धाग्याची प्रेरणा:
https://www.maayboli.com/node/74908?page=2
१. तुम्ही तुमच्या स्पाउसला अहो-जाहो म्हणता की अरेतुरे?
२. अहो-जाहो म्हणायचे काही कारण आहे का? घरातील वडीलधार्यांमुळे लागलेली सवय की त्यांचे कळत/नकळत असणारे प्रेशर की इतर काही?
३. आजच्या जगात "अहों"ना इतका भाव द्यायची गरज आहे का?
४. तुम्ही अहो-जाहो म्हणत असाल तरी तुम्हाला मनापासून काय आवडेल?
व्यक्तिशः मी आणि माझी बायको दोघेही एकमेकांना नावानेच हाक मारतो. माझे वडील आईला पण नावानेच बोलवत असत, पण आई अहो-जाहो करत असे. सासू-सासरे दोघेजण प्रत्यक्ष अहो-जाहो करत नसले तरीही थेट नाव घेत नाहीत किंवा टाळतात, पण मेव्हणा (बायकोचा भाऊ) आणि त्याची बायको एकमेकांना नावाने हाक मारतात.
माझी धाकटी बहीण मात्र नवर्याला "अहो" म्हणते कारण सासू-सासरे. त्यांची तशी अपेक्षा/मागणी आहे. (बहीण-मेव्हणा-मुले स्वतंत्र वेगळ्या ठिकाणी, म्हणजे सासू सासर्यांपेक्षा वेगळ्या घरात राहात असली तरीही आणि तिचा नवरा (माझा मेव्हणा) तिच्यापेक्षा वयाने लहान असूनही ).
तुमचे अनुभव आणि तुमची काय मत आहेत? होऊ द्या चर्चा.
टीपः हा विषय ऋन्मेऽऽषच्या तावडीतून सुटला होता म्हणून त्याचे खास आभार.
(No subject)
कशाला बरं ? अरे दादल्या
कशाला बरं ? अरे दादल्या म्हणेल की समर्पकपणे!
ऋन्मेषचा बाबा, चांगला किस्सा
ऋन्मेषचे बाबा, चांगला किस्सा सांगितलात. ऐसा भी होता है!
नवर्याचं नाव दादासाहेब असेल आणि बायको अरेकारे करणारी असेल तर, अरे दादा ? >> पुलंचा किस्सा आहे (खखोदेजा), जयंत नारळीकर आणि पुल एका व्यासपीठावर होते. आधी नारळीकर व्याख्यानात म्हणाले की मी आज बंधु आणि भगिनिंनो म्हणणार नाही, कारण समोर माझी बायको बसली आहे. नंतर पुल म्हणाले, 'बंधू आणि भगिनींनो.... हे मी आज म्हणू शकतो, कारण समोर माझी बायको बसलेली असली तरी ती मला भाई म्हणते'
ऋन्मेषचे बाबा म्हणजे काय?
ऋन्मेषचे बाबा म्हणजे काय?
मला आमच्या अहोंनी हाक
मला आमच्या अहोंनी हाक मारल्यासारखे वाटले..
अहो ऋन्मेषचे बाबा ऐकलेत का
आमच्या अहोंनी हाक
आमच्या अहोंनी हाक मारल्यासारखे वाटले..>>
ऋन्मेषचे बाबा म्हणजे काय?
ऋन्मेषचे बाबा म्हणजे काय?
—>> ऋन्मेष नावाच्या मुलाचे वडील.
रुबरुँ हा शब्द आठवला..
"रुबरु" हा शब्द आठवला..
"ॠबऋ" = ॠन्मेषचे बाबा ॠन्मेष..
नवर्याचं नाव दादासाहेब असेल
नवर्याचं नाव दादासाहेब असेल
>> असं नाव असलेला माणूस अरेतुरे करणारी बायको करणार नाही.
दादासाहेब हे नाव असत. हेच
दादासाहेब हे नाव असत. हेच पहिल्यांदा समजल.. मला वाटायच दादासाहेब हे विशेषण असाव..
रच्याकने
तुझ्यात जीव रंगला मधले साहेबराव या निमित्ताने आठवले.
"ॠबऋ"
"ॠबऋ"
माझे टोपण नाव भैया, लहान होतो
माझे टोपण नाव भैया, लहान होतो तेव्हा आता ज्या मुलीसोबत लग्न करणार आहे तिच्यासोबत खेळलोय!
तर भावी बायको तिच्या आईला म्हणतेय, लहान असताना भैया म्हणायला लावलेस, आणि आता लग्न लावून देणार का!
भैया मायबोलीवर स्वागत !
भैया मायबोलीवर स्वागत !
"ॠबऋ" : फिदी:
"ॠबऋ"
होतं असे कधी कधी
होतं असे कधी कधी
प्रेमप्रकरण चोरटे असले की हा माझा दूरचा दादा असे सांगतात
मग हा माझा दूर का भाई असे सांगतात
आणि मग लगीन करून नवरोजी बनवतात
दादा भाई नवरोजी
तो नवरोजी झालेला भाई जिचा
तो नवरोजी झालेला भाई जिचा नवरा असेल, तिचं नाव सारा असेल आणि तिचे सारे खरे भाऊ तिथं आले, तर जो काही माहोल बनेल, त्याचं नाव सारा-भाई वर्सेस सारा भाई.
अजूनपर्यंत तरी इथे बरा अर्धा
अजूनपर्यंत तरी इथे बरा अर्धा आणि बरी अर्धी आलेले नाहीत.
कदाचित बरा अर्धा अस्तित्वातच नसावा. फक्त बरी अर्धीच असावी.
स्पाऊस*ला* असेल तर अरेतुरे.
स्पाऊस*ला* असेल तर अरेतुरे.
स्पाऊस*ना* असेल तर अहोजाहो
स्पाऊस म्हणजे काय?
स्पाऊस म्हणजे काय?
स्पा मधला ऑरगॅनिक ऊस?
हा सुद्धा विषय असू शकतो?
हा सुद्धा विषय असू शकतो?
जे वाटेल त्या नावाने हाक मारा. जसा मूड तसा. मी जेव्हा , नवर्याचे पुर्ण नावाने हाक मारले एकी तो दचकतो(असं तो सांगतो) कारण त्यावेळी कशावरू ना कशावरून त्याची उलटतपासणी आहे हे त्याला जाणवतं . ,
हे म्हणजे, 'अहो एकलत का?' कॅटेगरी मधलं आहे.
हे खरेय.. बायको जेव्हा
हे खरेय.. बायको जेव्हा नवऱ्याचे पुर्ण नाव घेते तेव्हा त्याला फैलावर घ्यायचा पोग्राम आहे असे समजावे.
आमचं नोंदणी पद्धतीने अरेंज
आमचं नोंदणी पद्धतीने अरेंज मॅरज आहे. आम्ही परस्परांना एकेरी हाक मारतो. तसेच मुलगी देखील आम्हाला एकेरी संबोधते. ए बाबा ए आई. मुलगी देखील आता तिच्या नवर्याला अरेतुरे हाक मारते.
प्राण्यांची नावे घेऊन बोलवावे
प्राण्यांची नावे घेऊन बोलवावे
Pages