आरण्यक : पावसाळ्यातील आरण्यक - (भाग ०३)
Aaranyak In Rains...
आरण्यकमधील Flora & Fauna, प्राणी आणि हिरवाई आपण आधीच बघितली.
उन्हाळ्यात आरण्यक अतिशय रुक्ष, कोरडे, उजाड आणि गरम असे. सुरुवातीच्या माझ्या आरण्यकच्या भेटी उन्हाळ्यातल्याच. . . .
(पण तेव्हा त्याचं नाव आरण्यक आहे हे ठरलेलं नव्हतं).
पण त्यातून एक पावसाळी पाण्याचा प्रवाह जातो (अगदी धो-धो पाऊस पडला तरच) असं कळलं.
तोही पहिल्यांदा पाहिलं तेव्हा खूप शुष्क, उजाड होता. थोडासा खोलगट नाल्यासारखा भाग होता खरा पण त्यातून कधीकाळी पाणी जात असेल याची खूणही नव्हती. काठावर संपूर्ण पानगळ झालेले शुष्क साग आणि पळस.
मात्र त्या पावसाळी प्रवाहावर कमीत कमी दोन ठिकाणी बांध घालून पाणी अडवायचं आणि जिरवायचं ठरवलं गेलं आणि अडचणी आल्या तरी मोठ्या जिद्दीने पहिल्या पावसापूर्वी त्याच्यावर दोन बांध बांधले गेले.
मुळात पावसाळा रुक्षातला रुक्ष आणि उजाडातल्या उजाड जमिनीचेही नंदनवन करतो. (पुरेशा पावसाच्या ठिकाणी). पण ह्या बांधामुळे जे पाणी बांधामागे साठलं आणि जास्त पावसाच्या वेळी बांधावरून वाहायला लागलं त्यांनी डोळ्याचं पारणं फेडलं .
हि पावसाळ्यातल्या आरण्यकची काही प्रकाशचित्रे, तुमच्यासाठी. . . .
मुखपृष्ठ : हा आरण्यकचा सिग्नेचर फोटो....
प्रचि १ : आरण्यकवरून पुढे जाणारी ही वळणदार डांबरी सडक. पावसाने भिजलेली…
प्रचि २ : रस्त्यावरून कुंपणाबाहेरून दिसणारे आरण्यक. (Cool) हिरवाईतून दिसणारे ओझरते पिवळे नारिंगी घर…(Of Warm Colours)…
प्रचि ३ : कुंपणाबाहेरूनच दिसणारा आतला वळणदार मातीरस्ता…
प्रचि ४ : हाच मातीरस्ता थोडासा पुढून…
प्रचि ५ : प्रवेशद्वारातून दिसणारे घर (Glimpse of House)…
प्रचि ६ : टप्प्या टप्प्यातील पातळीची जमीन आणि ऊन-सावली (धूपछाँव)...
प्रचि ७ : मधल्या टप्प्यावरची कारवीच्या भिंतीची झोपडी…
प्रचि ८ : हीच झोपडी वरच्या टप्प्यावरून…
प्रचि ९ : आरण्यकच्या रस्त्याकडच्या बाजूने, रस्त्या खालच्या मोरीतून पावसाळी पाण्याचा प्रवाह वाहून नेणारा ओढा. आणि त्याच्यावर बांधलेला दगड,मातीचा बांध... (पावसाळा सुरु होण्याच्या आधी त्याची केलेली मरम्मत)…
(पलीकडच्या काठावर आपट्याच्या झाडाला बांधलेला दगडी पार)…
प्रचि १० : पाऊस सुरु झाल्यावर बांधाने अडवलेले पाणी..
प्रचि ११ : भरलेला ओढा, उजव्या कोपऱ्यात दिसणारा रस्ता आणि त्याखालून पाणी वाहून आणणारी गोलाकार मोरी…
प्रचि १२ : नंतरच्या काही वर्षात बांधाची थोडी वाढवलेली उंची आणि लांबवरुन दिसणारा ओढा..
प्रचि १३ : पाऊस वाढला कि प्रवाहाचा जोरही वाढतो आणि पाण्याची धार अशी वळीदार / घेरदार/ Pleated पडद्यासारखी पडते आणि जास्त पुढेही पडते..
प्रचि १४ : हा प्रवाहाला अडवणारा बाल आरुणी…
(हा बांध एकदम सुरुवातीचा जुना आहे. आता त्यात प्रचि १२ प्रमाणे बदल आहेत.)…
प्रचि १५ : हा ओढा पुढे "S" आकाराचे वळण घेऊन आरण्यकबाहेर पडतो, त्याचे हे पहिले वळण…
प्रचि १६ : तेच वळण पुढे कंटिन्यु ... अगदी १८०° मध्ये…
प्रचि १७ : शंकासुर आणि शाल्मली (कांटेसावर) यातून दिसणारा गढूळलेला ओढा…
प्रचि १८ : हे वळण पुढे जाऊन दुसऱ्या बांधामागे एका छोट्याशा तळ्यामध्ये परिवर्तित होतं…
(वळणाच्या शेवटी गढूळलेलं पाणी दिसेल पहा..)
प्रचि १९ : आजूबाजूच्या निसर्गाला प्रतिबिंबित करणारं हे तळं. मात्र यातलं पाणी आता निवळलेलं…
प्रचि २० : आरण्यक मध्ये एक छोटासा उंचवटा, टेकडी आहे. तिच्यावरून दिसणार हेच तळं, फक्त विरुद्ध बाजूने…
प्रचि २१ : तळं ज्याने अडवलं आहे तो हा दुसरा बांध. एका काठाला दिसणार कहांडोळ (पांढरीचे झाड.)
(याचे पांढरे खोड रात्रीच्या वेळी थोड्याशा प्रकाशातही चमकते, आणि या झाडाचा रात्री जो आकार दिसतो म्हणून याला भुताचे झाड असंही म्हणतात)…
प्रचि २२ : बांध लांबून कमी उंचीचा वाटलं तरी जवळ जवळ पावणे सहा फूट उंच आहे. (त्याचा हा पुरावा…. ) पाण्याचा जोर / फोर्स जास्त असला कि पाणी जास्त पुढे पडतं आणि माणूस अर्धा अधिक प्रवाहामागे दडला जातो.
(प्रचि मध्ये चेहऱ्यावरून निरागस न वाटणारा पण प्रत्यक्षात कोक पिणारा माझा मित्र)…
प्रचि २३ : पाण्याचा जोर जास्त असला तर चिल्ली पिल्ली पूर्णपणे प्रवाहामागच्या पोकळीत (गॅप मध्ये) मावू शकतात. हे दोघंजण पूर्णपणे पाण्यामागे आहेत, फक्त पाणी स्वच्छ असल्यामुळे दिसतायंत. एकदा का त्या पोकळीमागे गेलं कि मग मुलांचे धबधब्याच्या प्रवाहाबाहेर फक्त हाताचे पंजे बाहेर काढणं, फक्त मुंडकं बाहेर काढणं (आणि इतरांना घाबरवण्याचा प्रयत्न करणं) असे खेळही चालू होतात.
(बऱ्याच मोठ्यांनाही हा मोह न आवरता आल्याचं मी पाहिलेलं आहे.)…
प्रचि २४ : तळ्याच्या आणि कहांडोळीच्या मागे असलेल्या टेकडीवर तिथल्याच बांबूंपासून आणि झाडांच्या फांद्यापासून बांधलेले रेलिंग.
(पूर्वी सुकलेल्या झाडांपासून बनवलेली एक प्रेमिकांची लाकडी बैठकही इथे होती [लव्हर्स बेंच])…
प्रचि २५ : ज्यावेळेला पावसाचा जोर वाढतो तेव्हा प्रवाह जाण्यासाठी केलेल्या भागाव्यतिरिक्त बांधाच्या उंच भागावरूनही पाणी वहायला लागतं…
प्रचि २६ : उजवीकडचा बांध आणि धबधबा मानवनिर्मित….
तर डावीकडे कातळावरुन पडणारा छोटासा नैसर्गिक धबधबा…
प्रचि २७ : धबधब्याचा थोडासा क्लोज – अप…
प्रचि २८ : पावसाळी ओढा, बांध, धबधबा याना ओलांडून पुढे आलं कि विहिरीकडे जाणारी ही वाट…
प्रचि २९ : विहिरीकडे जाणारा उताराचा रस्ता आणि बच्चे कंपनीसाठी वेलीचा नैसर्गिक झुला…
प्रचि ३० : पाण्याची कमतरता भासायला लागल्यावर विहिरीसाठी चार/पाच वर्षांनी खणलेला हा खड्डा..
प्रचि ३१ : आणि त्यानंतर अनंत अडचणी सोसून दोन वर्षांनी ही बांधलेली विहीर…
प्रचि ३२ : विहिरीजवळच्या आरण्यकच्या हद्दीवरून दिसणारं मत्स्यपालनासाठी बांधलेलं हे शेजाऱ्याचे शेततळे…
प्रचि ३३ : विहिरीपासून दुसऱ्या अंगाने घराकडे आलं कि एक छोटासा भाग टिपिकल गावाकडची किंवा रानावनातली चौथऱ्यावरची उघडी मंदिरं असतात ना, तसं मंदिर बांधण्यासाठी ठेवलाय. त्यात लावलेली देवचाफा, कांचन हि झाडे…
प्रचि ३४ : त्याच्या अलीकडची जागा पावसाळी भाजीपाला, लागवड यासाठी राखलेली. त्यातला हा मका, भेंडी, इतर भाजी...
प्रचि ३५ : देवळाकडून घराकडे येतानाची हि जागा…
प्रचि ३६ : खडकाळ भागावरचे बांबू, करंज…
प्रचि ३७ : झाडावरती चढलेली ही रानकरांदा, त्याची वेल..
प्रचि ३८ : कुठूनतरी आणलेलं आणि गेल्या पावसाळ्यात आंब्याच्या झाडावर स्थानापन्न केलेलं Orchid (ऑर्किड)…
(जगेल की नाही याची शंका होती पण आता रुजलंय ते.. प्रतिसादात फोटो डकवतो नंतर..)
प्रचि ३९ : रातांबा / कोकम… (मनीमोहोर फेम.. )
प्रचि ४० : आपोआप आलेली सुंदर लाल रंगाची अळंबी (Mushroom)…
प्रचि ४१ : अळंबीचा क्लोज-अप…
प्रचि ४२ : पावसाळ्याची बहार - रंगांची उधळण..
हा बहुधा अस्वन..
प्रचि ४३ : पावसाळ्याची कमाल : गवताचे दुरंगी पान..
प्रचि ४४ : हिरवाईमधला चुकार लाल/किरमिजी रंग..
प्रचि ४५ : अगदी वारुणी-रन्गी (Wine Red) असलेला रान-द्राक्षं घोस..
प्रचि ४६ : अहाहा !!! काय झळाळी आहे…
(पावसाळी थेंब ल्यायलेलं हे रानद्राक्षाचं पान…)
प्रचि ४७ : कंटोळ्याची (रानभाजी, काहीजणं कर्टुली ही म्हणतात) वेल… आणि फुलं…
प्रचि ४८ : किड्याचे नक्षीकाम / कातरकाम…
प्रचि ४९ : थेंब पावसाळी…
प्रचि ५० : घराकडे नेणारी गवत वाट…
प्रचि ५१ : घराजवळचा हा इको पॉन्डचा प्रयोग. यातल्या लिली आणि नदीवरून आणलेली पाण्यातली झाडं, रामबाण कापूस वगैरे खूप सुंदर फुलतात… इथे आता फुलपाखरु उद्यानही (Butterfly Garden) वाढतंय..
प्रचि ५२ : खाली उजव्या कोपऱ्यात गच्चीतून दिसणारे घराचे उतरते छप्पर आणि गच्चीतूनच दिसणारा प्राजक्त आणि सप्तपर्णी.
मागे चिंच…
प्रचि ५३ : निघताना गाडीत बसल्यावर विंडशिल्डवरच्या पाण्यामुळे धूसर (Blur) दिसणारे आरण्यक.
इथून निघताना कैकांचे डोळेही ओले, धूसर होतात आणि मने तर सर्वांचीच......
आणि म्हणूनच पावसाळ्यातल्या ह्या निसर्गाचा, पावसा-पाण्याचा, झर्या-ओढ्याचा, चिंब भिजण्याचा अनुभव घेण्यासाठी आरण्यक या काळात आप्त-मित्रांनी, सग्यासोयर्यांनी अगदी वार लावून, प्रसंगी शुद्ध मनाने भांडून गजबजलेले असते..
या मालिकेतील आधीचे भाग...
आरण्यक - घराभोवतालचे सखेसोबती : (भाग ०१)
https://www.maayboli.com/node/64916
आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ अ)
https://www.maayboli.com/node/67470
आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ ब)
https://www.maayboli.com/node/68137
जिद्दु, किल्ली, शशांकजी......
जिद्दु, किल्ली, शशांकजी...... अभिप्रायाबद्दल धन्यवाद
@ माधव - अहो ही पावसाळ्याची किमया..
उजाड ओसाड माळाचंही निसर्ग पावसाळ्यात नंदनवन करतो.
एरवी उन्हाळ्यात पाण्याच्या दुर्भिक्षापायी आरण्यकही रखरखीत असतं..
फक्त पूर्वी ते निर्वृक्ष होतं.. आता कमी पाण्यावरची झाडं वाढवून थोडीशी हिरवाई वाढवलीय..
@ किट्टु२१ .... - विसरलो होतो.
आता या भागात आणि पुढच्या भागात देतो. आधीच्या भागात संपादन करायची वेळ निघून गेलीय...
नुस्तं अहाहा झालंय, इथे
नुस्तं अहाहा झालंय, इथे मित्र मैत्रिणींसोबत घालवलेला संबंध दिवस, तुमचे भरघोस आदरातिथ्य या जन्मी तरी विसरणे अशक्य च
धन्यवाद.. - वर्षू.
धन्यवाद.. - वर्षू.
वर, गेल्या वर्षी पावसाळ्यात
वर, गेल्या वर्षी पावसाळ्यात ऑर्किड लावलंय म्हणून उल्लेख केला होता आणि गेल्या वर्षीचा फोटो दिला होता.
यावर्षी त्याला फूल आलंय..
आणि हा क्लोज-अप....
पृथ्वीवरचा स्वर्ग काश्मीरमधून
पृथ्वीवरचा स्वर्ग काश्मीरमधून महाराष्ट्रात आलेला माहित नव्हता. नुसते फोटो बघूनच डोळे निवले. प्रत्यक्ष अनुभवताना काय होत असेल!>>>>>> अगदी अगदी!
प्रचि.१,१३,१५,२२,२३ एकदम मस्त.१४ आणि २२ मधल्यांचा प्रचंड हेवा!
देवकी प्रतिसादाबद्दल
देवकी प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
अहाहा, डोळे निवले प्रचि
अहाहा, डोळे निवले प्रचि पाहूनच.
प्रत्यक्षातील अनुभव किती छान असेल.
आम्ही सुखी माणसाचा सदरा घालुन
आम्ही सुखी माणसाचा सदरा घालुन आलेलो एक रात्र का होईना.
पावसाळ्यात यायच राहूनच गेल निरु..
मस्त प्रचि सारेच..
आसा. , टीना
आसा.
प्रतिसादाबद्दल आभार...
@ टीना... हो. मस्त होता तो सगळाच प्रकार...
आणि पावसाळा अजून बराच बाकी आहे गं..
निरुदा किती वर्ष लागली हो
निरुदा किती वर्ष लागली हो ओसाड जागेतून इतका सुन्दर आरण्यक बनवायला?
माझीही खूप इच्छा आहे अशी एखादी छोटी तरी जागा घेऊन तिथे खूप झाडं लावावीत अगदी जंगल बनवायचं. काय माहित कधी प्रत्यक्षात उतरवता येईल का.
वाह निरूदा... एक न एक फोटो
वाह निरूदा... एक न एक फोटो मोठा करून फ्रेम करून लावावा असा आहे...
आमची लिली..
आमची लिली..
हा ऑर्किडचा यावर्षीचा फोटो..
ही कमरखची फुलं (Carambola /starfruit)
खूपच छान आहेत फोटो
खूपच छान आहेत फोटो
अप्रतिम!!
अप्रतिम!!
आहाहा, मस्त मस्त.
आहाहा, मस्त मस्त.
Pages