युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३१

Submitted by मी मधुरा on 15 August, 2019 - 10:08

आकाश महालात सुर्यमहाराजांचे गमन-आगमन होत राहिले. ना दुर्योधन बदलला, ना भीम आणि दुर्योधनाचे वैर. होणाऱ्या भांडणात मध्ये पडून न्यायाचे अमृत ओतत दोघांना शांत करण्याचे काम नित्यनियमाने करणारा युधिष्ठिरही बदलला नाही, आणि काहीही झालं की भीष्माचार्यांच्या कुशीत शिरणारा अर्जुनही नाही.....

ते ना महालात बदलले ना गुरुकुलात!

आचार्य द्रोणांचा अश्वत्थामाप्रती असलेला स्नेह पराकोटीचा होता. अश्वत्थामाच्या कपाळावरचा मधोमध असलेला पांढरा शुभ्र हिऱ्याचा खडा पाहून तो शिवशंकरांचा तिसरा नेत्र असल्याचा भास होत असे. सगळेच त्याचा आदर करायचे. शेवटी गुरुपुत्र होता तो. दुर्योधनाचा घनिष्ट मित्र बनल्यापासून ते दोघे सतत सोबत असायचे.

"बाणाची दिशा आणि धनुष्याची पकड, प्रत्यंचेवरचा ताण योग्य हवा. बाणाची गती ही प्रत्यंचेवरचा ताण ठरवतो. बाणाची दिशा तुमचं लक्ष ठरवते आणि धनुष्याची पकड तुमचा आत्मविश्वास दर्शवते. आज आपण धनुर्विद्येचा सराव करणार आहोत."

"गुरुदेव, आपले लक्ष काय आहे आज?"

"आपले लक्ष त्या पक्षाचा डोळा आहे." द्रोणाचार्य म्हणाले तसे सगळे त्यांनी बोटाने दाखवलेल्या झाडाच्या फांदीवरील लाकडी पक्षाकडे बघू लागले.

"हे कसं जमेल आपल्याला?" "कसं शक्य आहे..." मागे कुजबुज सुरु झाली.

"दुर्योधन, मला सांग, तुला काय दिसते?"

"झाड, पान, फुलं, लाकडी पक्षी, त्याच्या मागचा खरा पक्षी."
"युधिष्ठिर, तू सांग, काय दिसते आहे."

"लाकडी पक्षी....आणि फांदी आणि झाड... आणि गुरुदेव मागचा पक्षी आत्ताच उडला." आपलं काहीतरी सुटत तर नाही ना ते बघत त्याने पुढे सांगितले, "गुरुदेव, आत्ताच सुर्यदेवांना ढगाने झाकलेले आहे."
आपण किती योग्य आणि खरं उत्तर दिलं म्हणून युधिष्ठिराला शांत आणि समाधानी वाटत होतं.
"धन्य आहेस. भीम तुला काय दिसते?"
"गुरुदेव, मला भविष्यातली फळे दिसत आहेत."
"काय?"
"ती बघा गुरुदेव, ती झाडांवरची फुले. डाळिंबाची आहेत. काही वेळात त्याच मस्त डाळींब बनेल." त्याने पोटावर हात फिरवत म्हटले.
"भीम, आपण इथे भोजनाकरता आलेलो नाही."
"क्षमा असावी गुरुदेव."
"अर्जुन, तुला काय दिसते आहे?"
"फक्त डोळा दिसतो आहे गुरुदेव...."
द्रोणाचार्य मनातून आनंदित झाले.
"बाण संधान कर."
अर्जुनाने धनुष्य उचलले, विशिष्ट अंशात पकड घट्ट केली. बाणाच्या एका बाजूला अंगठा तर तर्जनी- मध्यमा दुसऱ्या बाजूला धरून बाण प्रत्यंचेवर नेमत ताणला. ताण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आल्यावर बाणावरचा सगळा ताण एकदम काढून घेतला. साप्प्प....
सर्वजण बघत राहिले. पक्षाच्या बुबुळाला छेदून बाण आरपार घुसला होता. द्रोणाचार्यांनी आनंदाने मान डोलावली.
"धनुर्विद्येत निपुण झाला आहेस तू, अर्जुन. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी. आयुष्यमान भवं!"
भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांनी दिलेले वचन आज त्यांच्या शिष्याने पूर्ण केले होते. अर्जुनला सर्वोत्तम धनुर्धारी बनवण्यात यशस्वी झालेले द्रोणाचार्य ही वार्ता भीष्माचार्यांना ऐकवायला आतूर झाले होते.
वनातून ते निघणार तितक्यात एक कुत्रा दिसला. द्रोणाचार्य बघतच राहिले. त्याचे तोंड बाणांनी भरलेले होते. आणि आश्चर्य म्हणजे.....ना त्याला कुठे जखम झाली होती आणि ना रक्त आलेले दिसत होते. ते ती अद्वितीय कला स्तब्धपणे बघत उभे राहिले.
'या वनात असा कोण आहे जो इतक्या कुशलतेने बाण चालवू शकतो?' त्यांनी इकडे तिकडे नजर टाकली. दूर कुठेतरी कोणीतरी असल्याचा भास झाला. द्रोणाचार्य तिथे गेले. समोर एक त्यांच्या शिष्याच्या वयाचा तरूण उभा होता.
"प्रणाम" त्याने द्रोणाचार्यांना पाहताच पुढे येऊन नमस्कार केला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दाटून आला होता.
"तू कोण आहेस?"
"एकलव्य!"
त्यांना काहीतरी आठवलं...'आपला शिष्य बनण्याची इच्छा घेऊन आलेला लहान वयातला हिरण्यधनूचा पुत्र! शृंगबेर राज्यातला.... आज इतका कुशल धनुर्धारी झाला?'
"तू.... तोच ना?"
"हो."
"त्या श्वानाच्या मुखात बाण तूच मारलेस?"
"हो, माझ्या साधनेमध्ये व्यत्यय येत होता त्याच्या भुंकण्यामुळे."
"अतिसुंदर! कोण आहेत तुझे गुरु? मला त्यांची भेट घ्यायला आवडेल."
"हे बघा गुरुदेव...." त्याने पुर्वेच्या दिशेने बोट दाखवले. तिथे एक पुतळा होता. तंतोतंत द्रोणाचार्यांसारखा दिसणारा.
"हा तर माझ्या सारखा दिसणारा पुतळा आहे."
"कारण तुम्हीच आहात माझे गुरु."
"काय? पण मी तर तुला शिकवले नाही काहीच. आणि मला आठवतयं, मी तुला नकार दिला होता...."
"हे सांगून की तुम्ही केवळ कौरवांना शिक्षा देण्यास बांधिल आहात आणि मी कौरव नाही." शांत चेहऱ्याने वाक्यपूर्ण करत तो म्हणाला. "आठवते आहे, गुरुदेव."
"मग इथे माझा पुतळा कसा?"
"गुरुदेव, तुम्ही मला शिष्य मानले नाहीत पण माझ्यासाठी तुम्हीच माझे गुरु आहात. या तुमच्या पुतळ्याकडे बघत तुमची प्रेरणा घेऊन मी लक्ष भेद करायला शिकलो गुरुदेव. "
"तू बनवलास हा पुतळा?"
त्याने होकारार्थी मान हालवली.
लांब राहून धनुर्विद्येत पटाईत झालेल्या, न शिकवताही आपल्याला गुरु मानणाऱ्या शिष्याकडे द्रोणाचार्य कौतूकाने बघत होते. एकाएकी त्यांच्या डोळ्यात चिंता उतरली हस्तिनापुरची.... उद्या याने हस्तिनापुर विरूध्द हत्यार उचलले म्हणजे? त्यांच्या कानात घोळू लागला भीष्माचार्यांना दिलेला शब्द.....! 'अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनेल.'
....आणि काही क्षणात चेहऱ्यावरचे भाव बदलले.
"पण तू हे सगळे केलेस ते गुरुंची आज्ञा आणि अनुमती न घेता?"
"क्षमा असावी गुरुदेव. पण एकदा तुम्हाला गुरु मानल्यावर दुसऱ्या कुणाला गुरु बनवणे पाप होते माझ्यासाठी."
"तू मला खरचं गुरु मानतोस?"
"हो, गुरुदेव." तो हात जोडून उभा होता.
"मग गुरूदक्षिणा देणार नाहीस?"
"का नाही गुरुदेव? सांगा, काय देऊ शकतो हा एकलव्य त्याच्या गुरुंना ज्याने गुरु प्रसन्न होतील?"
त्याचा नम्रपणा, लाघवी बोलणं..... एकीकडे शब्द आणि एकीकडे एकलव्य! शब्दांचं पारडं नेहमीच जड का होते अश्यावेळी? त्यांनी मन कठोर केले.
"उजव्या हाताचा अंगठा."
"जशी आपली आज्ञा...." त्याने नमस्कार केला. कंबरपट्याला बांधलेला सुरा काढला. डाव्या हातात धरला. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या बुंध्यावर सरर् कन फिरवला. 'आह्ह..' ऱक्ताचा फवारा उडला. रक्ताळलेला अंगठा द्रोणाचार्यांसमोर धरत म्हणाला, "गुरुदेव, आपली गुरुदक्षिणा!"
द्रोणाचार्यांच्या डोळ्यांत पाणी उभे होते. मनात कोलाहल माजला होता...... 'हे काय केलं आपण! आपल्या शब्दाची किंमत एकलव्य सारख्या सर्वोत्तम धनुर्धाऱ्याला चूकवावी लागते? ते ही अशी? हे काय केलेस द्रोण? कश्याकरता? अर्जुनाकरता? आपली परवानगी न घेता एकलव्य आपल्याला गुरु मानून शिकला म्हणून ही शिक्षा? त्याच्या विद्येचा वापर त्याला लिलया करता येऊच नये म्हणून ही दक्षिणा मागितलीस? की.....आपणही हस्तिनापुरचे दास झालेलो आहोत.....भीष्माचार्यांसारखे? ज्याला हस्तिनापुर, स्वतःचा शब्द आणि कौरव इतकेच दिसतात. बाकी सारे कवडीमोल. मग हा एकलव्य असो, अथवा त्याची आपल्यावरची श्रद्धा. ज्याला खरतर आपण काहीच शिकवले नाही, त्याने एकही प्रश्न न विचारता अशी भयंकर गुरुदक्षिणा द्यावी? चेहऱ्यावर एकदाही रागाचा लवलेश नाही.... गुरुबद्दलच्या विश्वासात तसूभरही फरक नाही..... असेही शिष्य मिळू शकतात? इतकाही भाग्यवान कुणी गुरु असू शकतो? .... आणि इतका दुर्दैवी कुणी शिष्य असू शकतो? तू सर्वोत्तम धनुर्धारी होतास, एकलव्य. आणि आता सर्वोत्तम शिष्य आहेस. अभिनंदन तरी कसे करू मी तुझे??? कारण सर्वोत्तम असण्याचा मान तू इथेही पटकवलास माझ्या सर्व शिष्यांना हरवून!'
त्यांच्या तोंडून नकळत बाहेर पडले, "किर्तीमान भवं, पुत्र! किर्तीमान भवं!!"
एकलव्याच्या हातातून होणाऱ्या रक्तस्त्रावाकडे त्यांचे लक्ष गेले. तो अजूनही हातात कापलेला अंगठा घेऊन उभा होता..... नम्रपणे, मान खाली घालून आणि गुरुंची भेट घडली हे समाधान घेऊन!

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुरा कथा जबरदस्त continue केलीये.2-3 भाग सलग वाचलेत. कुठेही वाचताना खटकलं नाही. Happy

हा.ब. आणि मधुरा तुमची चर्चा तर एकदम जबरदस्त! दोघांचे वेगवेगळे point of view.प्रतिसाद वाचताना मजा आली. Lol

अज्ञा, तु दिलेली लिंकसुद्धा सुंदर आहे.

महाभारत ही सत्य कथा आहे. दैवी चमत्कारांनी भरलेली. >> Lol बरं बरं... सत्य आणि चमत्कार एका वाक्यात वाचून मनोरंजन झाले... चमत्कारिक.

चर्चा महाभारतावर करायची आहे. ते असत्य आहे असं मानणाऱ्या व्यक्ती सोबत चर्चा करून काय फायदा? >> चर्चा हॅरी पॉटर वर पण चिक्कार होते, त्यात पण चमत्कार आहेत. आजच्या जगात महाभारत वाचणार्‍यांपेक्षा हॅरी पॉटर वाचणार्‍यांची संख्याही जास्त आहे मग ते पण तुमच्या दृष्टीने सत्य असेल नाही Proud कधी घेताय लिहायला Proud

आणि करोडो हिंदू जे कृष्णाला देव मानतात त्यांना तुम्ही खोटं ठरवायला निघालेले आहात तुम्ही? >>> "मानतात" ताई ह्या शब्दातच खर्‍या-खोट्याचा निकाल लागला की. मनाने एकदा "मानले" की ते खरं आहे की खोटं काहीच फरक पडत नाही. एखाद्याला भाऊ मानले की तो जन्माने भाऊ आहे नाही, काही फरक पडतो का?
पण तुम्म्ही कृष्णाला देव मानता म्हणजे नक्की काय करता? एका कथेत त्याने खूप चमत्कार केले असे लिहिले आहे म्हणून त्याची पुजा अर्चा करायची असे का? चमत्कार आणि पुजा अर्चा ह्याच्यापुढे देवपण असेल ना ? ते काय आहे ते सांगता का?

बाकीच्या धर्मातील कथांमध्येही कैक चमत्कार आहेत. त्यावर लिहिण्याची हिंमत दाखवा! बघू ते ऐकून घेतात का ते!>>ईथले संपले की तेच करणार आहे काळजी नसावी Proud

आणि हो, ते नको तेव्हा नको तिथे सतत भुंकत राहिल्याने एकल्व्याने एकदा बाण मारून तोंड गप्प केलेल्या श्वानाचा पुनर्जन्म मायबोलीवरच्या एका आयडीत झाला ह्याची काही कथा आहे का महाभारतात. असा एक आयडी दोन तीन प्रतिसादांआधी अवतरल्याचे दिसत आहे.

फक्त डॉ. स्ट्रेंजच्या चमत्कारामागील लॉजिक/विज्ञान हाब यांनी शोधून द्यावं ही नम्र विनंती. >> भाचे कंपनीला विचारून सांगतो. Proud मागे एकदा त्यांनी समजावले होते पण विसरून गेलो.

सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ १७-३ ॥

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमश्रितम् |
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् || ९-११ ||

माझ्या कडून या चर्चेला पूर्णविराम!

एक वयस्कर साधू महाराज पावसात देवाचे नाव घेत घेत आनंदाने भिजत चालले होते. समोरच एका मिठाईच्या दुकानात कढईमध्ये गरम दूध उकळत होते आणि बाजूला गरमागरम ताजी जिलेबी तळली जात होती. हे बघून आपसूकच साधूचे पाय काही वेळ त्या दुकानासमोर थांबले. बहुदा पोटातील भूक तसे करायला सांगत होती. इच्छा खूप होती, पण काय करणार, शरीराला पोट होते, पण अंगावरील कपड्याला खिसाच नव्हता. साधूकडे एक रुपयाही नव्हता.
बहुधा दुकानदाराला ह्याची जाणीव झाली असावी. त्या सदहृदयी दुकानदाराने आदराने साधूला जवळ बोलावले आणि एक ग्लास भरून गरमागरम दूध आणि एक प्लेट गरमागरम जिलेबी वाढली. साधूने मोठ्या आनंदाने दूध आणि जिलेबी खाल्ली आणि दुकानदाराला धन्यवाद देऊन मोठ्या भक्तीने आकाशाकडे बघितले. आणि ईश्वराचे आभार मानले आणि दुकानातून प्रस्थान केले.
पोट भरल्याने साधूचे मन प्रफुल्लित झाले होते आणि जगाची फिकीर न बाळगता त्याने रस्त्यावर देवाचे भजन गायला आणि नाचायला सुरू केली.

समोरून एक नवविवाहित जोडपे येत होते आणि इकडे साधू नाचत असताना साधुचा पाय रस्त्यावरील डबक्यात पडला ज्यात चिखलाचे पाणी होते आणि ते चिखलयुक्त पाणी त्या जोडीतील तरुण बाईच्या अंगावर उडाले. तिची साडी, दागिने सर्व घाण झाले. हे बघून त्या बाईच्या नवऱ्याला भयंकर राग आला आणि साधूला म्हणाला, "म्हाताऱ्या तुला डोळे दिले नाहीत का? माझ्या बायकोच्या अंगावर चिखल उडवायची तुझी हिम्मत कशी झाली?"
त्याला भयंकर राग आला आणि तो साधूच्या अंगावर धावून गेला. आजूबाजूला लोक हा प्रकार बघत होते पण कोणी काही बोलले नाही. त्याच्या बायकोने त्याला आवरायचा प्रयत्न केला पण त्याच्या डोळ्यातील राग बघून मागे सरकली. त्या युवकाने पुढचा काही विचार न करता साधूच्या मुस्काटीत एक जोरात ठेऊन दिली. बिचारा साधू तोल जाऊन त्या खड्ड्यात पडला, त्याला खड्ड्यात पडलेला बघून तो युवक हसला आणि बायकोचा हात धरून चालू लागला.
इकडे साधूला काहीच कळले नाही. त्याने फक्त वरती आकाशाकडे बघितले आणि ईश्वराला म्हणाला, "वा ईश्वरा - तुझी लीला अगाध आहे. एका क्षणाला गरमागरम दूध आणि जिलेबी देतो आणि दुसऱ्या क्षणाला कानाखाली झापड, पण असो तू जे काही मला देतोस ते मला पसंत आहे."

इकडे ते नवविवाहित जोडपे त्यांच्या रस्त्याच्या पलीकडे असलेल्या घरी पोचले. बायकोशी हसत हसत गप्पा मारत नवरा वरच्या मजल्यावर दरवाजा उघडायला निघाला. पाऊस पडल्याने जिना ओला झाला होता आणि त्या युवकाचा पाय घसरला. हे बघून ती बाई जोरजोरात ओरडू लागली आणि लोकांना मदतीला बोलवायला लागली. लोक मदतीला आले पण उशीर झाला होता. जोरात आपटल्याने त्या युवकाचे डोके फुटले होते आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

साधू समोरुनच चालले होते. त्यांना बघून लोक कुजबुज लागले की नक्कीच ह्या साधूने त्याला शाप दिला असणार. म्हणून ह्या युवकाचा मृत्यू झाला, ही कुजबुज ऐकून काही मस्तीखोर युवकांनी साधूला घेरले आणि म्हणाले, "तुम्ही कसले ईश्वराचे भक्त आहात? ज्यांनी फक्त एक थोबाडीत मारली म्हणून असला भयंकर शाप दिलात! ईश्वराचे भक्त तर दयाळू असतात, असे भयंकर तुम्ही कसे केलेत?"

हे ऐकल्यावर साधूने सांगितले की, "ईश्वराशपथ मी त्या युवकाला शाप दिला नाही"
"जर तुम्ही शाप दिला नाही तर मग ह्या युवकाचा अकाली मृत्यू कसा झाला?", एका व्यक्तीने विचारले.
हे ऐकून साधूने जमलेल्या गर्दीला विचारले की "जे काही घडले त्या संपूर्ण प्रसंगाचे कोणी प्रत्यक्ष दर्शक आहेत का?"
हे ऐकून एक व्यक्ती पुढे झाली आणि म्हणाली, की "हो जे काही घडले त्याचा मी प्रत्यक्षदर्शी आहे."
साधू म्हणाला, "माझ्या पायाने जो चिखल उडाला तो ह्या युवकाच्या अंगावर उडाला होता का?"
व्यक्ती म्हणाली "नाही, मात्र तो चिखल त्या बाईच्या अंगावर जरूर उडाला होता"
मग साधूने विचारले, "जर युवकाच्या अंगावर चिखल उडाला नव्हता तर मग त्याने मला का मारले ?"
व्यक्ती म्हणाली, "तो युवक या महिलेचा नवरा व प्रेमी होता आणि महिलेच्या अंगावर चिखल उडालेले त्याला सहन झाले नाही. म्हणून त्याने तुम्हाला मारले."

हे सर्व ऐकून साधू मोठ्याने हसला आणि म्हणाला,"ईश्वराशपथ मी ह्या युवकाला शाप दिला नाही. पण नक्की ईश्वराचे माझ्यावर प्रेम आहे. ह्या बाईचा प्रेमी सहन करू शकला नाही, तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या ईश्वराला हे सहन कसे होईल, की कोणी मला अकारण मारावे...?
ईश्वर एवढा शक्तिशाली आहे की जगातील मोठ्यात मोठा चक्रवर्ती सम्राट पण ईश्वराच्या कोपाला घाबरतो. ईश्वराची लाठी दिसत तर नाही, पण जेव्हा ती पडते तेंव्हा मोठा आघात करते. त्या माराची तीव्रता फक्त आपले चांगले कर्मच कमी करू शकतात. म्हणून चांगले कर्म करावे."
हे सांगून साधू तेथून निघून गेला.

बोध -:

कुणाचे चांगले करता आले नाही तरी चालेल, शांत रहा. पण कुणाचे वाईट करण्याचा, विनाकारण बदनामी करण्याचा विचारही करू नका

*श्री गुरुदेव दत्त*

Thinking of our mind and the way we perceive the things depend on our past experiences. But unfortunately we're not having the experience of all that actually exists and therefore we cannot perceive many things with our tiny mind and it's limited logic.
If one cannot accept blindly then he's having no right to reject blindly. So, directly denying inconceivable facts is also illogical.
Things real and possible for us can be magic or impossible for a child. similarly things real and possible for those can be magic and impossible for us. As a frog in a well for a lifetime can never imagine the vastness of Pacific ocean, this is something like that.
Pls think over this...

मराठीत न लिहिल्यामुळे क्षमस्व...

Paresh Marathi translation of your article.

आपल्या मनाचा विचार करणे आणि गोष्टी ज्या पद्धतीने पाहिल्या त्या आपल्या मागील अनुभवांवर अवलंबून आहेत. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे प्रत्यक्षात अस्तित्त्वात असलेल्या सर्व गोष्टींचा अनुभव नाही आणि म्हणूनच आपल्या लहान चित्रासह आपल्याला बर्‍याच गोष्टी कळू शकत नाहीत आणि ते तर्कसंगत आहे.
जर एखादा आंधळेपणाने स्वीकारू शकत नसेल तर त्याला आंधळेपणाने नाकारण्याचा अधिकार नाही. तर, अकल्पनीय गोष्टींचा थेट इन्कार करणे देखील अतार्किक आहे.
आपल्यासाठी वास्तविक आणि संभाव्य गोष्टी मुलासाठी जादू किंवा अशक्य असू शकतात. त्याचप्रमाणे त्यासाठी वास्तविक आणि संभाव्य गोष्टी आपल्यासाठी जादू आणि अशक्य असू शकतात. आयुष्यभर विहिरीत बेडूक पॅसिफिक समुद्राच्या विशालपणाची कल्पनाही करू शकत नाही, हे असे काहीतरी आहे.
कृपया यावर विचार करा ...

एक सुंदर विचार

देवळाच्या बाहेर माझा एक हात धरून पायातले बूट काढताना लहान मुलाने विचारलं कि, देवळात जाण्यापूर्वी चपला का काढायच्या ?

मी एक क्षण त्याच्याकडे पाहिलं... हसलो आणि म्हटलं, चपला काढल्या की माणसाचे पाय जमिनीवर येतात म्हणून.

मी हे धागे वाचले नाहीत, अमर ९९ यांचे सगळे धागेही वाचले नाहीत, पण महाभारतबद्दल आलेल्या धाग्यांपैकी या धाग्यावर सगळ्यात जास्त प्रतिसाद दिसताहेत म्हणून इथे प्रश्न विचारते:

महाभारताचे सगळे ऑफिशियल, मौखिक, काल्पनिक वगैरे लेखन एकत्र करून त्याचे स्त्रीवादी (किंवा स्त्री दृष्टिकोनातून) ऍनालिसिस कोणी केले आहे का?

राजश्री भीष्म या धाग्यामुळे मनात आलेला विचार.

अॅमी जी माझे धागे कॉपी पेस्ट केलेले आहेत. मृत्युंजय वाचले असेल तर कुंती वगैरे स्त्रियांनी स्वगतपर बोललेले टाईप लिखाण आहे असे आठवते. मला नक्की आठवत नाही.
बाकी महाभारत हे पांडवांची बाजू सत्याची होती व श्रीकृष्ण हा परमात्मा होता हेच सिद्ध करण्यासाठी लिहिली गेलीत असे मला वाटते. द्रोपदी, अंबा, अंबिका व अंबालिका यांनाच अन्याय सहन करावा लागला असे दिसते. अंबेचे प्रेमप्रकरण? नसते तर तीने विचित्रविर्याशी विवाह करायला नकार दिला नसता कदाचित. गांधारी पतिनिष्ठ असल्याने तिने स्वत:हून कृत्रिम अंधत्व स्विकारलं होते.

ख्यातनाम गायक पंडित जसराज यानीच त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते. ..
ते भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. त्यांचेकडे एक फोटो आहे श्रीकृष्णाचा, त्यातील भाव त्यांना जिवंत वाटत असे.
त्यांनी का त्यांच्या मुलानी..
नवे घर घेतले होते तिथे जाण्यासाठी गडबड चालली होती. पण त्या गडबडीत तो फोटो कुठेतरी गळबटला.. सापडेनासा झाला.
पंडितजी अस्वस्थ झाले. ...मेरा कान्हा मुझसे रूठ गया ... असेच सारखे सारखे म्हणत होते.आठ दिवसानंतर त्यांची ...गुरूवायूर... इथे गायनसेवा होती...
पण ह्यांचे म्हणणे एकच...
जब कान्हा रूठा है तो जीनेमे रहाही क्या है ?
मुलाला कार्यक्रम रद्द करायला सांगितला जे नुकसान होईल तेपण भरून दे असेही सांगितले. आणि जणू काही ...आमरण उपोषण सुरू केले. एकच ध्यास... कान्हा रूठ गया है. . अब जिंदगी नही जी पाऊंगा...
सगळे जण समजूत काढून थकले ... फोटो शोधून पण थकले ...जुन्या घरी नवीन घरी... कुठेच नाही. .. मग तर पंडितजीनी ठरवलेच ..
आता मेलेलेच बरे...
रात्र झाली. .. घरातील कोणीच जेवले नव्हते. .. हळूहळू सर्वजण तसेच उपाशीपोटी झोपी गेले.
पंडितजी ... जब कान्हा नही है तो ऐसी जिंदगी जिनेसे बेहेतर है की मर जाए... करत करत झोपी गेले... झोप कसली ग्लानीत होते..
पहाडे ..साधारण साडेतीनच्या दरम्यान त्याना एका स्त्रीचा
आवाज ऐकू आला व ते जागे झाले. .. जागो जसराज..
ह्याना कळेना , कोण ह्या ?
ते... माताजी आप कौन हो ? और मेरे घरमे इस वक्त?
... उत्तर ऐकल्यावर पंडितजी सटपटलेच...
मै ...राधा हूं ...
तूने सुबहसे एक ठान ली है , और उसके कारण तूने सुबहसे कुछभी नही खाया है...
पं.... हां... लेकिन जब कान्हा मुझसे रूठे है तो मै कैसे खा सकता हूं ?
राधाजी.... किसने कहा तुझे की कान्हा रूठे है ? और तो और तुझे मालूम है... तुने नही खाया है सुबहसे ... इसीके कारण तेरा कान्हाभी अबतक भूखा है... उसने भी कुछ नही खाया है... अगर कान्हा नही खाता है तो बाकी हम सब कैसे खा सकते है?
अब उठो और कुछ खा लो ..
तसबीर मिल जाएगी..
अचानक पुन्हा अंधार ...
पंडितजीनी सर्वांना जोरात हाका मारून उठवलं . हा किस्सा सागून पत्नीला ताबडतोब ताजा स्वैपाक करायला सांगितले . आणि प्रसाद दाखवून खाऊन घेतले .. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते ..
ठरल्याप्रमाणे गुरूवायूर येथे गेले ... सकाळी मंदीरात दर्शनाला गेले होते. गर्दीत सगळे थोडे पुढेमागे झाले ...
अचानक त्यांच्या मुलाला एका लहान व गोंडस मुलाने हटकले .. ये आपके पितिजीको देना .. मुरलीधरने दिया है ...
असे म्हणून एक गुंडाळी दिली.
मुलानं त्यांना हाक मारून बोलावले व हातात ती गुंडाळी दिली . निरोपही सांगितला...
उघडून पहातात तर तोच फोटो होता.. श्रीकृष्णाचा ... जो सापडत नव्हता. .
अरे वह छोकरा कहा है ? ढूंढ लो उसको ...
खूप शोधलं ....पण....

सोनी टी व्ही वर...
मानो या ना मानो ...
ह्या कार्यक्रमातील किस्सा.
पंडितजीनी स्वतः सांगितलेला...

"हे सांगून की तुम्ही केवळ कौरवांना शिक्षा देण्यास बांधिल आहात आणि मी कौरव नाही.".............. जर मी चुकत नसेल तर तुमचा इथे काहीतरी गैरसमज होतोय.. माझ्या माहिती प्रमाणे इथे राजपुत्र असायला हवे होते कारण पांडव व कौरव हे वेगळे होते... आणि द्रोणाचार्य दोहिंना शिक्षण देत होते

ढांग्या,

कुरुवंश हा कुरु राजा मुळे सुरु झाला.
त्या वंशाची लोकं म्हणजे कौरव.
हस्तिनापुराचा राजपरीवार कुरुवंशी!
त्यात भीष्माचार्य देखील आले, विदुरही आला, पंडू देखील आला आणि धृतराष्ट्रही. म्हणून त्यांची मुले सुद्धा कुरुवंशीच! नंतर त्यांच्यात्यांच्यात वाद झाले म्हणून कौरव साम्राज्य आणि हस्तिनापुर विभागले गेले.
कौरव विरूध्द पांडव युध्द झाले असे म्हणले जाते, धृतराष्ट्रपुत्र विरूध्द पांडव असे नाही.
कारण भीष्माचार्य, अश्वत्थामा, कर्ण यात लढले होते धृतराष्ट्र पुत्रांसोबत!

पंडु पुत्र हे सुद्धा कौरवच! पण ते हस्तिनापुरविरूध्द रणांगणावर उतरले. मग एकाच वंशाचे दोन पक्ष म्हणून युधिष्ठिरच्या पक्षाला पांडव नाव दिले गेले.

थोडक्यात, कौरव हा शब्द हस्तिनापुर राजपरिवारासाठी (कुरुवंशाकरता) आहे, धृतराष्ट्र पुत्रांकरता नाही.

Happy

Pages