Submitted by Asu on 5 July, 2019 - 22:25
फकीर
विशाल पसरल्या जीवनी
टीचभर तुझी कहाणी
अस्तित्व तुझे मानवा
अळवावरचं पाणी
भवसागरी पोहतांना
कष्टला किती जीवनी
राज्य, वैभव गेले
गेली राजघराणी
दमून दमून जमविले
हातात कितीक पाणी
निसटून सर्व गेले
स्थिती केविलवाणी
नाही कुणी कुणाचा
अटळ भविष्यवाणी
आपल्याच ओंजळीत
आपलेच पाणी
आयुष्यभर गायली
अनेक सुंदर गाणी
कातर संध्याकाळी
फकिराची आर्त विराणी
प्रा.अरूण सु.पाटील (असु)
(दि.05.07.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अप्रतिम!
अप्रतिम!
छान आहे कविता!
छान आहे कविता!
छान
छान