जगातले सर्वात कर्मकठीण काम म्हणजे बायकोला काय गिफ्ट द्यावे असे आपल्याला वाटत असेल तर तुमच्यावर अजून मेहुणीला गिफ्ट द्यायची वेळ आली नसणार हे नक्की..
मला सुदैवाने दोन मेहुण्या आहेत. जुळ्या आहेत. त्यामुळे वाढदिवस एकाच दिवशी येतोय. तो दिवस तोंडावर आला तरी काय द्यावे ते अजून ठरत नाहीये.
आजवर कधी मी माझ्यातर्फे त्यांना गिफ्ट दिले नाही. माझ्या बायकोने दिले. भले ते माझ्याच खिश्यातून पैसे काढून दिले असले तरी तिचे तिनेच ठरवून दिलेय. माझ्या मताला कवडीचीही किंमत दिली नाहीये.
तर आता मला मेहुणींना गिफ्ट का द्यायचेय?
कारण् मला त्या दोघींनी आजवर न चुकता बड्डे गिफ्ट दिल्या आहेत. माझे बड्डेही पुढाकार घेत सेलिब्रेट केले आहेत. म्हणजे केक आणने, सरप्राईज डेकोरेशन करणे, माझ्या बड्डेच्या दिवशी पिकनिक प्लान करणे, त्यासाठी ऑफिसला सुट्टी टाकणे अश्या गोष्टी केल्या आहेत.
मागे एक मेहुणी परदेशात गेली असताना मला तेथील महागडे ब्रांडेड घड्याळ आणले होते. महागडे म्हणाल तर त्या किंमतीचे घड्याळ घेणे तर दूर मी कधी तसा विचारही केला नसता.
नुकतेच गेल्या महिन्यात दोघी पर्यटनाला परदेशात गेल्या होत्या तेव्हा पुन्हा मला तिथून बरेच ब्रांडेड कपडे वगैरे आणले होते.
त्यामुळे यंदा मलाही वाटतेय की बायको नेहमीप्रमाणे त्यांना जे देईल ते देईल. पण मलाही माझ्यातर्फे त्यांना काहीतरी द्यायला हवे. कदाचित त्यांनाही वाटत असेल की आपले ईकलौते जिजू आपल्याला आजवर काहीच कसे देत नाहीत...
मायबोलीवर गिफ्टबाबत छान सल्ले मिळत असल्याने डेअरींग करत हा तसा जरा पर्सनलच धागा काढत आहे. प्लीज तितकेच सिरीअसली घ्यात सल्ले द्या. आणि लवकर द्या...
तर साधारण मदत सल्ले असे हवे आहेत.
१) गिफ्ट अर्थातच त्यांच्यासाठी सरप्राईज राहील. बायकोला या कटात सामील करेन वा न करेन.
२) दोघींना सेमच हवे. नंतर एकीपेक्षा दुसरीला चांगले असे लफडे नकोत.
३) गिफ्टला कुठला रोमांटीक ॲंगल नको. म्हणजे बायकोला वा गर्लफ्रेंडलाच शोभावे असे गिफ्ट नकोत. उगाच माझ्या संसारात राडा व्हायचा.
४) दोघींच्या गिफ्टचे मिळून टोटल बजेट २ हजारापासून १० हजारापर्यंत पकडू शकता.
तळटीप - मी आजवर ऑनलाईन शॉपिंग केली नाही.
पण मलाही माझ्यातर्फे त्यांना
पण मलाही माझ्यातर्फे त्यांना काहीतरी द्यायला हवे. कदाचित त्यांनाही वाटत असेल की आपले ईकलौते जिजू आपल्याला आजवर काहीच कसे देत नाहीत... >> नशीबवान आहात ..
Imagica trip
Imagica trip
New insurance scheme launched
New insurance scheme launched.
"Insurance for friends" check it n gift it
शीर्षकात मेहुण्यांना हवे ना?
शीर्षकात मेहुण्यांना हवे ना?
तळटीप संशयास्पद वाटते
तळटीप संशयास्पद वाटते
मेहुणीला फ्रीज हवा
मेहुणीला फ्रीज हवा
(दादा कोंडकेंचे वाक्य आहे मला काय बोलायचं नाय)
काय घ्यायचं ते घेशीलच पण
काय घ्यायचं ते घेशीलच पण
<<<मी आजवर ऑनलाईन शॉपिंग केली नाही.>>> हे काही झेपलं नाही.
काहीही घ्या परंतु या मिशन
काहीही घ्या परंतु या मिशन गिफ्ट मध्ये आधी बायकोला सामील करा. नंतर टेंशन नको.
मेव्हण्यांना ब्रँडेड कपडे,
मेव्हण्यांना ब्रँडेड कपडे, गॉगल्स, शूज, घड्याळं वगैरेची आवड असेल तर तशा प्रकारच्या दुकानांची (hidesign, fossil वगैरे) गिफ्ट व्हाऊचर्स देऊ शकतोस. किंवा तुझ्या बायकोला बहिणींना काय आवडेल याची खात्री असेल तर थेट विकत घेऊन दे.
बुन्नू धन्यवाद... हो नशीबवान
बुन्नू धन्यवाद... हो नशीबवान आहे या बाबतीत. चांगली बायको शोधता येते. पण चांगल्या मेहुणीज नशीबानेच मिळतात
..
शीर्षकात मेहुण्यांना हवे ना? >>> माझे मराठी कच्चे आहे. मी मायोनीज लिहीले नाही हेच नशीब
मेहुण्यांना हा कर्रेक्ट वर्ड आहे का?
मग पुल्लिंगी अनेकवचन काय होईल याचे?
पाफा ते ईमॅजिका छान प्लान
पाफा ते ईमॅजिका छान प्लान होता. पोरींना फिरायची आवडही आहे. पण दुर्दैवाने नुकतेच त्या दुसरयांदा ईमॅजिकाला जाऊन आल्यात. त्या आठवणी ताज्याच असतील. मी स्वताही नुकतेच तिथे जाऊन आलोय. त्यामुळे या गिफ्टमधील नावीन्य हा घटक संपुष्टात आला आहे.
आणि पैश्याचे सेव्हिंग प्लान नकोच ते.. आजवर मी स्वतासाठी एक पैसा कुठे गुण्तवला नाही. ईतरांसाठी केले तर आधी माझी बायको मला मारेन..
@ ओनलाईन शॉपिंग
@ ओनलाईन शॉपिंग
दूध अण्डी ब्रेड वगळता आमचे घर ऑनलाईन शॉपिंगवर चालते. पण मी आजवर केली नाही कधी. बायकोकडेच आहे हे डिपार्टमेंट. स्विगी ओला असले प्रकारही तीच हाताळते. ईतकेच नाही तर माझी नेटबॅंकींगही तिच्याच अखत्यारीत येते.
तर ती तळटीप टाकायचा हेतू असा - जर ऑनलाईन शॉपिंगची गरज असलेला एखादा सल्ला आला तर मला बायकोची मदत घ्यावी लागेल किंवा मग ऑनलाईन शॉपिंग कशी करावी हा धागा काढावा लागेल.
वावे, गिफ्ट वाऊचर्स देणे
वावे, गिफ्ट वाऊचर्स देणे योग्य राहील अंदाज नसताना... फक्त ते कॅश दिल्याचेच फिलिंग येते. ते नकोय.
ब्रांडेड गॉगल पर्स ड्रेसेस घड्याळ मोबाईल हे आजवर माझ्या बायकोने त्यांना दिलेय. यंदा पुन्हा पर्सचा टर्न आहे.
सध्या मी माझ्यातर्फे एक बार्बेक्यू ट्रीट आदल्या दिवशी प्लान केली आहे दोन्ही फॅमिलीजना. तिथे केकही कापला जाईल. किंवा हॉटेल बदलताही येईल..
तिथेच काही छोटेमोठे गिफ्ट दिले तर ओवरऑल मोठे फिल येईल असे वाटते..
पुढच्या दिवशी ते आपला बड्डे सेलिब्रेट करतीलच. तेव्हा बायको आपले गिफ्ट देईल. हे सेलिब्रेशन टोटली माझे होईल. असा साधारण प्लान आहे
@ऋन्मेऽऽष ... मेव्हण्यांना
@ऋन्मेऽऽष ... मेव्हण्यांना वाचनाची, मग त्या मध्ये इन्ग्रजी उत्तमोत्तम पुस्तके असोत वा मराठी... पण जर वाचनाची आवड असेल तर चांगल्या बुकस्टोअर्स चे व्हाउचर्स दे. तसे ही पुस्तक किंवा पुस्तके खरेदी करण्यासाठी चे व्हाउचर्स हि खरेच चांगली आयडिया ची कल्पना आहे. त्यांना वाचनाची आवड नसली तरी असे गिफ्ट देण्याने ती वाढीस लागेल.
- प्रसन्न
mi कंपनीचा वजनाचा काटा (body
mi कंपनीचा वजनाचा काटा (body composition scale) (₹२०००) आणि त्याच कंपनीचा फिटनेस बँड (₹२३००) द्या.
Mi च्या दुकानात मिळतील या वस्तू.
किंवा चांगल्या ब्रँड चे ब्लुटूथ इअरफोन द्या तुमच्या बजेट मध्ये बसणारे
ऋण मेष तू वेडा आहेस की आमचा
ऋण मेष तू वेडा आहेस की आमचा वडा बनवत आहेस.
माय बोली काय deep web aahe ka ki तुझ्या बायकोच्या च्या बहिणी इथे येत नसतील.
तुझे हे प्रताप त्यांना समजले तर त्याच गिफ्ट देतील.
त्यांच्या घरात एसी नसेल तर
त्यांच्या घरात एसी नसेल तर त्यांना चांगल्या कंपनीचे एअर कूलर्स घेऊन देऊ शकता. तसेही आता काही दिवसांतच तापमान वाढीला लागेल पण सध्या थंडी असल्याने कूलर्स डिस्काऊंटमध्ये मिळतील.
उगाच काहीबाही देण्यापेक्षा
उगाच काहीबाही देण्यापेक्षा त्यांना मिक्सर दे.
म्हणजे त्यांना काही वाटायला नको.
म्हणजे त्यांना काही वाटायला
म्हणजे त्यांना काही वाटायला नको.
>>>
असं कसं.. काही वाटायलाही हवं ना
बिपिनचंद्र, एसी आहे त्यांच्याकडे. पण गृहोपयोगी वस्तू अविवाहीत मुलींना नकोच.
राजेश, त्यांना समजले तर
राजेश, त्यांना समजले तर कश्याला... कधीतरी मी त्यांना सांगेनच या धाग्याबद्दल. काही लपवावे असे धंदे मी करतच नाही
व्यत्यय वजनाचा काटा आमच्याकडे
व्यत्यय वजनाचा काटा आमच्याकडे आहे. त्या आमच्याकडे येऊन रोज वजन चेक करतात.
ब्ल्यू टूथ हेडफोन छान आयड्या आहे. विचारात घेतले असते. पण कामानिमित्त त्यांना सारखे लागते. त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त आहेत.
प्रसन्न
प्रसन्न
पुस्तके देऊन वाचनाची आवड लागेल यावर माझा विश्वास नाही. किंवा वाचनाची आवड नसलेल्यांना नेमके कोणते पुस्तक द्यायचे हा गहन प्रश्न. उगाच पुस्तके दिल्यावर मी त्यांना काकाटाईप्स मनुष्य वाटायला नको हा वेगळाच धोका. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना वाचनाची नाही पण फिरायची ट्रेकिंगची वगैरे आवड आहे.
गाण्यांची आवड आहे का चेक करायला हवे... छोटासा मुजिक प्लेअर, ब्ल्युटूथ स्पीकर वगैरे विचार करता येईल..
आता एक काम करतो.. त्यांच्या आवडी काय काय आहेत हेच आधी आठवतो, शोधतो, बायकोला विचारतो....
आयफोन ११ प्रो देवून टाका २
आयफोन ११ प्रो देवून टाका २ म्हणजे त्या पण गिफ्ट विसरणार नाहीत आणि तुम्ही पण वर्ष भर तरी त्याचं विचारात राहाल.
जर परदेशी जाणाऱ्या असतील तर
जर परदेशी जाणाऱ्या असतील तर क्लासी ब्रँडेड बॅग्ज (ज्यासाठी तुमचं 10 हजारच बजेट वाढवावं लागेल) किंवा मग 'सिफोरा' (Sephora)चं गिफ्ट व्हाउचर किंवा मग 'बॉडी शॉप' मध्ये मिळणारे गिफ्ट बॉक्सेस (यात वेगवेगळ्या कोस्मेटिक्सचा एका fragrance चा आकर्षक बॉक्स असतो. माझ्या गिफ्ट बॉक्समध्ये बॉडी स्क्रब, बॉडी वॉश, शॅम्पू, कंडिशनर, फेस क्रीम, बॉडी क्रीम, लीप बाम होतं. किंमत माहीत नाही, पण हे सुद्धा कदाचित 10 हजारमध्ये बसणार नाही )
मी सांगितलेल्या तिन्ही गिफ्ट्पैकी एक कणभरही विचार न करता घेऊ शकता. कोणत्याही स्त्री /मुलीला 100% आवडणारच.
जीम ची मेंबरशीप एकीला द्या.
जीम ची मेंबरशीप एकीला द्या. सीता गीता को कौन पेहचाने गा?

असं कसं.. काही वाटायलाही हवं
असं कसं.. काही वाटायलाही हवं ना >>
मिक्सर असला तर कशाला वाटायचं?
उगाच काहीबाही देण्यापेक्षा
उगाच काहीबाही देण्यापेक्षा त्यांना मिक्सर दे.
म्हणजे त्यांना काही वाटायला नको.>>>>>
राजेश, धाग्यावरची नाराजी
राजेश, धाग्यावरची नाराजी सोडून सल्ला दिलात याचा आनंद झाला. सल्ला मात्र महागडा द्यायचा मोह आवरला नाही
मागे त्या दोघींना आम्ही मोबाईल दिलेले. आता शक्य नाही. आता त्या कमावू लागल्यात आणि त्यांचे प्रत्येकी फोन आमच्या दोघांच्या फोनची टोटल मारली तरी त्याच्या दुप्पट किंमतीचे आहेत.
मीरा आपली पोस्ट फुकट नाही
मीरा आपली पोस्ट फुकट नाही जाणार. त्या महागड्या गिफ्ट मी त्यांना त्यांच्या लग्नाला नक्की देईन. वेगळा धागा काढायची गरज नाही आता
बाकी सौण्दर्यप्रसाधने तुर्तास नको. मला बायकोला ऊत्तरे द्यावी लागतील. तिच्या साध्या लिपस्टिक खरेदीतही मी आजवर सहभाग नोंदवला नाही ..
पाफा, एकीला द्यायची आयड्या
पाफा, एकीला द्यायची आयड्या छानेय
जिमला मात्र नो, त्या योगावाल्या आहेत
मानवमामा आपले वाटण्याचे
मानवमामा आपले वाटण्याचे दोन्ही अर्थ कळले. पण ज्यांना आपण गिफ्ट देतो त्यांना काहीतरी वाटायला हवे ही आपली भावनिक गरज असते. त्याचवेळी बायकोलाही काही भलतेसलते वाटायला नको ही माझी शारीरीक + संसारीक गरज आहे
मानव मिक्सरवर सिक्सर सॉलिड
मानव मिक्सरवर सिक्सर सॉलिड
Prepaid gift card
Prepaid gift card
वाईन ची बाटली द्या.
वाईन ची बाटली द्या.
१. बायकोला माहित असलेलेच
१. बायकोला माहित असलेलेच गिफ्ट दे.
२. गिफ्ट हे बायकोला दिलेल्या कुठल्याही गिफ्ट्च्या किंमतीपेक्षा जास्त किंमत असलेले नसावे याची काळजी घे.
३. गिफ्ट पाहुन स्रीचा ओढा पुरुषाकडे होईल असले कुठलेही गिफ्ट देणे टाळ.
त्यांचे लग्न झाले नसेल तर
त्यांचे लग्न झाले नसेल तर लग्न लावून दे कायमची झंझट जाईल आणि त्यांचे स्वतःचे नवरे बघतील मग त्यांना काय गिफ्ट द्यायचे ते।
बायकोशी कन्सल्ट करुनच गिफ्ट
बायकोशी कन्सल्ट करुनच गिफ्ट द्या. शेवटी बायको आहे म्हणुन मेहुण्या आहेत. शिवाय क्वचित बहीणीबहीणींत स्पर्धाही असू शकते.
अजिंक्यराव धन्यवाद, पण
अजिंक्यराव धन्यवाद, पण प्रीपेड गिफ्टकार्ड कॅश दिल्याची फिलीण्ग येते म्हणून नको...
च्रप्स वाईनमध्ये अल्कोहोल असल्यास नको...
गिफ्ट पाहुन स्रीचा ओढा
गिफ्ट पाहुन स्रीचा ओढा पुरुषाकडे होईल असले कुठलेही गिफ्ट देणे टाळ.
>>>>
मला अश्या गिफ्टसची लिस्ट मिळेल का बॉन्ड
जेणेकरून ईथे टाळता येईल आणि ईतर दरयाखोरयातील ओढा नदी नाले झरे माझ्याकडे वळतील हे बघता येईल
अजनबी, लग्नाची आयड्या वरकरणी
अजनबी, लग्नाची आयड्या वरकरणी भारी आहे
.. पण आजकालच्या मुलींचे लग्न लावणे जगात अवघड काम आहे.. 
बायकोशी कन्सल्ट करुनच गिफ्ट
बायकोशी कन्सल्ट करुनच गिफ्ट द्या
>>>>>
हो, आजच मी बायकोला किमान ईतकी कल्पना तरी दिली आहे की मी त्यांना माझ्यातर्फे काही गिफ्ट देणार आहे..
नेहमी टूर वर असतील तर
नेहमी टूर वर असतील तर चांगल्या सुटकेसेस पण गिफ्ट देता येतील. सगळ्याच नामांकित ब्रॅण्ड्स मध्ये खूप छान कलर्स आणि डिझाइन्स उपलब्ध असतात.
>>>>गिफ्ट पाहुन स्रीचा ओढा
>>>>गिफ्ट पाहुन स्रीचा ओढा पुरुषाकडे होईल असले कुठलेही गिफ्ट देणे टाळ.>>> पर्फ्युम्स
लव्ह देम. पण अतोनात पर्सनल आहे ती गिफ्ट. नाही सुट झाला तर डोके दुखते वासाने 
बुन्न्नू, नाही, नेहमी टूरवर
बुन्न्नू, नाही, नेहमी टूरवर नसतात. वर दोन परदेश दौरयांचा उल्लेख केला त्यातील एक पीएचडीसाठी आणि एक नुकताच पर्यटनासाठी केलेला. तशी ईथे तिथे फिरायची ट्रेकिंगची वगैरे आवड आहे पण त्यासाठी खास बॅग मला द्यायची गरज नसावी
पर्फ्युम्स Happy लव्ह देम >>
पर्फ्युम्स Happy लव्ह देम >> अरे देवा, या गिफ्टच्या कल्पनेने मलाच गुदगुल्या झाल्या.. त्यामुळे मोठी फुल्ली
अबब... किती ती चर्चा
अबब... किती ती चर्चा भेटींसाठी. त्या दोघींना मॉलमधे घेऊन जा व सांग 'इतके बजेट आहे... यात काय हवे ते घ्या". विषय संपला. त्या त्यांना हवं ते
निवडतील नि ऋन्मेषभाऊ तुम्हाला तोवर मायबोलीवर टाईमपास करता येईल.
त्या दोघींना मॉलमधे घेऊन जा व
त्या दोघींना मॉलमधे घेऊन जा व सांग 'इतके बजेट आहे..
>>>
हो, बड्डेच्या आदल्या दिवशी मी, त्या दोघी आणि माझ्याशी विवाह झालेली त्यांची बहिण असे चौघेच एक ट्रीट वा आऊटींग प्लान करतोय. त्यात हे मॉल गिफ्ट वगैरे घुसडता येईल. मात्र अमुकतमुक बजेट आहे हे सांगणे काही रुचत नाही. आणि न सांगावे तर कमी जास्त होण्याची शक्यता..
त्या दोघी आणि माझ्याशी विवाह
त्या दोघी आणि माझ्याशी विवाह झालेली त्यांची बहिण असे चौघेच एक ट्रीट वा आऊटींग प्लान करतोय. वीन Submitted by ऋन्मेऽऽष on 31 January, 2020 - 01:15
>>>>
म्हणजे अजून या व्यतिरिक्त सख्खे भावंड आहेत का?
असे असेल तर आता माझा पास. बाकी भावंडांच्या धाग्यावर लिहीन.
त्वरा करा त्वरा करा ..शेवटचे
त्वरा करा त्वरा करा ..शेवटचे दोन तीन दिवस
आयड्याजचा महापूर येऊ दे.धाग्याची शंभरी होऊ दे..
तुम्हाला तुमच्या मेहुणीजची शप्पथ.. तुम्ही कोणाच्या मेहुणी असाल तर त्या नात्याचा वास्ता.. माझ्यासाठी आता मायबोली हाच एक रास्ता _/\_
पाफा तीन बहिणी त्यात एक माझी
पाफा तीन बहिणी त्यात एक माझी बायको..
आणि बायकोला गिफ्टचा धागा आपला आधी आहेच. माझ्या बायकोच्या वाढदिवसादिवशी मी तिथूनच आयड्या घेईन.
बाकी बायकोच्या भावाला वा जगातल्या कुठल्याही पुरुषाला काय गिफ्ट द्यावे हा धागा काढायची कुठल्याही स्त्रीपुरुषाला गरज पडू नये.
Pages