काही इतर हिपोक्रिसी

Submitted by कटप्पा on 13 April, 2019 - 12:57

१. मला स्मोकर्स अजिबात आवडत नाहीत.
हो का? तुझी आवडती व्यक्ती कोण आहे?
शाहरुख खान !

२. मी एक ओपन माइंडेड नवरा आहे, पण तू शॉर्ट स्कर्ट घातलेले मला आवडले नाही.

३.भारतात काय साला करप्शन आहे, कधी थांबणार काय माहीत. मागच्या सिग्नल वर 500 ची नोट द्यावी लागली पोलिसाला सिग्नल तोडला म्हणून.

४. मुक्या प्राण्यांवर दया करा. भूतदया विसरत चालले आहेत लोक.
जेवताना - ही घ्या तुम्ही ऑर्डर केलेली चिकन बिर्याणी आणि मटण करी.

५. ती-प्रेमात लुक्स आणि पैसा कधीच नाही बघितला पाहिजे. सौदा नाही आहे हा, प्रेम बघितले पाहिजे.
तो -बरे झाले तू म्हणालीस - बरेच दिवस तुला माझया मनातले सांगावं म्हणतोय. आय लव यु.
ती- काय? थोबाड पाहिलंयस का आरशात. माझ्या एक वेळचा शॉपिंग चा खर्च तरी झेपणार आहे का तुला??

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी देवीचा कडक भक्त, नवरात्र मध्ये नऊ दिवस उपवास।
--- आज सापडलीस,आता कुठं पळशील, टाका रे तिला जीप मध्ये, चला फार्म हाऊस वर.

सरकारी बाबू रिकामटेकडे फुकटचा पगार घेतात.
>> काय करणार, वशिला नव्हता म्हणून नाही मिळाली सरकारी नोकरी. भरपूर प्रयत्न केला पण.....

पाकिस्तान को लवलेटर भेजणा बंद करणा चैये
- स्वत: गोडगोड लवमेसेज पाठवणे...

चीन को लाल आंख दिखाना चैये
- झोपाळ्यावर गुलाबी गुलाबी आंखे दाखवत झोके देणे...

स्कूटर होंडाची, मोबाईल रेडमीचा, टेब्लेट याप्पलचा, कपडे अमेरिकन ब्रॅंडचे वापरतो.
>>आन म्हणतो डालरच्या तुलनेत रुपया कुठं आहे?

मधमाशांचा जीव वाचलाच पाहिजे, त्या मधमाशी वाचवणार्याला फोन करतो. पण आधी या घरात मुंग्या झाल्यात, त्यांची पावडर टाकून घेऊया. गुड नाईट लावायचे विसरलोच, डास फार झालेत.

स्मोकर नाही आवडत पण शाहरूख आवडतो हे उदाहरण फार गंडलेले आहे आणि धाग्याच्या हेतूला छेद देत आहे.

संपादीत करता येईल का?

सर, संपादन करायची मुदत निघून गेली आहे. तुम्ही माझ्या धाग्यावर प्रतिसाद दिलात,मी नक्कीच संपादित केले असते. तुम्ही, हायझेनबर्ग आणि किल्ली माझे प्रेरणास्थान आहात।

कटप्पा काही हरकत नाही पण मला सर बोलू नका Happy

शाहरूख हा एक कलाकार आहे. बहुतांश लोकांना त्याची कला आवडते. त्याच्या व्यक्तीगत आयुष्यात तो दारू पितो की सिगारेट याच्याशी त्यांना घेणेदेणे नसते.

मला तो एक व्यक्ती म्हणूनही आवडतो. पण एखाद्याला एखादी व्यक्ती आवडते म्हणून त्याचे दुर्गुणही आवडतात हा निष्कर्श गंडलेला आहे.
या जगात कोणतीही व्यक्ती पर्रफेक्ट नाहीए (अपवाद मी). प्रत्येकात काहीना काही दुर्गुण सापडतीलच. याचा अर्थ कोणाला कोणती व्यक्ती आवडूच नये का?

Pages