देणं सीझन २ – भाग १
https://www.maayboli.com/node/73996
देणं सीझन २ – भाग २
https://www.maayboli.com/node/74043
आता पुढे..
देणं सीझन २ – भाग 3
सुषमा ताईंचं विचारचक्र वेगाने सुरू होतं. हा पेच सोडवायला प्रचंड खडतर होता. एखाद्या स्वप्नवत त्यांच्या कुटुंबाची विस्कटलेली घडी बसण्याची आशा त्यांच्या मनात हळूहळू पालवली होती. पण यशची तामसी बाजू त्यांच्या सात्विक संस्कारांच्या आड येणार होती ही निश्चित. यश दीप्ती आणि आदित्य चा त्रिकोण सरळ रेषांनी सांधणारा नव्हता. त्यांच्या मार्गात खूप अडचणी येणार होत्या. ह्या अडचणींमुळे त्यांचा एकत्र एक कुटुंब बनण्याचा निर्धार डळमळला तर कायमचे ओले घाव वागवत ही तीघंही आयुष्यात कधीही सुखी होणार नव्हती.
मुली लहान असताना सुद्धा सुषमाताईंनी शिस्तीच्या चौकटीत त्यांना स्वातंत्र्य दिलं होतं. त्याशिवाय त्या स्वतःच्या सदसदविकेकाने स्वतःचे निर्णय घ्यायला आणि ते निभवायला समर्थ होणार नाहीत ही त्यांची धारणा होती. एखाद्या गोष्टीची सक्ती हा त्यांच्या घरात लास्ट रिसॉर्ट होता. कुणी अगदी धडधडीत चुकतंय इतकी स्पष्टता असल्याखेरीज एकमेकांच्या आयुष्यात दखल द्यायची दीक्षितांच्या घरात पद्धत नव्हती. परंतु आत्ताची परिस्थिती पाहून सुषमाताईंनी सुकाणू स्वतःच्या हातात घेण्याचं ठरवलं. अडचणीच्या वेळी त्यांची एक सवय होती. म्हात्रे हाऊस मधून परतल्यावर घरातली खुणावणारी कामं तशीच ठेवून त्या पुस्तकांच्या कपाटांपाशी गेल्या. अर्नेस्ट हेमीन्गवे नाव बघून त्यांनी पुस्तक उचलले. आणि क्षणभर डोळे मिटून त्यांनी एक रॅन्डम पान उलटले.
हेमीन्गवे म्हणाला “ वुई आर ऑल ब्रोकन. दॅट्स हाऊ द लाइट गेट्स इन. “
आणि सुषमा ताईंच्या चेहेऱ्यावर हलकेच स्मितहास्य उमटलं.
***********************************************************************************************************************************
दीप्तिची ठासून भरलेली रकसॅक सोफ्याजवळ पाहून यश अचंबयात पडला.
“हे काय आहे? “
“काय म्हणजे ? सामान आहे माझं ? “
“एवढंच? “
“८ दिवसांसाठी किती सामान लागतं ? “
“मला तर ३ सूटकेसेस सुद्धा कमी पडताहेत. “
“आय आम नॉट सर्प्राइजड अॅट ऑल. तू तुझं सगळं घर पॅक केलं असशील नाही “
“अजिबात नाही. जस्ट द इस्सेनशीअल्स.”
“तुझे इस्सेनशीअल्स ३ बॅग्स पेक्षा जास्त आहेत? फ्लाइट मध्ये अलाउड नाहीये बरं का एवढं सामान” यश ला डिवचंत दीप्ती मेक माय ट्रीप वर डील्स बघत होती
“फ्लाइटमध्ये तुझीच घाणेरडी बॅग अलॉव करणार नाहीत”
“एय घाणेरडी कुणाला म्हणतोस रे? आरिजिनल वाइल्ड क्राफ्ट ची ऑलराउंडर ऑलसीजन हेवि डयूटी बॅग पॅक आहे ती..” दीप्तीच्या लाडक्या बॅगला नावं ठेवणं म्हणजे तिच्याशी मोठा पंगा होता
“डोंगर, दर्या, बर्फ, वाळवंट वाट्टेल तिथे नेता येते ती आणि ठणठणीत राहते. आत ३० केजीस् कोंबलेस ना तरी आआ होत नाही तिचा”
“ पण आपण कुठे डोंगर दर्या वाळवंटात चाललोय..
“म्हणजे स्वित्झर्लंड ला जाऊन आल्प्स मध्ये ट्रेकिंग करायचं नाहीये आपण? आय आम आउट देन”
“ काय कटकट लावलीये तुम्ही? सरळ २ वाक्य तरी बोलाल की नाही एकमेकांशी ?” सुषमाताई बाहेर येत करवादलया
“ आणि आय अॅम आउट आय अॅम काय लावलयस सारखं? अंा? दॅट इज नॉट यॉर डेसीजन टु मेक ठरलंय ना आपलं??
आणि यश म्हणतोय ते बरोबर आहे. ती जुनी बॅग बदलायची वेळ आली आहे आता. छानशी नवी सूटकेस घे आणि व्यवस्थित पॅकिंग कर कळलं? आणि हो ! फेकून दे तो गोणपाट पहिला “
“हे म्हणजे अति होतंय आता. मला सूटकेस आवडत नाही. मला माझे हात मोकळे लागतात.” दीप्ती धुसफूसली आणि यश गालातल्या गालात हसत त्यांचं भांडण एंजॉय करत चकली खात बसला होता
“कशाला मोकळे लागतात हात तुला ? आदीची प्रॅम नाहीये ढकलायची तिथे. आणि जास्त सामान झालं तर हा यश आहे ना उचलायला”
“ अंा .. म्हणजे हो .. मी आहे ना..” आपल्यावर बूमरॅंग आल्यावर यश गडबडला पण इथे आपली शान पणाला लागली आहे ही जाणवून म्हणाला
“मी सुद्धा तिला तेच संागत होतो की सामानाची काळजी करू नकोस. जरा व्यवस्थित आयर्न केलेले फॉर्मल कपडे वगरे घे.. आपल्याला फॉर्मल डायनिंगला लागले तर ..”
“फॉर्मल डायनिंग? माला जाम बोअर होतं अश्या पार्टीस् मध्ये “ दीप्तीनी नकारघंटा हालवली
“स्वित्झर्लंड मध्ये जाऊन फॉर्मल डायनिंग करायचं नाहीये आपण? आय आम आउट देन” सुषमाताईंकडे मुद्दाम पहात यश ने चिडवलं
“ आहेच का परत आता ? याद राखा कुणी परत हे वाक्य म्हणालं तर ..” सुषमाताईंना बरोबर बाण लागलेला पाहून दीप्ती आणि यश चक्क एकत्र हसायला लागले. आणि त्यांना तसं हसताना बघून सुषमा ताईंना हायसं वाटलं.
.. तर प्लॅनचं पहिलं पाऊल असा होता की यश आणि दीप्ती ह्या दोघांनीच एकत्र कुठेतरी परदेशी ट्रीपला जायचं. बऱ्याच वादावादी आणि खटपटी नंतर दोघं तयार झाली. आफ्रिकन सफारी ते ऑस्ट्रेलियन बोनाझा पर्यन्त विचार विनिमय आणि शेवटी संघर्ष होऊन जगातील शांततेचं माहेरघर म्हणजे स्वित्झर्लंड असं स्थान नक्की झालं. ह्या ट्रीप साठी २ अटी सुषमा ताईंनी घालून दिल्या होत्या. एक म्हणजे दोघांनी स्वतः नव्हे तर दुसऱ्याचा सगळा खर्च करायचा आणि दुसरी म्हणजे ८ दिवस एमर्जन्सि असल्या शिवाय घरी किंवा इतर कोणालाही फोन करायचा नाही. बाकी काहीही बंधन नाही. ह्या प्लॅन मधून त्यांना काय साधायचे होते ते समजायला वाचक सूज्ञ आहेतच!
तेव्हा आता जाऊ यात त्यांच्या बरोबर स्वित्झर्लंडला ..
|| क्रमशः ||
मस्त!
मस्त!
उत्सुकता वाढली आहे पुढील
उत्सुकता वाढली आहे पुढील भागाची. शुभेच्छा.
Next part plz
Next part plz
मस्त आहे कथा. छान वेग आहे
मस्त आहे कथा. छान वेग आहे कथानकाला.
ह्म्म्म!! प्रत्येक भागात
ह्म्म्म!! प्रत्येक भागात दोघांतील ठळक फरकच अधोरेखित होतायत की. काय होतय पुढे देव जाणे.