दिवाळी

Submitted by Santosh zond on 16 November, 2020 - 00:12

का सगळ्यांसाठी सारखी नसते
स्वतःची सावलीच तीथ स्वतःसाठी पारखी असते

नसला दिवा काहींच्या दारे
तिथं असतात की चंद्र तारे

असतो कीतीतरी जणांचा
तो धुर करुन निसर्गाला संपवण्याचा छंद
कुठे भेटतो सगळ्यांना तो
नव्या खरेदीचा आनंद

स्वप्न असते चिमुकल्या डोळ्यांचे
पाय आपसूकच चार चाकी जवळ जातात
मन मोडून तेव्हा बाबांची
सायकलच मोठी सवारी होते

एकदिवस पावलांची होईल वाट
नक्कीच उगवेल तुझ्या स्वप्नांची पहाट
तेव्हा मिळेल तूला सगळं काही
फक्त नाराज होऊन बसायचं नाही

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users