हिंदी. मराठी
-----. -----------
१९) दिखावा. १९) देखावा
२०) गर्व. २०) अभिमान
२१) धन्यवाद. २१) आभार
(मी आपले धन्यवाद. ( मी आपला आभारी आहे)
करतो)
२२) महानता. २२) महत्त्व
२३)सुंदरता. २३) सौंदर्य
२४) आवाज देणे. २४) हाक मारणे
(आवाज देना चे (साद घालते हा काव्यातला
भाषांतर.) शब्द आहे. बोलताना वापरत
नाहीत. )
२५)व्यस्त. २५) व्यग्र. मग्न
२६) नमकीन. २६) खारं
२७) थोपवणे. २७) लादणे
(मूळ हिंदी शब्द थोपना
चे मराठी करणं)
२८) सजग. २८) सावध, जागरुक
२९) पदार्थ बनवतात २९) पदार्थ करतात
(मराठीत बनवणे म्हणजे
फसवणे)
३०) लालवाला. ३०) लाल रंगाचा
निळावाला. निळ्या रंगाचा
३१) घट्ट मित्र. ३१) जिवाभावाचा मित्र
३२) ....सिलेक्टर राहिले. ३२) सिलेक्टर होते
( सिलेक्टर रहेचे मराठी
करण)
३३) प्रधानमंत्री. ३३) पंतप्रधान
३४) तोंडावर पाडणे. ३४) तोंडघाशी पाडणे
(मूळ हिंदी रचना मूॅंहपे
बल गिरा दिया चे
भाषांतर)
३५) चमकवणे. ३५) चकचकीत करणे
(मूळ हिंदी शब्द
चमकाना चे
भाषांतर)
३६) बुद्धीवान ३६) बुद्धीमान
३७) बोलणं . ३७) म्हणजे "म्हणणं "
(बोलना चे भाषांतर)
(दुसऱ्याचं बोलणं, आपलं
म्हणणं असतं. )
३८) मी बोलली मी बोलले
३९) विश्र्वास तोडणे विश्र्वासघात करणे
.(..आपका विश्र्वास
तोडेंगे चे भाषांतर)
४०) माझी मदत करा. ४०) मला मदत करा
(मेरी हद्द करो चे
भाषांतर. )
४१) -----. ४१) (भावणे हा शब्द
बोली भाषेतला शब्द
नाही तर तो वाङ्मयीन
आहे.मूळ शब्द भावना
पण हल्ली फार
वापरला जातो.खरंतर
भावणे म्हणजे आवडणे.
पूर्वी बाहुली ऐवजी भावली
म्हणायचे.ते जास्त बरोबर
आहे. कारण भावनेनी
भरलेली , ती भावली. )
हे वि ष यां त र आहे.
४२) मी आली. ४२) मी आले
(मैं आयी चे भाषांतर )
४३) माझ्या सोबत. ४३) माझ्याशी
(मेरे साथ चे भाषांतर)
४४) गंभीरता. ४४) गांभीर्य
४५) भाग्यशाली. ४५) भाग्यवान
४६) आध्यात्मिक ४६) अध्यात्मिक
टंकलेखन फारच जवळ आले आहे.
टंकलेखन फारच जवळ आले आहे. कृपया समजून. घ्यावे. असे टंकलेखन कसे करावे हे सांगावे.
ह्यातले काही आधीच्या धाग्यात
ह्यातले काही आधीच्या धाग्यात झालेले आहेत, काही मीच सुचवले होते. नवीन धागा का काढावासा वाटला?
टंकलेखन फारच जवळ आले आहे >>
टंकलेखन फारच जवळ आले आहे >> म्हणजे?? कुणाच्या जवळ?
हरचंद पालव
हरचंद पालव
टंकलेखन फारच जवळ आले आहे,म्हणजे हिंदी शब्द आणि मराठी प्रतिशब्द यांच्यात काहीच अंतर नाही. आपल्या सगळ्यांच्याच प्रतिसादांतून शब्द घेतले आहेत कारण मला सगळेच शब्द आठवणार नाहीत आणि यादीमध्ये जेवढे शब्द समाविष्ट होतील तेवढं चांगलं ,म्हणूनच प्रतिसादांतूनही शब्द घेतले आहेत. हा एकच हेतू आहे. कृपया गैरसमज नसावा. प्रतिसादाबद्दल आभार.
मला तरी तुमचे हिंदी आणि मराठी
मला तरी तुमचे हिंदी आणि मराठी शब्द जवळ (जोडून) दिसत नाहीयेत. किमान एक स्पेस दिसते आहे. तुम्हाला टॅब द्यायचा आहे का मध्ये? किंवा मेजीकृत (tabulate) करायचे आहे का?
होय टॅब्युलेट कसं करतात ते
होय टॅब्युलेट कसं करतात ते सांगा. टाईपरायटर वरचं माहीत आहे.
मिरींडा, एक सुचवू का? तुमचा
मिरींडा, एक सुचवू का? तुमचा पहिला धागा तुम्हाला एक महिनाभर संपादीत करता येईल. तर त्याच धाग्याच्या मजकूरात या नवीन शब्दांची भर घालत राहीलात तर सर्व एकत्र सापडणे सोपे जाईल. संपादन करताना नवीन मजकूर वरती घातलात तर पुन्हा वाचणाऱ्यांना कमी स्क्रोल करावे लागेल. हवं तर तारीख घालून लिहा म्हणजे अजून सोपे जाईल.
जिज्ञासाशी सहमत
जिज्ञासाशी सहमत
' सजग ' ह्या शब्दाचा अर्थ
' सजग ' ह्या शब्दाचा अर्थ अलीकडे ' mindful' असा घेतला जातो.
हीरा , मी aware असा घेते.
हीरा , मी aware असा घेते. (सजग)
Mindful , मनःपूर्वक होईल का?
गांभीर्य ---गंभिरता (हिंदी)
पंतप्रधान--- प्रधानमंत्री(हिंदी)
भाग्यवान---भाग्यशाली (हिंदी) ,
तसंच बुद्धिमान
बुद्धिमान की बुद्धिवान कुठले अधिक योग्य आहे? की सारखेच आहे.
हिंदीत अध्यात्मिक आणि मराठीत आध्यात्मिक आहे का ?
मी नेहमीच अध्यात्मिक असंच लिहिते. चूक आहे ना ,
आता सुरू केले आहे योग्य रूप. पण मराठीत दोन्ही वारंवार आढळते.
तसं संसार - संसारिक (हिंदी) , सांसारिक (मराठी)
तसंच अदिती हे नाव आता आदिती (मराठी भाषिक सुद्धा) असेच म्हणतात , आणि आदित्यला मात्र अदित्य म्हणतात हिंदी भाषिक.
अस्मिता, जसे प्रसंग-
अस्मिता, जसे प्रसंग- प्रासंगिक तसेच अध्यात्म- आध्यात्मिक असावे.
बाकी आधीच्या धाग्याच्या प्रतिसादात bhar padali asati tar बरे झाले असते, एकाच ठिकाणी नवे शब्द कळायला मदतच झाली असती
बुद्धिमान योग्य आहे. आकारांत
बुद्धिमान योग्य आहे. आकारांत आणि अकारांत शब्दांना वान लागतो आणि बाकी मान.
विशेषणांपासून भाववाचक नाम होताना पहिल्या अक्षराचा गुण होऊन नंतर य लागतो. ही भाववाचक नामे मराठीत अधिक रूढ आहेत. हिंदीत त्याऐवजी ' ता' वापरतात, ज्यासाठी गुण व्हावा लागत नाही. उदा. वैचित्र्य, माधुर्य, सातत्य, चातुर्य वगैरे
हीरा, तुम्ही सांगितलेला नियम
हीरा, तुम्ही सांगितलेला नियम संस्कृतात आहे, पण मराठीत तो तसाच्या तसा घेतला/लागू केला आहे का?
शिवाय संस्कृतातही लक्ष्मीवान् असा शब्द आहे, लक्ष्मीमान् नाही. बहुधा अपवाद असावा. तसेच यशस् चे यशस्वान् होते, पण आयुस् चे आयुष्मान् होते.
मजा म्हणजे गरज ह्या अरबी/फारसी मधून आलेल्या शब्दाचेही आपण गरजवंत केले आहे. संस्कृतात -वन्त असे बहुवचनी रूप होईल, पण आपण एकवचनी वापरतो (गरजवंताला अक्कल नसते - इथे आपण जवळपास फारसीच बोलत आहोत). तसेच भगवंत देखिल आपण एकवचनी वापरतो. त्यावरून नवीन हिंदी मराठी जोडी सुचली: 'हे भगवान (हिंदी) - हे भगवंता (मराठी)'