"मी" माझ्यातली..

Submitted by अ'निरु'द्ध on 9 September, 2019 - 10:08

"मी" माझ्यातली..

सहजच फोन केला माझ्या सेमिनारला गेलेल्या मैत्रिणीला
म्हटलं बाई, कशी आहेस..
खाणं, पिणं, रहाण्याची व्यवस्था कशी आहे..बरी आहे..?

ती उत्तरली, झकास, अगदी उत्तम
हाॅटेल मस्तच आणि रुम मधे सोबतीला कोणी नाही, हे तर अति उत्तम...

नाहीतर बिन ओळखीच्या, जराशा ओळखीच्या कुणीतरी एकीने सोबतीला यावं..
आणि सोबत म्हणता म्हणता तिच्यासवे आणखीनंच एकटं व्हावं…

तशी काही वाईट नसते ती, चांगलीच असते..
पण आपली आपली नसल्याने तीही कानकोंडी होऊन बसते…

उगाचच वरवरचं बोलतो दोघी..
पण अंतरीच्या जिव्हाळ्याची दोघींमधेही कमी...

पण हा जिव्हाळा असणार तरी कसा..
आणि दोघीनाही हे समजतं, म्हणून जिव होतो कसानुसा...

पण आज आहे मी रूममध्ये एकटी, निवांत..
या एकटेपणाचं काय करु नी काय नको याची पडलीय भ्रांत...

मी म्हटलं, मग काय…?
आता हाॅटेलचा टाॅवेल हातात घेऊन भिरीभिरी गोफण चालवणार की काय..?

की करणार बल्ले बल्ले करत आरशासमोर भांगडा..
आणि आरशातल्या स्वतःच्याच प्रतिबिंबाला देणार सैराट नृत्याचा धडा…

ती म्हणाली कल्पना वाईट नाहीये असं मनमोकळं व्हायची..
पण ही निवांत वेळ मला वाया नाही दवडायची...

इतका मोकळा वेळ नाही मिळत मला सहसा..
तुही ठेव फोन खाली आणि दे मला "मी टाईम" माझा...

संसाराच्या धबडग्यात वेळेचं पार भरीत होउन जातं..
जुनी बिनी तर सोड कालची मी मला सापडणं अवघड होतं...

आज शहरात असूनही मला आठवतेय एकटी मी आणि
गावाकडची गच्ची..
वाटतंय या निवांतपणात ती जुनी मीच मला भेटेल जराशी...

थोडी जरी भेटली तरी एक खूप मोठा सांधा जुळेल..
ती मी च मला सापडले तर पुढचं सारं आयुष्य उजळेल...

मी काहीही न बोलता हळूच फोन ठेवून दिला माझा..
आणि ठेवल्यानंतर तीने न बोलताही ऐकू आलं थँक यू आणि एक अस्पष्ट उसासा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे…
सुरुवात छान आहे. तुमची मैत्रिण अगदी माझ्याच विचारांची… Happy
नंतर थोडं बोर झालं पण मग ह्या ओळी भावून गेल्या
>>>>लोकंही बोलतात, आता तू बराच बदललास..
आधी कसा शिष्ट होतास नी आता कसा मस्त झालास…<<<<

>>>नंतर थोडं बोर झालं<<<
@ vt220

खरं आहे.. लिखाण थोडं, खरं तर बरंच लांबलंच..
म्हणून तर "काहीच्या काही कविता" मधे टाकलंय.
आधीचा भागंच मला आधी सुचलेला आणि जास्त आवडलेला..
(तिथेच कुठे तरी थांबायचा प्रयत्न अजूनही खरं तर चालू आहे..)
पुढच्या गोष्टी कमी कडव्यात बसवायचा विचार केला पण मला तरी नाही बसवता आल्या.
प्रतिसादाबद्दल आभार..

लिखाण थोडं, खरं तर बरंच लांबलंच..>>> लांबलं पेक्षा जो विचार मांडला गेला आहे, तो आता सगळीकडेच सांगितला जातो. वय जसं वाढत जातं तसतशी अक्कल यायला लागते… मग आधी कधी भारी वाटलेल्या गोष्टी तितक्या भारी नाही वाटत. कदाचित अर्ली ३०ज मधे असणार्‍या कुणाला हे खुप आवडून जाइल…

सुंदर लिहिलीये पण निरुदा याआधीची कविता वेगळी होती का?? असेल तर तीसुद्धा टाका.. आवडेल वाचायला.. Happy

मन्या ऽ .....प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

>>>याआधीची कविता वेगळी होती का?? असेल तर तीसुद्धा टाका.. आवडेल वाचायला.. <<<

अगं ती खूप लांबलचक होती.
आणि थोडीशी प्रचारकी म्हण किंवा उपदेशात्मक किंवा असंच काहीतरी..
म्हणून बदलली...

प्रचारकी म्हण किंवा उपदेशात्मक म्हण किंवा असच काहितरी.. म्हणून बदलली.. >>अर्रर एवढं सगळं होतं का?वाचायला उशिर झाला..
ही कविता पण छान आहे.. पु.का.प्र! Happy

आवडली.
_______________________
एकटेपण मला सैरभैर तर करतच पण अतोनात बेशिस्तही. अज्जिबात नको!!! पण ज्यां नी ते पोटभर अनुभवलेले नाही किंवा जे थोडे अलिप्त स्वभावाचे असतात त्यांचे विचार मी समजू शकते.

Swati Karwe, mrunali.samad, धनुडी प्रतिसादाबद्दल आभार..

धनुडी, खरं तर लयबद्ध लेखनही म्हणू शकता...
म्हणून तर मुक्तछंद मधे टाकली. Wink

संसाराच्या धबडग्यात वेळेचं पार भरीत होउन जातं..
जुनी बिनी तर सोड कालची मी मला सापडणं अवघड होतं...>>> अगदी खरं लिहिलयं..
छान रचना...