घरापासून जवळपास एक मॉल आहे. म्हणजे येण्याऱ्या जाण्याऱ्या रस्त्यावरच आहे. मॉल म्हटलं की दर्शनी भाग महत्वाचा. दर्शनी भागावर नेमकी कपड्याची छान छान दुकानं आहेत. मॉल जेव्हा पहिल्यांदा सुरू झाला तेव्हा मी कॉलेजात होते . दुपारी परतताना त्या कपड्यांच्या दुकानात असलेल्या सजवलेल्या मॅनेक्वीनवर नजर टाकणे हा छंद होता. काही काही ड्रेस खरंच सुंदर असायचे .इतके सुंदर की लगेच घेऊन टाकावेत आणि मिरवावेत असे. पण तेव्हा विद्यार्थीदशेत होते , मिळण्याऱ्या पॉकेटमनीत ड्रेस परवडणारे नव्हतेच आणि मातोश्री भलते लाड पुरवणाऱ्या नव्हत्याच. त्यामुळे विंडो ड्रेसिंगद्वारे नेत्रसुख हा एकच पर्याय होता.
*कट २*
पुढे यथावकाश नोकरी लागली. त्यामार्गे स्वतः ड्रेस विकत घेण्याची पतही आली. आजही त्या मॉलमध्ये ती दुकाने आहेत. दर्शनी भागात छान छान ड्रेस घातलेल्या मॅनेक्वीन आहेत . थोडक्यात मौका भी है और दस्तुर भी . पण आता ड्रेस विकत घ्यायची इच्छा होत नाही. तेव्हा त्या गोष्टीच अप्रूप होत. आजही त्या रस्त्यावरुन जाताना ते सुंदर ड्रेस दिसतात आणि छान वाटत . पण पुढे जायची इच्छा होत नाही . एखादी गोष्ट अस्पर्श राहावी , ती मिळून तिचं अप्रूपपण संपू नये असं काहीसे फिलिंग येते आणि त्यामुळे पाऊल पुढे टाकलं जात नाही. खूप सारी मेहनत करून एखादी गोष्ट मिळवावी नि हातात आल्यावर हातीच्या! एव्हढ्यासाठी अट्टाहास करत होतो होय अस काहीसं होत.
कदाचित काही गोष्टींची मजा विंडोशॉपिंगमध्येच असावी.
विंडोशॉपिंग ची सुरुवात बहुतेक
विंडोशॉपिंग ची सुरुवात बहुतेक वेळा आर्थिक कारणामुळेच (म्हणजे पैसे नसण्यामुळे) होते
पण एकदा का, 'पैसे असले तरी जगातली प्रत्येक नवीन गोष्ट प्रत्येक वेळी आपल्याला घेता येणे शक्य नसते' हे कळले की विंडोशॉपिंगचा वेगळाच आनंद घेता यायला लागतो. अहमदाबादला असताना आमच्या ऑफिसच्या खालीच स्टारबझार होते तिथेही बरेचदा जाऊन यायचो बाजारात काय नवनवीन ट्रेंड आहेत वगैरे विनासायास कळायचे.
रिकामपण असले की मी तर ऑनलाईन शॉपिंग साईट वर जाऊन पण भरपूर उंडारतो. भरपूर शोधाशोध करतो. भरपूर वस्तु कार्ट मधे भरतो आणि नंतर खरेदी करतच नाही. पैसे न खर्च करता छान वेळ जातो.
हे ही एक प्रकारचे विंडोशॉपिंगच ना
हर्पेन सेम हिअर.
हर्पेन सेम हिअर.
पैसे असले तरी जगातली प्रत्येक नवीन गोष्ट प्रत्येक वेळी आपल्याला घेता येणे शक्य नसते>+१
खरं आहे! दुकानांसमोरून नुसती
खरं आहे! दुकानांसमोरून नुसती चक्कर मारायलाही मजा येते. In fact, जेव्हा काही घ्यायचं नसतं तेव्हाच बाजारात/ मॉलमध्ये फिरायला जास्त मजा येते.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
वावे, नेमकं पकडलेत
दुकानांसमोरून नुसती चक्कर
दुकानांसमोरून नुसती चक्कर मारायलाही मजा येते. >>>>+१
एखादी गोष्ट अस्पर्श राहावी , ती मिळून तिचं अप्रूपपण संपू नये असं काहीसे फिलिंग येते >>>> जाई.. भावना सुंदररित्या व्यक्त केल्यात.
भावना पोचल्या जाई मस्त
भावना पोचल्या जाई मस्त लिहिलंय. रीलेट झालं.
मस्त लिहिलयं .
मस्त लिहिलयं .
छान लिहिलंय. मला पण निरुद्देश
छान लिहिलंय. मला पण निरुद्देश बाजारपेठेत हिंडायला आवडतं विंडो शॉपिंग करत. फ्रेश होऊन जातो आपण.
छान लिहिलंय. मला पण निरुद्देश
छान लिहिलंय. मला पण निरुद्देश बाजारपेठेत हिंडायला आवडतं विंडो शॉपिंग करत. फ्रेश होऊन जातो आपण.>>>+१
लेख आवडला.
या आशयाचा शाळेत एक धडा होता. लेखकाला बाजारात फिरायला, निरनिराळ्या वस्तू बघायला आणि जे विक्रेते माल विकत घेण्याची गळ घालतात त्यांच्याशी गप्पा मारायला आवडते याचे वर्णन असलेला.
मस्त लिहिलेय
मस्त लिहिलेय
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
पैसे असले तरी जगातली प्रत्येक नवीन गोष्ट प्रत्येक वेळी आपल्याला घेता येणे शक्य नसते ...+१११
छान आहे. जिव्हाळ्याचा विषय पण
वावे, अगदी!!
मला विंडोशॉपिंग बिल्कुल आवडत
मला विंडोशॉपिंग बिल्कुल आवडत नाही. जी गोष्ट घ्यायची आपली त्या ठराविक वेळी ऐपत नाही तिच्यात उगाच का जीव गुंतवावा असे वाटते.
वा किंबहुना मला जीव न अडकवता अलिप्त राहून विंडोशॉपिंग करणे जमत नसावे.
शॉपिंग करायला मात्र फार आवडते. जी गोष्ट मी वापरणार आहे किंवा घरात कॉमन वापरली जाणार आहे त्या प्रत्येक खरेदीत मला सहभाग घ्यायला आणि ती आपल्या आवडीची घ्यायला आवडते.
मग एखादी शर्ट पॅंट घ्यायला मी ट्रायलचा वेळ पकडून तीनचार तास सहज खर्च करू शकतो कारण एखादी गोष्ट अगदी मनात भरल्याशिवाय घ्यायचीच नाही हे माझे ठरलेले असते. ज्यामुळे बायको माझ्यासोबत यायला नाराज असते. पण काही न घेता नेत्रसुख घेणे वेळ वाया घालवतोय आयुष्यातला असे वाटते. त्यात बघताना मनात एखादी गोष्ट भरली आहे आणि ती आपण घेणार नाही आहोत हि कल्पनाच त्रासदायक वाटते. म्हणून त्या त्रासाला आमंत्रण द्यायला विंडोशॉपिंग अशी कधी केलीच नाही
जिव्हाळ्याचा विषय पण इतकं
जिव्हाळ्याचा विषय पण इतकं थोडं का लिहीलं...
>> लेखाची विंडो शॉपिंग
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
रीलेट नाही करता आलं फार पण हल्लीच्या फॅशन प्रमाणे फॅन क्लब नाव दिलं नाहीस हे एक बरं केलंस!
छान आहे. जिव्हाळ्याचा विषय पण
छान आहे. जिव्हाळ्याचा विषय पण इतकं थोडं का लिहीलं...
+1
ऋन्मेष, प्रत्येक वेळी ऐपतीचाच
ऋन्मेष, प्रत्येक वेळी ऐपतीचाच प्रश्न असतो असं नाही. त्या विशिष्ट वेळी ती वस्तू खरेदी करायची गरजही नसू शकते. किंवा एखादा ड्रेस दिसायला छान दिसतो, पण घातल्यावर आपण छान दिसलो पाहिजे ना!
दुकानात साड्या बघायला आवडतात. पण आपल्याकडून त्या वापरल्या जाणार नाहीत हे माहिती असतं. मग नुसतं पाहण्याचा आनंद घ्यायचा. (विकत घेऊन ती साडी नुसती कपाटात पडून राहिलेली बघण्याच्या दुःखापेक्षा हे नेत्रसुख किती तरी जास्त! )
ऋन्मेष, प्रत्येक वेळी ऐपतीचाच
ऋन्मेष, प्रत्येक वेळी ऐपतीचाच प्रश्न असतो असं नाही. त्या विशिष्ट वेळी ती वस्तू खरेदी करायची गरजही नसू शकते. किंवा एखादा ड्रेस दिसायला छान दिसतो, पण घातल्यावर आपण छान दिसलो पाहिजे ना!
>>>>>>
काहीही खरेदी करायची ऐपत असेल तर असले प्रश्न पडत नाहीत ..
किंवा ऐपत असेल तर फारशी गरज नसलेल्या गोष्टीही बस आवडल्या तर आपलेच मन राखायला घेतल्या जातात ..
प्रश्न ऐपतीचाच असतो
सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद
सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद


सीमंतिनी , फाफटपसारा होईल म्हणून थोडेसे लिहिले
अमित
रुन्मेष , तुम्ही लेख नीट वाचलाय का ? ऐपत असूनही काही गोष्टी घ्यावश्या वाटत नाहीत. त्यांचं अस्पर्शपण तसच राहू देत अस वाटत. वावेनी बरोबर मुद्दा पकडलाय.
छान लिहिलंय जाई. ...
छान लिहिलंय जाई. ...
७-८ वर्षांपुर्वी मी जिथे जॉबला होतो त्याच प्रीमाईस मधे बाजुला शॉपर्स स्टॉप होतं त्याच्या शेजारी @होम मॉल. लंच ब्रेक नंतर आमच्या लंच ग्रुपला मी अशीच विंडो शॉपिंग ची सवय लावली होती. जेवण झालं की आमची स्वारी शॉपर्स स्टॉप च्या एंट्रंस मधून आत घुसायची. आत गेल्या गेल्याच पर्फ्युम चा सेक्शन होता.. असं भारी वाटायचं ना..
आम्ही ४ फ्लोअर्स असणार्या शॉपर्स स्टॉप चा रोज एक एक फ्लोर पालथा घालुन काय काय नवीन आलंय ते बघायचो. अन पाचव्या दिवशी @होम मधे जायचो
. तिथल्या स्टाफ आणि फ्लोर मॅनेजर्सना सुद्धा आम्ही विंडो शॉपिंग करतोय हे समजायचं कारण खरेदी काहीच व्हायची नाही. पण दुपारच्या वेळात अगदी मोजकी गिर्हाईकं आलेली असायची अन त्यांच्या फ्लोर वर आमची ७-८ जणांची उपस्थिती असली की त्यांना मनातुन बरं वाटायचं. आम्ही मजेने त्यांना म्हणायचो की रोज २०-२५ मिनिटं इथे येतोय तर आम्हाला डिस्काउंट देत जा. ते बिचारे खरेच कधी सेल वगैरे असला की आम्हाला आवर्जुन सांगायचे अन आम्हाला आवडणार्या वस्तु आदल्या दिवशीच सिलेक्ट करुन ठेवायला सांगायचे. त्या वस्तु / कपडे ते थोडे आडबाजुला ठेऊन द्यायचे अन मग सेलच्या दिवशी आम्ही गर्दीत घुसुन आपल्या वस्तु आरामात काढुन घ्याय्चो अन तेही डिस्काउंट मधे.
तुमचा लेख वाचुन माझ्या आठवणी जाग्या झाल्या
ऐपत असेल तर फारशी गरज
ऐपत असेल तर फारशी गरज नसलेल्या गोष्टीही बस आवडल्या तर आपलेच मन राखायला घेतल्या जातात ..>> वरचं माझं साडीबद्दलचं वाक्य वाचलंस ना? किंमत परवडणारी होती आणि साडी आवडली म्हणून मी ज्या साड्या घेतल्या त्या फारशा नेसल्या जात नाहीत ( इन जनरल साड्याच फारशा नेसल्या जात नाहीत) यावरून धडा घेऊन मी साड्या विकत घेणं टाळते.
असे धडे आपण सगळेच शिकतोच की कधी ना कधी.
वा ! डीजे मस्तच.
वा ! डीजे मस्तच. विंडोशॉपिंगचा फायदा झाला म्हणायचा तुम्हाला
हो ना
हो ना
छान लिहिलंय! रिलेट झालं एकदम!
छान लिहिलंय! रिलेट झालं एकदम! Enjoy the journey and not the destination हे खरेदीच्या बाबतीत अगदी लागू पडतं. आपल्याला काहीही घ्यायचं नाहीये आणि मैत्रीणीला सोबत म्हणून शॉपिंगला जाणे यात छान वेळ जातो.
मलाही विंडो शॉपिंग खूप आवडतं
मलाही विंडो शॉपिंग खूप आवडतं
कधी काळी एकटीच परदेशी होते तेव्हा वीकेंड ला आवडता कार्यक्रम. सी अँड ए मध्ये जाऊन सर्व लेटेस्ट आलेले स्कर्ट ट्राय करून बघायचे.मग अगदी उगीच स्टाफ ला ताप दिला असं वाटायला नको म्हणून 50 सेंट-1 युरो चे स्टॉकिंग विकत घेऊन बाहेर.
दुकाने, मॉल च्या ट्रायल रूम ला रांगा असल्याने शॉपिंग मधला रस कमी होत गेला.10 मिनिटात दुकानात घुसून रंग जाणार नाही, एम्ब्रॉयडरी खराब होणार नाही असा दणकट कुर्ता/टॉप विकत घेऊन बाहेर पडायचं इतकं ध्येय राहिलं.
करोना काळात ऑनलाईन विंडो शॉपिंग बरंच चालू आहे.आय टोकरी वर रोजच 3-4 सुंदर ओढण्या कार्ट मध्ये टाकून ठेवते.टीएस खादी वर लीनन च्या साड्या टाकून ठेवते.आणि काहिच घेत नाही.
मलाही आवडतं विंडो शाॅपिंग
मलाही आवडतं विंडो शाॅपिंग पण जाणं होत नाही आता उत्साहही कमी झालाय. गरजाच कमी झाल्यात त्यामुळे बाजारात कमीच जावं लागतं . दुसर्यांच्या खरेदीत सहभागी व्हायला जास्त आवडतं. ...
साड्यांच्या बाबतीत वावेशी सहमत
लेख आवडला.
विंडो शॉपिंग बाबत ऋन्मेषशी
विंडो शॉपिंग बाबत ऋन्मेषशी सहमत. जी गोष्ट घ्यायची नाही त्यात वेळ घालवायचा नाही.
सहमत, विंडो शॉपिंग हा वेळ
सहमत, विंडो शॉपिंग हा वेळ घालवण्याचा खूप छान प्रकार वाटतो मला. शिवाय आजकाल काय काय ट्रेंड्स सुरू आहेत याची माहिती मिळते हा एक साईड इफेक्ट.
माझी विंडो शॉपिंगची सुरवात स्वित्झर्लंडमध्ये झाली. मी एका लहान गावी होतो आणि संध्याकाळी ट्रेनिंग वरून परतल्यावर रात्री जेवायची वेळ होई पर्यंत मोकळा वेळ असायचा. बस पास होता, त्यावरील रूट वरील कुठल्याही गावात कितीही वेळा जा ये करता येत असे. उन्हाळा होता तेव्हा रात्री उशिरा पर्यन्त उजेड असायचा. बस पकडून कधी या गावात कधी त्या गावात जे काही बघण्यासारखं असेल तर बघून भूक लागे पर्यन्त विंडो शॉपिंग करत फिरायचं. मग जेवून परतायचं.
आता सुद्धा काही मॉल्स , स्टोअर्समध्ये आत जाऊन मस्त पैकी फिरून काहीही खरेदी न करता परत यायला आवडतं.
ऐपत असेल तर फारशी गरज
ऐपत असेल तर फारशी गरज नसलेल्या गोष्टीही बस आवडल्या तर आपलेच मन राखायला घेतल्या जातात .
>>>
असं काही नसतं. मला स्वतःला स्वतः साठी विंडो शॉपिंग आवडते तर इतरांसाठी शॉपिंग करायला आवडते.
ज्यांना जनरली पैसे जपून वापरायची सवय असते ( कंजूसगिरी नाही वा अगदी कटकसरही नाही पण उगाच मनाला वाटलं म्हणून पैसे उडवू नये इतकी जाण असते) असे लोकं ऐपत आहे म्हणून वस्तू घेत सुटत नाहीत.
मी पण विंडो शॉपिंग फॅन गटातली. लेख बराच रिलेट झाला.
मधे एकदा जवळच्या नात्यातल्या
मधे एकदा जवळच्या नात्यातल्या एका लग्नासाठी एक विशिष्ट प्रकारचा ड्रेस घ्यायचा होता (सगळ्या बायकांनी सेम प्रकारचा घालायचं ठरलं होतं) तेव्हा इतक्या दुकानांमध्ये जाऊन इतके ड्रेसेस घालून बघितले की मला तेव्हापासून अक्षरशः कंटाळा आलाय कपडे ट्राय करण्याचा! एकूणच कंटाळा आला कपडे खरेदी करण्याचा. तेव्हापासून वर अनुने लिहिलंय तसं जेव्हा गरजच असेल तेव्हा " दुकानात घुसून रंग जाणार नाही, एम्ब्रॉयडरी खराब होणार नाही असा दणकट कुर्ता/टॉप विकत घेऊन बाहेर पडायचं इतकं ध्येय राहिलं."
आपल्याला काहीही घ्यायचं नाहीये आणि मैत्रीणीला सोबत म्हणून शॉपिंगला जाणे यात छान वेळ जातो.> > +१ जिज्ञासा
फक्त कपडेच नाही, तर पुण्यात लक्ष्मी रोडवर किंवा इथे मल्लेश्वरम भागात रस्त्यावर विकायला मांडलेल्या शोभेच्या वस्तू, अगदी ज्यूटच्या पिशव्या, कानातले-गळ्यातले, सुंदर प्रकारे रचलेली सफरचंदं-संत्री-अंजिरं वगैरे बघायला किती तरी मजा येते. तो मटारावरचा सरनोबत आयडीचा लेख आहे तो वाचून मंडई किंवा मार्केट यार्डातलं विंडो शॉपिंगही किती मजेचं असतं ते आठवलं.
Pages