क्लिक... क्लिक... क्लिक...
"वाह! ब्युटीफुल."
एका निळसर झाक असलेल्या धोतर्याच्या फुलावर बसलेले, लाल ठिपकेदार फुलपाखरू पिनीने अलगद टिपले होते. आपला डी एस एल आर कॅमेरा गळ्यात अडकवत तिने एक समाधानाचा सुस्कारा सोडला तेव्हा कुठे तिच्या लक्षात आलं, कि आपला फोन केव्हापासून वाजतो आहे. स्क्रीनकडे पाहून एक हलकीशी स्माईल देत तिने फोन उचलला.
"गुडssss मॉर्निंग. एक परफेक्ट शॉट आणि एका परफेक्ट माणसाचा फोन. क्या बात है? सकाळी-सकाळी कॉल."
"काय करणार. त्या परफेक्ट शॉटच्या नादात मला विसरत चालली ना तू? " कॉफी मग टेबलवर ठेवत विराजने लॅपटॉप बंद केला.
"एक्सट्रीमली सॉरी... खरच मी रात्री खूप वेळ ट्राय करत होते, बट इकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि सकाळी शूटसाठी निघाव लागलं. सो राहून गेलं."
"ओके हनी. नो प्रोब्स. बाय द वे, रिटर्न केव्हा येतेस?"
"रात्रीची फ्लाईट आहे. सो अर्ली मॉर्निंग भेटूया. प्रॉमिस."
"याह! डन... मिस यू हनी. एक क्लाईंट कॉल वेटिंगवर आहे नंतर बोलूयात प्लिज."
"ओके. मिस यू टू. बाsss बाय." म्हणत पिनीने फोन कट केला. तिचा डोक्यात विचारचक्रे फिरू लागली.
'आपण कालपासून विराजला एकही फोन केला नाही. खरच माझ्या परफेक्ट शॉट च्या नादात विसरते की काय मी त्याला? आणि हो उद्या भेटल्यावर काय सांगू? त्याने दोनच ऑपशन्स माझ्यापुढे ठेवलेत. 'एकतर एखाद्या वर्षाचा करिअर ब्रेक किंवा लग्न पोस्पॉन करायचं. हे कॉम्प्रोमाइज फक्त मलाच करावं लागणार. का? तर, तो एका जागेवर सेटेल आहे, आणि मी माझ्या फोटोग्राफीसाठी इकडे तिकडे फिरत असते. म्हणजे झालं तर, याचा अर्थ असा आहे की, थोडक्यात मी त्याला , म्हणजेच आमच्या रिलेशनशिपला वेळ देऊ शकत नाही.
रेवा म्हणाली ते एका अर्थी बरोबर होत. 'मी सुध्या एक नामांकित फोटोग्राफर आहे. माझं सुद्धा करिअर आहे. याकडे विराज जाणून बुजून दुर्लक्ष करतोय. ????'
दोन महिन्यांनी आमचं लग्न आहे, आणि तो स्वतःच्या ऑफिस कामासाठी आता काहीच दिवसात म्हणजे १ जुलैला टर्कीला जायला निघणार आहे. ते पण एक महिना. 'पोस्पॉन कर म्हणाले,' तर 'अजिबात पॉसिबल नाही,‘ म्हणत हात वर केले. म्हणजे याच करिअर महत्वाचं आणि माझं काय?' रोजचे हेच विचार तिच्या मनात यायचे. पण शेवटी, 'तोच मला आठवणीने फोन करतो. काळजी करतो. मग ठीक आहे.' या वाक्याने सगळ्याचा शेवट व्हायचा.
*****
"हॅलो, हो जस्ट बॉक्स पॅक केला आणि मी निघतेच आहे."
"ओके. मी सुध्या निघालो. पण तो बॉक्स कशासाठी?"
"भेटल्यावर सांगते."
"ओके हनी."
"बाय."
फोन कट करून पिनीने एकदा बॉक्सवर नजर फिरवली. 'एका मोठ्या बॉक्समध्ये सगळ्या वस्तू, विराजने दिलेले सगळे गिफ्ट्स पॅक करून झाले. पण आठवणींचं काय? त्या पॅक करून ज्याच्या त्याला रिटर्न करता येत नाहीत ना. काश तस करता आलं असत.' या विचारात तो बॉक्स डिकीत ठेवून तिने गाडी स्टार्ट केली.
*****
'माझ्या करिअरसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. तसही अजून आमचं लग्न झालेलं नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाही. तेव्हा गोष्टी पुढे वाढू न देता आहेत तिथेच थांबवणे योग्य. विराजला कल्पनासुद्ध्या नसेल याची, पण हरकत नाही. मी समजावेन त्याला. समजून घ्यावच लागेल. यापुढे मला कोणतंही कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये आणि त्याच्यासाठी तर माझ्यापेक्षा त्याच करिअर महत्वाचं आहे, हे सुध्या मला वेळीच लक्षात आल, ते एक बार झालं. दरवेळेसची भांडण आणि मग रुसवे फुगवे, कंटाळा आलाय याचा. अजिबात इमोशनल होणार नाहीये मी आणि आज सगळ्याचा शेवट करणार आहे.'
स्वतःशी चाललेली बडबड थांबवून पिनीने गाडीला ब्रेक लावला. त्याच्या गाडीच्या बरोबर विरुद्ध दिशेला गाडी पार्क करून ती उतरली.
विराजची गाडी कॅम्प रोडला एका बाजूला उभी होती. त्या दोघांचं या आधीच रोजचं भेटण्याचं एकमेव ठिकाण... डोक्यावरच्या उंच आभाळात मस्त बहावा चोहोदिशांत बहरत असे, त्याच्या फुलांच्या पिवळसर सडयाची चादर ओढलेला तो सुमसान रस्ता, म्हणजे पिनीची आवडती जागा. ते दोघे तिथे भेटले की पाच-दहा मिनिटे ती अगदी-अगदी शांतपणे तल्लीन होऊन त्या बहाव्याच्या आस्वाद घ्यायची. समोर हाताची घडी घालून गाडीला टेकलेलया अवस्थेत विराज तिचीच वाट बघत होता. ती त्याचा दिशेने चालत येईपर्यंत पावसाची एक हलकीशी सर उडत-उडत त्यांच्या डोक्यावरून निघूनही गेली होती.
"काय परफेक्ट टायमिंग आहे. १५ मिनिटे झाले, मी इथे तुझी वाट बघत थांबलोय, आणि तुझी एंट्री झाली नाही तोच पाऊस सुरु झाला. हा रस्ता, भरभरून फुलणारा बहावा, तू आणि पाऊस...काहीतरी गुपित आहे राव."
एक हलकीशी स्माईल देत विराजने तिच्या नाकावर लांबूनच एक टिचकी मारली.
"हा शांत रस्ता, भरभरून फुलणारा बहावा, वाट बघणारा तू, अकाली बरसणारा पाऊस आणि नेमहीच उशीरा येणारी मी, हेच तर गुपित आहे ना."
तिही हाताची घडी घालत त्याच्या शेजारी येऊन गाडीला टेकली.
"म्हणजे ऍग्री आहेस तर, तुला नेमहीच उशीर होतो."
"कदाचित यापुढे मला उशीर होणार नाही. आणि तुला कधीच वाट पाहावी लागणार नाही." आपल्या हाताची थरथर थांबवण्याचा आटोकाट पर्यंत करत पिनीने डायरेक्ट विषयाला हात घातला.
"थॅट्स गुड अॅन्ड एक्सपेक्टेड, मी सुध्या तेच म्हणतो. ऑल इज वेल ना, देन वि कॅन थिंक अबाउट इट."
'म्हणजे तू सुद्धा तोच विचार करतोयस?" पिनीने अती आच्छर्याने प्रश्न केला.
"फक्त विचार नाही. मी तर लन्गाची डेट सुध्या कन्फर्म करणार होतो. बट विचार केला, आधी तुझं शेड्युल कसं आहे ते बघून ठरवूयात. काय म्हणते?"
आपल्या खिशातील किटकॅट आणि एक छोटस रेड रोज तिला देत, विराजने एक स्माईल दिली. पिनीला काय बोलावे सुचेना. आता कुठे तिच्या लक्षात आलं, की आपण एक विचार करतोय, आणि हा तर दुसराच विचार करतोय. ते रेड रोज नाजूक हाताने गोंजारत तिने सेकंदासाठो डोळे मिटले. सगळी शक्ती एकवटून आता ती सज्ज झाली.
"मी काय म्हणते विराज. बी सिरिअस अँड प्रॅक्टिकल. बघ...हल्ली आपली रोज भांडण होतात. एकमेकांच्या खूप साऱ्या गोष्टी एकमेकांना खटकतात, आपलं प्रोफेशनही डिफ्रन्ट आहे, त्यामुळे नंतर कदाचित आपण एकमेकांना जास्त वेळही देऊ शकणार नाही. नंतर हेच छोटे छोटे प्रॉब्लेम्स मोठे होत जातील आणि ताण-तणाव वाढेल. सो... " तिने एक दीर्घ श्वास घेतला पण वाक्य पूर्ण करण्याचा आधीच त्याने रागाने तिच्याकडे बघत प्रश्न केला.
"सो वॉट? हान. हे सगळं होतच असत गं. म्हणून तर आपण गेली तीन-चार वर्षे थांबलो ना. अजून थांबायचं असं म्हणायचं आहे का तुला? आणि किती वेळ थांबायचं ? त्याने प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील?"
पिनीला काय बोलावं आणि याला आपला डिसिजन कसा समजवावं हेच कळेना. तिने आपल्या बोटातली एंगेजमेंट रिंग हातात काढून ती घट्ट मुठीत आवळली. विराजला परत देऊन सरळ इथून निघून जाऊया, या विचारात असतानाच एक लखलखती वीज कडाडली, आणि धो धो करून तोच अकाली पाऊस पुन्हा एकदा बरसू लागला. विराजला काही कळायच्या आत पिनीने उघडली मूठ तशीच दाबली. "गाडीत बसून बोलूया." म्हणत ती आपल्या गाडीकडे वळणार तोच विराजने तिचा हात पकडला होता.
"थांबते का? थोडं भिजूया म्हणतो आज. त्याने किमान तुझ्या मनावर जमा झालेले मळभ वाहून जाईल."
"पण तुला पाऊस आवडत नाही ना?" म्हणत पिनीने आपला हात सोडवून घेतला.
"पाऊस मला आवडत नाहीच. पण तू आवडतेस. आणि तुला आवडत असलेली प्रत्येक गोष्ट मी आवडून घेतो."
त्याच्या त्या शब्दासरशी पिनी गर्रकन मागे वळली होती. "काल एक तास भांडत होतो आपण. त्याने माझी फॅमिली सुध्या डिस्टर्ब् आहे. हल्ली हे असं रोजच होतंय. त्यापेक्षा इथेच थांबूया हे सगळं."
जवळ येत एक बोट पिनीच्या ओठांवर ठेवत विराजने तिला चुप केले. "मी एक वेगळा विचार करतोय, आणि तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरु आहे. त्याचा विचारही मी करु शकत नाही. सगळं इथेच थांबवणं, हा एकच पर्याय नाहीये. सो थिंक पॉसिटीव्ह. थोडं तुझं थोडं माझं... असं दोघांनी एकमेकांना वेळ देऊ. दोघांनी मिळून अॅडजेक्ट करुया मग सगळ्याचा बॅलन्स होईल."
"आणि जर ते नाही जमलं तर?" पिनीने त्याला थांबवत मध्येच प्रश्न केला.
"एवढ्या वर्षाचे रिलेशनशिप असूनही जर आपल्या दोघांचं एकमेकांशी नाही जमल तर दुसऱ्या कोणाबरोबर ते जमेल याची काय गॅरेंटी?"
यावर पिनिच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला. "सॉरी."
तिचा निर्णय ठाम होता. ‘थोडं तुझं थोडं माझं,' म्हणतो हा... पण कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली की मात्र ते मला करावं लागत. लग्नासाठी एका वर्ष माझं करिअर मी सोडणार नाही.
'मनात काहीतरी पक्के करून ती पुन्हा गाडीकडे वळली. तो बॉक्स त्याचा स्वाधीन करून तिथून निघण्यासाठी... तिने बॉक्स काढण्यासाठी डिकी उघडली, आणि क्षणात धाडकन बंदही केली. कारण डिकी उघडताना तिचे हातातल्या घड्याळाकडे सहजच लक्ष गेले. त्यावर तारीख होती १ जुलै. ती धावतच विराजकडे आली. तो तसाच पावसात भिजत शांत उभा होता. आपले दोन्ही हात पसरून तिच्याकडे बघत.
"सरप्राईज म्हणून एक बॉक्स घेऊन येणार होतीस ना? त्याच काय ?"
"काही नाही. घरीच विसरले तो मी, पण टर्की ट्रिप कॅन्सल करून तुचं मला सरप्राईज केलस." म्हणत पिनी पळत जाऊन सरळ त्याच्या मिठीत शिरली.
"आलं का लक्षात? थोडं तुझं थोडं माझं." म्हणत तोही पुन्हा हसला.
हिच तर खरी गंमत आहे, या अकाली बरसणाऱ्या पावसाची...
हा शांत रस्ता, भरभरून फुलणारा बहावा, वाट बघणारा तो आणि उशीरा का होईना, पण नेहमी न चुकता येणारी ती.
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com
छान !
छान !
सुंदर...
सुंदर...
खूप गोड प्रेमकथा आहे...
खूप गोड प्रेमकथा आहे...
छानच..
छानच..
खूप गोड प्रेमकथा आहे... + 1
खूप गोड प्रेमकथा आहे... + 1
It is postponed.
It is postponed.
लग्न पोस्पॉन्ड करायचं. >>>
लग्न पोस्पॉन्ड करायचं. >>> पोस्टपोन / पोस्पोन पण ed नाही.
हे दोन ठिकाणी झालं आहे.
कथा छान
आमच्या घरी पिनी म्हणजे 'सुसू' 'ममा पिनी आली' म्हटलं की वॉशरुमला न्यायचं. त्यामुळे यातली काही वाक्य वाचून हसू आलं.
Light n sweet. Khup chan
Light n sweet.
Khup chan
छानच!
छानच!
Chan ahe
Chan ahe
प्रतिसादासाठी सगळ्यांना
प्रतिसादासाठी सगळ्यांना धन्यवाद.
टायपो करेक्ट केली आहे. थैंक्स अमा आणि मीरा.
प्रतिसादासाठी सगळ्यांना
.
सिध्दि कथा छान आहे, पण या
सिध्दि कथा छान आहे, पण या आधी वाचली आहे नक्की. कोठे ते आठवत नाही. मा बो , मै अथवा एखाद्या ब्लॉग वर.
आधी कोठे टाकली होती हा हिच कथा?
वाह छान
वाह
छान
सुंदर
सुंदर
प्रतिसादासाठी सगळ्यांना
प्रतिसादासाठी सगळ्यांना धन्यवाद.
-आधी कोठे टाकली होती हा हिच कथा?
Submitted by रिमझिम on 27 July, 2020 - 23:26
- होय. इ साहित्य प्रतिष्ठान वरती रेशिमधारा या माझ्या पावसाळा विशेष अंकात पुर्व प्रकाशित केली आहे ही कथा.
आणि माझ्या ब्लॉगवर सुध्दा पोस्ट आहे.
चांगली कथा!
चांगली कथा!
पण शुध्दलेखनाच्या बर्याच चूका आहेत, जमलं तर दुरुस्त करा.
This guy practically gave up
This guy practically gave up a work commitment for the sake of this lady's nakhra
नेहमीप्रमाणे सुरेख आणि गोड
नेहमीप्रमाणे सुरेख आणि गोड कथा.
प्रेमकथांची लेखिका, कारण तुझा प्रेम कथेवर विशेष भर दिसतो आहे.
This guy practically gave up
This guy practically gave up a work commitment for the sake of this lady's nakhra pudhe hich dominate karel
अमा , हल्ली तुमचे प्रतिसाद
अमा , हल्ली तुमचे प्रतिसाद असे का असतात?
This guy practically gave up
This guy practically gave up a work commitment for the sake of this lady's nakhra
Submitted by अमा on 29 July, 2020 - 12:16
- अमा work आणि relationship यापैकी आपण कोणाला जास्त महत्व देतो यावर सगळं depend करत.
या कथेमध्ये पिनीच्या point of view नुसार, तिने या आधी आपली रिलेशनशिप टिकवण्यासाठी प्रयत्न केला आहे. पण तिच्या मते, सारखं तिलाच compromise करावं लागत असेल तर पुढेही असेच होत राहील.
तर दुसरीकडे या सगळ्याची कल्पना असल्याने या वेळी विराजने रिलेशनशिप टिकवण्यासाठी पुढाकार घेतला. म्हणूनच कथेचं नाव आहे, थोडं तुझं थोडं माझं.
in short, moral of the story - नातं टिकवायचं असेल तर दोघांचीही तयारी पाहिजे.
pudhe hich dominate karel
- हे मात्र अगदी शक्य आहे हो. पण मी मात्र पुढच्या भागाच्या विचारात नाही.
विनिता - शुध्दलेखन बघते.
विनिता - शुध्दलेखन बघते. कुठे - काय चुकले ते. tnx
अनघा - माझी प्रत्येक कथा वाचुन प्रतिसाद करता, त्यासाठी मनापासुन आभार.
pudhe hich dominate karel >>
pudhe hich dominate karel >> इतके दिवस तो डॉमिनेट करत होता, ते बघा चालतेय का मग!
अजून एक मस्त कथा सिद्धी आणि
अजून एक मस्त कथा सिद्धी आणि विनिता ताईंचा दुसरा प्रतिसाद पण झकास.
छान.शेवट आवडला.
छान.शेवट आवडला.