Submitted by तो मी नव्हेच on 28 July, 2020 - 06:42
येत्या जन्मी पक्षी। करि मला देवा।
वैराग्याने खोपा। सोडे सहजी।।
येत्या जन्मी देवा। कर वृक्ष वल्ली।
स्थिर कर्मयोगी। दुजा नाही।।
वाघरू होईन। आनंदाने देवा।
पोटासाठी हिंसा। धर्मची तो।।
नर जन्मी देवा। दिली मज बुद्धी।
परि मनी भिंगरी। बांधिली गा।।
नर जन्म दिधला। उपकार देवा।
घेईन केशवा। नाम तुझे।।
-रोहन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमचं पूर्ण नाव प्लीज सांगाल
आत्मज्ञान प्राप्त झाल्या सारखं लिहिलं आहेत रोहन सर !
धन्यवाद प्रगल्भ जी.
धन्यवाद प्रगल्भ जी.
आत्मज्ञान प्राप्त झाल्या
आत्मज्ञान प्राप्त झाल्या सारखं लिहिलं आहेत रोहन सर !.>.>>.>+१
धन्यवाद प्रभुदेसाई जी
धन्यवाद प्रभुदेसाई जी
पहिल्या कडव्यामध्ये वैराग्य
पहिल्या कडव्यामध्ये वैराग्य मागितले आहे .दुसऱ्या कडव्यामध्ये वृक्षासारखा कर्मयोग मागितला आहे तर तिसऱ्या कडव्यामध्ये हिंसेमध्ये लपलेला असला तरी ही चालेल पण धर्म मागितला आहे .
पुढील कडव्यात नरजन्म मिळाल्याची भानआहे त्यामुळे मिळालेल्या बुद्धीचे भान आहे मनाचेही भान आहे.
नरजन्म मिळाल्यामुळे मुखांमध्ये देवाचे नाव येथे हा धन्यवादही प्रकट होतो .
पण जर आता सर्व श्रेष्ठ नर जन्मामध्ये ,ते ही मुखांमध्ये नाव असताना, पुन्हा झाड वाघरू ,पक्षी होण्यामध्ये स्वारस्य का असावे हे कळत नाही .हे सारे तर नर जन्मातही प्राप्त करून घेता येते तेही जाणीवपूर्वक साधनेने .पशु पक्षांमध्ये काही गुण असतात पण ती त्यांची मूळ प्रवृत्ती असते नाही का ?
प्रथमतः तिकोणे सर मनापासून
प्रथमतः तिकोणे सर मनापासून धन्यवाद.
आपण म्हणल्याप्रमाणे मनुष्येतर जीवांमध्ये असणारे गुण हे त्यांचे मूलभाव असतातच.
परंतु मनुष्य जन्मी सर्वोच्च स्थान वैराग्यास अन् क्रमप्राप्तीने मोक्षाला आहे़.... अन् याची नुकतीच जाणीव झालेल्या व्यक्तीला वैराग्य मोहवते...अन् तिथे कसे पोहचावे हे शोधताना त्यास कर्मयोगाची वाट दिसते (तसे कर्म, हठ, नाम असे तीन योग असले तरीही इथे मी तिन्ही साठी मिळून कर्मयोग असे उल्लेखलेले आहे कारण हठ अन् नाम हेही एक कर्मच आहे असे मला वाटते)
पण हा कर्मयोग प्राप्त करण्यासाठी त्याला आपण धर्म पाळला पाहिजे याची जाणीव होते... मनुष्य धर्म... मनुष्य म्हणून बुद्धी मिळाली सर्व विचार करायला पण त्यासोबत अतिचंचल मन लाभले आहे... मग ही चंचलता कशी कमी करता येईल हे शोधताना त्यास कोणत्याही मार्गे गुरुकृपा होऊन नाम घेण्याचा मार्ग गवसतो... अन् हे लक्षात येते की नाम घेणे ही पहिली पायरी आहे मोक्षप्राप्तीची..
अन् पक्षी, वृक्ष, वाघरु होण्याची इच्छा ही नाम मार्ग गवसण्यापूर्वीच्या इच्छा अथवा मागण्या आहेत.
अन् दुरून प्रथम शिखर दिसते, पाया जवळ गेल्यावर म्हणून हा क्रम योजिला आहे कडव्यांचा.
यात काही चुकले असल्यास कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद.