लांबड कथा..

Submitted by मन्या ऽ on 8 April, 2020 - 13:17

लांबड कथा..

कोणतीही कथा वाचताना "यार! शेवट वेगळा हवा होता" किंवा "फारच ताणलीये राव कथा." असं वाटल असेल तर हा धागा तुमच्यासाठीच आहे.

तर लोक हो, महत्वाचं म्हणजे
या कथेला शेवट नसेल.

तेव्हा तुम्हाला हवे तसे ट्विस्ट कथेत टाका!
मग तो नवरसांचा विचार न करता टाकलात. तरीही चालेल.

नियम फक्त एकच ट्विस्ट टाकताना कथेची कंटीन्युटी ठेवा..
चला तर मग करुया लांबड कथेला सुरवात आपल्या पारंपारिक कथांच्या वर्ल्डफेमस ओळीने..

एक होत आटपाट नगर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>> एक होत आटपाट नगर..>>>>>
या नगरातील राजा विचित्रसेन भयंकर भित्रा होता. त्याच्या पाठी जणू ब्रह्मराक्षसच लागलेला होता म्हणा ना.

विचित्रसेनाच्या दोन राण्या होत्या, एक होती चित्रा, दुसरी होती विचित्रा.
चित्रा नावाप्रमाणेच एका सुंदर चित्रासारखी सुंदर होती, पण विचित्रा नावाप्रमाणेच विचित्र होती.
एकदा नगरीत एक चित्रकार आला, तो माणसाचं हुबेहूब चित्र काढण्यात पटाईत होता.

चित्रेचं चित्र चित्रकाराने काढलं, पण विचित्रेचं चित्र काढायला चित्रकार भीत होता. विचित्रा दिसायला विचित्र असली तरी राजाचं मात्र तिच्यावर नि:सिम प्रेम होतं, त्याला कारणहि तसं खास होतं.

चित्रा रूपगर्वीता होती, तिच्यामुळेच राजाचा आत्मविश्वास जाऊन राजा भित्रा झालेला, या उलट विचित्रा विक्षिप्त वागत असली तरी राजाला समजून घेऊन आपल्या विक्षिप्त वागण्यातून त्याचे समाधान होईल असे बघायची.

तर आता राजाच्या आवडत्या राणीचे विचित्राचे चित्र काढायचे कसे हा पेच चित्रकाराला पडला. कारण हुबेहूब चित्र काढाल तर विचित्रा रागवण्याची धास्ती पण जर हुबेहूब चित्र काढले नाही तर कलेशी प्रतारणा.

चित्रकाराने विचित्राचे कोळशाच्या खाणीत काम करतानाचे चित्र काढले. त्यामुळे सगळेच खुश झाले.

राजा खुष झाला. राजाने चित्रकाराला विचित्रेचे पुष्पवाटिकेत विहार करतांनाचे चित्र काढण्याचे आदेश दिले. चित्रकार घाबरला..

चित्रकार घाबरला>>>
अन त्याने स्वतःलाच तळघरात क्वारंटाईन करवुन घेतलं..

बोकलत! मजा आणलीत
राव कथेत.. Lol
असेच कोणतेही सुचतील ते ट्विस्ट टाका कथेत. कथेचा मालक कुणीच नाहीये. आपलीच कथा समजा आणि येऊदेत चित्रविचित्र लांबड कथेत एकसेएक ट्विस्ट! Happy

चित्रकाराने स्वत:ला तळघरात कोंडुन घेतल्याची बातमी त्याची जिवलग सखी फुलवंतीला समजताच तीने तात्काळ खास दुतामार्फत चित्रकारास निरोप पाठवला की "हे प्राणनाथ, आपण महाराणी विचित्रा यांचे कोळशाच्या खाणीतले चित्र काढावे यामागे नक्कीच दृष्ट शक्तींचा हात असावा. आपण असे तळघरात लपुन बसलात तर राजाचे शिपाई आपली मानगुट पकडुन दरबारात हजर करतील. त्याऐवजी आपण त्वरेने नगरातील धान्याच्या कोठाराचा आश्रय घ्यावा ही विनंती."
सखी फुलवंतीचा संदेश ऐकुन, तिची आपल्याबाबतची चिंता बघुन चित्रकाराचे डोळे भरुन आले आणि जड अंतकरणाने त्याने धान्याच्या कोठाराकडे प्रस्थान केले.

तो गुपचुप धान्य कोठारात गेला तर कोठार रिकामे होतं कारण वीरू यांच्या चिमणीने एकेक दाणा उचलून कोठार रिकामे केले होते. ही गोष्ट फक्त राजाला माहीत होती, प्रजेला वाटायचे कोठार भरलेले आहे.
प्रजेला कळले तर ही राजाची दुसरी भीती होती

चित्रकार घाबरला, दुष्ट शक्ती ची भिती खरी ठरते का काय म्हणून तो अर्धमेला झाला. अचानक तेथे एक दुष्तात्मा प्रगट झाला आणि म्हणाला माझे चित्र काढ नाहीतर तुझे प्राण घेईन
त्याच्या पाठोपाठ फुलवंती दाखल झाली, तीने प्रसंगाचे गांभीर्य ओळखले आणी बसंती सारखी नाचू लागली, " मी फुलवंती मी जलवंती, तुझी नजर लागेल मला..."

(आता माझा पास.... चालती कथा भरकटवायचा मी प्रयत्न करत राहणार आहे, कृपया हलके घेणे)

नाचता नाचता फुलवंती चा चेहरा बदलू लागला आणि तिची उंचीही वाढू लागली...बघता बघता ती कोठाराच्या छतापर्यंत पोचली...हे बघून चित्रकार आणि दुष्टात्मा अनुक्रमे भयभीत आणि आनंदित झाले......

धान्याच्या कोठारात एका भिंतीवर अनेक शतकापूर्वी कोरलेली काही चित्रे होती ती पाहुन पाहुनच फुलवंती नाचली. पण तिला माहीत नव्हते की ती चित्रे म्हणजे खरं तर बोर्नविटा आणि कॉम्प्लानच्या जाहिराती होत्या. त्यामुळे तिच्या डान्स नंतर ती पटापट उंच वाढू लागली आणि अनेक बाजुनी आवाज घुमु लागले -- आय एम कॉम्प्लान गर्ल आणि बोर्नविटापेक्षा कॉम्प्लान डान्सवर नाचल्याने वाढ जास्त जोमदार होते हे बिझनेस रायव्हल कंपनीने सिद्ध केले...

ती त्रेपन्नी ऐकून अंधेरा कायम रहे म्हणत "दुष्टमान" प्रकट झाला. आणी म्हणाला, त्या कोळशाच्या खाणीत काढलेले चित्राने मला जिवदान दिले आहेस. क्या हुकूम है मेरे आका?

चित्रकाराने आदेश दिला की चित्रेचे रुप विचित्रेला आणि विचित्रेचे चित्रेला देऊन टाक. त्यामुळे माझा एक पेच मिटेल.

चित्रकाराने पेच मिटवायच्या उद्देशाने केले खरे ... पण आता अजुन एक पेच निर्माण झाला होता. ह्या पोट्रेटनुसार दोन्ही राण्यांना आधार कार्ड इश्यू केले जाणार होते. चित्राचे चित्र मुळात चित्राचे नसून विचित्राचे असणार होते त्यामुळे आता तिची डिजिटल आयडेंडीटी पूर्णपणे बदलून गेली.

आणि त्यामुळे राजाने, "आजपासून आधार कार्डला रद्द करत आहोत!" अशी राज्यात घोषणा करवून टाकली. ना रहेगा बास ना बजेगी बाँसरी!
आता चित्रकार विचित्रेचे बागेत विहार करतानाचे चित्र विनासंकोच काढू शकणार होता.

_/\_

राजाचा हां नवीन आदेश ऐकून सर्वात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर तो होता राजाच्या प्रीमियर पद्मिनीचा ड्रायव्हर धर्मरतन ह्याला.... कारण तो मुळचा बांग्ला देशी होता. आपण पकडले जाण्याची चिंता करायची आता त्याला गरज नव्हती. घूसखोरी केलेल्या धर्मरतनचे पूर्ण नाव होते धर्मरतन श्रमण भूबन बरूवॉ... आणि त्याचे मिशन होते -

पद्म
अजुन किती वेळा एडिट करणार प्रतिसाद Sad

Pages