प्राजक्ताची फुले

Submitted by मनोजकुमार देशमुख on 28 April, 2020 - 06:51

हळूवार वेच ती
प्राजक्ताची फुले
रानपाखरे वेलीवरती
घेती तेथे झुले

मधुर गोजिरी होते किलबिल.
तुझ येण्याची देती चाहूल.
प्राजक्त ही मग बहरून येतो
शुभ्र फुलांची रास घालीतो

केस मोकळे शुर्भ वसने
पायावर ते अलगत बसणे
फुल फुलाशी घेते वेचून
असेच मजला वाटे पाहून

चोरुन घेई गंध नेटका
अंगणी वाहे वारा अवखळ
प्राजक्ताचा गंध सुगंधी
की आसे तो तुझाच दरवळ

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर कविता.

'फुल फुलाशी घेते वेचून
असेच मजला वाटे पाहून'
ही ओळ फारच आवडली.