निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही तलसा मधे राहात असताना तेथे जवळच एक निसर्गसंवर्धनासाठी राखीव असलेलं Oxley Nature Center नावाचं ठिकाण होतं. तिथले हे काही फोटो -

Screenshot 2025-03-18 111747.jpgScreenshot 2025-03-18 111120.jpgScreenshot 2025-03-18 111230.jpgScreenshot 2025-03-18 111431.jpgScreenshot 2025-03-18 111519.jpg

आमच्याकडे कुतुहलाने पाहणारं हरीण Happy

Screenshot 2025-03-18 111553.jpg

हा अर्माडिल्लो. अतिशय बुजरा असा हा प्राणी सहसा दिसत नाही. मात्र पुष्कळदा अर्माडिल्लो फ्रीवे च्या कडेला मरून पडलेले दिसतात. रात्री रस्ता ओलांडायच्या प्रयत्नात किंवा गाड्यांच्या उजेडाने बुजून ते भर रस्त्यात येतात म्हणे.

Screenshot 2025-03-18 111650.jpg

अनिंद्य,
मुनिया - चाफा मस्त आहे जोडगोळी.

अस्मिता,
फारच सुरेख जागा आहे ही. इथे नुसत निवांत बसायला खूप भारी वाटेल.

rmd,
अहाहा....
काय सुंदर फोटो आहेत ग.
डोळे निवले.. त्या झाडातून येणारा प्रकाश ..तो फोटो तर भारीच आहे. हरिण पण मस्त.
बोरिवलीच्या नॅशनल पार्कात खूप हरण दिसतात.
अर्माडिल्लो... हा प्राणी पहिल्यांदा पाहिला.
मात्र पुष्कळदा अर्माडिल्लो फ्रीवे च्या कडेला मरून पडलेले दिसतात. Sad

अनिंद्य,
मुनिया - चाफा मस्त आहे जोडगोळी.

अस्मिता,
फारच सुरेख जागा आहे ही. इथे नुसत निवांत बसायला खूप भारी वाटेल.

rmd,
अहाहा....
काय सुंदर फोटो आहेत ग.
डोळे निवले.. त्या झाडातून येणारा प्रकाश ..तो फोटो तर भारीच आहे. हरिण पण मस्त.
बोरिवलीच्या नॅशनल पार्कात खूप हरण दिसतात.
अर्माडिल्लो... हा प्राणी पहिल्यांदा पाहिला.
मात्र पुष्कळदा अर्माडिल्लो फ्रीवे च्या कडेला मरून पडलेले दिसतात. Sad

Such clean public waterbody.
First world privilege, without doubt>>>>>

गावात असतात.. जिथे पर्यटक पोचतात तिथे सत्यानाश

अर्माडिल्लो = हा प्राणी प्रथमच बघितला. म्हणजे फोटोतही आधी कधी नव्हता पाहिला.

सर्व नवीन फोटोज् सुंदर आहेत. कीप इट फ्लोईंग गाईज.

# Moods of Champa
# चाफा

35f733d5-7a9a-42d3-9cc3-3520a3b3dc3d.jpeg

चंपा तुझ में तीन गुण
रूप रंग और बास
अवगुण तुझ में एक है
भ्रमर न आवे पास

मस्तंच अनिंद्य...

हा बघा चाफ्याचा आणखी एक उल्लेख

कूरम कमल, कमधुज है कदमफुल,
गौर है गुलाब राना, केतकी बिराज है |

पाँढुरी पवार, जुहीसोहत है चंदावत,
सरस बुंदेले सों चमेली साजबाज है ||

भूषण भनत मुचुकुंद बडगूजर है,
बघेले बसंत सब, कुसुम समाज है |

लेई रस ऐतिन को, बैठी न सकत है,
अली नवरंगजेब चंपा शिवराज है ||

-कविराज भूषण

अनिंद्य,
तुमचं चाफेकर कुटुंब आवडतय
मस्त आहे हा पण...

चंपा तुझ में तीन गुण
रूप रंग और बास
अवगुण तुझ में एक है
भ्रमर न आवे पास>>>>>>

चम्पा वर्णी राधिका, भ्रमर कृष्ण का दास.
यही कारण अवगुण भैय्या, भ्रमर ना आवें पास.

मनीम्याऊ,
अली नवरंगजेब चंपा शिवराज है >>>>>> मस्तच

अनिंद्य हा माझा चाफ्या चा झब्बू तुम्हाला.#चाफा
IMG_20250319_192210.jpg
हा गुलाबी चाफा मी पहिल्यांदा पाहिला कर्जत ला, त्या आधी फक्त पिवळा आणि सफेद चाफाच माहीत होता.पण नंतर ऋतुराज यांचा चाफ्याचा धागा पाहिला. इतके विविध चाफे आहेत कळले.

चाफेकर Happy

भुंगा अधिक कमळ आणि हे चाफा उणे भुंगा … आपल्या कवींचे हातखंडा विषय

त्या एका अन्य धाग्यावर चर्चा रंगली होती नुकतीच.

@ सिमरन.

हा रंग नाही माझ्याकडे.

नवीन फोटोही सुरेख आहेत रमड ( ते वाटेचे विशेष आवडले. )
ऋतुराज, अनिंद्य, सिमरन मस्तच.
मनिम्याऊ, कवितेसाठी आभार. Happy

अनिंद्य - शांतता, स्वच्छता आणि निसर्गसौंदर्य हे प्रिव्हिलेज खरोखरच आहेत येथे.

हे मी आधीही आणि कालही वाहत्या धाग्यावर दिलेले पुन्हा येथे देत आहे.

ही नदी सॅन ॲन्टोनिओ रिव्हर आहे आणि ओढ्याचे नाव 'सिबोलो क्रीक' आहे. तेथे संवर्धन व निसर्ग केंद्र आहे. ते ॲल्जी, जुनी झाडे, अंडरब्रश वगैरे सगळे जपतात. हा पार्कही बांधकामात जाणार होता कारण तसा शहरापासून जवळ आहे पण लोकांनी प्रयत्नांनी वाचवला. ही जागा मला कळाली तेव्हा लॉटरी लागल्यासारखे वाटले होते, कारण उन्हाळ्यात सुद्धा हे थोडे गार असते. हे जुने फोटो, स्प्रिंगचेच आहेत.

1.IMG-20250318-WA0010.jpg
2. IMG-20250318-WA0011.jpg
3.IMG-20211209-WA0009.jpg
4.IMG-20250318-WA0008.jpg
5.IMG-20240906-WA0002(1).jpg

अस्मिता...भारीच
छान माहिती.
अशी शांत निवांत नयनरम्य स्थळं घराजवळ म्हणजे लॉटरीच.
ती कचराकुंडी, बाक, झोपाळा किती छान जपली आहेत.
त्या मुळांवर आलेले शेवाळ किती हिरवकंच आहे.
तो शेवटचा फोटो तर अगदी क्लास आहे.
This place is a bliss !

White Calliandra >>> अगदी शिरीषासारखा दिसतो आहे. पण त्याहून सुबक. पावडर पफ सारखा.

अनिंद्य, हा नेहमीचा आवडता चाफा. वेगळाच वास असतो याला.

सिमरन, गुलाबी चाफा पाहून मला मी हवाईत पाहिलेल्या चाफ्याची आठवण आली. तसाच आहे हा काहीसा. मी मागच्या पानावर फोटो दिला होता.

अस्मिता, तुझे फोटो आवडल्याचे कालच तिकडे सांगितले होते Happy हॅमॉक खुणावतोय!

मस्त फोटो सगळे.

Screenshot_20250320_071911_Photos.jpg
किती पाहिली मी वाट, असे सांगावे धाडून
केली कितीदा तयारी, सारे काही आवरून..
- इंदिरा संत.
सुप्रभात

मस्त रंग आहे कांचन चा
मला
कच्ची कली कचनार की तोडी नहीं जाती ...आठवलं
@ rmd, वक्त हमारा हैं Lol

मस्त फोटो

इक शोख़ इशारा है कचनार के फूलों में
क्या ख़ूब नज़ारा है कचनार के फूलों में

इस रंग से आँखों को आबाद करें कैसे
इक सुर्ख़ शरारा है कचनार के फूलों में

रह-रह के कोई मंज़र ख़्वाबों में उभरता है
रूमाल तुम्हारा है कचनार के फूलों में

फूलों पे हवाओं ने इक नाम लिखा पढ़ लो
वो नाम तुम्हारा है कचनार के फूलों में

एहसास की ख़ुशबू से हर शाख़ महकती है
ये प्यार तुम्हारा है कचनार के फूलों में

मासूम परिंदों से इक रोज़ कहा माँ ने
संसार हमारा है कचनार के फूलों में

वो चीज़ है क्या जिससे रोशन है जहाँ सारा
चाहत का सितारा है कचनार के फूलों में

- कवी देवमणि

क्या बात हैं अनिंद्य..
खरंच हा धागा आता खऱ्या अर्थाने निसर्गाच्या गप्पा विथ फोटो, गाणी, कविता, शेर ओ शायरी..

Pages