जगातले सर्वात कर्मकठीण काम म्हणजे बायकोला काय गिफ्ट द्यावे असे आपल्याला वाटत असेल तर तुमच्यावर अजून मेहुणीला गिफ्ट द्यायची वेळ आली नसणार हे नक्की..
मला सुदैवाने दोन मेहुण्या आहेत. जुळ्या आहेत. त्यामुळे वाढदिवस एकाच दिवशी येतोय. तो दिवस तोंडावर आला तरी काय द्यावे ते अजून ठरत नाहीये.
आजवर कधी मी माझ्यातर्फे त्यांना गिफ्ट दिले नाही. माझ्या बायकोने दिले. भले ते माझ्याच खिश्यातून पैसे काढून दिले असले तरी तिचे तिनेच ठरवून दिलेय. माझ्या मताला कवडीचीही किंमत दिली नाहीये.
तर आता मला मेहुणींना गिफ्ट का द्यायचेय?
कारण् मला त्या दोघींनी आजवर न चुकता बड्डे गिफ्ट दिल्या आहेत. माझे बड्डेही पुढाकार घेत सेलिब्रेट केले आहेत. म्हणजे केक आणने, सरप्राईज डेकोरेशन करणे, माझ्या बड्डेच्या दिवशी पिकनिक प्लान करणे, त्यासाठी ऑफिसला सुट्टी टाकणे अश्या गोष्टी केल्या आहेत.
मागे एक मेहुणी परदेशात गेली असताना मला तेथील महागडे ब्रांडेड घड्याळ आणले होते. महागडे म्हणाल तर त्या किंमतीचे घड्याळ घेणे तर दूर मी कधी तसा विचारही केला नसता.
नुकतेच गेल्या महिन्यात दोघी पर्यटनाला परदेशात गेल्या होत्या तेव्हा पुन्हा मला तिथून बरेच ब्रांडेड कपडे वगैरे आणले होते.
त्यामुळे यंदा मलाही वाटतेय की बायको नेहमीप्रमाणे त्यांना जे देईल ते देईल. पण मलाही माझ्यातर्फे त्यांना काहीतरी द्यायला हवे. कदाचित त्यांनाही वाटत असेल की आपले ईकलौते जिजू आपल्याला आजवर काहीच कसे देत नाहीत...
मायबोलीवर गिफ्टबाबत छान सल्ले मिळत असल्याने डेअरींग करत हा तसा जरा पर्सनलच धागा काढत आहे. प्लीज तितकेच सिरीअसली घ्यात सल्ले द्या. आणि लवकर द्या...
तर साधारण मदत सल्ले असे हवे आहेत.
१) गिफ्ट अर्थातच त्यांच्यासाठी सरप्राईज राहील. बायकोला या कटात सामील करेन वा न करेन.
२) दोघींना सेमच हवे. नंतर एकीपेक्षा दुसरीला चांगले असे लफडे नकोत.
३) गिफ्टला कुठला रोमांटीक ॲंगल नको. म्हणजे बायकोला वा गर्लफ्रेंडलाच शोभावे असे गिफ्ट नकोत. उगाच माझ्या संसारात राडा व्हायचा.
४) दोघींच्या गिफ्टचे मिळून टोटल बजेट २ हजारापासून १० हजारापर्यंत पकडू शकता.
तळटीप - मी आजवर ऑनलाईन शॉपिंग केली नाही.
तुला काय घ्यायचं आहे त्यावर
तुला काय घ्यायचं आहे त्यावर उत्तर अवलंबून आहे. अमेरिकेत ती कुठे आहे त्यावरही काय गिफ्ट देता येईल हे अवलंबून आहे.
तुझं बजेट काय आहे? तुला शक्य असेल तर भारतातून कुरियर कर. सगळे तिच्या आवडीचे पदार्थ/स्नॅक्स पाठव. तुम्ही जेंव्हा घरापासून लांब रहाता तेंव्हा गिफ्ट पेक्षा घरून आलेल्या गोष्टींची किंमत खूप जास्त असते. यामध्ये फॅमिली फोटो, तिच्या साठी हॅंडरिटन नोट्स वगैरे असतील तर आणखी इमोशनल वाटेल.
किंवा तिचं गिफ्ट आत्ता पेंडीग ठेव पण तिला एक छान व्हिडीओ करुन पाठवा ज्यामध्ये घरातल्या सगळ्यांकडून तिला एक छानचा मेसेज असेल. एखादं फोटोचं छान कोलाज करून सॉफ्ट कॉपी पाठवा ज्याची ती प्रिंट काढून घेईल आणि तिच्या घरात लावेल. आजकाल कस्टमाईज गाणी बनवून मिळतात. तसं एखादं गाण (ण वर टिंब- साभार नानबा) लिहून/गाऊन पाठवा. यामध्ये तुम्हाला खर्च काही येणार नाही आणि तिला पण मेमोरेबल गिफ्ट मिळेल.
इथे तू अगदी १० डॉलरची गोष्ट
इथे तू अगदी १० डॉलरची गोष्ट घेतलीस तरी तुला ८४० रुपये लागणार साधारण. यामुळेच बजेट महत्वाचं आहे. तुला ऑर्डर करायची असेल तर मी मदत करू शकेन. मी डॉलर मधे पैसे भरेन आणि तू मला INR मधे दे.
१०-२० डॉलर मधे फार तर फार एखादा टॉप किंवा परफ्युम किंवा मेकअप चं सामान येऊ शकेल. किंवा आर्टीस्ट अंग असेल तर त्या गोष्टी पण येऊ शकतात. अमेझॉन वरून मागवलं तर कुरिअर चार्जेस वाचतील.
सामो, रीया, प्रतिसादाबद्दल
सामो, रीया, प्रतिसादाबद्दल धन्यवाद
रीया फारच सविस्तर प्रतिसाद
तू सुचवलेल्या पर्यायांबद्दल घरी बोलणे झाले. ज्यात तिथूनच डॉलरमध्ये गिफ्ट घेणे हा पर्याय घरच्यांनी आधीच बाद केला आहे.
तु म्हटले तसे,
मला हे डिटेल माहीत नव्हते.
<<<< घरापासून लांब रहाता तेंव्हा गिफ्ट पेक्षा घरून आलेल्या गोष्टींची किंमत खूप जास्त असते. यामध्ये फॅमिली फोटो....>>>>
हे खरेच आहे.. आणि सासुरवाडीकडून हे वाढदिवसानिमित्त गेले सुद्धा आहे. ज्यात तिच्या ईकडच्या बहिणीने दोघींचा एक फोटो फ्रेम करून तिला पाठवला आहे
सध्या जी ईथे आहे तिला गिफ्ट (शक्यतो ड्रेस, ज्याची फार आवड आहे त्यांना) घ्यायचा आणि दुसरीला विडिओकॉल लावून तिला काही पसंत पडला तर आताच वाढदिवसाच्या मुहुर्तावर घ्यायचा किंवा तिचे गिफ्ट पेन्डीग ठेवायचे आणि ती ईथे आल्यावर घ्यायचे असे ठरत आहे.
बाकी माझी मुलगी ग्रीटींग बनवतेच तसे विडिओ किंवा एखादी बर्थ डे विशेसची रील ही कल्पना तिला देता येईल. जे तिला कौतुकाने तिथल्या
मित्र-मैत्रीणींना दाखवता येईल.. ज्याचा वाढदिवस आहे त्याला तो दिवस स्पेशल फिल करून देणे महत्वाचे.
Pages