सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग सातवा

Submitted by मुक्ता.... on 19 February, 2020 - 03:24

सरमिसळ एक भयंकारी रोमांच यकथामलिकेच्या अधिच्या भागाचे धागे खाली दिले आहेत
भाग एक
https://www.maayboli.com/node/73290
भाग दोन
https://www.maayboli.com/node/73298
भाग तिन
https://www.maayboli.com/node/73372
भाग चार
https://www.maayboli.com/node/73373
भाग पाच
https://www.maayboli.com/node/73403
भाग सहा
https://mabo.page.link?utm_campaign=inApp-share&apn=com.maayboli.mbapp1&...

सरमिसळ एक भयंकारी रोमांच.... भाग सातवा...

गुड मॉर्निंग आत्या...गंगाने वत्सल आत्यांना उठवलं..वत्सल झटकन उठून बसली...."आग, माजे ल्येकरू, येव्हढया लवकर उठलं बी...आन मला पत्याचं नाय..."

"अगं आत्या शांत झोपली होतीस..हि मी पण आत्ताच उठली....आत्या फ्रेश झालीस कि मस्त चहा देशील ना?" गंगाने माहेरी आल्यासारखे लाडिक हट्ट सुरु केले.

" व्हय ग माजी बाय...आन गंगे येक ध्येनात ठिव. या घरातलं पानी मला इच्यारल्या बगर पीयाच न्हाई..मोटी गडबड हाय त्याच्यात, आन दूध बी...समजलीस? आन कुणालाबी दार उगडायच्या अदुगर म्या तीत हवी....तुला म्या समदं म्यसिज करून सांगितलं हाय...पन जरा ब्येतान आन सावध हृया पायजे..कळलं न्हवं? म्या जे काय बी दावल त्ये नवीन आन द्येवकी दोगास्नी आताच्याला सांगायच आन कळू द्यायचं न्हाय....त्यास्नी तरास हुईल आन जर त्ये दोगेबी घाबरलं तर आपलं काम बिगडल..आज रातच्याला म्या तुला ती गिलास च्या प्रकारची बरनि दाविती आन त्यातला त्यो इचित्र परकार बी......"

" होय ग आत्या...बरं काल रात्री ना....." गंगा पुढे बोलणार इतक्यात वत्सल ने थांबवले......." श्श , गंगे...माजे बाय रातच्याला बोलू....आता नग , म्या समदं ऐकती, मोटा इशय हाय त्यो...पन पुन्यांदा, या दोगा म्होरं नग..आता त्यास्नी उठिव...द्येवकी हापिसात जाईल आन त्या आदूगार त्येना योगाचं शिकवयाचं हाय.....चल आवराया घेऊ ....."

देवकी अन नवीन दोघे उठले. योगासने अभ्यासल्यावर चहापाणी आटपले, आणि गंगाशी थोडं बोलचाल झाल्यावर रोजच्याप्रमाणे देवकी ऑफीसला गेली. आता घरात वत्सल आत्या, गंगा,नवीन तिघे होते. देवकी हिप्नॉटिसम च्या ट्रीटमेंट विषयी नवीनशी आज बोलणार होती आणि डॉक्टर टंडन कडे ते सगळेच उद्या जाणार होते.

देवकी आल्यावर रात्री त्यांनी जेवण आटपलं...आज देवकीला काही विचित्र अनुभव आला. तो तीला वत्सल अत्यंत सांगायचं होता. नवीन झोपल्याचे खात्री करून देवकी वत्सल जवळ आली. " आई, आज ऑफिसमध्ये एक फोन आला कि लवकर निघ...आणि आवाज आपल्या वॉचमन काकांचा होता. नवीन ला ऍडमिट केलंय लवकर निघ म्हणून...."

"अगो बया...ह्ये काय आक्रीत ? नवीन यवस्थित येकदम....म्हनून मला म्यासेज क्येलास व्हाय? समदं ठीक हाय का म्हनून?मंग शांत कशी झालीस ती?आन समदं कस पचवलंस पोरी?"

" आई अहो वॉचमन काका बोलताना दोन गोष्टी ऐकू आल्या ते म्हणज मांजराचे गुरगुरणे....आणि मागून येणारा घुंगराचा आवाज...काळ गंगावर आलेला प्रसंग हा त्यांचा डाव समजायला पुरेसा आहे..आणि नवीन बाबतीत काही झालंच तर तुम्ही पहिला फोन मला करालच कि, आई ते शांत बसले नाहीत....ते काहींना काही करणारच....पण आता मी घाबरत नाही त्यांना ....."

भले शाब्बास पोरी......लै ब्येस....बरं आता तू जाऊन निज....मला गंगासान्गत थोडं बोलायचं हाय तुला म्या लवकरच सांगन.."

ओके आई म्हणून देवकी जाऊन शांत निजली. देवकीत हळुहळू स्थैर्य वाढलं होत. आत्मविश्वास वाढला होता...आता तर तिची उंचीची भीतीही कमी झाली होती. दहाव्या मजल्यावरून खाली बघायला ती घाबरत नव्हती आणि हे महत्वाचे होते.

गंगा आणि आत्या आता प्रयोग करायला मोकळ्या होत्या.....आधी त्यांनी गंगाचा अनुभव विचारायचे ठरवले...सगळं ऐकल्यावर एक लक्षात आलं...त्या शक्तींनी गंगेला घाबरवण्याचा प्रयत्न केला. गंगेच्या येण्याने होणारा वत्सल आत्यांना फायदा त्या शक्तींना कळलं असावा. "आणि आत्या तो घुंगुर वाल्या काठीचा आवाज मला नवीन दादाच्या लग्नात ऐकू आला होता आत्या....आणि आपल्या गावच्या घरातही कैक वेळा गॊदाई च्या बंद खोलीजवळ देखील.....आत्या म्हणूनच नवीन दादा घाबरत असेल ग....

आत्या एक कविताही त्या काठीच्या ठेक्यावर ऐकू अली होती सगळे शब्द लक्षात नाहीत पण काही आठवतात त सांगते...

एक आवाज तिथे घुमला तो फक्त मी ऐकला...

छन छन छम...छन छन छम...
आता खोदा मिळेल सोनं..
आता शोधा मिळेल नाणं...
सुख वरवरचं पिऊन घ्या...
मिळेल विष लिहून घ्या...

छन छन छम.. छन छन छम..

लपायला मागाल अंधार...
न कुणाचा मिळेल आधार..
उजेडापासून लांब पळाल....
येऊन परत तिथेच थांबाल....

छन छन छम...छन छन छम..

मी दचकle..वाटलं आताच वत्सल आत्याना सांगावं, काही क्षणात मला स्वतःवर हसू आलं की आपण वैज्ञानिक असूनही असल्या भासाला घाबरलो...पण मी वरचे शब्द विसरले नाही पण भ्रम म्हणून ते भूतकाळात दडवून टाकलं..

आणि मी गावाला आल्यावर आत्या तू काही ऐकून नाही घेतलंस ग......" गंगणे आपले सांगणे पूर्ण केले.

" आग पोरी,आता काय सांगू तुला...मला ध्येंवकी म्हनून भेटल्येली पोर हि हि न्हवतीच....दुसरीच कुणी इचित्र आन लाल डोळ्याची झपाटल्यागत पोरगी हुती...तिचा चेहराबी लै भयानक....आन घरात आली नाय कि माझ्या म्होरं आणि जवळ बी आली नाय....म्या कशी पसंद करील तिला? आन असं काही आसल ह्ये कुनि इचार करावा बर? मला एक पत्तर आलं...का नवीन आन द्येवजी संकटात हाईत कुनितरी त्यास्नी त्रास देत्यात...आन पत्तर बी कसं घरात आलं त्या ठाव न्हाय...इजयजी म्हणत्यात कि त्ये कुणीतरी चांगलं हाय , हितचिंतक शक्ती हाय पर तिला बी यानि जखडलं हाय....येळ आल्यावर हुईल उलगडा.."

बापरे....आत्या ते व्हिडीओ रेकॉर्डिंग्स....मला उद्या दाखव दादाची हिप्नॉटिसमी ची पहिली सीटिंग झाली कि मग जरा त्यावर ताळा करता येईल......असं म्हणून गंगाने तो बाटली सदृश ग्लास मागितला. वत्सलने पुन्हा गायत्री मंत्राचा प्रयोग करून दाखवला....आधीचे रिजल्ट्स सांगितले...

बाहेर खिडकीच्या काचेवर पुन्हा तस्सस्स्स तुइइइइइइइ स्टिक स्टिक स्क्याव स्क्याव असे आवाज होत काही हिरवे अन लाल झोत आपटू लागले....गंगा उठणार इतक्यात.... गंगे त्ये तावदान खोलू नगास ....त्ये तीतून आत येत्यात.....

गंगा थांबली....

" बापरे, आत्या हे विचित्र आहे पण आत्मा आणि भूत याच्या पलीकडे पॉवरफुल आहे हे......आत्या हे त्यांच्यातले सूक्ष्म कण आहेत. ज्या अर्थी ती गायत्री मंत्र म्हटल्यावर ते पाणी फिरतंय आणि त्यातून प्रकाश बाहेर येतोय त्या अर्थी एकतर या मंत्रातून त्यांना ऊर्जा मिळते किंवा आणि काही जे आणखीन गूढ आहे, तू म्हणून मला पाणी प्यायलं मनाई केलीस तर......माझी आत्या द ग्रेट मला सांग तुझा तो मित्र अविनाश आणि विजयसर कधी येणार आहेत? आता ते येईपर्यंत या बाटलीवर गायत्रीमंत्र नको. तू हि बाटली कॉटन च्या जाड कपड्यात गुंडाळी कर आणि पुन्हा ठेवून दे......."

वत्सलने ते तस ठेवलं पुन्हा लाकडी खोक्यात.....

आत्या झोपूया आता...परत उठायचं आणि वहिनीला प्रोजेक्ट साठी जायचंय ना?आणि संद्याकाळी दादाला तिथे डॉक्टर टंडन कड न्यायचंय ना?..........गंगा म्हणाली....

व्हय व्हय.....चला......

त्या दोघी झोपल्या.....आणि इकडे स्वयंपाक घरात कुणीतरी लाकडी पाटावर बसून समाधानाने हसत होत.......

क्रमश:

फोटो: पिक्सबाय

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे.
पण कृपया खंड पडू देऊ नका.