(भाग १ - https://www.maayboli.com/node/75516)
(भाग २ - https://www.maayboli.com/node/75524)
(भाग ३ - https://www.maayboli.com/node/75536)
पुढे चालू...
-----------------------------------------------------------------------
'तिचे-त्याचे हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच एकमेकांत अडकलेले काही आनंदाचे क्षण होते. लग्नापूर्वीचे आणि लग्न होईपर्यंतच. त्यानंतर मात्र त्या नात्याला न सांगताच जणू वाळीत टाकलं गेलं. फक्त नावापुरतं... आज खरच त्याचाही शेवट झाला होता? तेच ते… अव्यक्त आणि अबोल असलेलं गुपित, ज्याची भनक देखील मीराला केव्हाच लागली नाही. सर्वस्वी सगळा दोष राघव वरती टाकून तिने आपला मार्ग मोकळा केला होता का?'
*****
अगदी धावपळीत ऑटोने राघवने एअरपोर्ट गाठले, पण फ्लाईट केव्हाची निघून गेली होती. आणि मिराही?
'तिला सांगितलं होत, मी बँकेचं काम उरकून येईपर्यंत थांब. पण शेवटी नाही ऐकलं.'
मनाला चुटपुट लागली होती. तसाच हताश होऊन तो फुटपाथवर एका बाकड्याचा आधार घेत त्यावर बसला.
आपल्याकडे कोणीतरी बघतंय याची जाणीव होऊन राघवने सहज आपली उदास नजर वर टाकली. बॅग एका बाजूला कलंडलेली, पर्स दुसऱ्या हातावरून ओघळत होती. त्यातून काही पेपर्स बाहेर पाण्यात पडून ओले झाले होते. या अवस्थेत त्याची मीरा त्याच बाकड्याच्या दुसऱ्या टोकाला त्याच्याकडेच नजर लावून बसली होती.
बाकड्यावरून थोडं सरकत तोही तिच्या जवळ जाऊन बसला. "फ्लाईट चुकली की चुकवली?"
"चुकली. ते बाबांनी तुम्हाला दिलेलं लेटर...ते माझ्याकडेच राहील होत. कदाचित त्या पेपर्सच्या बंचमधून आलं असावं. तुम्ही येतोय म्हणालात म्हणून इथेच थांबले. ते लेटर देण्यासाठी. आणि फ्लॅइट निघून गेली वाटत."
"ओके. कुठे आहे लेटर?" तोही तिची खिल्ली उडवत सहजच इकडे तिकडे शोधू लागला.
"ते...भिजलं. ते... ते... मी माझ्या हातातच घेऊन उभी होती. मग... पाऊस..." समोर पाण्यात भिजून पार गोळा होऊन पडलेल्या कागदाकडे बोट दाखवत मीराने खाली मन घातली.
"ओके आणि याच काय? याला पण तुझ्यासारखं पावसात भिजायला आवडत का?" समोर उघड्या पडलेल्या तिच्या पर्स मधून तेच ते रात्री दिलेलं गुलाब बाहेर डोकावत होत.
क्षणाचाही विचार न कारता मीराने अक्षरशा ते पर्समध्ये कोंबलं, आणि त्याच क्षणी "सॉरी" म्हणत राघवने तिला जवळ घेतल होत.
"मीरा गेले काही दिवस मी इथल्या सगळ्या फॉर्मेलिटीज कम्प्लिट करत होतो. तुझ्याबरोबर येण्यासाठी... तो फ्लॅट, गाडी वगैरे सगळ्याच कंपनीच काँट्रॅक्ट असत. काही गोष्टी मार्गी लावल्या, तर काही अजूनही बाकी आहेत. ते सगळं एकदा संपवतो मग जाऊया?"
होकारार्थी मान हलवत त्याच्या नकळत गुपचूप मीराने आपले डोळे पुसले. आपण ते लेटर वाचलं, हे मीराने राघवला सांगितलं नाही. आणि राघवने बाबांना दिलेलं वचन ही अबाधित राहील.
'एकटेपणाला कंटाळलेल्या बाबांनी स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा सेवेसाठी म्हणा, हक्काचं माणूस असावं म्हणून मीराला राघव पासून दूर केलं होत. ‘लग्नानंतर मीराला इथेच ठेवायचं' असं त्यांनी वचन घेतलं, आणि नकळत ‘हो‘ म्हणून गेलेला राघव या वचनात अडकला गेला. याचा कबुली जबाब असलेले बाबांचे ते लेटर चिंब भिजत पाण्यात विलीन झालं होते.'
'तुरळक रिमझिम पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली होती. त्यांच्या विरहाची फ्लाईट केव्हाच निघून गेली होती. आता बरसत होत्या फक्त श्रावणधारा... त्याच्या आणि तिच्या प्रेमाच्या. त्याच तिच्या आवडत्या श्रावणधारा एन्जॉय करत, मीरा आणि तिचा राघव दोघेही हातात हात घालून घरच्या रस्त्याला लागले.'
समाप्त
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन.
{https://siddhic.blogspot.com}
पटकन संपली? छान होता हा भाग
पटकन संपली? छान होता हा भाग पण. पुलेशु.
Chan zala shevat.. lihit raha
Chan zala shevat.. lihit raha . shubheccha
खूप छान आहे कथा... वेगळी आहे.
खूप छान आहे कथा... वेगळी आहे... आणि शेवट पण आवडला..
अप्रतिम... आजच्या काळात
अप्रतिम... आजच्या काळात वडिलांसाठी स्वतःच्या आनंदावर पाणी सोडणारी मुले देखील आहेत हे वाचून आनंद वाटला... पुढील लेखनासाठी शुभेच्छा
अरे वाह.छान झालं की.
अरे वाह.छान झालं की.
सुंदर प्रेमकथा.. शेवट हि छान.
सुंदर प्रेमकथा.. शेवट हि छान..
छान .. शेवटही आवडला.
छान .. शेवटही आवडला.
छान कथा !
छान कथा !
शेवट तितकासा नाही पटला सॉरी!
ही संपूर्ण कथा आधीच लिहून
ही संपूर्ण कथा आधीच लिहून तयार होती. त्यामुळे उगीच छोटे-छोटे भाग करुन मग ते पोस्टायला उशीर लावत बसण्यापेक्षा चार भागात कथा संपते. आणि पर्सनली मला सुध्दा लांबड कथा वाचायला कंटाळा येतो. त्यामुळे कथा लवकर संपली.
- माझ्या कथा शक्यतो भावनिक असतात. आणि भावनांना प्राधान्य दिल्यामुळे शेवट गोड-गोड होत असावा. काहींना ते पटत आणि काहींना नाही. पण ज्याने त्याने आपापले मत जरूर मांडावे.
तुम्ही सगळे सातत्याने वाचत होता आणि प्रतिक्रिया सुध्दा देत होता त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.
- लवकरच भेटू नविन कथेसह.
छान. नवीन कथेच्या प्रतिक्षेत.
छान.
नवीन कथेच्या प्रतिक्षेत.
छान
छान
अप्रतिम कथा
अप्रतिम कथा
पुन्हा एकदा कथा वाचली. पाऊस
पुन्हा एकदा कथा वाचली. पाऊस आणि ही कथा वाचण्याची मजा काही औरच. प्रेमात पडावं अगदी.