युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३१

Submitted by मी मधुरा on 15 August, 2019 - 10:08

आकाश महालात सुर्यमहाराजांचे गमन-आगमन होत राहिले. ना दुर्योधन बदलला, ना भीम आणि दुर्योधनाचे वैर. होणाऱ्या भांडणात मध्ये पडून न्यायाचे अमृत ओतत दोघांना शांत करण्याचे काम नित्यनियमाने करणारा युधिष्ठिरही बदलला नाही, आणि काहीही झालं की भीष्माचार्यांच्या कुशीत शिरणारा अर्जुनही नाही.....

ते ना महालात बदलले ना गुरुकुलात!

आचार्य द्रोणांचा अश्वत्थामाप्रती असलेला स्नेह पराकोटीचा होता. अश्वत्थामाच्या कपाळावरचा मधोमध असलेला पांढरा शुभ्र हिऱ्याचा खडा पाहून तो शिवशंकरांचा तिसरा नेत्र असल्याचा भास होत असे. सगळेच त्याचा आदर करायचे. शेवटी गुरुपुत्र होता तो. दुर्योधनाचा घनिष्ट मित्र बनल्यापासून ते दोघे सतत सोबत असायचे.

"बाणाची दिशा आणि धनुष्याची पकड, प्रत्यंचेवरचा ताण योग्य हवा. बाणाची गती ही प्रत्यंचेवरचा ताण ठरवतो. बाणाची दिशा तुमचं लक्ष ठरवते आणि धनुष्याची पकड तुमचा आत्मविश्वास दर्शवते. आज आपण धनुर्विद्येचा सराव करणार आहोत."

"गुरुदेव, आपले लक्ष काय आहे आज?"

"आपले लक्ष त्या पक्षाचा डोळा आहे." द्रोणाचार्य म्हणाले तसे सगळे त्यांनी बोटाने दाखवलेल्या झाडाच्या फांदीवरील लाकडी पक्षाकडे बघू लागले.

"हे कसं जमेल आपल्याला?" "कसं शक्य आहे..." मागे कुजबुज सुरु झाली.

"दुर्योधन, मला सांग, तुला काय दिसते?"

"झाड, पान, फुलं, लाकडी पक्षी, त्याच्या मागचा खरा पक्षी."
"युधिष्ठिर, तू सांग, काय दिसते आहे."

"लाकडी पक्षी....आणि फांदी आणि झाड... आणि गुरुदेव मागचा पक्षी आत्ताच उडला." आपलं काहीतरी सुटत तर नाही ना ते बघत त्याने पुढे सांगितले, "गुरुदेव, आत्ताच सुर्यदेवांना ढगाने झाकलेले आहे."
आपण किती योग्य आणि खरं उत्तर दिलं म्हणून युधिष्ठिराला शांत आणि समाधानी वाटत होतं.
"धन्य आहेस. भीम तुला काय दिसते?"
"गुरुदेव, मला भविष्यातली फळे दिसत आहेत."
"काय?"
"ती बघा गुरुदेव, ती झाडांवरची फुले. डाळिंबाची आहेत. काही वेळात त्याच मस्त डाळींब बनेल." त्याने पोटावर हात फिरवत म्हटले.
"भीम, आपण इथे भोजनाकरता आलेलो नाही."
"क्षमा असावी गुरुदेव."
"अर्जुन, तुला काय दिसते आहे?"
"फक्त डोळा दिसतो आहे गुरुदेव...."
द्रोणाचार्य मनातून आनंदित झाले.
"बाण संधान कर."
अर्जुनाने धनुष्य उचलले, विशिष्ट अंशात पकड घट्ट केली. बाणाच्या एका बाजूला अंगठा तर तर्जनी- मध्यमा दुसऱ्या बाजूला धरून बाण प्रत्यंचेवर नेमत ताणला. ताण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आल्यावर बाणावरचा सगळा ताण एकदम काढून घेतला. साप्प्प....
सर्वजण बघत राहिले. पक्षाच्या बुबुळाला छेदून बाण आरपार घुसला होता. द्रोणाचार्यांनी आनंदाने मान डोलावली.
"धनुर्विद्येत निपुण झाला आहेस तू, अर्जुन. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी. आयुष्यमान भवं!"
भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांनी दिलेले वचन आज त्यांच्या शिष्याने पूर्ण केले होते. अर्जुनला सर्वोत्तम धनुर्धारी बनवण्यात यशस्वी झालेले द्रोणाचार्य ही वार्ता भीष्माचार्यांना ऐकवायला आतूर झाले होते.
वनातून ते निघणार तितक्यात एक कुत्रा दिसला. द्रोणाचार्य बघतच राहिले. त्याचे तोंड बाणांनी भरलेले होते. आणि आश्चर्य म्हणजे.....ना त्याला कुठे जखम झाली होती आणि ना रक्त आलेले दिसत होते. ते ती अद्वितीय कला स्तब्धपणे बघत उभे राहिले.
'या वनात असा कोण आहे जो इतक्या कुशलतेने बाण चालवू शकतो?' त्यांनी इकडे तिकडे नजर टाकली. दूर कुठेतरी कोणीतरी असल्याचा भास झाला. द्रोणाचार्य तिथे गेले. समोर एक त्यांच्या शिष्याच्या वयाचा तरूण उभा होता.
"प्रणाम" त्याने द्रोणाचार्यांना पाहताच पुढे येऊन नमस्कार केला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दाटून आला होता.
"तू कोण आहेस?"
"एकलव्य!"
त्यांना काहीतरी आठवलं...'आपला शिष्य बनण्याची इच्छा घेऊन आलेला लहान वयातला हिरण्यधनूचा पुत्र! शृंगबेर राज्यातला.... आज इतका कुशल धनुर्धारी झाला?'
"तू.... तोच ना?"
"हो."
"त्या श्वानाच्या मुखात बाण तूच मारलेस?"
"हो, माझ्या साधनेमध्ये व्यत्यय येत होता त्याच्या भुंकण्यामुळे."
"अतिसुंदर! कोण आहेत तुझे गुरु? मला त्यांची भेट घ्यायला आवडेल."
"हे बघा गुरुदेव...." त्याने पुर्वेच्या दिशेने बोट दाखवले. तिथे एक पुतळा होता. तंतोतंत द्रोणाचार्यांसारखा दिसणारा.
"हा तर माझ्या सारखा दिसणारा पुतळा आहे."
"कारण तुम्हीच आहात माझे गुरु."
"काय? पण मी तर तुला शिकवले नाही काहीच. आणि मला आठवतयं, मी तुला नकार दिला होता...."
"हे सांगून की तुम्ही केवळ कौरवांना शिक्षा देण्यास बांधिल आहात आणि मी कौरव नाही." शांत चेहऱ्याने वाक्यपूर्ण करत तो म्हणाला. "आठवते आहे, गुरुदेव."
"मग इथे माझा पुतळा कसा?"
"गुरुदेव, तुम्ही मला शिष्य मानले नाहीत पण माझ्यासाठी तुम्हीच माझे गुरु आहात. या तुमच्या पुतळ्याकडे बघत तुमची प्रेरणा घेऊन मी लक्ष भेद करायला शिकलो गुरुदेव. "
"तू बनवलास हा पुतळा?"
त्याने होकारार्थी मान हालवली.
लांब राहून धनुर्विद्येत पटाईत झालेल्या, न शिकवताही आपल्याला गुरु मानणाऱ्या शिष्याकडे द्रोणाचार्य कौतूकाने बघत होते. एकाएकी त्यांच्या डोळ्यात चिंता उतरली हस्तिनापुरची.... उद्या याने हस्तिनापुर विरूध्द हत्यार उचलले म्हणजे? त्यांच्या कानात घोळू लागला भीष्माचार्यांना दिलेला शब्द.....! 'अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनेल.'
....आणि काही क्षणात चेहऱ्यावरचे भाव बदलले.
"पण तू हे सगळे केलेस ते गुरुंची आज्ञा आणि अनुमती न घेता?"
"क्षमा असावी गुरुदेव. पण एकदा तुम्हाला गुरु मानल्यावर दुसऱ्या कुणाला गुरु बनवणे पाप होते माझ्यासाठी."
"तू मला खरचं गुरु मानतोस?"
"हो, गुरुदेव." तो हात जोडून उभा होता.
"मग गुरूदक्षिणा देणार नाहीस?"
"का नाही गुरुदेव? सांगा, काय देऊ शकतो हा एकलव्य त्याच्या गुरुंना ज्याने गुरु प्रसन्न होतील?"
त्याचा नम्रपणा, लाघवी बोलणं..... एकीकडे शब्द आणि एकीकडे एकलव्य! शब्दांचं पारडं नेहमीच जड का होते अश्यावेळी? त्यांनी मन कठोर केले.
"उजव्या हाताचा अंगठा."
"जशी आपली आज्ञा...." त्याने नमस्कार केला. कंबरपट्याला बांधलेला सुरा काढला. डाव्या हातात धरला. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या बुंध्यावर सरर् कन फिरवला. 'आह्ह..' ऱक्ताचा फवारा उडला. रक्ताळलेला अंगठा द्रोणाचार्यांसमोर धरत म्हणाला, "गुरुदेव, आपली गुरुदक्षिणा!"
द्रोणाचार्यांच्या डोळ्यांत पाणी उभे होते. मनात कोलाहल माजला होता...... 'हे काय केलं आपण! आपल्या शब्दाची किंमत एकलव्य सारख्या सर्वोत्तम धनुर्धाऱ्याला चूकवावी लागते? ते ही अशी? हे काय केलेस द्रोण? कश्याकरता? अर्जुनाकरता? आपली परवानगी न घेता एकलव्य आपल्याला गुरु मानून शिकला म्हणून ही शिक्षा? त्याच्या विद्येचा वापर त्याला लिलया करता येऊच नये म्हणून ही दक्षिणा मागितलीस? की.....आपणही हस्तिनापुरचे दास झालेलो आहोत.....भीष्माचार्यांसारखे? ज्याला हस्तिनापुर, स्वतःचा शब्द आणि कौरव इतकेच दिसतात. बाकी सारे कवडीमोल. मग हा एकलव्य असो, अथवा त्याची आपल्यावरची श्रद्धा. ज्याला खरतर आपण काहीच शिकवले नाही, त्याने एकही प्रश्न न विचारता अशी भयंकर गुरुदक्षिणा द्यावी? चेहऱ्यावर एकदाही रागाचा लवलेश नाही.... गुरुबद्दलच्या विश्वासात तसूभरही फरक नाही..... असेही शिष्य मिळू शकतात? इतकाही भाग्यवान कुणी गुरु असू शकतो? .... आणि इतका दुर्दैवी कुणी शिष्य असू शकतो? तू सर्वोत्तम धनुर्धारी होतास, एकलव्य. आणि आता सर्वोत्तम शिष्य आहेस. अभिनंदन तरी कसे करू मी तुझे??? कारण सर्वोत्तम असण्याचा मान तू इथेही पटकवलास माझ्या सर्व शिष्यांना हरवून!'
त्यांच्या तोंडून नकळत बाहेर पडले, "किर्तीमान भवं, पुत्र! किर्तीमान भवं!!"
एकलव्याच्या हातातून होणाऱ्या रक्तस्त्रावाकडे त्यांचे लक्ष गेले. तो अजूनही हातात कापलेला अंगठा घेऊन उभा होता..... नम्रपणे, मान खाली घालून आणि गुरुंची भेट घडली हे समाधान घेऊन!

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिमन्यूवर गर्भ संस्कार झाले.
कर्ण खोटे बोलून गुरुंकडून शिकला.
एकलव्य स्वतः प्रयत्न करून शिकला.

हस्तिनापुराच्या मित्र देशांपैकी एका देशातून एकलव्य विद्या ग्रहण करण्याच्या हेतूने आला. तो आला आणि विद्या अवगत न करता जायचे नाही, असे ठरवले. म्हणून तिथेच वनात राहीला. स्व:गृही नुसतेच परत जायचे म्हणून!

बाकी तुमचे तर्क आणि विचारधारा वेगळी आहे. मला नाही वाटत यावर आपले कधी एकमत होईल.

एकलव्य महाभारत का एक पात्र है। वह हिरण्य धनु नामक निषाद के पुत्र थे।[1] एकलव्य को अप्रतिम लगन के साथ स्वयं सीखी गई धनुर्विद्या और गुरुभक्ति के लिए जाना जाता है। पिता की मृत्यु के बाद वह श्रृंगबेर राज्य के शासक बने। अमात्य परिषद की मंत्रणा से उनहोने न केवल अपने राज्य का संचालन किया , बल्कि निषादों की एक सशक्त सेना गठित कर के अपने राज्य की सीमाओँ का विस्तार किया।

महाभारत में वर्णित कथा के अनुसार एकलव्य धनुर्विद्या सीखने के उद्देश्य से द्रोणाचार्य के आश्रम में आया किन्तु निषादपुत्र होने के कारण द्रोणाचार्य ने उसे अपना शिष्य बनाना स्वीकार नहीं किया। निराश हो कर एकलव्य वन में चला गया। उसने द्रोणाचार्य की एक मूर्ति बनाई और उस मूर्ति को गुरु मान कर धनुर्विद्या का अभ्यास करने लगा। एकाग्रचित्त से साधना करते हुये अल्पकाल में ही वह धनु्र्विद्या में अत्यन्त निपुण हो गया। एक दिन पाण्डव तथा कौरव राजकुमार गुरु द्रोण के साथ आखेट के लिये उसी वन में गये जहाँ पर एकलव्य आश्रम बना कर धनुर्विद्या का अभ्यास कर रहा था। राजकुमारों का कुत्ता भटक कर एकलव्य के आश्रम में जा पहुँचा। एकलव्य को देख कर वह भौंकने लगा। कुत्ते के भौंकने से एकलव्य की साधना में बाधा पड़ रही थी अतः उसने अपने बाणों से कुत्ते का मुँह बंद कर दिया। एकलव्य ने इस कौशल से बाण चलाये थे कि कुत्ते को किसी प्रकार की चोट नहीं लगी। कुत्ते के लौटने पर कौरव, पांडव तथा स्वयं द्रोणाचार्य यह धनुर्कौशल देखकर दंग रह गए और बाण चलाने वाले की खोज करते हुए एकलव्य के पास पहुँचे। उन्हें यह जानकर और भी आश्चर्य हुआ कि द्रोणाचार्य को मानस गुरु मानकर एकलव्य ने स्वयं ही अभ्यास से यह विद्या प्राप्त की है।[2]

कथा के अनुसार एकलव्य ने गुरुदक्षिणा के रूप में अपना अँगूठा काटकर द्रोणाचार्य को दे दिया था। इसका एक सांकेतिक अर्थ यह भी हो सकता है कि एकलव्य को अतिमेधावी जानकर द्रोणाचार्य ने उसे बिना अँगूठे के धनुष चलाने की विशेष विद्या का दान दिया हो। कहते हैं कि अंगूठा कट जाने के बाद एकलव्य ने तर्जनी और मध्यमा अंगुली का प्रयोग कर तीर चलाने लगा। यहीं से तीरंदाजी करने के आधुनिक तरीके का जन्म हुआ। निःसन्देह यह बेहतर तरीका है और आजकल तीरंदाजी इसी तरह से होती है। वर्तमान काल में कोई भी व्यक्ति उस तरह से तीरंदाजी नहीं करता जैसा कि अर्जुन करता था।[3]
>> विकीवर हे सापडले.

एक सांकेतिक अर्थ यह भी हो सकता है कि एकलव्य को अतिमेधावी जानकर द्रोणाचार्य ने उसे बिना अँगूठे के धनुष चलाने की विशेष विद्या का दान दिया हो।
>>> हे पटलं मला.

अभिमन्यूवर गर्भ संस्कार झाले. >> ओके. म्हणजे गर्भसंस्कारातून विद्या शिकता येणे शक्य होते पण चोरून शिकता येणे शक्य नव्ह्ते असे तुम्ही म्हणता आहात तर Happy तेच पुन्हा चमत्कारांप्रति आकर्षण.
अभिमन्यू स्वतः प्रयत्न करून शिकला. >>>एकलव्य म्हणायचं आहे का? चला पुतळा ते स्वअध्यापन (असा काही शब्द असेल मला वाटत नाही पण असल्यास संधीनुसार हे स्वाध्यापन व्हायला हवे ) ते स्वतः प्रयत्न - असे म्हणण्यापर्यंत लॉजिकच्या दिशेने प्रगती झाली म्हणायची.
Happy मग द्रोणांना गुरू म्हणण्याचा आणि गुरूदक्षिणा देण्याचा संबंध कुठे येतो? महाभारतात असे "स्वअध्यापन" करून शिकल्याची काही अजून ऊदाहरणे आहेत का? जे अर्जून किंवा कर्ण हे देवांचे अवतार स्वअध्यापन करून शिकू शकत नव्हते ते एकलव्य कसे शिकला असेल? असा विचार करून पहाता एकदा?

हस्तिनापुराच्या मित्र देशांपैकी एका देशातून एकलव्य विद्या ग्रहण करण्याच्या हेतूने आला. तो आला आणि विद्या अवगत न करता जायचे नाही, असे ठरवले. म्हणून तिथेच वनात राहीला. स्व:गृही नुसतेच परत जायचे म्हणून! >> हे आता घटनापश्चात सुचलेलं लॉजिकल विवेचन आहे असं वाटतंय Happy हेच लॉजिक थोडं पुढे वाढवून 'वना राहून त्याने चोरून विद्या शिकली आणि त्याची शिक्षा म्हणून अंगठा गमावला' असे केले की चमत्कारांच्या परे एक मानवी कथा वाचल्याचे समाधान तुम्हाला मिळेल . प्रयत्न करून बघा.

हायझेनबर्ग Lol
तुम्हाला मानवी कथा कथा वाचण्यात रुची आहे. पण यात मानवी जास्त काही नाहीये. कृष्णाच्या, देव देवतांच्या चमत्कारांनी भरलेली आहे कथा.
तुम्ही 'राधेय' वाचा.
नक्की आवडेल तुम्हाला.

अहो मी स्वअध्यापनातून महाभारतासहित सगळ्या पौराणिक भाकडकथा आधीच आत्मसात केल्या आहेत. त्यामुळे काही वाचण्याबिचण्याची गरजच ऊरली नाही.
माझी प्रार्थमिक शाळेत शिकणारी भाचे कंपनी सुद्धा चार प्रश्न विचारते अशा बालिश चमत्कारांनी भरलेल्या भाकडकथा त्यांना सांगितल्या की. मग त्यांना सुद्धा चमत्कारांच्या परे लॉजिकल विवेचन सांगावे लागते.

मग त्यांना सांगायला कथा आणि उत्तरे हवीत म्हणून तुम्ही माझ्यावर तुमचे विचार आणि मते थोपवता आहात?

जर सगळंच वाचले आहे तर स्वतः लिहा ना तर्क लावत 'लॉजिकल' महाभारत!

तुमच्या भाचे कंपनीला स्पायडर मॅन वगैरे दाखवू नका. कारण त्यात तर काहीच लॉजिकल नाही. उगाच उत्तरे देता देता नाकीनऊ येईल.

नाही हो! थोपवत वगैरे काय? Sad मी आपलं प्रांजळपणे सुचवत होतो. Proud
जर सगळंच वाचले आहे तर स्वतः लिहा ना तर्क लावत 'लॉजिकल' महाभारत! >> खरं तर लिहायला हरकत नाही बरं का, पण काये ना, एकतर ती भाषा जाम आपल्याला जमत नाही आणि साधे प्रतिसादात लिहिलेले लोकांच्या पचनी पडत नाही तर संपूर्ण महाभारत लिहायची ऊठाठेव कोण करणार. पण तुम्ही लिहित रहा.

तुमच्या भाचे कंपनीला स्पायडर मॅन वगैरे दाखवू नका. कारण त्यात तर काहीच लॉजिकल नाही. उगाच उत्तरे देता देता नाकीनऊ येईल.>> अहो त्याचे लॉजिक तेच आपल्याला समजावतात. ते त्यांनी त्यांच्या स्वअध्यापनाने मिळवलेले असते. आपण प्रश्न विचारले की 'तुला काही कळणार' म्हणतात. मग आपण काय बोलणार सांगा.

स्व अध्यापन आणि स्वाधापन यात फरक काय आहे? असो.

आणि कमाल आहे.... त्यांना स्पायडर मॅन कळतो. महाभारत नाही. हे अपयश आहे खरंतरं आपल्या संस्कृतीच. superman, spiderman दाखवून त्यांना चमत्कारांवर विश्वास ठेवायला शिकवले जाते. पण जर तिथे आपल्या भूमीतील खऱ्या कथा असतील तर ते मान्य करायला त्यांना पुरावे आणि कारणे मागावी वाटतात??? Sad

आणि कमाल आहे.... त्यांना स्पायडर मॅन कळतो. महाभारत नाही. हे अपयश आहे खरंतरं आपल्या संस्कृतीच. superman, spiderman दाखवून त्यांना चमत्कारांवर विश्वास ठेवायला शिकवले जाते. पण जर तिथे आपल्या भूमीतील खऱ्या कथा असतील तर ते मान्य करायला त्यांना पुरावे आणि कारणे मागावी वाटतात??? Sad >> हो कारण ते सुपरमॅन आणि स्पायडरमॅन फक्त सिनेमा म्हणूनच बघतात. तुम्ही का फिक्षनल सिनेमा आणि (तुमच्या भुमीतले खरे) महाभारत ह्यांची तुलना करत आहात?
तुम्ही म्हणता आहात ह्या आमच्या भुमीतील खर्‍या माणसांच्या खर्‍या कथा आहेत... खर्‍या आहेत म्हंटलं तर मग तुम्हाला मानवी आकलनशक्तीच्या अनुसार पुरावे द्यावे लागतील ना ताई.

तेच तर म्हणते आहे मी. त्यांना काल्पनिक लॉजिक नसणाऱ्या व्यक्तिरेखा, कथा कळतात. मग देवांचे अवतार कळणे सोप्पे नाही का?

पुरावे द्यायला त्या काळी कॅमेरे नव्हते आणि ना आता कुठली वास्तू आपल्या आधुनिक लोकांनी शिल्लक ठेवलेली आहे. जे आहेत ते लेखी पुरावे आहेत महाभारताचे. ते सत्य मानलेत तरच मग त्यावर लिहिता आणि बोलता येईल.

तुम्ही का फिक्षनल सिनेमा आणि (तुमच्या भुमीतले खरे) महाभारत ह्यांची तुलना करत आहात?>>>>> मी तुलना समजून घेण्याच्या क्षमतेसाठी केली.

फिक्षनल समजते आणि महाभारत नाही?
तितक्याच आवडीने तुम्ही त्यांच्यासोबत महाभारत बघायला बसा जितक्या आवडीने विदेशी फिक्षनल बघायला जाता.

तेच तर म्हणते आहे मी. त्यांना काल्पनिक लॉजिक नसणाऱ्या व्यक्तिरेखा, कथा कळतात. मग देवांचे अवतार कळणे सोप्पे नाही का? >> आँ Uhoh सुपरहीरो कथांमध्ये लॉजिक नसते आणि देवांचे अवतार लॉजिकल Rofl विरोध करण्याच्या नादात तुम्ही काय लिहिले ते बहुधा तुम्हाला कळले नसावे. सुपरहीरो सिनेमातल्या लॉजिकबद्दल अज्ञातवासींना विचारा पाहू. ते अतिशय तज्ञ आहेत ह्या विषयातले.

फिक्षनल समजते आणि महाभारत नाही? >> तुम्हाला टॉम अँड जेरी, स्पायडरमॅन कार्टून कळत होते त्या वयात महाभारत सुद्धा कळत होते का?

तितक्याच आवडीने तुम्ही त्यांच्यासोबत महाभारत बघायला बसा जितक्या आवडीने विदेशी फिक्षनल बघायला जाता. >> हो त्यांच्याबरोबर महाभारत कार्टून सिरिज वगैरे ते बघतो आणि कार्टून म्हणूनच बघतो. जसे टॉम अँड जेरी खोटे, स्पायडर्मॅन खोटे तसे कार्टून महाभारतही खोटे हे सुद्धा त्यांना कळते. हे सगळे खरे आहे असे म्हंटले की त्यांना त्याचे पुरावे द्यावे लागतात.
लहान मोठ्या कोणालाही हे अमूक तमूक खरे आहे म्हंटल्यावर पुरावे द्यावे लागतात नाही तर आधी म्हंटले तसे चमत्कार भर्‍या मालिका भक्तीभावाने बघणे आणि लहान मुलांनी मन लाऊन कार्टून बघणे ह्यात फार काही फरक नाही. चमत्काराच्या नावखाली काहीही लिहिता दाखवता येते.

हायझेनबर्ग, तुम्ही देव मानत नाही असे स्पष्टपणे दिसते आहे. मग मला नाही वाटतं आपण यावर चर्चा/वादविवाद करू शकतो. पुरावे तर कशाचेही पुरेसे पडत नाहीत विश्वास नसेल तर.

माझ्या कथेत मला समजलेले महाभारत तुम्हाला वाचायला मिळेल. पुर्वग्रह न धरता वाचावे, अशी विनंती आहे.

मी देव मानत नाही असा निष्कर्ष कसा काढला बुवा तुम्ही? देवाचे अस्तित्व फक्त चमत्काराने सिद्ध होते का? कोणी चमत्कार मानत नाही म्हणजे देवच मानत नाही असे थोडीच आहे. चमत्कारावरूनच एखाद्याला देवत्व द्यायचे असेल तर मग डॉक्टरांऐवजी जादूगारांना देव म्हंटले पाहिजे, ते नाही का एखाद्या सुंदर मुलीचे शरीर अर्धे कापून पुन्हा जुळवतात जसे जरासंधाचे जुळवले होते तसे. बिचार्‍या डॉक्टरांनी असे काही केले की त्याला मात्र विज्ञान म्हणतात.
पुरावे तर कशाचेही पुरेसे पडत नाहीत विश्वास नसेल तर. >> आधी देऊन तर बघा.

माझ्या कथेत मला समजलेले महाभारत तुम्हाला वाचायला मिळेल. > 'हा देवाचा चमत्कार आहे' असं एकदा म्हंटलं तर त्यात समजण्यासारखं काय ऊरतं ?

वाह. हाब इस ब्याक.
चांगली चर्चा चालूय. मधुरा आणि हाब तुमचे प्रतिसाद आवडले.

आधी देऊन तर बघा.>>>>व्यासांनी लिहिलेले महाभारत हा पुरावा आहे.
पाण्यात गेलेल्या द्वारकेचे अवशेष पुरावे आहेत.
आजही भारताबाहेर सुद्धा खोदकामात सापडणारी मंदिरे, मूर्ती पुरावे आहेत. पांडव लेणी पुरावे आहेत.

चमत्कार उगाचच करत का फिरेल देव?

'हा देवाचा चमत्कार आहे' असं एकदा म्हंटलं तर त्यात समजण्यासारखं काय ऊरतं ?>>>>>केलेल्या चमत्कारांची गरज समजून घेण्यासारखी असते.
जर मी म्हणाले की मोदी देव आहेत कारण त्यांनी चांगली कार्ये केलेली आहेत तर तुम्ही मान्य करालं? म्हणालचं ना की सिद्ध करा. चमत्कार नाही तर नमस्कार नाही!!

व्यासांनी लिहिलेले महाभारत हा पुरावा आहे. >> महाभरातातील एक व्यक्तीरेखा व्यास आणि महाभारत त्यांनीच लिहिले हा कसा पुरावा मानायचा?
बच्चन खरा आहे म्हणून त्याने अभिनित केलेला शोले खरच घडून गेला की काय?

पाण्यात गेलेल्या द्वारकेचे अवशेष पुरावे आहेत. >> समुद्राखाली काही सपडले होती म्हणून ती द्वारकाच होती मग ती द्वारका आहे समजले म्हणजे कृष्णपण असेलच मग कृष्ण होता म्हणजे मथुरा आली मग त्याची करंगळी पण असेलच पण करंगळी आहे म्हणजे त्याने त्यावर गोवर्धन पर्वत पण ऊचलला असेलच. हे असे पुरावे का?
आजही भारताबाहेर सुद्धा खोदकामात सापडणारी मंदिरे, मूर्ती पुरावे आहेत. पांडव लेणी पुरावे आहेत. >>अहो हे मानवनिर्मित गोष्टींचे पुरावे आहेत ह्याचा त्या काळातली माणसे देव असण्याशी आणि त्यांनी भलसलते चिमित्कार केले असल्याचे छातीठोकपणे सांगण्यासाठी काही तरी लिंक आहे का?

केलेल्या चमत्कारांची गरज समजून घेण्यासारखी असते. >> म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी का? मग सांगा पाहू चमत्कारानेच मुलं होणार होती तर शंभर कौरवांसमोर पाचच पांडव का? "अजून तेहतीस कोटी वजा सहा" देव होते की आवाहन करण्यासाठी.

जर मी म्हणाले की मोदी देव आहेत कारण त्यांनी चांगली कार्ये केलेली आहेत तर तुम्ही मान्य करालं? >> देवच का म्हणायचे, माणसे अद्वितीय कामे करू शकत नाहीत की काय? चंद्रावर गेली, क्लोनिंग झाले, विमाने झाली, अणूस्फोट झाले हे चमत्कारांपेक्षा कमी आहे की काय?
देवत्व बहाल करण्याचे एवढे कंपल्शन का वाटते तुम्हाला? ह्या पात्राकंडे माणसे म्हणून बघता येते आणि त्यांची कार्येही माणसांच्या लॉजिकमध्ये बसवता येतात की.

देवत्व बहाल करण्याचे एवढे कंपल्शन का वाटते तुम्हाला? ह्या पात्राकंडे माणसे म्हणून बघता येते आणि त्यांची कार्येही माणसांच्या लॉजिकमध्ये बसवता येतात की. +११११११११

म्हणूनच म्हणले होते मी.

पुरावे त्याच्यासाठी असतात जो विश्वास ठेवतो. तुम्ही महाभारतावरच विश्वास ठेवत नाही की ते खरे घडले होते. इथंपासून सुरुवात आहे. मग आता जर ते असत्य असेल तर त्यातल्या व्यक्तिरेखा आणि प्रसंग तुम्ही फिक्षन म्हणून पहा. आणि सोडून द्या.
मग निदान फिक्षन म्हणून का होईना त्यात तुम्हाला आणि तुमच्या बच्चेकंपनीला 'लॉजिक' गवसेल.

पुरावे त्याच्यासाठी असतात जो विश्वास ठेवतो.>> एकदा का डोळे झाकून विश्वास ठेवला असल्यास पुरावे कशाला बघावे लागतील. विश्वास ठेवायचा असल्यास तो ताकद, कर्तुत्व, प्रेम, ज्ञान, मैत्री अशा गोष्टींवर ठेवतात पुराणातील भाकड कथांवर नाही. Happy

तुम्ही महाभारतावरच विश्वास ठेवत नाही की ते खरे घडले होते. >> ते घडले किंवा नाही घडले त्याने तुमच्या माझ्या आयुष्यात आज काही फरक पडतो का? एखाद्याला Spuritualy पडत असेल पण तसा व्यक्ती चमत्कारांपासून चार हात लांब राहतो. ते काय बुद्धाचा ज्ञानबोध, पानिपतचे युद्ध, प्रतापगड वरची हातघाई, 1857 चा उठाव, अशी इतिहासाची पाने आहेत का खरे खोटे करायला. चांदोबामधल्या सारख्या गोष्टी आहेत त्या. गीतेतील शिकवण समजण्यासाठी रचलेल्या. त्यातले सार तर निघून गेले फक्त चमत्कार उरले.

आज इथंपासून सुरुवात आहे. मग आता जर ते असत्य असेल तर त्यातल्या व्यक्तिरेखा आणि प्रसंग तुम्ही फिक्षन म्हणून पहा. >> म्हणजे ही एक चमत्काराने भरलेली काल्पनिक कथा आहे असे तुम्ही मानता तर. बघा पटले ना शेवटी तुम्हाला पण. Happy
आणि सोडून द्या. >> अरेरे मग अशाने चर्चा कशी होणार? Sad

हे म्हणजे एकट्यानेच पळून स्वतःला बेस्ट रनर अवॉर्ड देण्या सारखं आहे तुमचं.

महाभारत ही सत्य कथा आहे. दैवी चमत्कारांनी भरलेली.

चर्चा महाभारतावर करायची आहे. ते असत्य आहे असं मानणाऱ्या व्यक्ती सोबत चर्चा करून काय फायदा?

आणि करोडो हिंदू जे कृष्णाला देव मानतात त्यांना तुम्ही खोटं ठरवायला निघालेले आहात तुम्ही?

हेच..... सेक्युलरिझम!!

बाकीच्या धर्मातील कथांमध्येही कैक चमत्कार आहेत. त्यावर लिहिण्याची हिंमत दाखवा! बघू ते ऐकून घेतात का ते!

मधुरा, मोठे भाग टाकत जा ना कमीत कमी आताचे 3 भाग मिळून एक असा.. इथे comment करण्यापेक्षा..
तुम्ही छान लिहीत आहात

सुपरहीरो सिनेमातल्या लॉजिकबद्दल अज्ञातवासींना विचारा पाहू. ते अतिशय तज्ञ आहेत ह्या विषयातले.>>>>
स्वागतच आहे... Happy
फक्त डॉ. स्ट्रेंजच्या चमत्कारामागील लॉजिक/विज्ञान हाब यांनी शोधून द्यावं ही नम्र विनंती.

अवांतर: हॉलिवूडप्रेमींसाठी!!!!

https://www.mallstuffs.com/Blogs/BlogDetails.aspx?BlogId=286&BlogType=Sp...

मधुरा, हे प्रतिसाद टायपण्यापेक्षा पुढचा भाग मोठ लिहिता आला तर बघा. Happy
तुम्ही चांगलं लिहिताय. बरेच लोक वाचताहेत.

हायझेनबर्ग

तुम्ही God is one असे मानता .

अणि आम्ही बऱ्याच देवांना मानतो

for Ex -: राम ,कृष्ण ,श्री गुरुदेव दत्त , श्री स्वामी समर्थ 'साईबाबा ,etc

हा फरक आहे आपल्यामध्ये .

Pages