Submitted by पियुष जोशी on 15 May, 2020 - 00:11
एकदा तरी असं म्हणत
स्वप्नं तुझी रंगवत जा
अशक्य असली तरी
मनामध्ये रुजवत जा
नको करू चिंता उद्याची
रमू ही नको काळात तुझ्या
सांगड घाल दोन्हीची
आणि आज तुझा सजवत जा
जोरात पळू ही नको
आणि जागी एका थांबुही नको
दबक्या पावलांनी फक्त
वाटा तुझ्या तुडवत जा
एकदा तरी असं म्हणत
स्वप्नं तुझी रंगवत जा
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
अजून लिहीत जा , पुलेशु.
आवडली कविता.
आवडली कविता.
मस्त!
मस्त!
प्रत्येक कडव्यानंतर स्पेस दिली तर कविता सुटसुटीत दिसेल..
आवडली.
आवडली.
Nice poem
Nice poem