वनस्पती आणि औषधे हा एक मोठा व्यापक विषय आहे. त्यातील सर्वच बाबी वर लिहिणे केवळ अशक्य आहे.
कुतूहल शमन आणि ह्या विषय वरील विचारांचे आदान प्रदान हाच निव्वळ ह्या लेखनाचा हेतू आहे.
औषधे हि माणसाचे आरोग्य राखणे तसेच सुधारणे ह्या करिता वापरली जातात. जनावरां साठीही माणूस औषधे बनवितो. ह्या खेरीज अंतर्गत प्रेरणेने जनावरे मनाने च कधी कधी गवत, वनस्पती वगैरे खातात.
ह्या लेखात मी वनस्पती जन्य औषधाची केवळ तोंड ओळख करून देत आहे.
आम्ही फार्मासिस्ट, औषधे हि दोन ढोबळ भागात विभागतो.
एक म्हणजे शरीरावर परिणाम करणारी औषधे म्हणजे ज्यांना औषधी गुण आहे. त्यांना आम्ही ऍक्टिव्ह ड्रग असे म्हणतो. दुसरा ढोबळ प्रकार म्हणजे, ज्याला खास असा औषधी गुण नाही, पण औषध म्हणजेच गोळ्या, सिरप, चूर्ण, लोशन, क्रीम वगैरे फॉर्मुलेशन बनवण्यासाठी वापरले जातात असे पदार्थ. दुसऱ्या प्रकाराला आम्ही एक्ससिपीएंट असे म्हणतो. (ह्या पुढील लेखात मी आता ऍक्टिव्ह आणि एक्ससिपीएंट असेच शब्द वापरणार आहे)
वनस्पती पासून हे दोन्ही मिळतात. ऍक्टिव्ह आणि एक्ससिपीएंट पण. किंबहुना एक्ससिपीएंट हे बऱ्याचदा वनस्पती, प्राणी किंवा खनिज अश्या नैसर्गिक साधन संपती पासूनच मिळालेले असतात.
वनस्पती पासून मिळालेले ऍक्टिव्ह औषधे:
वनस्पती जेव्हा विकसित होत गेल्या आणि त्यांची उत्क्रांती होत गेली. तस तसे त्यांतील रसायने बदलत गेली.
आधी केवळ ग्लुकोज व साधी रसायने ( Primary metabolite) बनवून त्याचे चालत होते. पण आता त्या हि रसायने साठवू शकत होत्या. बऱ्याचदा ह्या रासायनिक प्रक्रिया होत असताना अशी रसायने बनत होती (by products ) कि त्यांचा वनस्पतीला वाढी साठी फारसा उपयोग नव्हता. पण हीच रसायने आता बीज प्रसार, फळ धारणा आणि संरक्षण ह्यासाठी उपयोगी पडू लागली. हि च आपली वनस्पती जन्य औषधे (secondary metabolite).
हि औषधे पूर्ण झाडात किंवा केवळ पाने, फळे, बिया, साल, मूळे, कंद ह्यात साठवलेली असतात. ऋतू, हवामान, झाडाचे भौगोलिक स्थान आणि झाडाला मिळालेली पोषक द्रव्ये ह्यामुळे ह्यांचे प्रमाण कमी, जास्त होते. हि औषधी द्रव्ये अगदी कमी प्रमाणात तयार होतात. पण अत्यंत गुणकारी असतात.
त्यांचा विधायक वापर माणसाने केला आणि वैद्यक शास्त्र उदयास आले. लक्षात घ्या मंडळीनो. आपले आधुनिक वैद्यक ज्याला आपण allopathy म्हणतो ह्याचा पाया हा वनस्पती जन्य औषधांवर उभारलेला आहे.
आत्ता वापरात असलेली जवळपास २० टक्के allopathy औषधे हि वनस्पती किंवा निसर्ग पासून मिळवलेली किंवा नैसर्गिक तत्वांवर प्रक्रिया करून तयार केलेली आहेत. आणि एक्ससिपीएंट हि तर ९० टक्के नैसर्गिक च किंवा नैसर्गिक तत्वांवर प्रक्रिया तयार केलेली असतात.
खरे तर ह्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी एक जन्म देखील अपुरा आहे. कित्येक वर्षे उत्क्रांत होऊन वनस्पतीनी हि रसायने बनवली आहे, बनवत आहेत.
पुढील लेखात मी ह्यावर अजून लिहीन.
वनस्पती आणि औषधे
Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 8 October, 2020 - 11:22
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कुतूहल चाळवणारा लेख. थोडासा
कुतूहल चाळवणारा लेख. थोडासा विस्तृत असता तरी चालले असते.
यापुढचे लेख थोडे मोठे असावे.
छान,
छान,
पु ले शु
एक विनंती, की 'allopathy' हा कालबाह्य आणि अशास्त्रीय शब्द न वापरता त्याला ' Modern Medicine' च म्हणावे .
केशराच्या गुणधर्माबद्दल लिहा.
केशराच्या गुणधर्माबद्दल लिहा.
हिमालयातील औषधी वनस्पतींबद्दल उत्सुकता आहे.
संजिवनी?
कुटकी
दारुहळदी.
डॉक्टर कुमार मी मॉडर्न
डॉक्टर कुमार मी मॉडर्न मेडीसिन हाच शब्द वापरीत ईथुन पुढे.
मला लेखात सुधारणा सुचवत जा.
हिरा मी मोठे लेख लिहिण्याचा
हिरा मी मोठे लेख लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. जरा सराव झाला की जमेल.
Srd
Srd
मी आयुर्वेदिक वनस्पती तज्ञ नाहीये. मी फार्मसिस्ट आहे. मी वनस्पती पासून मिळणाऱ्या औषध संशोधन करीत आहे. Pharmacognosy हा विषय शिकवते.
आयुर्वेदिक माहिती तुम्हाला वैद्या कडून च मिळेल.
मी फार फार तर ह्या औषधाची pharmacognosy अभ्यास करून सांगू शकते.
इंटरेस्टिंग. पुभाप्र
इंटरेस्टिंग. पुभाप्र
दोन तीन उदाहरणे दिलीत पुढच्या
दोन तीन उदाहरणे दिलीत पुढच्या लेखात म्हणजे कळेल.
Interesting! वाचायला आवडेल या
Interesting! वाचायला आवडेल या विषयी. पुभाप्र!
Interesting. पुढील भागाच्या
Interesting. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
Interesting. पुढील भागाच्या
Interesting. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
Interesting. पुढील भागाच्या
Interesting. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. + 1
छान आहे लेख. ह्या विषयावर
छान आहे लेख. ह्या विषयावर अजून वाचायला आवडेल.
छान
छान
छान! माहितीपूर्ण लेख...
छान!
माहितीपूर्ण लेख...