Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 24 May, 2020 - 07:05
पण...बोलत नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)
माझ्याबद्दल कधी कुणाला सांगत नाही
वळून बघते, हसतेही पण...बोलत नाही
एक चांदणी लुकलुक करते..अन् मावळते
त्याच अदेवर चंद्र रात्रभर झोपत नाही
तिला पाहिजे तसा तसा मी बदलत गेलो
अन् ती म्हणते मनासारखा वाटत नाही
खरे सांगतो..बाई म्हणजे असा डोह की
जन्म संपतो..थांग कुणाला लागत नाही
मी दिसलो की उगाच कुजबुज कुजबुज करते
वेळ बदलते..स्वभाव काही बदलत नाही
जशी यायची.. तशीच येते पाणवठ्यावर
मी ही असतो पाय तिचा पण घसरत नाही
मुखपृष्ठाला बघून जो तो मते ठरवतो
अख्खे पुस्तक कुणीच हल्ली वाचत नाही
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी...
भारी...
मुखपृष्ठाला बघून जो तो मते
मुखपृष्ठाला बघून जो तो मते ठरवतो
अख्खे पुस्तक कुणीच हल्ली वाचत नाही
मस्त...