फ्रान्सकडून भारतीय हवाईदलासाठी अत्याधुनिक 36 ‘रफाल’ लढाऊ विमाने खरेदी केली जात आहेत. तत्संबंधीचा करार दोन्ही देशांदरम्यान सप्टेंबर 2016 मध्ये झाला होता. त्यापैकी पहिली काही विमाने जुलै 2020 च्या अखेरीस भारतात दाखल होणार आहेत. त्याआधी भारतीय हवाईदलाच्या गरजांनुरुप फ्रान्समध्येच घडवल्या गेलेल्या ‘रफाल’वर गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लढाऊ वैमानिक, तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना आवश्यक ते संपूर्ण प्रशिक्षण दिले गेले आहे.
भारतात येताना भारतीय लढाऊ वैमानिकच या विमानांचे सारथ्य करणार आहेत. पहिल्या टप्प्यात पाच ‘रफाल’ भारतात दाखल होणार असून ती सर्व विमाने ‘मोहिमेसाठी सज्ज’ अशीच असणार आहेत. यापैकी काही विमाने ‘रफाल बी’ आणि काही ‘रफाल सी’ प्रकारची असणार आहेत. ही विमाने भारताच्या दिशेने निघण्यापूर्वी वैमानिकांना आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतुकीसंबंधीच्या सर्व बाबींचीही माहिती करून दिली जाणार आहे. कारण भारतात येताना या विमानांना नागरी हवाईमार्गांचाच वापर करावयाचा आहे.
भारताच्या दिशेने उड्डाण करताना भारतीय हवाईदलाचे मालवाहू विमान आणि फ्रेंच हवाईदलाचे इंधनवाहू विमान ‘रफाल’ विमानांसोबत असणार आहेत. या मालवाहू विमानांमधून भारतीय हवाईदलाचे अभियंते, तंत्रज्ञ, ‘रफाल’चे सुटे भाग आणि अन्य काही साहित्य भारतात आणले जातील. आंतरराष्ट्रीय नागरी हवाईमार्गांवरून जात असताना ‘रफाल’ विमानांवर कोणत्याही प्रकारचे शस्त्र बसवता येणार नाही.
भारतात येताना वाटेत ही सर्व विमाने एकच थांबा घेण्याची शक्यता आहे. हा थांबा संयुक्त अरब अमिरातीतील अबु धाबीजवळच्या अल धाफ्रा हवाईतळावर असेल. फ्रान्सहून निघाल्यावर साधारणतः चार तासांनी ही विमाने अल धाफ्राला पोहचतील. दरम्यानचा प्रवास विनाथांबा असल्यामुळे तसेच हे मध्यम पल्ल्याचे लढाऊ विमान असल्यामुळे या ताफ्यासोबत असलेल्या फ्रेंच इंधनवाहू विमानातून भारतीय ‘रफाल’ विमानांमध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरले जाईल. सुमारे साडेपाच हजार किलोमीटरचे उड्डाण करून अल धाफ्राला पोहचल्यावर या ताफ्यातील सर्व जण विश्रांतीसाठी काही काळ तेथे थांबतील. पश्चिम आशियातील आपल्या हितसंबंधांच्या संरक्षणाच्या उद्देशाने फ्रान्सने या हवाईतळावर आपली ‘रफाल’ विमाने तैनात केलेली आहेत. भारतीय 'रफाल' विमानांची या तळाला दिली जात असलेली ही भेट व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाची असणार आहे. तसेच त्रिपक्षीय सामरिक संबंधांच्या दृष्टीनेही या भेटीला महत्व असणार आहे.
अल धाफ्राहून भारतीय भूमीच्या दिशेने निघाल्यावर वाटेत परत एकदा 'रफाल'मध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरावे लागणार आहे. मात्र यावेळी भारतीय हवाईदलाच्या ‘आयएल-78 एमकेआय’ इंधनवाहू विमानातून ‘रफाल’मध्ये इंधन भरले जाईल. भारतीय हवाईदलात ‘रफाल’ची पहिली तुकडी हरियाणातील अंबाला येथील हवाईतळावर तैनात केली जाणार आहे. त्यामुळे अल धाफ्राहून निघालेली ‘रफाल’ थेट अंबालामध्येच दाखल होतील.
‘रफाल’चा ताफा भारतात येत असताना वाटेत ज्या-ज्या देशांच्या हवाई हद्दीतून त्याला जावे लागणार आहे, त्यात्या देशांकडून विशेष परवानाही या ताफ्याला काढावा लागेल आणि शुल्कही भरावे लागेल. हे कोणत्याही विमानाला करावे लागतेच. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेने (आयसीएओ) तयार केलेल्या नियमावलीनुसार आणि संबंधित देशांच्या नियमांनुसार ही प्रक्रिया पार पडेल.
आकाश मार्गे हल्ला झालाच तर
आकाश मार्गे हल्ला झालाच तर आकाशात ती विमाने स्वतः चे रक्षण बोटीवर असण्यापेक्षा चान्गल्या रीतीने करू शकतील. >>> ??
_______________
आंतरराष्ट्रीय नागरी हवाईमार्गांवरून जात असताना ‘रफाल’ विमानांवर कोणत्याही प्रकारचे शस्त्र बसवता येणार नाही.
ही रफाल सागरी मार्गाने आणली
ही रफाल सागरी मार्गाने आणली असती तरी ती युद्धनौकांवर ठेऊन आणली नसती. फक्त ती विमानं ठेवलेल्या जहाजाला युद्धनौकांनी संरक्षण पुरवले असते.
आता यावर चित्रपट येईल..
आता यावर चित्रपट येईल..
सुपर्ब !! आलेत ! स्वागत!
सुपर्ब !! आलेत ! स्वागत!
पराग, माहितीबद्दल धन्यवाद !
पराग, माहितीबद्दल धन्यवाद ! छान माहिती .
अरबी समुद्रात आल्यावर भारतीय
अरबी समुद्रात आल्यावर भारतीय नौदलाच्या भा. नौ. पो. कोलकाताशी रफालची संदेशांची देवाणघेवाण झाली. त्यानंतर भारतीय हवाई हद्दीत आल्यावर रफाल सुखोई-30एमकेआयच्या सोबतीने अंबाल्याला आली.
अम्बानीला दिलेले रु. ३००००
अम्बानीला दिलेले रु. ३०००० कोटी हे राफेल विमानान्च्या अपघातात मेलेल्या पायलटाना द्यावेत असे राहुल गान्धी काल-परवा म्हणाल्याचे व्रुत्त फेसबुकवर वाचले. चालु द्या.
>>आंतरराष्ट्रीय नागरी
>>आंतरराष्ट्रीय नागरी हवाईमार्गांवरून जात असताना ‘रफाल’ विमानांवर कोणत्याही प्रकारचे शस्त्र बसवता येणार नाही.
हो पण दूर पळवता तरी येतील ना
अम्बानीला दिलेले रु. ३००००
अम्बानीला दिलेले रु. ३०००० कोटी हे राफेल विमानान्च्या अपघातात मेलेल्या पायलटाना द्यावेत असे राहुल गान्धी काल-परवा म्हणाल्याचे व्रुत्त फेसबुकवर वाचले. चालु द्या.
Submitted by दिगोचि on 30 July, 2020 - 07:02
--
हि ईटालिय पनौती कधीच सुधरणार नाही.
राफेल भारतात पोहचून एक दिवस उलटत नाही, तोच त्या विमानांच्या पायलटच्या मृत्युवर टपलाय हा हि ईटालिय गंजेडी.
मोदीजींचे हे 5 राफेल आपल्या
मोदीजींचे हे 5 राफेल आपल्या देशा पर्यंत सुरक्षित पोचवायची जबाबदारी #कॉंग्रेसने घेतलेल्या #2_सूखोई वर होती..
राफल चे पाहिले पायलट हिलाल
राफल चे पाहिले पायलट हिलाल अहमद राथर राफेल आणत आहेत म्हणे.>>>>>>>
अशीच पारदर्शकता ठेवून अफजल गुरू ,दाऊद , मसूद आणि नाईक यांची पण नावे घ्यावीत !!!!
अफझल गुरू व कसाबला फाशी
अफझल गुरू व कसाबला फाशी दिल्याबद्दल मनमोहन सिंग , सोनिया, राहुल , नेहरू व काँग्रेस ह्यांचे अभिनंदन
मोदींनी दाऊदला फाशी दिली की त्यांचेही अभिनंदन करू
सगळे काँग्रेस अन नेहरूंनी केले तर मग वाजपेयी कविता करायला आणि मोदीजी फिरण्यापुरते अवतरीत होणार की काय ?
पायलट साठी तुम्ही विशिष्ट नाव
पायलट साठी तुम्ही विशिष्ट नाव निदर्शनास आणून दिले म्हणून तुम्हाला आरसा दाखवला !
१०० वर्षापूर्वी च्या खासगी कंपनी चा वारसदार दोन्ही लोकसभा निवडणूक मध्ये ९० च्या वर खासदार निवडून आणू शकला नाही म्हणून नैराश्यातून भाजप च्या नेत्यांचा उद्धार चालू केला आहे का ?
मोदी शहा हीही विशीस्ट नावेच
मोदी शहा हीही विशीस्ट नावेच आहेत
नुसते पंतप्रधान , गृहमंत्री असे म्हणावे
<< अम्बानीला दिलेले रु. ३००००
<< अम्बानीला दिलेले रु. ३०००० कोटी हे राफेल विमानान्च्या अपघातात मेलेल्या पायलटाना द्यावेत असे राहुल गान्धी काल-परवा म्हणाल्याचे व्रुत्त फेसबुकवर वाचले. चालु द्या. >>
------- फेसबुकावर वाचले...
मस्त फेकाफेकी करतात.
राफेल आले.... अभिनंदन. पाच राफेल आले... आणि भारत जगज्जेता/ महासत्ता झाली. याच न्यायाने कतार, इजिप्त पण महास्त्ता आहेत कारण त्यांच्याकडे पण आप् ल्यासारखेच राफेल आहे. आता राफेल मिळाल्यावर भारताचे सर्व प्रश्न बेरोजगारी, कोरोना, खंगलेली अर्थ व्यावस्था आदी प्रश्न चुटकीसरशी सुटतील.
आता तरी मोदी शत्रू राष्ट्राचे नाव घेण्याचे धारिष्ट्य दाखवतील. १९ जूनच्या सर्वपक्षीय सभेत किंवा मन कि बात मधे चौकीदार मोदी यांनी चीन बद्दल अवाक्षरही काढले नाहीत. चीनने LAC ओलांडली नाही तर २० जवान कुणाशी आणि कुठे (त्यांनी चीनची सिमा ओलांडली ?) लढतांना प्राणास मुकले हे ते सांगत नाही.
LAC बदलत आहे, चीन सिमा ओलांडून भारताच्या आत शेकडो चौ कि घुसून नव्या छावण्या तसेच रस्ते install करत आहे. आणि आपण चीनचे अॅप्स uninstall करुन तोडीस तोड उत्तर देत आहोत. कोट्यावधी देशप्रेमी नागरिकांनी १ - २ नाही तब्बल ६० (अक्षरी साठ) अॅप्स... चायनीज फोनमधून चक्क डिलीट केले... अभिनंदन.
आंतरराष्ट्रिय बाजारात पैसे मोजल्यावर विविध शस्त्रास्त्रे मिळतील, पण देशाचे पंतप्रधान शत्रू राष्ट्राचे नाव घ्यायला घाबरत असतील , अनेक आढेवेढे घेत शत्रू राष्ट्राचे नाव घेणेही टाळत असतील, शत्रू राष्ट्राने देशात शिरकाव केलेला आहे, मुक्काम ठोकला आहे हेच मुळात नाकारत असतील तर हे बोलण्यासाठी लागणारे अफाट धैर्य कुठल्या बाजारात विकत मिळेल?
चला रामाच्या मंदिराचे भूमिपूजन करुन टाकू या... जय श्री राम म्हणायचे आणि सद्य परिस्थिती वरुन जनतेचे लक्ष पुन्हा एकदा विचलीत करायचे...
LAC बदलत आहे, चीन सिमा
LAC बदलत आहे, चीन सिमा ओलांडून भारताच्या आत शेकडो चौ कि घुसून नव्या छावण्या तसेच रस्ते install करत आहे. आणि आपण चीनचे अॅप्स uninstall करुन तोडीस तोड उत्तर देत आहोत. कोट्यावधी देशप्रेमी नागरिकांनी १ - २ नाही तब्बल ६० (अक्षरी साठ) अॅप्स... चायनीज फोनमधून चक्क डिलीट केले... अभिनंदन.
---
हे "थापा" आले थापा मारायला.
वर जे काही बरळलात त्याचे काही पुरावे आहेत काय ?
चला रामाच्या मंदिराचे
चला रामाच्या मंदिराचे भूमिपूजन करुन टाकू या... जय श्री राम म्हणायचे आणि सद्य परिस्थिती वरुन जनतेचे लक्ष पुन्हा एकदा विचलीत करायचे...
Submitted by उदय on 2 August, 2020 - 01:38
--
ते लक्ष विचलित वगैरे जाऊ दे. पाच तारखेला बर्नोल जवळ बाळगा. बहोत जरुरत पडने वाली है.
जय श्री राम !
मला हेच कळत नाही शी भारता
मला हेच कळत नाही शी भारता बद्दल बोलत नसताना मोदींनी चीन चे नाव घेवून बोलण्याची अपेक्षा का ठेवावी ? एव्हढा हि प्रोटोकॉल कळत नाही ? की सतत पेडगाव चा प्रवास ?
आजच परराष्ट्रमंत्री नी स्टेटमेंट दिले आहे " बोलणी करून प्रश्न सुटला नाही तर कारवाई करावेच लागेल " . आता या स्टेटमेंट वरून सुद्धा चीन लगेच माघारी जाण्याची शक्यता बिलकुल नाही पण चीन सारख्या क्रूर आणि बलाढ्य शत्रू बरोबर भारताला कूटनीती करावीच लागणार हि वस्तुस्थिती आहे .
चीन सारख्या बलाढ्य देशा बरोबर तत्परतेने युद्ध सुरू केले की पुन्हा मोदींच्या नावाने ओरडायला मोकळे !
चर्चा का नाही केली ? देशाला युद्धाच्या खाईत ढकलून सामान्य गरीब लोकांचे जीवन अजुन खडतर का केले ?
चीन बाबत एखादी घटना घडली की ऑर्केस्ट्रा गैंग लगेच तयार असते हि मात्र वस्तुस्थिती आहे .
दरिद्री अवस्थे मुळे १९६२ मधील चीन बरोबरील युध्दात पराभव होवून नामुष्की स्वीकारली आणि आता १९६२ पासून २०२० पर्यंत समारिक , आर्थिक दृष्ट्या चीनच्या तुलनेत भारताने प्रगती केलेली आहे असे वाटत असेल तर गैंग गोळा करून सांगा सरकार ला सडेतोड उत्तर द्यायला .......
मग राफेल का 26 जानेवारी
मग राफेल का 26 जानेवारी परेडला घेतले का ?
शुद्ध मराठीत बोलायचे तर वाक्यात कर्ता हा लिहावाच लागतो
अंदर घुसा नही , म्हणजे नेमकं कोणत्या बॉर्डर बद्दल ?
शिवाय चिन , पाकला धडक , कडक धडा शिकवा , असे एक गुजरातचे मुख्यमंत्री सतत काँग्रेसला म्हणायचे म्हणे
" दरिद्री अवस्थे मुळे १९६२
" दरिद्री अवस्थे मुळे १९६२ मधील चीन बरोबरील युध्दात पराभव होवून नामुष्की स्वीकारली आणि आता १९६२ पासून २०२० पर्यंत समारिक , आर्थिक दृष्ट्या चीनच्या तुलनेत भारताने प्रगती केलेली आहे असे वाटत असेल तर गैंग गोळा करून सांगा सरकार ला सडेतोड उत्तर द्यायला. "
इतिहास चा अभ्यास करून किमान सक्षम विरोधका ची तरी भूमिका राजकुमार ला पार पाडायला सांगा !
3 दिवसात आर्मी बनवून काय
3 दिवसात आर्मी बनवून काय चड्ड्या झाडणार होते का ?
दोष तुमचा नाही !!
दोष तुमचा नाही !!
तुम्हाला मायबोली व्यवस्थापन ने अमर ठेवण्याचा विडा उचललेला आहे , त्यामुळे तुमची जीभ घसरते .
3 दिवसात आर्मी बनवून देतो
3 दिवसात आर्मी बनवून देतो बोलले होते , असे भागवत बोलले होते , देश दरिद्री आहे , म्हणून युद्ध नको तर मग ही चड्डी आर्मी कुणाशी लढायला जाणार होती ? संघाचे लेक्चर ऐकून नवीन सरकारने 2014 ला सुरुवात केली होती , म्हणजे गुरुजींना शिष्याच्या घरची कल्पना असणार.
काँग्रेसवाले पाक , चीन शी मिळाले आहेत , म्हणून ते कडक एक्शन घेत नाही , असे संघ , भाजपे , मोदी , शहा 2014 पूर्वी बडबडत होते
राफेल ची गरज आहे , असेही बोलले
कुणी आत आले नाही , असेही बोलले,
देश गरीब आहे , म्हणून युद्ध नको , मग ते 5 ट्रीलीयन फक्त शहा आणि अंबाणीच्या पोरापूरते आहेत का ?
देशाकडे लढायला पैसा नाही , असे काँग्रेसने यापूर्वी कधीही सांगितले नव्हते , विरोधी पक्ष म्हणून अडवाणी , बाजपइ आणि मोदी यांनीही कधी असे सांगितले नव्हते . 10 % सुरक्षेवर खर्च होतात ( आणि शिक्षण + आरोग्य मिळून आलमोस्ट तितके बजेट असते म्हणे )
आणि आता एकदम नेहरू , पंचशील , बुद्ध , शांती , गांधी अन शेळी ??
कुठे नेवून ठेवलाय नथुराम तुमचा ? 1947 पासून शिकीवत्यात , काँग्रेस मवाळ पार्टी आहे म्हणे , संघ , जनसंघ , भाजपा जहाल पार्टी आहे म्हणे , किती मोघल , ब्रिटिश , पाकि आणि चिनी ह्यांनी 1925 पासून आजवर ठार केलेत म्हणे ?
बरोबर. २०१४ पर्यंत गुजरातचे
बरोबर. २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री चीनबद्दल जे प्रश्न विचारायचे त्याचीच उत्तरे आताच्या पंतप्रधानांनी द्यावीत. इतकंच म्हणणं आहे.
लेख आवडला. धन्यवाद पराग
लेख आवडला. धन्यवाद पराग
Pages