Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 5 May, 2020 - 10:14
नशीब नेत राहिले.........!
- महेश मोरे (स्वच्छंदी)
मला उन्हात ठेवुनी कसे मजेत राहिले
नकोच जायला तिथे नशीब नेत राहिले
खुडून टाकले कुणी, कुणी जखम उरी दिली
उभ्या जगास तेच फुल सुगंध देत राहिले
असेच काल एकदा अधर चुकून चुंबिले
नि श्वास काळजातले तिच्या कवेत राहिले
जसा गझल लिहायला म्हणून शब्द शोधला
समोर नेमके तिचेच नाव येत राहिले
सुखांस भेटली अधीर वाहवा तुझी-तिची
नि दु:ख मैफलीत फक्त दाद देत राहिले
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर...
सुंदर...
>>>असेच काल एकदा अधर चुकून चुंबिले
नि श्वास काळजातले तिच्या कवेत राहिले<<<
हे मस्तच..
जसा गझल लिहायला म्हणून शब्द
जसा गझल लिहायला म्हणून शब्द शोधला
समोर नेमके तिचेच नाव येत राहिले.............
वा!वा!! क्या बात है!!!!
भारी!!!! क्या बात! क्या बात!!
भारी!!!!
क्या बात! क्या बात!!
खुडून टाकले कुणी, कुणी जखम
खुडून टाकले कुणी, कुणी जखम उरी दिली
उभ्या जगास तेच फुल सुगंध देत राहिले
खूप छान...
मनापासून धन्यवाद सर्वांना....
मनापासून धन्यवाद सर्वांना....!
प्रत्येक ओळीला.. क्या बात.!!
प्रत्येक ओळीला.. क्या बात.!!
वाहवा!
वाहवा!