" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)
(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)
सुप्रभात......
सुप्रभात......

Oleander Hawk-Moth.
Army Green Moth
वॉव! किती सहज लपून गेलंय.
वॉव! किती सहज लपून गेलंय. सुरेख फोटो मिळालाय.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
डोळे विस्फारलेली ईमोजी
डोळे विस्फारलेली ईमोजी
आजचा पाहुणा :
आजचा पाहुणा , गर्द गुलाबी चाफा :
हा चाफा तर फारच सुंदर आहे. ही
हा चाफा तर फारच सुंदर आहे. ही सगळी सिरीज झाली की सगळ्या चाफ्यांचा एकत्रित फोटो टाकणार का अनिंद्य?
बोगनवेलीचा क्लोजप सुरेख. तो वरचा मॉथ किती कॅमोफ्लाज झाला आहे!
गर्द गुलाबी चाफा तर एकदम
गर्द गुलाबी चाफा तर एकदम मनमोहक आहे.
ही सगळी सिरीज झाली की सगळ्या चाफ्यांचा एकत्रित फोटो टाकणार का अनिंद्य?>>>> हो हो, सगळ्याच कोलाज करून टाका.
कोलाज ? करुया की.
कोलाज ?
करुया की.
ही सगळी सिरीज झाली की सगळ्या
ही सगळी सिरीज झाली की सगळ्या चाफ्यांचा एकत्रित फोटो टाकणार का अनिंद्य?>>>>>वेगळा धागा काढलात तर आणखीनच छान होईल.
सर्व चाफे एका ठिकाणी भेटतील
वा गुलाबी चाफा.
वा गुलाबी चाफा.
कोलाज ?
करुया की. >>> इतके चाफे एकत्र बसवताना फेफे तर नाही ना उडणार?
कोलाज नाही नुसते, आख्ख्या
कोलाज नाही नुसते, आख्ख्या बागेचा फोटो हवाय
बांबूच्या वनात रहायला हवे
बांबूच्या वनात रहायला हवे
हवाई मधे काढलेला फोटो. हा रस्ता बराच दूरवर असाच जातो आणि त्याच्या शेवटाला एक छोटी वाट फुटून धबधब्याकडे जाते.
कसला सुंदर रस्ता... वेळूचे बन
कसला सुंदर रस्ता... वेळूचे बन.
@अनिंद्य चाफ्याचा स्वतंत्र धागाच येऊ दया.
अहाहा...काय मस्त आहे बांबूचे
अहाहा...काय मस्त आहे बांबूचे बन...
किती मस्त वाटेल चालायला यातून.....
सुप्रभात
सुप्रभात

हा Bottle brush आहे का ?
हा Bottle brush आहे का ?
चमकदार रंग आहे ❤
चाफ्याचे धागे आहेत इथे ऑलरेडी
ही वाट दूर जाते… बांबूच्या बनातली वाट सुंदर आहे.
चाफ्याचे धागे आहेत इथे ऑलरेडी. एक तर ऋतुराज यांचाच सुंदर लेख आहे.
छान फोटो सगळ्यांचे. हा धागा
छान फोटो सगळ्यांचे. हा धागा वाहता झाला हे बघून बरे वाटले.
हा Bottle brush आहे का ?>>>>
हा Bottle brush आहे का ?>>>> हो अनिंद्य.
अनिंद्य,
तुमच्याकडच्या चाफ्यांबद्दल लिहा.
त्याची नावं किती छान ठेवली आहेत तुम्ही.
मागे एक लेख वाचला होता. गंधलावण्य त्याची आठवण झाली
Bottle brush चे रूप बघून तो
Bottle brush चे रूप बघून तो विदेशी असावा असे वाटायचे. परंतु खाश्या भारतीय पेंटिंग्समधे हा उद्यान वृक्ष म्हणून हमखास दिसतो. उपवन केलि म्हटले की बॉटल ब्रश दिसणारच.
याला काही भारतीय नाव आहे का ?
बॉटल ब्रश हा परदेशीच आहे
बॉटल ब्रश हा परदेशीच आहे अनिंद्य
त्याचे मराठीकरण केलेलं नाव 'लाल कुंचला"
आमच्या भागात बॉटल ब्रश झाडाला
आमच्या भागात बॉटल ब्रश झाडाला 'चील का पेड' म्हणतात
मराठी नाव माहीत नाही
मराठी नाव माहीत नाही
झाड डौलदार दिसते याचे आणि
झाड डौलदार दिसते याचे आणि फुलाविनाही Center of attraction ठरते बागेत strategically लावले तर.
कुंडीत मात्र कितीही वर्ष ठेवले तरी फुले येत नाहीत असे जाणकारांनी सांगितल्याने आणले नाही.
अगदी खंत वगैरे नव्हता करत पण
अगदी खंत वगैरे नव्हता करत पण आमचा चाफा जरा बोर झाला होता.
मग ही (पिंजरेवाली नाही, स्वतंत्र स्वच्छंद) मुनिया आली गप्पा मारायला
चर्चासत्र सोहळ्याचा फोटो घ्या
बहरलो मी असा दारी
बहरलो मी असा दारी
मुनीया का बसली शेजारच्या झाडी
चाफ्याची खंत काही कमी झाली नाही
@रमड, बांबूच्या बनातला रस्ता अप्रतिम पकडला आहे फोटोत.
@ऋतुराज, बॉटल-ब्रश मस्तच.
मै तुम्हारे बच्चेकी मा
मै तुम्हारे बच्चेकी मा बननेवाली हु… नुकताच ऐकलेला डायलॉग मुनिया चाफ्याच्या कानात कुजबुजली. चाफ्याचे अंगांग शहारले आणि मुक्या कळ्यांना वाचा फुटली
जेव्हा चाफ्या कानी
मुनिया ही कुजबुजली
झाली फुले कळ्यांची
झाडे भरात आली..
ऋतुराज, अनिंद्य आणि रमड
*
Such clean public waterbody.
Such clean public waterbody.
First world privilege, without doubt
धन्यवाद सगळ्यांना!
धन्यवाद सगळ्यांना!
बॉटल ब्रशचा रंग किती ब्राईट आहे एकदम.
मुनिया छान कॅप्चर झाला आहे. आमच्या इथे सुद्धा दिसतात मुनिया अघूनमधून. कदाचित मेक्सिको वरून आलेले असावेत. पण त्यांना पाहिल्यावर एकदम देशाची आठवण येते घरी. माहेरी खाऊ ठेवतात मुनियांना. बराच हैदोस चालू असतो.
अस्मिता, सुंदर फोटो आहेत गं. असं ठिकाण जवळ असणं खरंच भाग्याचं आहे.
Pages