चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोगलगाय पोटात पाय , विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर
यात कसलाच भंग होत नाहीय
फक्त मीच उत्तर देताना नियमाचा भंग करतेय

अवनी, चांगला प्रयत्न.
बघा असाच दुसरा छोटुकला प्राणी !

अस्मिता,
तुमच्या म्हणीचे उत्तराशी साधर्म्य आहे, पण कुठे सम्राट आणि कुठे हवालदार !!!
बघा अजून थोडा रेटा लावून.....

शेपटी तुटली पाल निसटली.....
बरेचदा म्हणी माहीत नसतात ..... असेलही अशी म्ह ण
अर्थ ..... थोडक्यावर संकट निभावले..... पालीसाठी

कोडी एकदाका डोक्यात घुसली स्वस्थ बसू देत नाही. मी पण थेड्या थोड्या वेळानी चक्कर मारून जातेय पण काही क्लू नाही लागते

अळी आहे का प्राणी
....आणि मला राजा म्हणा
मला माहिती नाही अंदाजे सांगते आहे.

अवनी, अस्मिता ,
आता ४ संपवूया.
४. कप्पा, दाम, सम्राट
-खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा

..... अळी नाही, छान प्र करताय ....

कासव नाही,
आपल्या बोटावढा प्राणी .
आता उत्तर द्याच बरे !

सुरवंट
Carried away होते आहे Happy

बरोबर.
आता फक्त ५ राहिली.
५. कलत्र, ईश्वर, ती :
.....
या चहा पिउन. आज सम्पवून टाकू .

गोमवाली छानच.

५. >> म्हणजे इथे हे पती पत्नी और वो, असा मामला दिसतोय.
बाहेरख्यालीपणा असावा.

साद,
होय साधारण त्याच धर्तीवर.

@भरतजी
12. सर्वेभवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्

नवा खेळ:
यात तुम्हाला सहा चित्रपटांची नावे ओळखायची आहेत हे सर्व चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहेत. क्रमांक १ व २ मराठी, ३ व ४ हिंदी आणि ५ व ६ इंग्लिश भाषिक चित्रपट आहेत. त्यांचे कथानक असे आहे:

१. जात, वर्ग व लिंगभेदाने बरबटलेल्या भारतीय समाजाचे चित्रण. तळागाळातून वर आलेला तरुण, त्याचे खेड्यातून महानगरातले स्थलांतर आणि त्याला आपलं अस्तित्त्व टिकविण्यासाठी कोणत्या दिव्यांचा सामना करावा लागतो, याचे उत्तम चित्रण. या तरुणास पुढे मोठा राष्ट्रीय पुरस्कार.

२. एक कुस्तीगीर, गरीब मजुराच्या घरातला, मूकपटापासून अभिनयास सुरवात, पुढे चित्रनिर्माता आणि खूप श्रीमंत झालेला माणूस. त्याचे चित्रण.
………………..
३. सत्य घटना : एक जोडपे. आर्थिकदृष्ट्या समृद्ध. भारतातील खेडी सुधारायचा ध्यास घेतलेले. तंत्रकुशल. कमी खर्चातील सोप्या विद्युत जनित्राची निर्मिती. स्वयंसेवी कार्यास वाहून घेतलेले. यात फेरफार करून चित्रपट.

४. भारतातील नैसर्गिक प्रकोप ही सत्यघटना. त्याच्यात भर घालून आंतरधर्मीय व्यक्तींची प्रेमकथा. अर्थातच त्यापैकी मुलगी उच्चवर्णीय व श्रीमंत. पुढे प्रचंड अडथळे. सुखी शेवट नाही.
.....................
५. ‘वाल्याचा वाल्मिकी’ झाला हे सूत्र. ही व्यक्ती मोठे आर्थिक घोटाळे करण्यात तरबेज आणि तोतयेगिरी. तोतया भूमिकांची व्याप्ती स्तिमित करणारी. पुढे तुरुंगवास. शिक्षा भोगल्यावर चक्क सरकार दरबारी मानाची नोकरी !

६. एक अपहरण. शोधण्यास पोलिसांचे अपयश. एका महिलेने स्वतःच शोधमोहीम हाती घेणे. त्यातून एका बेटावरील अनेक वेश्यांचे खूनसत्र उघडकीस येणे.

Pages