धाग्याची प्रेरणा:
https://www.maayboli.com/node/74908?page=2
१. तुम्ही तुमच्या स्पाउसला अहो-जाहो म्हणता की अरेतुरे?
२. अहो-जाहो म्हणायचे काही कारण आहे का? घरातील वडीलधार्यांमुळे लागलेली सवय की त्यांचे कळत/नकळत असणारे प्रेशर की इतर काही?
३. आजच्या जगात "अहों"ना इतका भाव द्यायची गरज आहे का?
४. तुम्ही अहो-जाहो म्हणत असाल तरी तुम्हाला मनापासून काय आवडेल?
व्यक्तिशः मी आणि माझी बायको दोघेही एकमेकांना नावानेच हाक मारतो. माझे वडील आईला पण नावानेच बोलवत असत, पण आई अहो-जाहो करत असे. सासू-सासरे दोघेजण प्रत्यक्ष अहो-जाहो करत नसले तरीही थेट नाव घेत नाहीत किंवा टाळतात, पण मेव्हणा (बायकोचा भाऊ) आणि त्याची बायको एकमेकांना नावाने हाक मारतात.
माझी धाकटी बहीण मात्र नवर्याला "अहो" म्हणते कारण सासू-सासरे. त्यांची तशी अपेक्षा/मागणी आहे. (बहीण-मेव्हणा-मुले स्वतंत्र वेगळ्या ठिकाणी, म्हणजे सासू सासर्यांपेक्षा वेगळ्या घरात राहात असली तरीही आणि तिचा नवरा (माझा मेव्हणा) तिच्यापेक्षा वयाने लहान असूनही ).
तुमचे अनुभव आणि तुमची काय मत आहेत? होऊ द्या चर्चा.
टीपः हा विषय ऋन्मेऽऽषच्या तावडीतून सुटला होता म्हणून त्याचे खास आभार.
आपाप ल्या सोयीप्रमाणे हाक
आपापल्या सोयीप्रमाणे हाक मारावी, हाकेला उत्तर आले पाहिजे आणि त्या वेळॅची गरज असल्यास कृती घडली पाहिजे
बाकी काही का असेना
माबो वर असे वेगवेगळे धागे
माबो वर असे वेगवेगळे धागे निघाले की वाटत अरेच्चा किती तरी महत्त्वाचे विषयांवर आपण धड लक्ष सुद्धा देत नाही,
रच्याकने---
१. तुम्ही तुमच्या स्पाउसला अहो-जाहो म्हणता की अरेतुरे?--अहो म्हणते
२. अहो-जाहो म्हणायचे काही कारण आहे का? घरातील वडीलधार्यांमुळे लागलेली सवय की त्यांचे कळत/नकळत असणारे प्रेशर की इतर काही?--काहीच नाही म्हणजे कदाचित कळत नकळत वगैरे असावे,काय हाक मारावी असा गहन प्रश्न तेव्हा न पडल्याबद्दल स्वतःचाच निषेध
३. आजच्या जगात "अहों"ना इतका भाव द्यायची गरज आहे का? ---फक्त अहो म्हटल म्हणजे भाव दिला अस म्हणणं आहे का? न समजल्यामुळे पास
४. तुम्ही अहो-जाहो म्हणत असाल तरी तुम्हाला मनापासून काय आवडेल?--- इतक्या गहन प्रश्नाला इतकी वर्षे दुर्लक्षित केल्याने परत एकदा स्वतःचाच निषेध
अरेंज मॅरेज वाले अहो म्हणत
अरेंज मॅरेज वाले अहो म्हणत असावेत.
प्रेम विवाह किंवा मॅट्रिमोनी वगैरे वर भेटलेले नावाने हाक मारत असावेत.
माझ्या ओळखीत/नात्यात अशी
माझ्या ओळखीत/नात्यात अशी जोडपी आहेत ज्यांच्यात नवरा-बायको दोघे एकमेकांना अहो-जाहो म्हणतात. मला ते फार क्युट वाटतं. हिंदी भाषिक लहान बाळांना किंवा आई-वडिल मुलांना रागवताना पण 'आप...' अशी सुरूवात करतात ते पण फार गोड वाटतं ऐकायला.
मॅट्रिमोनी शिवाय अजून काय
मॅट्रिमोनी शिवाय अजून काय पर्याय आहे अरेंज मॅरेजला. मुलाने मुलीला एखाद्या लग्नात बघणे आणि नातेवाईकांनी किंवा अजून कोणी सुचवणे.
मला वाटतं वयात अंतर जास्त असेल तर अहो जाहो करतात जे पूर्वीच्या काळी सर्रास असायचे. आधीच्या पिढीत काही अपवाद वगळता वडील एकटेच कमावते असायचे म्हणून त्यांना बायको आणि मुलं अहो जाहो करत. आता बायकोच नाही तर मुलंही अरे तुरे करतात जे मला चांगले वाटते.
माझ्या एका आत्याने तर मुलींना स्पष्ट सांगितले होते कि वडिलांना अहो जाहो करताना तसे मलाही करायचे कारण आई वडील दोघांनाही सारखाच आदर मिळायला हवा. मजा वाटते त्यांचे अहो आई ऐकताना.
किल्ली चा ( स्वानुभवातला? )
किल्ली चा ( स्वानुभवातला? ) प्रतिसाद पटला. + ७६५
ॲरेंज मॅरेज असले तरी आम्ही एकमेकांना नावाने हाका मारतो. ( तुम्ही स्पाऊस ला काय नावाने हाक मारता? हा धागा मी कॉपी राईट करून ठेवत आहे (c) )
तळटीप: आहो जाहो / नावाने हाक याने आदर /
पाणउतारायात फरक पडत नाही हेमावैम आहे<< माझ्या ओळखीत/नात्यात अशी
<< अरेंज मॅरेज वाले अहो म्हणत असावेत.
प्रेम विवाह किंवा मॅट्रिमोनी वगैरे वर भेटलेले नावाने हाक मारत असावेत. >>
कटप्पा, माझ्या बघण्यात तरी तसे नाही. माझ्या बहिणीचा प्रेम विवाह आहे आणि माझा मेव्हणा तिच्यापेक्षा वयाने थोडासा, पण लहान आहे. ती अहो-जाहो करते. पण बरेच अरेंज मॅरेजवाले नावाने हाक मारतात. ( तुलनेत पुरुष जास्त.)
<< माझ्या ओळखीत/नात्यात अशी जोडपी आहेत ज्यांच्यात नवरा-बायको दोघे एकमेकांना अहो-जाहो म्हणतात. >>
माझ्या लिमिटेड डेटासेटनुसार नॉर्थ इंडियन नवराबायको एकमेकांना अहो-जाहो, आप-आप असे जास्त म्हणतात.
<< मजा वाटते त्यांचे अहो आई ऐकताना. >> खरंच गमतीशीर आहे. पण मग बाबांनी का नाही सांगितले की अरे बाबा म्हणायला, असा विचार आला मनात.
अय्या, अरे तुरेच. जर तो जिवा
अय्या, अरे तुरेच. जर तो जिवा भाव चा पार्टनर असेल तर. जर बॉस टाइप रिलेशन शिप असेल तर अहो जाहो. गुलाम गिरी असेल तर मालिक.
वरना हे, मेरे शॉहर, हब्बुडी, अहो तिकडची स्वारी, चपला दिसत नाहीत, उन्हों / ये असे कितीतरी ऑप्शन आहेत मोठा स्पेक्ट्रम आहे. मराठी बाप्ये ही म्हण तात बायकोला ते लै गोड वाटते मला ऐका यला.
माझी आई व सासुबाई दोघी ही
माझी आई व सासुबाई दोघी ही आपापल्या नवर्यांना अहो म्हणत असुन ही आमचे खटले आम्हाला अरे तुरे करते
मला नेहेमी नाही, परंतु ऑकेजनली.. कधी तरी अहो म्हणुन हाक मारावी बायकोने असं वाटतं, पण बायको म्हणते.. आपल्याला सुन वगैरे आली की मारेन तुला अहो म्हणुन हाक.... म्हणजे अजुन किमान २०-२२ वर्ष वाट पाहणे आहे... अरे ए मोट्या, बैला म्हणत नाहीये बायको हे ही नसे थोडके
प्रसन्न, शेवटचं वाक्य एकदम
प्रसन्न, शेवटचं वाक्य एकदम महत्वाचं ☺️☺️
अरे-तुरेच आणि अगं-तुगंच
अरे-तुरेच आणि अगं-तुगंच म्हणतो आम्ही एकमेकांना.
मला वाटतं की साधारणपणे १९९२/३ नंतर नवऱ्यांना अरेतुरे करण्याचं प्रमाण वाढलं. किंवा त्या पिढीत.
एक व्हॉट्सपीय पोस्ट आली होती मागे यावर. खाली पेस्ट करतेय.
*बायकांकडून नव-यांना संबोधण्या बाबतचा इतिहास तुम्ही वाचलाच पाहिजे*
न्या. रानडे यांच्या घरी एकदा कोणी
गृहस्थ आले. न्यायमुर्ती घरी आहेत का विचारलं.
रमाबाई म्हणाल्या, *"खुंटीवर पगडी दिसत नाहीये.”*
त्या माणसाला काही कळलं नाही. त्याने परत विचारलं.
रमाबाई म्हणाल्या, *“जोडेही दिसत नाहियेत."*
तरिही त्याला कळलं नाही त्याने पुन्हा तेच विचारलं.
रमाबाई म्हणाल्या, *"कोपऱ्यात काठीही दिसत नाहिये."*
*ते घरी नाहियेत हे सांगण्याची ही त्या काळची पद्धत झाली.*
नावाने सोडाच पण *"हे"* वगैरे उल्लेखही केला जात नव्हता त्या काळी.
*का. पु. स. (काळ पुढे सरकला)* ..... नवर्याचा उल्लेख *"इकडुन येणं झालं"*, तिकडुन सांगणं झालं *"इकडची स्वारी”* असा होऊ लागला.
मऱ्हाटी शिणुमात *"एक माणुस रागावलंय जणू आमच्यावर"* असा लडिवाळपणा झरु लागला.
*का. पु. स.* ..... नवर्याचा उल्लेख *अहो, माझे यजमान, माझे मिस्टर असा होऊ लागला*.
*का. पु. स.* ..... नवर्याला चारचौघांच्यात *अहो*, तर *एकांतात लाजत लाजत अरेतुरे* सुरु झालं.
याशिवाय *खाशा स्वाऱ्या, घरधनी, कारभारी, मालक, पप्पुचे पप्पा, बंटीचे बाबा, अहो नारायण* हा एक समांतर प्रवास चालु होताच .....
*का. पु. स.* ..... नवर्याचा उल्लेख *रितसर नावाने किंवा माझा नवरा* असा होऊ लागला.
*का.पु.स.* ..... नवर्याचा उल्लेख *बंड्या, खंड्या, निल्या, मित्या* असा यायाकारी होऊ लागला.
*का. पु. स* ...... *सिरिअल्स* मधुन आणि कुठे कुठे प्रत्यक्षातही *शोना, बच्चु,पिलु,डार्लिंग, बेब, Hb, हब्बी, हब्बुडी* असा होऊ लागला.
या सगळ्याला मागे टाकील असा एक अति लडिवाळ उल्लेख हल्ली वरचेवर आढळायला लागलाय तो म्हणजे *नवरू* .....
अगदी नारू म्हटल्यासारखं वाटतं आणि, *"नारुचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा"* किंवा *"पाणी गाळा नारू टाळा"* अशा भिंतीवर लिहिलेल्या जाहिराती डोळ्यासमोर तरळायला लागतात.
पण सर्वात धडकी भरवणारी हाक म्हणजे.. *अहो..ऐकलत का* याला अजुन तोड नाही.
असा हा नवरे जमातीचा ईतिहास.
अरे ए मोट्या, बैला म्हणत
अरे ए मोट्या, बैला म्हणत नाहीये बायको हे ही नसे थोडके
Submitted by प्रसन्न हरणखेडकर on 7 June, 2020 - 09:36
@प्रसन्न, ते अग बाई अरेच्च्या सिनेमात दाखवल्याप्रमाणे बायकांच्या मनातले ऐकू येऊ लागले तर..... विचारही करू शकत नाही
प्यांटवालं आठवलं.
प्यांटवालं आठवलं.
आमची ही फक्त काही आज्ञा
आमची ही फक्त काही आज्ञा सोडायची असेल तेंव्हाच अहो जाहो करते.
उदा:. आपण आपला पसारा कृपया आवराल का?. किंवा आता बास झाल मित्रांबरोबर गप्पा छाटण, जरा घरात लक्ष द्या. पिशवी घ्या , उठा आणि बाजारात जा, मला खूप काम पडली आहेत.
पण मला काही प्रॉब्लेम नाही. काहीपण म्हणा, पण प्रेमाने म्हणा.
अरेंज मॅरेज वाले अहो म्हणत
अरेंज मॅरेज वाले अहो म्हणत असावेत. >>> असं काही नाही. आमचं अॅरेंज मॅरेज आहे आणि लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत तरी मी अरे तुरेच करते. पहील्यांदा गावाला गेलो की अहो जाहो म्हणायचे मग तेही सोडून दिलं.
अर्थात माझ्या आईला, साबांना आवडत नाही. पण माझ्या भाच्या (सासरच्या) ज्या वयाने माझ्याबरोबरीच्या आहेत साधारण, एकीचं लग्न आधी झालंय माझ्या, त्या सर्व नावानेच हाक मारतात, अरे तुरेच करतात. त्यामुळे फार कोणी आवडलं नाही तरीही तोंडावर बोलत नसावेत. आई सांगून थकली.
माझी बायको हिंदी भाषिक आहे.
माझी बायको हिंदी भाषिक आहे.
हिंदीत बोलताना ती जवळ जवळ कायमच आप म्हणते. क्वःचीत कधीतरी - एकटे असताना - तुम म्हणते.
इतर लोक असतील तेव्हा मात्र strictly इनको दिया, इन्हौने मांगा वगैरे म्हणते. बादवे ती माझ्यापेक्षा २.५ वर्षांनी मोठी आहे.
(कधीतरी) मराठीत बोलते तेव्हा तू म्हणते.
मी सुद्धा तिला आप किंवा तुम्ही म्हणतो पण ते गम्मत म्हणून. पूर्वी तिला खूप सांगायचो की नावाने हाक मार.. पण आता सोडून दिले आहे.
लग्नापूर्वी आम्ही जवळ जवळ ४ वर्षे प्रेमात होतो तेव्हापासून हे आप / इंहोने वगैरे चालू आहे
माझा नवरा मल्याळम भाषिक आहे,
माझा नवरा मल्याळम भाषिक आहे, हिंदी, मराठी अजिबात येत नाही.. दोघांची संवादाची भाषा एकच अर्थात इंग्लिश.. त्या मुळे अहो वगैरे काही नाही.. मल्याळम मध्ये नवर्याला चेट्टा (मोठ्या भावाला सुध्दा) किंवा एट्टा म्हणतात जसं की माझ्या नवर्याला harietta म्हणू शकते.. अर्थात मी केरळ ला गेले की हरी च म्हणते..
अरेंज मॅरेज वाले अहो म्हणत
अरेंज मॅरेज वाले अहो म्हणत असावेत. >>> खूपच जनरलायजेशन, किंवा पूर्वग्रह
लग्नानंतर रिस्पेक्टने अहो
लग्नानंतर रिस्पेक्टने अहो जाहो म्हणा नाहीतर लाडाने अरे तुरे काहीही फरक पडत नाही.. काही काळानंतर.. आमचं हे ध्यान आणि आमच ते सोंग हे पाठीमागून बोलतातच..
मी आधी अहो जाहोच करायचो पण माझ्या बायकोला मोठ्ठं झाल्यासारखं वाटतं म्हणून अगं तुगं करायला लागलो.. बाकी तिला अरे तुरे म्हणायचं की, अहो जाहो हे तिच्यावर सोडलं होतं.. आता सोयीनुसार ती कोणी नसताना लडीवाळपणे अरे तुरे आणि चारचौघांत अहो जाहो करते...
वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे हिंदीभाषिक आप वैगेरे करतात ना..ते छान वाटतं लहान मोठं कुणीही असो.. "ती" मिठास आवडते..
मेव्हणीला, बायकोला काय भेट
मेव्हणीला, बायकोला काय भेट द्यावी? नवऱ्याला काय गिफ्ट द्यावे? स्पाऊसला अहो जाहो करावे का? हे करावे का आणि ते करावे का या सारखे प्रश्न ज्यांना पडतात व वर सोशल मिडीयाकडून या उत्तराची अपेक्षा करतात ते लोक्स लग्न करतातच कशाला?
पावसाळी रात्री नवऱ्याला लाडाने अरे तुरे करने किंवा एखाद्या गुलाबी पहाटे बायकोला अहो म्हणून हाक मारने यातला रोमान्स ज्यांना कळला नाही त्यांना संसाराची गम्मतच कळली नाही.
एकमोकांना साधी नावाने हाकही न मारणाऱ्या व दोन पोरं होईपर्यंत एकमेकांची तोंडेही पाहीली नाहीत असं लाजून सांगणाऱ्या पिढीला कितीही नावे ठेवली तरी संसारातला रोमान्स त्यांनाच कळला व तो त्यांनी चार पोरं होऊनही शेवटपर्यंत टिकवला हेच खरं आहे.
मी 'अहो,(नवऱ्याचे नाव)' अशी
मी 'अहो,(नवऱ्याचे नाव)' अशी हाक मारेन, असं ठरवलं होतं. पण लग्न ठरल्यावर एका आठवड्यातच माझं " अहो, तुम्ही" ऐकून नवरोबा वैतागले. मग आमच्या अहोंंना घाबरून ( नवीन असल्याने), मी नावाने हाक मारायची सवय करून घेतली.
पण सासर खेडेगावात असल्याने, इतरांसमोर अहो-जाहो करेन, अशी अट घातली. पण साखरपुड्याच्या खरेदीला गेल्यावर समजलं की, आता अरे बोलायची इतकी सवय झालीय की अहो बोलणं कठीण होतंय. आणि त्यालाही समजत नव्हतं, मी हाक मारतेय ते. मग दिला हट्ट सोडून.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी साबांना औपचारिकता म्हणून नावाने हाक मारली तर चालेल ना? असं विचारलं. त्या चालेल म्हणाल्या. सुरुवातीला गावात हा चर्चेचा विषय झाला होता. आता माहितेय सगळयांना. सध्या लेकीमुळे बऱ्याचदा "ओ पप्पा" अशी हाक मारली जाते.
माझ्या दोन नणंदांंचे प्रेमविवाह आहेत, त्या मात्र एकांतात 'अरे' आणि चारचौघात "अहो" म्हणतात.
वावे मस्त पोस्ट
वावे मस्त पोस्ट
मी नवर्याला त्याच्या शॉर्ट
मी नवर्याला त्याच्या शॉर्ट नावाने हाक मारते.. अगदी त्याच्या पेरेन्ट्स समोर ही. त्याची ऑर्थॉडॉक्स साऊथ इन्डियन फॅमिली आहे..सासूबाईनी सान्गायचा प्रयत्न केला पण मी लग्नाआधीची प्रॅक्टिस चालू ठेवली
वावे,प्रतिसाद मस्त.का. पु. स.
वावे,प्रतिसाद मस्त.का. पु. स.*आवडले.
स्त्रीमुक्तीवाले कस्काय आले
स्त्रीमुक्तीवाले कस्काय आले नै या धाग्यावर
मी पण माझ्या नवऱ्याला नावाने
मी पण माझ्या नवऱ्याला नावाने बोलावते. आमचे लग्न गावी झाले तेव्हा लग्नात मी त्याला घरचे ज्या नावाने बोलतात त्याच नावाने हाक मारली, तेव्हा बरेच जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. माझ्या चुलत सासूने पण सांगितले की त्याला अहो जाहो करायचे. पण मी तिकडे लक्ष दिले नाही. बाकी कुणी काही बोलले नाहीत. बोलले तरी दुर्लक्ष कर असे नवऱ्यानेच सांगितल्यामुळे प्रश्नच मिटला.
एकटा, माहेरच्या मंडळींसमोर,
एकटा, माहेरच्या मंडळींसमोर, मित्रांमध्ये, अरे तुरे... गल्ली मध्ये, सासरच्या लोकांसमोर अहो जाहो.... त्या त्या वेळी आपोआप अरे तुरे किंवा अहो जाहो बोललं जाते..
VB, सॉरी पण घरच्या नावाने हाक
VB, सॉरी पण घरच्या नावाने हाक मारली हे वाचून हे आठवलं
'समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता
बेंबट्याचं नाव घेते माझा नंबर पयला'
(असा मी असामी)
*अहो..ऐकलत का* याला अजुन तोड
*अहो..ऐकलत का* याला अजुन तोड नाही.<<<
हाहाहा ☺️
आपापल्या सोयीप्रमाणे हाक
आपापल्या सोयीप्रमाणे हाक मारावी, हाकेला उत्तर आले पाहिजे आणि त्या वेळॅची गरज असल्यास कृती घडली पाहिजे Happy Proud>>किल्ली अनुमोदन.
लव्ह मॅरेज असलं तर 'अहो' म्हणायला काही हरकत नाही ना? तसंही काही वर्षांनी टोपणनावंही सुचतात:फिदी :
Pages