Submitted by Asu on 14 September, 2019 - 08:35
पुनर्जन्म
पुनर्जन्म हा साठीनंतर
ज्येष्ठ नागरिक, वय सात
जुने जगणे सरले आता
नवजीवनाची करूया बात
काळोखाच्या रात्री कधी
कधी चाललो बिकट वाट
नव्या युगाची वाट पहाते
उज्वल रम्य पहाट
संध्यासमयी सांज फुलली
क्षितिजावरती रंग बरसात
सूर्य अजून तळपत राही
मम प्रियेची जोवर साथ
दूर पुढे दिसते अजून
मंद दिव्याची तेवत वात
नव्या दमाने जगण्यासाठी
आम्ही टाकली कात
अस्त होई कधी तरी
जरी मोक्ष सागरात
पार करू भवसागरही
घेऊन हातात हात
काम करून दाम घेती
न्याय जगाचा खास
गतकामाचे पैसे मजला
पेन्शन म्हणती त्यास
जगता जगता जगवावे
लाख मोलाची ही बात
जाताजाता देऊन जावे
देणारे अपुले हात
प्रा.अरूण सु.पाटील (असु)
(दि.14.09.2016)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवडली..
आवडली..
वाह!!
वाह!!
मनःपूर्वक धन्यवाद! आपल्याला
मनःपूर्वक धन्यवाद! आपल्याला माझ्या कविता आवडत असतील तर माझ्या इतर कविता वाचण्यासाठी 'असुच्या कविता' हे माझे एफबी पेज लाईक करा.