तुझ्या येण्यानी सृष्टीसारी सुखावते
हे तू जरा विसरून गेलास का...???
एवढ्यात तू जास्त बरसलासं
हे तू जरा विसरून गेलास का...???
तुझं नेहमीचं पडणं म्हणजे
दोन महिने तीन महिने हेच का...???
पण यावेळी वेगळा वागला आहेस
हे तू जरा विसरून गेलास का...???
तुझ्या येण्याने माणसं सुखावून गेली
आनंदाने सगळीकडे उधाण आल का...???
नेहमी सारखं वागणं कस असतं
हे तू जरा विसरून गेलास का...???
चार दिवस पाहुणा असतो तू
हे विसरून यावेळी वागलास का...???
आनंदावर विरजण घालून गेलास
हे तू जरा विसरून गेलास का...???
तुझ्या येण्याने भूमी पुत्र सुखावतो
हे तुला माहिती आहे का...???
तुझा हा अचानक वाढलेला मुक्काम
हे जरा तू विसरून गेलास का...???
नदी नाले भरले रे ओसांडून वाहू लागले
हे तुला माहिती आहे का...???
पूर आले घरं वाहून गेली
हे तू जरा विसरून गेलास का...???
नको असा वागू , तू परत तुझ्या येण्याचा
आनंद हिरावून घेणार आहेस का...???
पुन्हा तुझ्या येण्याला लोक घाबरतात
हे तू जरा विसरून गेलास का...???
बाबारे असा नको वागत जाऊस
तुला काही हवं आहे का...???
आमची काही चूक झाली हे सांगायला
हे तू जरा विसरून गेलास का...???
©तुषार कोकजे, पुणे