देणं सीझन २ – भाग १
https://www.maayboli.com/node/73996
देणं सीझन २ – भाग २
https://www.maayboli.com/node/74043
देणं सीझन २ – भाग 3
https://www.maayboli.com/node/74080
देणं सीझन २ – भाग ४
https://www.maayboli.com/node/74117
देणं सीझन २ – भाग ५
https://www.maayboli.com/node/74153
आता पुढे..
देणं सीझन २ – भाग ६
काही अर्जंट काम आटोपून येतो असं सांगून यश झुरिक वरून डायरेक्ट लंडनला गेला आणि दीप्तीला एकटीलाच मुंबईला परतावं लागलं. गेले 8 दिवस ठरवल्याप्रमाणे एकदाही तिने घरी फोन केला नव्हता आणि घरूनही फोन आला नव्हता म्हणजे ऑल वॉज वेल. घरी परत येताना फार संमिश्र भावना होत्या तिच्या मनात. तब्बल ४ वर्षांनी खऱ्या अर्थाने सुटी अशी तिने उपभोगली होती. स्वित्झर्लंडचे नयनरम्य देखावे, फुप्फुसांची शुद्धी करणारी हवा, बर्फाचा गोठवणारा पाहिलावाहिला मऊ स्पर्श ह्यांच्यावर कडी म्हणजे तिच्यात आणि यश मध्ये निर्माण होऊ घातलेलं एक हळुवार नातं. ४ वर्षं एकटीने झगडताना दीप्ती कमपॅनियनशिप म्हणजे काय ते जणू काही विसरूनच गेली होती. आशु आणि प्रीतीच्या एकत्र निघून जाण्याने तिच्या आयुष्यात जी भयानक पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्याचा विचार सुद्धा तिच्या मनात कधी आला नव्हता.
एखादा अवयव कापून टाकावा तसं आपलं प्रेमाला आसुसलेलं मन तिने स्विच ऑफ करुन टाकलं होतं. लगेच ती यशच्या प्रेमात पडली होती अशातला भाग नव्हे पण तो तिला आता एक जवळचा माणूस नक्कीच वाटायला लागला होता. आता पुढे काय आणि कसं करायचं ह्याचे काही आडाखे फ्लाइट मध्ये बसल्या बसल्या तिने मनात बांधले होते.
घरी पोचायला रात्र झाली. सुषमाताई जाग्या होत्या पण आदी मात्र झोपला होता. त्याच्या कपाळाच्या आणि गालांच्या मनसोक्त हळुवार पाप्या घेऊन दीप्ती त्याला कुशीत घेऊन १० मिनिटे तशीच पहुडली.
“ अगं फ्रेश तरी हो बाळा ... ” सुषमा ताईंना ही अपेक्षितच होतं तरी त्यांनी दीप्तीला हलवलं
“ कधी उठेल हा ? मी काय काय आणलंय त्याच्या साठी म्हणून सांगू !!! हे बघ ..”
शेवटी भांडून भांडून विकत घेतलेली कोरी करकरीत सूटकेस उघडत दीप्तीने सामानाचा ढीग सोफ्यावरच उपडा केला. सुषमाताई आणि सुरेश यांना एक हिज अँड हर ऊंची पर्फ्यूमची जोडी, स्विस चीज, स्विस चोकोलेट्स, आदी साठी एक फारच क्यूट स्विस गायीचं सॉफ्टटॉय, कपडे, इतरही अनेक खेळणी, एक मोठी स्विस काऊबेल आणि त्याच आकाराच्या छोट्या छोट्या की चेन्स्, नाजूक काशिदाकारी केलेलं टेबल क्लॉथ, असा सगळा गाव गोळा करून टी आली होती. सुषमाताईंसाठी आणलेला अतिशय मखमली ऊबदार स्वेटर तिने त्यांच्या खांद्याला लावून पहिला आणि स्वतःच्या चॉइस वर खूश झाली
“वॉव! ह्या स्वेटर मध्ये एकदम हॉट दिसशील तू मदर इंडिया ! “
“दीप्ति! अगं किती दिवसांनी तू मला मदर इंडिया म्हणालीस !!!” सुषमाताई अक्षरशः मोहरून गेल्या.
कुणाला सरळ नावाने हाक मारायचीच नाही ही दीप्तीची लहानपणापासूनची खोड होती. त्यातून काहीतरी चावटपणा करण्याचा प्लॅन असेल तर ती सुषमाताईंना मदर इंडिया अशी संबोधायची. ४ वर्षे दीप्ती ची विनोदबुद्धी सुद्धा जणू स्विच ऑफ झाली होती. त्यामुळे ती पूर्वीसारखी थट्टा करते आहे ही पाहून सुषमाताई खूश झाल्या
“तर मी म्हणते आहे एकदम हॉट दिसशील तू ह्याच्यात .. बाबाचं काही खरं नाही”
“झाला का फजिलपणा सुरू तुझा? हॉट दिसेन की हॉट पोटॅटो होईन. मुंबईतल्या थंडीला गरज असते का एवढ्या ऊबदार स्वेटरची दीप्ती.. उगीच आपला खर्च! आणि काय गं स्वतःसाठी काही घेतलंस की नाही? “
“अगं ही अख्खी ट्रीपच माझ्यासाठीच नव्हती का! आणखीन कशाला काय आणायचं ? “
“ही अख्खी ट्रीप तुझ्यासाठी नव्हती बरं! तुमच्यासाठी होती! त्याचं काय केलंत ते बोल ! “
“केलं की सगळं! “ दीप्ती सुषमाताईंची फिरकी घ्यायच्याच मूड मध्ये होती. कितीतरी दिवसांनी!
“आं!“ सुषमाताईंचा आ वासलेला बघून दीप्ती हसायला लागली
“ट्रेकिंग केलं, स्कीइंग केलं, फाईन डायनिंग पण केलं .. तुला काय वाटलं अंम्म? “
“मला काय वाटायचंय “ सुषमाताई गोऱ्या मोर्या झालेल्या बघून दीप्ती ला अजूनच चेव आला
“नाही म्हणजे तू म्हणूनच फोर्स केलास ना आम्हाला दोघंच जा म्हणून!
“हो म्हणजे तुमची नीट ओळख व्हावी, मैत्री जमावी, इथे बाकीची डिसट्रॅकशन्स खूप आहेत ना तुम्हाला कुठे मोकळा वेळ मिळणारे म्हणून मी आग्रह केला झालं..”
“आम्हाला ते माहीत होतं माता. म्हणून तर आम्ही गेलो न तुझ्या आग्रहाला मान देऊन ? “
“मग? कसा वाटला तुला यश? काही मोकळ्या गप्पा मारल्यात की नाही“ .. न राहवून सुषमाताईंनी विचारलंच शेवटी!
“माहीत नाही का पण नेहमी सारखा भांडला नाही माझ्या बरोबर. त्यामुळे बोअर झालं मला “
“पुरे झालं तुझं. तुलाच भांडणाची हौस असते नेहमी माहित्ये मला. महत्त्वाचं बोल..”
“महत्त्वाचं काय आई ?”
“लग्न करण्याच्या दृष्टीने तुला तो आवडलाय का? “ सुषमताईंनी आत्ता सरळसरळ बाऊनसर टाकला
“अकॉर्डिंग टु माय अनॅलिसिस ही इज अ रिस्क वर्थ टेकिंग!” दीप्तीनेही फॉरवर्ड स्विंग हाणला
“रिस्क? ही इज ए रिस्क अकॉर्डिंग टु यू? “
“आरन्ट दे ऑल? इसन्ट मॅरेज इट्सेल्फ इज अ रिस्क? “
“नॉट व्हेन यू मॅरी समवन हूम यू लव”
“तुझी काय अपेक्षा होती आई? ८ दिवसांत आम्ही प्रेमात पडू?”
“म्हणजे तू कॉमप्रमाईजच करते आहेस तर ” सुषमाताई स्वतःशीच म्हणाल्या
“शेवटी अरेंज्ड मॅरेज मध्ये कुठे प्रेम करतात माणसं एकमेकांवर लग्न करताना. सगळं तोलून मापूनच तर असतं...यश तरी नोन(known) डेव्हिल आहे. त्याने प्रामाणिकपणे त्याचा पास्ट मला सांगितला हे काय कमी आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं आदीवर खरंखुरं प्रेम आहे आणि आदी त्याच्या बरोबर अगदी खूश असतो. जे मी एकटी त्याला कधीच देऊ शकले नसते ते यश त्याला देऊ शकतो. मग आदीसाठी आपण ह्या रिलेशनला चान्स द्यायला नको का?”
सुषमाताई अजूनही निराशच दिसत होत्या. त्यांची निराशा दीप्तीला गोंधळात टाकत होती.
“आदीसाठी तू तुझं आयुष्य तुझं प्रेम नसलेल्या माणसाबरोबर घालवावंस हे मला अजूनही पटत नाहीये “
“माझं प्रेम असलेला माणूस मला केव्हाच सोडून गेलाय आई! आता मी त्याची वाट का बघू?” दीप्ती आता अगतीक व्हायला लागली होती
“.. कारण तो परत आलाय ..” सुषमाताईंचा आवाज घशांतच अडकला जणू
“काय म्हणालीस?” तिने अविश्वासाने विचारलं
“आशु परत आलाय दीप्ती. आणि त्याला तुझ्याशीच लग्न करायचंय. ही नेवर गॉट मॅरीड अर्लियर. “
सुषमाताईंचा चेहरा रडवेला झाला होता तर दीप्तीचा चेहरा भकास.
कानावर पडलेल्या वाक्यातला एकेक शब्द हळूहळू नीट(neat) स्कॉच व्हिस्कीचा घोंट प्यावा तशी ती रिचवंत होती आणि तो घोंट तिचा घसा जाळत पोटात उतरत होता. तिचा फोन वाजला तरी त्याचं भान तिला राहिलं नव्हतं. शेवटी सुषमाताईंनी फोन बघितला आणि “YashMhatre Calling...“ अशी अक्षरे वाचून तिच्या हातात नेऊन कोंबला
फोनएवरची अक्षरे पाहून दीप्तीने क्षणभर डोळे मिटले आणि फोन कट् केला..
*************************************************************************************************************************
लंडन पासून तासाभराच्या प्रवासानंतर यश सरे काऊंटी मध्ये पोचला. खरं सांगायचं तर स्वित्झर्लंडचं कडक इस्त्री मारलेलं सौन्दर्य यशला टिपिकल इंग्लिश कंट्रीसाइड पेक्षा जास्त आवडलं नव्हतं. मुंबईशी लंडनच्या असलेल्या साम्यामुळे का कुणास ठाऊक पण लंडन त्याला कायमंच मनापासून आपलं वाटलं होतं. पण आत्ता त्याला त्याच्या लाडक्या लंडन मध्ये थांबायला वेळ नव्हता. हीथ्रो वरून डायरेक्ट ट्रेन घेऊन तो सरे हिल्सला पोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती.. टॅक्सीत बसून तो बाहेरचं अतिशय प्रेक्षणीय दृश्य बघत होता. आज हवेने कृपा केल्याने आकाश ढगाळ नव्हते. स्वच्छ सूर्यप्रकाशाने आसमंत उजळला होता. नजर जाईपर्यंत पहुडलेल्या हिरव्याकंच टेकड्या, वाऱ्याच्या तालावर हुळहुळणारं गवत, गर्द झाडीतून अधूनमधून डोकावणारी टुमदार घरं. त्याचा प्रवासाचा सगळा शीण कुठल्या कुठे पळून गेला. दीप्तीची त्याला तीव्रतेने आठवण झाली. नात्यातली अशी गहिरी ओढ त्याला आयुष्यात पहिल्यांदाच जाणवत होती. आत्तापर्यन्तची त्याची सगळी रिलेशनशिप्स ही कॅज्यूअल, टाइमपास आणि काही पुढे शारीर सुखापर्यंत जाऊन थांबलेली होती. नातं निवडायचं कसं आणि त्यात कुठल्या पायरीला थांबायचं ह्याचे संस्कार त्याला कधी मिळालेच नव्हते. मनाच्या तालावर नाचणं तेवढं त्याला येत होतं. पण मनाच्या गाठी जुळणं काय असतं ते तो आता पहिल्यांदाच अनुभवतही होता आणि त्यातली दुखरी बोच एंजॉय ही करत होता. न राहवून त्याने तिला फोन लावला. खरंतर २ तासांपूर्वीच तिने मुंबई एयरपोर्ट वरून पोचल्याचा फोन केला तेव्हा बोलणं झालं होतं. पण आत्ता ह्या क्षणी तिचा आवाज ऐकण्याची जणू यशला तहानच लागली. जवळजवळ ५ मिनिटे रिंग होऊन दीप्ती ने फोन कट् केलेला बघून तो जरा खट्टू झाला आणि “फ्रेश होत असेल, करेल कॉल बॅक” अशी स्वतःची समजूत घालून पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागला. पण आत्ता त्याला काही दृश्य दिसत नव्हतं कारण त्याचं सगळं लक्ष फोनकडे लागून राहिलं होतं. फोन काही आला नाही पण ‘होप’ ची पाटी मात्र आली. सरे हिल्स मधील एका व्हिक्टोरियन गढी मध्ये ‘होप रीहॅबिलिटेशन सेंटर “ वसलेलं होतं.
३ वर्षांपूर्वी यश इथूनच आशेची किरणं डोळ्यात घेऊन, एक नवीन यश बाहेर पडला होता. डॉक्टर जॉन ओ’राईली ‘होप’ चे प्रमुख मानसोपचारतज्ञ होते. अत्यंत अनिच्छेने तिथे दाखल झालेल्या यशला अंतर्बाह्य बदलण्यात त्यांचा मोठा वाटा होता. होप मध्ये पेशंटस् ची संख्या मर्यादित असल्या मुळे त्यांचं यशकडे वैयक्तिक लक्ष होतं. हा वरकरणी वाया गेलेला मुलगा आत कसा हिरा आहे ही त्यांनी ओळखलं होतं आणि साम, दान आणि वेळप्रसंगी दंड वापरून त्याला वठणीवर आणलं होतं. डॉक्टर ओ’राईलींना यशच्या मनात फार वरचं स्थान होतं. त्यामुळेच त्याच्या आयुष्यात घडणारं हे नवीन पर्व त्याला त्यांच्या कानावर घालायचं होतं. ज्या नवीन जबाबदाऱ्या तो स्वीकारू पहात होता त्यासाठी त्यांच्याकडून काही सल्ले घ्यायचे होते. जे आयुष्य तो साकारू पाहत होता त्याच्यासाठी त्यांच्याकडून बळ घ्यायचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका कुटुंबात सामील झाल्याचा जो आत्मीय आनंद तो अनुभवत होता तो त्यांच्याबरोबर वाटायचा होता.
मोठया मोठया ढांगा टाकत यश होप च्या लॉबी मध्ये पोचला. लॉबी मध्ये ओळखीची सॅमंथा उर्फ सॅम दिसल्यावर त्याच्या तोंडभर हसू पसरलं. यश ला बघून सॅमनेही त्याला ओळखलं.
“हे सॅम!!!”
“हे यश!!! व्हॉट आर यू डूइंग हियर? आय होप यू आर नॉट गेट्टिंग एडमिटेड अगेन हूं ”
“ओह नो लव! आय हॅव कम टु टेक यू विथ मी धिस टाइम“ म्हणत तिला डोळा मारला
“ लायर!! हाऊ हॅव यू बीन? यू लुक टेररीफीक ! “ सॅम मनापासून खूश झाली होती
“अॅम गुड सॅम अँड होप द सेम विथ यू. सो व्हेअर इज अवर ओल्ड मॅन?”
“यू मीन यू डोन्ट नो?” सॅमने गंभीर होत विचारलं
“नो व्हॉट?”
“जॉन इज नो मोअर यश.. ही पास्स्ड अवे कपल ऑफ मन्थ्स अगो ..”
यशच्या प्रफुल्लित चेहेऱ्यावर क्षणात अवकळा पसरली. एखाद्या थकलेल्या म्हाताऱ्या माणसा सारखा खुर्चीच्या हाताचा आधार घेत तो खुर्चीवर बसला
“... अँड आय थॉट माय हॅपी डेज हॅव फायनली अराइव्ड .. “
|| क्रमशः ||
छान भाग. पुढील भागाच्या
छान भाग. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!
छान आहे हा भाग पण.
छान आहे हा भाग पण.
ट्विस्ट पुराण मोड ऑन ()
कथेच्या या वळणावर ट्विस्ट साठी दोन चित्रपट eligible आहेत.
1) दिवाना (रिहॅब वाला यश - ऋषी)
2) HDDCS
ट्विस्ट पुराण मोड ऑफ()
पुभाप्र
मस्त!
मस्त!
मस्तच झालाय हाही भाग...!
मस्तच झालाय हाही भाग...!
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.. शुभेच्छा!!
फक्त हा वरकरणी वाया गेलेला मुलगा आत कसा हिरा आहे ही त्यांनी ओळखलं होतं आणि साम, दान आणि वेळप्रसंगी दंड वापरून त्याला वठणीवर आणलं होतं >>> या वाक्यात दान झालंय चुकून तिथे दाम एवढा बदल कराल का ??
Chan ahe ha bhag pn.. next
Chan ahe ha bhag pn.. next part lvkr plz
मस्तच, पुढचा भाग टाका लवकर
मस्तच, पुढचा भाग टाका लवकर
मस्त सुरु आहे कथा!
मस्त सुरु आहे कथा!
मस्त आहे हा भागही.
मस्त आहे हा भागही.
खुपच भारी आहे .... पुढचा भाग
खुपच भारी आहे .... पुढचा भाग टाका लवकर प्रतिक्षेत
लवकर लिहा ना.... पुढील भाग..
लवकर लिहा ना.... पुढील भाग....
Next part aala nahi ? Waiting
Next part aala nahi ? Waiting ...