नऊ भाग झाले.....तुमच्या माझ्या साथीने या कथेचा प्रवास आतापर्यंत छान सुरु आहे. आपल्या मायबोलीवर कथामालिका, एकूणच कथामालिका लिहिण्याची हि माझी पहिलीच वेळ. आपण सर्वांचा आशीर्वाद म्हणून इथपर्यंत आले आहे.असाच आशीर्वाद असू द्यात असाच.
आपल्या सरमिसळ या कथामालिकेचा एक छोटासा मागोवा घेऊयात....आपल्या कथेत आतापर्यंत अनेक पात्र आली.
भूतकाळ वर्तमान भूतकाळ अशा पद्धतिने आपली कथा पुढे प्रवास करत आलीय...पुढेही शेवटापर्यंत असाच प्रवास करत राहील'
देवकी आणि नवीन या प्रेमळ जोडप्याच्या आयुष्यात अनेक अनाकलनीय घटना घडत राहिल्या, सगळे प्रयत्न थकल्यावर ते दोघे लढत राहिले पण अमानवीय शक्तीपुढे हतबल ठरले. सगळंच संपलाय असं वाटत असताना वत्सल आत्या तिथे आल्या. त्यांना कुणी अनोळखी मुलीने दार उघडणं, देवकीला दुसरीच स्त्री सासू म्हणून धमकावते. आणि नवीनला त्या विक्षिप्त आजाराने पछडलेले असते. पण वत्सल आल्यावर हि परिस्थिती बदलते. जणू खूप मोठ्या रात्रीनंतर सूर्योदय होतो तसाच. वत्सलला इजा करण्याचा प्रयत्न होतो. पण विफल ठरतो. ती नऊवार साडी वाली ब बाई देवकीला घाबरवण्याचा प्रयत्न करते. अशा अनेक घटनामध्ये वत्सल त्या दोघांचा खम्बिर आधार होते. वत्सल तिचे योगाभ्यासाचे गुरु विजय आणि कॉन्फरेन्स मध्ये भेटलेला मित्र अव्या उर्फ अविनाश यांची मदत घेते. महत्वाच्या नोंदी करते. गंगाला बोलवून घेते. या सगळ्या ती देवकी आणि नवीनला योगाभ्यासाचे धडे देते. नवीन आता पूर्ववत होऊ लागतो. देवकी पुन्हा तिच्या प्रोजेक्ट वर काम करू लागते. सगळं हळूहळू पुन्हा सुस्थितीत येत असत. त्या शक्ती सरळ नाही पण आडून आडून हल्ला करण्याचा प्रयत्न असतोच पण विफल आणि अगदी गंगाही यातून वाचते....
वत्सल आत्यांचा तो भन्नाट प्रयोग..काचेच्या बरणीत असलेली ती लाल आणि हिरव्या प्रकाश कणांची सरमिसळ आणि गायत्री मंत्रणामुळॆ ते पाण्याच गोल फिरणे.....पुढे जाऊन याचा खूप मोठा उपयोग होणार आहे....वत्सल आत्या आणखी असे प्रयोग करतील काय?
त्या हिरव्या आणि लाल प्रकाश शक्ती , मांजरीचे देह वापरून वावरणे.......हिरव्या रंगाने नवीन आणि लाल प्रकाशाने देवकीला लक्ष्य करणे....त्यात ती विक्षिप्त बाई....काठी आपटत आपटत काही भयानक कविता म्हणते.....धडकी भरवणाऱ्या......
पण आता देवकी आणि नवीनच्या नशिबाने आपली कूस बदलली. देवकी आणि नवीनच्या भूतकाळातील काही घटनांचा या सगळ्याशी काही सम्बन्ध आहे का हे शोधण्यासाठी वत्सल आत्या त्याचा मागोवा आपल्या पद्धतीनं घेतात. आई वडील बकुळा नावाच्या स्वार्थी स्त्री मुळे गमावलेला नवीन आपल्या, गंगा य अनाथ मुलीबरोबर वत्सल आत्याच्या छत्रछायेखाली मोठा होतो. शिकतो. पुढे देवकी या सालस मुलीशी लग्न करतो आणि काही वर्षांनी या जीवघेण्या घटनांना सुरुवात होते.
नवीन लहान पणापासून दुर्दैवी आणि अतिशय कमकुवत मनःस्थितीचा आहे. त्याला विमानांत बसल्यावर ती हिरवी प्रकाशमान दुष्ट शक्ती आपले रंग दाखवते आणि देवकीलाही. मानसतज्ञांच्या सांगण्यानुसार नवीन त्या कडे दुर्लक्ष करतो. भास म्हणून सोडून देतो पण त्याला कुठे ठाऊक असते कि त्याच्या पुढे काय वाढून ठेवलेय?
आता हिप्नॉटिसम च्या ट्रीटमेंट नंतर नवीन कडून अजून विसम्यकारक माहिती समोर येतेय. देवकीला त्या पाटाभोवती त्या अनुषंगाने तिच्या घरात आणखीन एका अदृश्य वावराची जाणीव झालीय.त्या
त्या दुष्ट शक्तींचे आव्हान पुढच्या प्रत्येक भागात वाढणार आहे.जे चांगलं होतंय ते त्यांना निश्चित आवडत नाहीए.आपला नवीन आता बरा होतोय..पण काही जुन्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली का? मलाही उत्कंठा आहे बरं......
देवकीला पत्र पाठवून त्या भग्न मंदिरात त्या बाईला भेटायला कुणी बोलावलं?कोण आहे ती...तीच जी घरात देवकीला दिसते आणि त्रास देते......
वत्सल आत्यांना नवीनच्या अवस्थेबद्दल कुणी कळवलं?
देवकी म्हणून वत्सल आत्यांना कोण भेटलं कि त्यांनि देवकी आणि नवीन च्या लग्नाला येणं नाकारलं?
कोण मुलगी आहे जी नवीनला दिसते?
अव्या, विजय सर, गंगा, वत्सल आत्या, आणि आता डॉक्टर टंडन.....एक एक करून भिंत तयार होतेय ......
भेटू लवकरच पुढच्या भागात.........
तुमच्या सूचना, अभिप्राय....नेहमीच स्वागत आहे......अधिकाधिक उत्कंठावर्धक लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करिन......
हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे...यातील कोणत्याही संकल्पनांच्या वापराचा वास्तवतेशी काहीही सम्बन्ध नाही. तो केवळ मनोरंजनपर उद्देशाने आहे....याची वाचकांनी नोंद घ्यावी.
आजच सगळे भाग वाचून काढले.
आजच सगळे भाग वाचून काढले. भारी लिहिलंय... मस्त!!!
पुढील भागांच्या प्रतीक्षेत!!!