सोळा आण्याच्या गोष्टी - चिरंजीव! - अज्ञातवासी

Submitted by अज्ञातवासी on 13 September, 2019 - 00:42

"आतातरी काढून घे शाप... मुक्ती दे..."
तेवढ्यात एक धिप्पाड माणूस त्याच्यासमोर आलं.
"काय रे, मारुतीची चोरी करतोय व्हय, आरं तुला काही लाज?"
"मारू नका...एक थेंब तेल पाहिजे होतं फक्त, म्हणून देवळात आलो"
त्या माणसाला त्याची दया आली.
"आरं चांगला देव हाय तो, मागितलं तर सगळं देतो."
'देव?' तो मनाशीच हसला. 'त्या एका देवानेच तर हा शाप दिलाय...'
"घे, थेंबभर तेलाने काय हुतय, कपाळ?"
त्या धिप्पाड माणसाने त्याला वाटीभर तेल दिलं, आणि तो निघून गेला.
त्याने घाईघाईने आपल्या कपाळाच्या जखमेवर तेल लावलं...
दाह शांत झाला...
...आणि तो समाधानाने झाडाखाली विसावला.
...तो धिप्पाड माणूस दूरवर गेला, त्याची गदा उचलली, आणि अंतर्धान पावला!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mstch

छान

छान! Happy

छान.
अश्वत्थामाला मारुतीने शाप दिला होता का? मला माहित नव्हतं.

मस्तच!
अश्वत्थाम्याला श्रीकृष्णाने शाप दिला होता.

> "काय रे, मारुतीची चोरी करतोय व्हय, आरं तुला काही लाज?"
"आरं चांगला देव हाय तो, मागितलं तर सगळं देतो."
'देव?' तो मनाशीच हसला. 'त्या एका देवानेच तर हा शाप दिलाय...' > याच्यावरून मला वाटलं मारुतीने शाप दिलाय Lol

बरोबर कृष्णाने दिला होता शाप. द्रौपदी मुलं मारली म्हणून (हे तर बरोबर आहे का :-P)

हो Happy द्रौपदीच्या मुलांना (झोपेत) मारलं म्हणून की ब्रह्मास्त्र सोडलं म्हणून ( ज्याने उत्तरेच्या गर्भाचा बळी घेतला) ते लक्षात नाही. किंवा दोन्हीसाठी असेल.
अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सात चिरंजीव.

तू एखाद्या कसलेल्या कलाकारासारखा मास्टरपीस शेवटी राखून ठेवला होतास वाटतं...
अप्रतिम जमलीये, आणि वाचतानाही मन प्रसन्न झालं!!!!

सर,
माफ करा पण ही कथा नसून नुसते एक प्रसंग वर्णन आहे.
लिहिलेले आणि खासकरून न लिहिलेले अनेक प्रसंग एकत्र विणून एक कथा बनते. जसे सिनेमातले वेगवगळे सीन्स मिळून एक सिनेमा बनतो.
तुम्हाला एका प्रसंगाच्या वर्णनाला स्टोरीटेलिंग म्हणायचे आहे? जरूर म्हणा.