Submitted by मन्या ऽ on 8 April, 2020 - 13:17
लांबड कथा..
कोणतीही कथा वाचताना "यार! शेवट वेगळा हवा होता" किंवा "फारच ताणलीये राव कथा." असं वाटल असेल तर हा धागा तुमच्यासाठीच आहे.
तर लोक हो, महत्वाचं म्हणजे
या कथेला शेवट नसेल.
तेव्हा तुम्हाला हवे तसे ट्विस्ट कथेत टाका!
मग तो नवरसांचा विचार न करता टाकलात. तरीही चालेल.
नियम फक्त एकच ट्विस्ट टाकताना कथेची कंटीन्युटी ठेवा..
चला तर मग करुया लांबड कथेला सुरवात आपल्या पारंपारिक कथांच्या वर्ल्डफेमस ओळीने..
एक होत आटपाट नगर..
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायला ! हे संगिता नाव कुठनं
हायला ! हे संगिता नाव कुठनं आणलंय ? मी हा आ च्या शशकमध्ये वाचलेलं आठवतंय.
अरे मै दो दिन यहा नही फिरक्या
अरे मै दो दिन यहा नही फिरक्या, तो किसी ने लिख्याईच नै?
टांगा पलटी घोडे फरार?
ये ना चॉलबे.
चलो लिखो, नै तो अंनिस वाल्यांना कळवेन हं.
टांगा तर माहिती नाही पण
टांगा तर माहिती नाही पण
आज अख्खी कोंबडी पोटात पलटी झालीय त्यामुळे जरा आराम !
वफहो असल्याने नवऱ्याला सर्व
वफहो असल्याने नवऱ्याला सर्व ट्रिक्स तोड़पाठ झालेल्या असतात त्यामुळे तो फक्त १ उड़ी मारून त्याची क्लिप रिप्लेवर ठेवतो आणि व्हाटस आप स्टेटस अपडेट करतो ...
तुझी माझी जोड़ी
झालीस कधी तू जाडी
घाबरू नकोस वेडी
मारतो मी दोरी उड़ी>>>
त्याचं व्हाट्स अप स्टेटस बघून हडळ संतापते आणि जाब विचारण्यासाठी नाशिकला जायला निघते. रस्त्यात तिला पोलीस पकडतात कारण लॉकडाउन चालू असतं. ती कारण सांगते, ―
त्याचं व्हाट्स अप स्टेटस बघून
त्याचं व्हाट्स अप स्टेटस बघून हडळ संतापते आणि जाब विचारण्यासाठी नाशिकला जायला निघते. रस्त्यात तिला पोलीस पकडतात कारण लॉकडाउन चालू असतं. ती कारण सांगते, ―
माबोवर तीने छान छान कुरडई चे फोटो पाहीले, आता नासिक हून येवल्याला जाऊन कुरडई डिझाईन ची पैठणी घ्यायची आहे.
कुरडई डिजाईन ची पैठणी घ्यायची
कुरडई डिजाईन ची पैठणी घ्यायची आहे.>>>>
हडळ पैठणी घ्यायची म्हणुन नवऱ्याच्या मागे लागते खरी.. पण थोपुवर तिच्या नंणदेचा अगदी तिला हव्या तशाच कुरडई डिजाईन ची पैठणी नेसलेला फोटो बघते आणि ...
कुरडई डिजाईन ची पैठणी नेसलेला
कुरडई डिजाईन ची पैठणी नेसलेला फोटो बघते आणि >>>
तिला आठवत की दोन वर्षापुर्वी तिची सेम टु सेम साडी तिच्या स्पेशल कुलूप असलेल्या कपाटातून चोरीला गेलेली... त्याच साडीवरचा नणंदेचा फोटो बघून ती खवळते आणि तावातावाने तिच्याकडे जायला निघते ... पण उंबरठ्याबाहेर पडताच तिला आपण कुठे निघालोय ते आठवायच बंद होत... परत ती घरात जाते तर तिला पुन्हा आठवत ... पण परत घराबाहेर पडताना विसरते .. .
घराबाहेर घरात घराबाहेर घरात
घराबाहेर घरात घराबाहेर घरात असं करता करता तिला चक्कर येऊन ती खाली पडते आणि...
आणि Good News....
आणि Good News....
आज परत एकदा हा धागा वाचला..
आज परत एकदा हा धागा वाचला..
काही लोकांनी कथेला दिलेले ट्विस्ट वाचून खूप मजा आली..
कथा अजून पुढे सुरू राहावी.. असं वाटतं.. म्हणून धागा वर काढतेय..
हा आ आणि मला खूपच धुतलाय यात
हा आ आणि मला खूपच धुतलाय यात
आणि Good News....>>> >>>
आणि Good News....>>> >>>
आणि अमानवीय धाग्यावर भुतबाळाचे बारसे होते..पाळणा गाईला जातो..आत्या भुतबाळासाठी हाडांची माळ आणते.
आत्या भुतबाळासाठी हाडांची माळ
आत्या भुतबाळासाठी हाडांची माळ आणते.
>>>>>>>
भुतबाळाला घातलेली ती हाडांची दुर्मिळ माळ एका सिद्ध मांत्रिकाच्या हाडापासून बनवलेली असते..
हा आ आणि मला खूपच धुतलाय यात
हा आ आणि मला खूपच धुतलाय यात Lol Lol>>
हो.. परत वाचायला जाम मजा आली..
भुतबाळाला घातलेली ती हाडांची
भुतबाळाला घातलेली ती हाडांची दुर्मिळ माळ एका सिद्ध मांत्रिकाच्या हाडापासून बनवलेली असते..>>>>>>>>>>>>
आणि तो मांत्रिक दुसरा तिसरा कुणी नसून पशुपतीनाथ होता..हो तोच तो अरूंधती चा दाजी. मेल्यानंतर तो जास्तच शक्तीशाली बनतो.
आणि तो मांत्रिक दुसरा तिसरा
आणि तो मांत्रिक दुसरा तिसरा कुणी नसून पशुपतीनाथ होता..हो तोच तो अरूंधती चा दाजी. मेल्यानंतर तो जास्तच शक्तीशाली बनतो.
>>>>>>>
काही वर्षांपूर्वी..
नकट्या अरुंधतीच्या लग्नात...
तो पशुपतीनाथ अरुंधतीच्या नवऱ्याचं आधीच लग्न झाले आहे. हे नवरदेवाचे गुपित माईक वरून पशुपतीनाथाच्या नकळतच त्याच्याकडून अनाउन्स होते..
तर आपल्या नुकत्याच सुरू होणाऱ्या संसाराला आग लागलेली बघून आधीच या न त्या कारणाने लग्न न ठरणाऱ्या नकट्या अरुंधतीला प्रचंड राग येतो.. रागाच्या भरात ती चक्क पशुपतीनाथालाच बडव बडव बडवते.
तर तिची बहीण संगीता आता सगळ्यांनाच मोठ्या जावयाकडून चूक झाली. तरी त्यांच्याशी ही कोणती वागायची पद्धत! असं बोट नाचवत विचारुन पुर्ण गाव डोक्यावर घेते..
हा आ आणि मला खूपच धुतलाय यात
हा आ आणि मला खूपच धुतलाय यात Lol >>> धन्यवाद ! तुम्ही हलकं घेतलंत
येथे पुन्हा लिहावं काय... :डोकं खाजवणारा बाहुला:
असं बोट नाचवत विचारुन पुर्ण
असं बोट नाचवत विचारुन पुर्ण गाव डोक्यावर घेते..>>>>>>>>>
लग्नातला तो गोंधळ पाहून पशुपतीनाथ हलकेच तिथून सटकतो आणि सिनेमात काम करायचं म्हणून मुंबईत पोहोचतो. इकडे गावात अरूंधती आणि संगिता भांडत बसतात.
लग्नातला तो गोंधळ पाहून
लग्नातला तो गोंधळ पाहून पशुपतीनाथ हलकेच तिथून सटकतो आणि सिनेमात काम करायचं म्हणून मुंबईत पोहोचतो. इकडे गावात अरूंधती आणि संगिता भांडत बसतात.
>>>>>>
नवीन शहर- नवीन माणसं मुंबईचा तुफान वेग प्रचंड गर्दी बघून पशुपतीनाथाच्या काळजात मोठ्या शहराची धडकी भरते.. खिशात मोजून 500 रुपये आणि अंगावरचे कपडे.. याच अवस्थेत त्यानं मुंबईत पहिलं पाऊल टाकलेलं असतं..
गावी लग्नात घातलेला गोंधळ पहाता मागे परतणं. म्हणजे स्वतःच अग्निकुंडात उडी मारल्यासरखं होईल. याची पुरेपूर जाणीव आता त्याला असते..
नवीन शहर- नवीन माणसं मुंबईचा
नवीन शहर- नवीन माणसं मुंबईचा तुफान वेग प्रचंड गर्दी बघून पशुपतीनाथाच्या काळजात मोठ्या शहराची धडकी भरते.. खिशात मोजून 500 रुपये आणि अंगावरचे कपडे.. याच अवस्थेत त्यानं मुंबईत पहिलं पाऊल टाकलेलं असतं..
गावी लग्नात घातलेला गोंधळ पहाता मागे परतणं. म्हणजे स्वतःच अग्निकुंडात उडी मारल्यासरखं होईल. याची पुरेपूर जाणीव आता त्याला असते..>>>> सगळ्यात प्रथम तो एस टी स्टँड वर 10 रुपयांचा वडापाव खाऊन पोटभर पाणी पितो. मुंबईत राहण्यासाठी तो एक खोली बघत असतो पण 490 रुपयात ती मिळणं अशक्य असल्याने तो ती रात्र रेल्वे स्टेशनवर काढण्याचा निर्णय घेतो. रात्री दोनच्या सुमारास एका विचित्र हॉर्नने त्याला जाग येते. समोर एक एक ट्रेन उभी असते. त्या ट्रेनमध्ये कोणीच नसतं. सहज कुतूहल म्हणून तो त्या ट्रेनमध्ये चढतो आणि ट्रेन अचानक सुरू होते. ट्रेन बघता बघता सुसाट वेग पकडते, सगळीकडे अंधार पसरतो. ती ट्रेन साधी सुधी ट्रेन नसून टाईम ट्रॅव्हल करणारी ट्रेन असते.
ती ट्रेन साधी सुधी ट्रेन नसून
ती ट्रेन साधी सुधी ट्रेन नसून टाईम ट्रॅव्हल करणारी ट्रेन असते.>>>>>>>>
ट्रेनमध्ये रोबोट ताई असतात. त्या पशुपतीला जेवण पण देतात बिर्याणी ची गोळी. तोंडात टाकताच बिर्याणी ची चव आणि पोट भरल्याचं समाधान. तेवढ्यात ट्रेन थांबते, डायनासोर युगात.
ट्रेनमध्ये रोबोट ताई असतात.
ट्रेनमध्ये रोबोट ताई असतात. त्या पशुपतीला जेवण पण देतात बिर्याणी ची गोळी. तोंडात टाकताच बिर्याणी ची चव आणि पोट भरल्याचं समाधान. तेवढ्यात ट्रेन थांबते, डायनासोर युगात.
>>>>>
डायनासोर युगात..!
सुखसुविधाच्या अधीन असणाऱ्या ह्या पशुपतीनाथाची ही दिवसेंदिवस होणारी दुरवस्था कोणीतरी दुरुन बघत होतं..
त्यानेच मदतीसाठी टाईम ट्रॅव्हल ट्रेन ही पाठवलेली असते..
पण ४थी पास पशुपतीनाथ त्या टाईम ट्रॅव्हल ट्रेन मुळेच आता डायनासोर युगात येऊन पोहोचला होता.
...
पण ४थी पास पशुपतीनाथ त्या
पण ४थी पास पशुपतीनाथ त्या टाईम ट्रॅव्हल ट्रेन मुळेच आता डायनासोर युगात येऊन पोहोचला होता.>>>>>>>>
ओराशिमातारू तिथे पशुपतीनाथ ची वाटच पाहत होता. दोघे एकमेकांना कडकडून भेटले. युगायुगांतराचे दुरावलेले जुळे भाऊ होते दोघे.
आता हे दोघे पुढे काय करतील..
कळेल लवकरच पुढच्या भागात.......?
कडकडून भेटताना पशुपतीनाथला
कडकडून भेटताना पशुपतीनाथला काहीतरी कडाडून चावल.
खाली बघतो तर काय????
पालीच्या आकाराच्या मगरीने त्याला चावा घेतला होता.
तो विस्फारून बघत राहिला.
ओमारु (शॉर्ट फॉर्म) हसला.
व त्याने पीपी (शॉर्ट फॉर्म) ला त्याचा ग्रँड प्लॅन सांगायला सुरुवात केली.
लहानपणी ओमारू ने एक मुंगी
लहानपणी ओमारू ने एक मुंगी पाळली होती.
ती मुंगी त्याचा जीव की प्राण होती...
पण एके दिवशी, एके दिवशी, कुणीतरी नराधमाने तिचा वध केला.
ओमारु जाम चिडला.
समस्त मानव जातिकडून किड्या मुंग्यांना किड्या मुंग्यांसारखं चिरडून टाकलं जातंय, हे बघून तो प्रचंड व्यथित झाला.
आणि त्याने पण केला....
मानवाला असच किड्या मुंगीसारखं चिरडण्याचा......
मानवाला असच किड्या मुंगीसारखं
मानवाला असच किड्या मुंगीसारखं चिरडण्याचा...... >>
ओमान चं दु:ख बघून पशुपतीनाथला गहिवरून आलं. त्याने आपल्या मंत्रशक्तीने डायनासोर च्या हाडापासून एक खुळखुळा बनवला. त्याचा आवाज जर एखाद्या माणसाच्या कानावर पडला तर माणूस मुंगी मध्ये परिवर्तीत होईल पण....
Pages