Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एक भयानक निरिक्षण...
एक भयानक ऐकिव किस्सा...
माहेरच्या शेजारील एक आजी वारल्या होत्या.
त्यांचे त्यांच्या घरावर खुप प्रेम होते, भांडण झाले कि सुनेला म्हणायच्या निघ माझ्या घरातून.
सुन विचारायची, मेल्यावर घर घेऊन जाणार का वर?
सासू म्हणायच्या, या घरातच राहणार आहे मी.
त्या वारल्यानंतर त्यांच्या मुलाने घरात त्यांचा फोटो लावला होता.. त्या आजी फोटोतुनच सगळ्या घरात पाहतात 180° मधे डोळे फिरवून असे त्यांची सुन सांगत होती..
किती डेंजर ना????
हम पांच मधली अशोक सराफची
हम पांच मधली अशोक सराफची बायको आठवली.
बोकलत हो मी भयानक किस्सा
बोकलत हो मी भयानक किस्सा लिहिला..तुम्हाला कॉमेडी सिरियल काय आठवतेय...
कॉमेडी सिरियल कुठे होती ती?
कॉमेडी सिरियल कुठे होती ती? हॉरर सिरियल होती ती. एकदा त्यात तीन मुंडेवाली चुडेलची स्टोरी दाखवली होती तेव्हा लहान मुलं खुप घाबरली होती.
>> चिंबोऱ्या चे भूत येणार
>> चिंबोऱ्या चे भूत येणार बोकलत आता
ते पळून जाण्यासाठी अंगाई म्हणायची:
चिंबोरीच्या रश्श्या मध्ये कांदा झोपला गं बाई
कुत्री मांजर पाळणारे हे
कुत्री मांजर पाळणारे हे प्रत्येकवेळी फार प्रेमाने पाळत असतील असे नाही. अमानवीय शक्तींचा वास त्यांना पहिला येतो व त्याचे बळीही तेच पहिले ठरतात. त्यामुळे कुंटुंब सुरक्षित राहते असा एक विचार ऐकला आहे. बोकलत काय बरोबर आहे का?
कुत्री भुतांवर/ आत्म्यावर भूकंतीलच असं नाही. ओळखीतलं कोणी असेल तर कुत्र्याचं वागणं बरंच गूढ असतं.
बरोबर.. कुत्रा नाही ओळखत..
बरोबर.. कुत्रा नाही ओळखत..
मांजर ओळखते भूतांचे अस्तित्व...
जमल्यास कावळा पाळावा.. तो तर नक्कीच ओळखतो आत्म्यांना...
किती सखोल अभ्यास आहे तुम्हा
किती सखोल अभ्यास आहे तुम्हा सर्वांचा.
अमानवीय शक्तींचा वास त्यांना
अमानवीय शक्तींचा वास त्यांना पहिला येतो व त्याचे बळीही तेच पहिले ठरतात. >>>>>
याचा अनुभव मागच्या दिवाळीत घेतला आहे.
जमल्यास कावळा पाळावा.. तो तर
जमल्यास कावळा पाळावा.. तो तर नक्कीच ओळखतो आत्म्यांना...
Submitted by च्रप्स >> कोंबडी तर जीवच देते अमानवीय पाहुन.
मासा पाळावा
मासा पाळावा
भुताला पाहुन तो मासा काचेवर लयबद्ध धड़का देत मोर्स कोड मध्ये भुताचा बायोडाटा सांगत आपल्याला इशारा देईल आणि दुसरीकडे भुत पोहु शकत नसल्याने आपल्या लाडक्या पा प्रा ला मारणार सुद्धा नाही..
साप भी मरे, लाठी भी न टूटे ।
टिळकांच्या धाग्यावर
टिळकांच्या धाग्यावर घटकंचुकीचा उल्लेख केलाच आहे तर लकीली त्याच्याशी निगडित एक अमानवीय किस्सा आहे माझ्याकडे. मी आता विवेकी-विज्ञानवादी झाल्याने माझा काही यावर विश्वास नाही तरी इच्छूकांनी इच्छूकांसाठी यावर प्रकाश टाकावा


भारी! असेच किस्से डकवत जा.
भारी! असेच किस्से डकवत जा. तेवढाच विरंगुळा. अनिळजीच्या धाग्यांचा थोडा शिणभार हलका होईल.
भुताला पाहुन तो मासा काचेवर
भुताला पाहुन तो मासा काचेवर लयबद्ध धड़का देत मोर्स कोड मध्ये भुताचा बायोडाटा सांगत आपल्याला इशारा देईल....
-- . .- -. ... .. -. . . -.. - --- .-.. . .- .-. -. -- --- .-. ... . -.-. --- -.. .
आज माझी संपूर्ण फॅमिली एकत्र
आज माझी संपूर्ण फॅमिली एकत्र जमली आहे.. छान भूतांच्या गप्पा चालल्यात.. माझ्याकडे सांगायला काहीच नाही.. मानव, तुमची ती फ्लाईट जर्नीची कथा सांगायचा मोह होतोय पण कुठे सापडत नाहीए.. पुन्हा एकदा शेअर कराल का? त्या बदल्यात उद्या एक खराखुरा अनुभव शेअर करेन
इथेच दहाव्या पानावर आहे ती
इथेच दहाव्या पानावर आहे ती कथा.
आज पौर्णिमा
आज पौर्णिमा
आहे ना
धागा वर आला
हा थरारक प्रसंग काही
हा थरारक प्रसंग काही दिवसांपूर्वी माझ्यासोबत घडला. आमच्या शेजारी एक काका राहतात. मागच्या आठवड्यात ते रात्री दहाच्या सुमारास घरी आले तेव्हा खूप घाबरले होते. काहीच बोलता येत न्हवतं. त्याच रात्री त्यांना ताप भरला. दुसऱ्या दिवशी त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले पण काही फरक पडला नाही. शेवटी त्यांनी एका बुवाला बोलावलं. बुवाने तपासून सांगितलं की यांच्यावर एका वाईट शक्तीने कब्जा केलाय. यांना बरं करायचं असेल तर रात्री दोन वाजता कांदा चपाती उतरवून वीस किलोमीटर लांब असलेल्या वडाच्या झाडाखाली ते ठेऊन यायचं. वीस किलोमीटर दूर जायला बाईक वापरायची नाही. चालत किंवा सायकल वापरली तरी चालेल. झाडाखाली कांदा चपाती ठेवली की पुन्हा मागे वळून पाहायचं नाही. काहीच बोलायचं नाही. घरी येऊन हातपाय धुवायचे. रात्री दोन वाजता वीस किलोमीटर सायकलवर जायचं म्हणजे एक वाजता इथून निघायला हवं होतं. ते झाडही आडरस्त्याला होतं. रात्रीचे नऊ दहा वाजले की रस्ता निर्मनुष्य व्हायचा. मी खरंतर जायला तयार होतो पण कोणीतरी घरातल्यानेच ते कार्य करायला हवे होते. शेवटी त्यांचा मुलगा जायला तयार झाला. रात्री साडेबारा वाजता कांदा चपाती उतरवली आणि मुलगा ते घेऊन तो सायकलवरून त्या झाडाखाली जायला निघाला. सगळा रस्ता निर्मनुष्य होता. निघाल्यावर त्याला सायकलवर कोणीतरी पाठीमागे बसल्याचा भास होत होता. नेहमीपेक्षा पॅडल मारायला जास्त ताकद लागत होती. दीड तासात तो कसातरी त्या झाडाजवळ पोहचला. ते उतरवलेलं झाडाजवळ ठेवलं आणि पुन्हा घरी यायला वळणार इतक्यात पाठीमागून चक्क त्याच्या वडिलांचा आवाज आला. ते त्याला थांबायला सांगत होते. परंतु बुवाने असं घडेल कितीही ओळखीचे आवाज आले तरी मागे वळायचं नाही हे सांगितलं होतं.मुलाच्या एकदम पाठीमागून कोणीतरी त्याला हाक मारून मागे वळण्यास प्रवृत्त करत होते.त्याच्या मते ते जे काही होतं ते सायकलच्या मागेच हवेत उडतंय असं वाटत होतं. मुलाने कशालाही दाद न देता सायकल चालवणे सुरू ठेवलं.शेवटी घर जवळ आलं तसा पाठीमागून भेसूर हसण्याचा आवाज आला. आणि ती शक्ती बोलली "जा यावेळी वाचलास, बापाला सांग परत त्या रस्त्याने आलास तर जीवानिशी जाशील". दुसऱ्या दिवसापासून काका एकदम ठणठणीत बरे झाले.
मटण चपाती असती तर खाऊन दुष्ट
मटण चपाती असती तर खाऊन दुष्ट शक्ती खुश झाली असती..आणि तसा पण कांदा महाग झालाय.
बाप रे।
बाप रे।
भयानक किस्सा होता.बरं झाले काका बरे झाले ते.
कांदा चपातीवर खुष होणारं भुत
कांदा चपातीवर खुष होणारं भुत पहिल्यांदा पाहिलं.
आमच्या गावाकडचं भुत असतं ना तर ती कांदा चपाती पाहुनच डोकं फिरलं असतं त्याचं. ते काका राहिले असते बाजुला, त्यांच्या पोरालाच उलटं टांगलं असतं भुताने.
मागितला असेलहो कांदा.. महागच
मागितला असेलहो कांदा.. महागच इतका आहे.
परवा मी पाणीपुरी खायला गेले होते तर कांदा दिलाच नाही पाणीपुरीवाल्याने.
कांदा महाग झाला की आमच्या
कांदा महाग झाला की आमच्या ऑफिस बाहेरचा भजीवाला कांदा भजी ऐवजी कोबी भजी विकायचा ते आठवले
भुतांची इतकी अधोगती होईल असं
भुतांची इतकी अधोगती होईल असं वाटलं नव्हतं. महाग झाला म्हणुन काय कांदा मागायचा?
उतारा केल्यानंतर तो सोडून
उतारा केल्यानंतर तो सोडून यायला अमूकच वाहन वापरावं असा काही नियम नसतो. बोकलत, तुम्हाला तो बुवा फसवत होता. बरं झालं तुम्ही नाही गेलात ते नाहीतर अवघड होतं तुमचं!
माझे जीजू मराठी आणि हिंदी
माझे जीजू मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रिमधे PR आहेत.. त्यामुळे बऱ्याच मराठी आणि हिंदीतील दिग्गज कलाकारांसोबत रोजचे उठणे बसणे.. तीन चार वर्षांपूर्वी अजय देवगण ने त्यांना सांगीतलेला एक अनुभव..तर हा अनुभव आहे टिपरे मालिकेतील शिऱ्या आणि अजय देवगण यांचा.. फार कमी लोकांना हे माहीत आहे की ते दोघे फार चांगले मित्र आहेत. एकदा शूटसाठी ते दोघे राजस्थानात होते. तीथल्याच एका हाॅटेलात मुक्कामाला होते. त्या रात्री शिऱ्या ज्या खोलीत झोपला होता त्यात एका भिंतीवर घोड्यांचे चित्र होते.. त्याला झोप लागताच त्याला निरनिराळे आवाज ऐकू येऊ लागले, भरदाव वेगाने अंगावर चालून येणाऱ्या घोड्यांचे मोठमोठे आवाजही होते.. रूममधे काही तरी लोचा आहे हे समजून तो रिसेप्शनमधे जाऊन सोफ्यावर बसल्या बसल्याच झोपी जायचा प्रयत्न करत होता तेव्हा बाहेर सिगरेट फुकायला चाललेल्या अजय देवगणने त्याला त्याविषयी विचारले..पण शिऱ्याने उगाचच काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून नेली.. दुसऱ्या दिवशी तनुजा आणि काजोलही तीथे आले होते..अजय देवगण आपली खोली त्या दोघींच्या स्वाधीन करून शिऱ्याच्या खोलीत जाऊन झोपला..त्या रात्री त्यालाही विचीत्र अनुभव आले..त्यात कोणी तरी त्याच्या अंगावर येऊन झोपले आहे असे जेव्हा वाटले तेव्हा तो तडक उठून रिसेप्शन मधे गेला आणि तीथे असलेल्या शिऱ्याच्या थोबाडीत देऊन तो खाली झोपण्याचं खरं कारण विचारू लागला .. शिऱ्याने हा अनुभव अजय देवगण पासून लपवल्याबद्दल क्षमाही मागितली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच सगळी टीम वेगळ्या हाॅटेलात शिफ्ट झाली.
म्हणून काय थोबाडीत मारायची
म्हणून काय थोबाडीत मारायची
अनुभव छान आहे,पण स्वतः ची
अनुभव छान आहे,पण स्वतः ची खोली बायकांना देऊन अजय मित्राच्या खोलीत शिफ्ट झाला,म्हणजे तो पण माझ्यासारख्या पैसे बचाओ आंदोलनात असतो म्हणावे लागेल
अनिळजींना त्या हॉटेलमध्ये
अनिळजींना त्या हॉटेलमध्ये काही दिवसांसाठी पाठवले तर आपल्याला लाइव्ह अपडेट्स मिळु शकतील.
अनिळजींना त्या हॉटेलमध्ये
अनिळजींना त्या हॉटेलमध्ये काही दिवसांसाठी पाठवले तर आपल्याला लाइव्ह अपडेट्स मिळु शकतील.>>>>>
त्यांच्या टुरचे पैसे कोण भरणार? बोकलतंना पण सोबत पाठवा. 
Pages