स्पाउसला अहो-जाहो म्हणावे की अरे-तुरे?

Submitted by उपाशी बोका on 6 June, 2020 - 14:13

धाग्याची प्रेरणा:
https://www.maayboli.com/node/74908?page=2

१. तुम्ही तुमच्या स्पाउसला अहो-जाहो म्हणता की अरेतुरे?
२. अहो-जाहो म्हणायचे काही कारण आहे का? घरातील वडीलधार्‍यांमुळे लागलेली सवय की त्यांचे कळत/नकळत असणारे प्रेशर की इतर काही?
३. आजच्या जगात "अहों"ना इतका भाव द्यायची गरज आहे का?
४. तुम्ही अहो-जाहो म्हणत असाल तरी तुम्हाला मनापासून काय आवडेल?

व्यक्तिशः मी आणि माझी बायको दोघेही एकमेकांना नावानेच हाक मारतो. माझे वडील आईला पण नावानेच बोलवत असत, पण आई अहो-जाहो करत असे. सासू-सासरे दोघेजण प्रत्यक्ष अहो-जाहो करत नसले तरीही थेट नाव घेत नाहीत किंवा टाळतात, पण मेव्हणा (बायकोचा भाऊ) आणि त्याची बायको एकमेकांना नावाने हाक मारतात.

माझी धाकटी बहीण मात्र नवर्‍याला "अहो" म्हणते कारण सासू-सासरे. त्यांची तशी अपेक्षा/मागणी आहे. (बहीण-मेव्हणा-मुले स्वतंत्र वेगळ्या ठिकाणी, म्हणजे सासू सासर्‍यांपेक्षा वेगळ्या घरात राहात असली तरीही आणि तिचा नवरा (माझा मेव्हणा) तिच्यापेक्षा वयाने लहान असूनही ).

तुमचे अनुभव आणि तुमची काय मत आहेत? होऊ द्या चर्चा.

टीपः हा विषय ऋन्मेऽऽषच्या तावडीतून सुटला होता म्हणून त्याचे खास आभार. Light 1

Group content visibility: 
Use group defaults

मी सुरवातीला लग्ना अगोदर नवऱ्याला अहो वैगरे, म्हणत होतें,पण नवरयने सांगितले की अरे तुरे कर, सासरची मंडळी अति सुधारकी असल्याने(चुलत सासू सासयाना अरे तुरे करतात) कुणीही आक्षेप घेतला नाहीं, नवऱ्यने माझ्या घरी सांगितले की राव पंत म्हणू नका, सगळे त्याला नावाने हाक मारतात

आई / मम्मी" / "बाबा /डॅडी / पप्पा" च म्हणतात !!! ते अत्यंत विनोदी वाटतं.>> हेच लिहायला आले होते. ओळखीच्या काकू काकांना लेकीसाठी पप्पा म्हणतात. आता लेक लग्न होऊन सासरी गेली, आता तोंडात पप्पाच बसलंय, ती सवय काही जाईना. प्रचंड विनोदी वाटतं ते.

माझी मैत्रिणीच love marriage. लग्न ठरलं तेव्हा ती नावानेच हाक मारायची. सासरी कोणाची हरकत नव्हती . पण एकदा तिच्या आजीनेच दम दिला. मग ती माहेरच्या लोकांसमोर त्या चा उल्लेख "ते" म्हणून करायची.
माझ्या सासरी सगळ्या मुली, सूना त्यांच्या नवर्याला नावाने एकेरी हाक मारतात. मग मीही अपवाद नव्हते.
कधीतरी गंमतीत अहो म्हणते.
आमचा non marathi मित्र परिवार आहे. त्यांच्या समोर किंवा त्यांच्या आई वडिलांसमोर आपसूकच "उनको" , "इनसे" निघतच.

मजेदार आहे हे सगळं. आमच्या शेजारचे एक काका, (वय ७५) त्यांच्या मुलाचं नाव योगेश आहे. तर ते काका काकूंना बोलावयच असलं कि योगेश म्हणतात, आणि काकू पण धावत पळत जाऊन ओ देतात. माझे आजोबा आजीला आवाज देताना खाकरायचे फक्त.. तरीही आजी कडून रिप्लाय आला नाही तर, "ऐकलं का" असं जोरात बोलायचे. बोलताना दोघेही एकमेकांना आदराने बोलत. माघारी बोलताना आजीचा उल्लेख "आमचं कुटुंब" असा व्हायचा. वडील आईसाहेबांना नावाने हाक मारतात, आईसाहेब "अहो, ऐकलंत का.. " माघारी बोलताना "हि म्हणाली", आणि "हे म्हणाले" वगैरे वगैरे.
माझा विचार वेगळा आहे. एकांतात लडिवाळ, इतर वेळी हिंदीतले अदब मराठीत आणायची आहे. मी बायकोला, बायको मला मानानेच बोलणार. मुलांनाही आईला मानाने बोलावे हे शिकवणार (मी स्वतः आईसाहेबांना अगं तुगं करतो, बदलायचा प्रयत्न केला पण जिभेला वळणच पडलं तर ते बदलता येत नाहीये).

सा .बा. .. सा.बु.ना 'अहो बाबा' म्हणतात..
आणि सा.बु सा.बा.ना 'अहो आई' म्हणतात.
comfort matters ... Proud

माझ्या आईच्या फोन मध्ये बाबांचा नंबर बाबा नावाने save होता, एवढंच नाही तर आजी, आत्या, मावशी, मामा असे सगळे होते. एके दिवशी बदलून सगळी नावं मी बदलली म्हणजे आई ज्या नावाने त्यांना हाक मारते त्या नावाने save केले
सगळ्यात अवघड होतं बाबा चं? काय rename करू?
शेवटी मी बाबा बदलून पतीदेव केलं Lol

कहर म्हणजे बाबांच्या फोन मध्ये आईचा नंबर home नावाने save होता, तोही बदलला नंतर

कोण कशामुळे "टर्न ऑन/ऑफ" होते त्यावर ठरवावे. काही पुरुष स्त्रीने "अहो" म्हटल्याने "टर्न ऑन" होतात तर काही स्त्रिया पुरुषाने "अगं" म्हटल्याने "टर्न ऑन" होतात.

कोण कशामुळे "टर्न ऑन/ऑफ" होते त्यावर ठरवावे. काही पुरुष स्त्रीने "अहो" म्हटल्याने "टर्न ऑन" होतात तर काही स्त्रिया पुरुषाने "अगं" म्हटल्याने "टर्न ऑन" होतात.
नवीन Submitted by Parichit on 8 June, 2020 - 12:22

टिपीकल परिचित प्रतिसाद पण या धाग्याच्या विषयाकरिता अत्यंत अप्रस्तुत आणि संदर्भहीन. पुढील प्रतिसादांचा रोख १८० अंशात बदलून धाग्याला भलतंच वळण लागण्याआधीच ताबडतोब संपादित करावा.

अजिंक्यराव छान प्रतिसाद
किल्ली कशाला ढवळाढवळ करताय आई वडीलांच्या आयुष्यात? त्यांनी ते नंबर काय समाजाला घाबरून किंवा बुद्धी नाही म्हणून तसे सेव्ह केलेत का? तुमच्या मोबाईलमधले कॉंटंक्टची नावे कुणी बदलली तर चालेल का तुम्हाला?
आणि मोबाईलची थिम जरी बदलली तर मोबाईल वापरताना काही वेळ गोंधळ होतो, तुम्ही नावेच बदलली. त्यांनाही त्यांची स्पेस आहे हे ध्यानात ठेवा.
आईचा नंबर होम नावाने होता. किती गोड व समर्पक. तुम्ही तोही बदलला? कहर आहे.

तैमुर +१

"जिथे आई असते तेच आपलं घर / माहेर" असं आपण म्हणतो. तसंच बाबांना जिथे माझी बायको तेच माझं घर असं असू शकतं.

कित्ती गहन प्रश्न

मी प्रसंगानुरूप माझ्या नवर्याला अनेक प्रकारचे संबोधने वापरते
१. लग्नापूर्वी नांवाने पण आदरार्थी
२. लग्नानंतर नांवाने पण अरे तुरे (अरेंज करून मैरेज होईतो बराच कालावधी गेल्याने हे स्थित्यंतर)

टीपः हा विषय ऋन्मेऽऽषच्या तावडीतून सुटला होता म्हणून त्याचे खास आभार. Light 1
>>>>>

वादळ झाल्यापासून माझे नेट नव्हते. आता मायबोली चेक करतोय.
@ वरची पोस्ट तर याच्याशी मिळताजुळता धागा मी कैक वर्षांपूर्वी काढलेला.

अहो जावईबापू .. ए सूनबाई ऽऽ
Submitted by ऋन्मेऽऽष on 1 August, 2014 - 00:32

आता वर काढतो. कदाचित काही नवीन आणि काही बदललेली मते येतील.

@ हा टॉपिक
बहुतांश समाज आजही या बाबतीत पुरुषप्रधान आहे.
जिथे लव्हमॅरेज असते तिथे एकेरी उल्लेख असतो. त्यात काही विशेष नाही.
उदाहरणार्थ माझी बाईको मला "अबड्या" नावाने हाक मारते. आणि चिडते तेव्हा "अभिषेक नाईक" असे पुर्ण नाव घेते.
तिचे लग्नानंतरचे नाव तिच्याच ईच्छेने बदललेले असले तरी मी तिला तिच्या जुन्या नावाच्या शॉर्टफॉर्मनेच हाक मारतो.
कारण आमची मैत्री ऑनलाईन चॅटींगवर झालेली. तर त्याच नावांची सवय झालीय.

पण प्रश्न खरा तेव्हा आला असता जेव्हा आमचे अरेंज मॅरेज मॅरेज झाले असते. तेव्हा आम्ही एकमेकांना कशी हाक मारली असती यावरून आमचे हाकांबाबतचे विचार समजले असते.

मुले मात्र आम्हा दोघांनाही अरे तुरे करतात. जनरली आपल्यात आईला प्रेमाने एकेरीच संबोधले जाते. बापाने मग काय गुन्हा केला असतो.
गंमत म्हणजे मी सुद्धा बारावीपर्यंत वडिलांचा उल्लेख एकेरीच करायचो. अनेकांना ते खटकायचे. माझ्यावर संस्कार झाले नाहीत असे वाटायचे. पुढे बारावी नंतर कधीतरी मीच वडिलांना अहोजाहो करू लागलो. ती चूक केली असे आता वाटते.

असो

अहोजाहो या उल्लेखाला आदरार्थी म्हटले जाते यात खरी मेख आहे.
त्यामुळे एकेरी उल्लेखात आदराचा अभाव आहे असा सोयीने अर्थ घेतला जातो, वा तसे वाटते. एकेरी उल्लेख अनादर करायला आहे की प्रेमातून आलेला आहे हे त्या संबंधित दोन व्यक्तींनाच ठाऊक असते. त्यामुळे जगाची पर्वा करायची गरज नाही. मला पर्सनली माझ्या मुलांनी मला एकेरीच उल्लेखलेले आवडेल. मुळात जिथे प्रेम असते तिथे वेगळ्या आदराची गरज नसते असे मला वाटते. Happy

लग्नानंतर इतर विषेश प्रसंगी वापरली जाणारी संबोधने

१. भांडण/ पाण उतारा करण्यालायक हरकत झाल्यास
आडनांवाने (माझे व त्याचे आडनाव वेगवेगळे असल्याचा फायदा), कधीकधी फक्त आडनांवाने हाक मारल्यावर तो समजून जातो व प्रत्यक्ष ओरडा/भांडण (बरेचदा याचे कारण त्याचे आडनाव share करणारे असतात) टालता येते हा स्वानुभव
२. मुलांसोबत बोलतांना बाबा
३. टाळाटाळ करत असलेले काम करून घेण्यासाठी आदरार्थी अनेकवचन
४. आदिमानव सद्रुश सवयीना address करतांना (especially खाण्याच्या आवडी व सवयी) त्याच्या दुर्गम गावावरून (त्याचे पूर्वज पोर्तुगीज आक्रमण काळी आमच्या जिल्ह्यातील दुष्काळी गावात स्थायिक झाल्याने)
५. सर्वांसमोर नावाने अरे/तुरे

दोघांना ही याची सवय झालीय

दोघांना ही comfortableअसेल अशा कुठल्याही प्रकार हाक मारावी, परस्पर विश्वास, प्रेम, आदर महत्वाचं. कुठल्या नावाने हाक मारली यावरून judge करू नये.

आमच्या आईला आमचे बाबा श्रीमंत म्हणून संबोधायचे. आईने कधी बाबांना हाक मारलेली मी ऐकलीच नाही. किंवा त्यांना दोघांना कधी फारस बोलतानाही पाहिल नाही. पण एकमेकांना पूरक आणि आदर्श अशी व्यक्तिमत्व होती त्यांची. Happy

आमच्या विस्तारीत कुटुंबातल्या एक नवसूनबाई नवराच काय पण सासू सासर्‍यांसकट सर्वांना अरे तुरे करतात. Happy पण सगळ्यांना मजा वाटते, आणि सगळ्यांनी आनंदाने स्विकारलय. पण नाही कशाला म्हणू , सगळेजण जरा टरकूनच असतात.
याला मी अतीप्रेमविवाह म्हणतो.

आमच्याकडे मी मिसेसना अहो असे बोलावतो. ती मला 'बाबा' (म्हणजे मुलाचे बाबा) असे बोलावते. आमचे ऑफिस एक असल्याने, आणि घरातच असल्याने, ऑफिसमध्ये ती मला सर म्हणते आणि मी तिला मॅडम म्हणून बोलावतो. संदर्भ महत्त्वाचे. आणि त्याप्रमाणे योग्य तो आदर प्रत्येक व्यक्तीचा केला पाहिजे.

मी बायकोला नांवानेच हांक मारतो व 'अग'च म्हणतो. माझी बायको मला कधी 'अहो' कधी 'अरे' म्हणते पण बारिक सारिक वाद/ भांडण असेल , तेव्हा मात्र हटकून 'अरे' वरच येते. आम्हा दोघांनाही या संबोधण्यातला फरक जाणवतही नाहीं.

या एकविसाव्या शतकात, नवरा बायको एकमेकांना अहो म्हणतात, हेच हास्यास्पद आहे.

यात काय हास्यास्पद आहे?

या एकविसाव्या शतकात, नवरा बायको एकमेकांना अहो म्हणतात, हेच हास्यास्पद आहे.
.>>>

बायको नवरयाचे आडनाव लावते हे त्याहून हास्यास्पद आहे

आमच्या इथे खूपच वेगळं आहे, माझे सासरे सासूबाईंना, मला आणि बाहेर पण सर्वाना अहो/जाहो करतात. फक्त माझ्या नवऱ्याला आणि दीराला सोडून Happy

समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता
बेम्बटेरावांचं नाव घेते माझा नंबर पहिला

तात्पर्य: चारचौघांत काढायची नसेल तर स्पाऊस ला आधी विचारलेले बरे.

सहज evandi शोधताना मिळालेली लिंक. ऑलमोस्ट माझ्या मनातले विचार. इतक्या तरलतेने मला कदाचित मांडता आले नाहीत, म्हणून लिंक देत आहे.

https://www.womensweb.in/2015/04/what-do-you-call-your-husband/

बेंबट्याचं नाव घेते माझा नंबर पयला' >> वावे, ते 'बेंबटेरावांचं' आहे.

असं कुणी जोडपं आहे का, ज्यांच्यात बायको अरे-तुरे करते आणि नवरा अहो-जाहो करतो? जाणून घ्यायल आवडेल.

असं कुणी जोडपं आहे का, ज्यांच्यात बायको अरे-तुरे करते आणि नवरा अहो-जाहो करतो? जाणून घ्यायल आवडेल.
>>>>

आमच्या ऑफिसमध्ये एक आहे दाक्षिणात्य कर्मचारी. त्यांच्यात प्रत्येकाला अहोजाहो करतात घरात. आईलाही फोनवर तो आप बोलतो. त्याचे लव्हमॅरेज झाले ऑफिसातीलच एका पोरीशी. तो तिलाही आप आप करतो. पोरगी मराठी आहे. ती बिनधास्त त्याला अरेतुरे करते. यावरून आम्ही त्यांची स्पेशली त्या पोरीची खेचतोही फार. तू आपल्या नराठी लोकांना संस्कार नाही असे दाखवतेस वगैरे वगैरे Happy

चांगले दिवस होत तेव्हा मला अहो, सर
नंतर दिवस फिरले मग मी ए आळश्या, दरिद्र्या झालो
परत चांगले दिवस आले परत अहो,सर झालो
सध्या सर्वसंगपरित्याग केल्याने ए गोसावड्या झालो
मी मात्र सौला नेहमी अहो

Pages