राहणार.

इच्छा उफाळून आली की मग तिला 'सुप्त' पण नाही म्हणता येणार आणि उफाळून आली नाही तर सुप्त होती हे तरी सिद्ध कसं करणार?

ऋन्मेष काहीही सिद्ध करू शकतो.
सुर्य पश्चिमेला उगवतो हे ही तो सिद्ध करून दाखवऊ शकतो.
ऋ के काबिलियत पे संदेह नही करते

जाई छान लिहले आहेस आवडले आणी relate पण झाले.
खर तर विकत घेण्या साठी शॉपिंग करताना एक टेंशन असते वस्तू नीट बघुन घ्या अमुक आणी तमुक. पण विंडो शॉपिंग करताना काहिच टेंशन किन्वा विचार नसतात नुसत्या छान छान वस्तू बघत जायच्या.
कधी तरी लो मूड असेल आणी विंडो शॉपिंग केले की मस्त वाटते.

मृणाली, अमुपरी थँक्स

कधी तरी लो मूड असेल आणी विंडो शॉपिंग केले की मस्त वाटते>>>> सही पकडे है. फ्रेश वाटते एकदम.

Pages