काही इतर हिपोक्रिसी

Submitted by कटप्पा on 13 April, 2019 - 12:57

१. मला स्मोकर्स अजिबात आवडत नाहीत.
हो का? तुझी आवडती व्यक्ती कोण आहे?
शाहरुख खान !

२. मी एक ओपन माइंडेड नवरा आहे, पण तू शॉर्ट स्कर्ट घातलेले मला आवडले नाही.

३.भारतात काय साला करप्शन आहे, कधी थांबणार काय माहीत. मागच्या सिग्नल वर 500 ची नोट द्यावी लागली पोलिसाला सिग्नल तोडला म्हणून.

४. मुक्या प्राण्यांवर दया करा. भूतदया विसरत चालले आहेत लोक.
जेवताना - ही घ्या तुम्ही ऑर्डर केलेली चिकन बिर्याणी आणि मटण करी.

५. ती-प्रेमात लुक्स आणि पैसा कधीच नाही बघितला पाहिजे. सौदा नाही आहे हा, प्रेम बघितले पाहिजे.
तो -बरे झाले तू म्हणालीस - बरेच दिवस तुला माझया मनातले सांगावं म्हणतोय. आय लव यु.
ती- काय? थोबाड पाहिलंयस का आरशात. माझ्या एक वेळचा शॉपिंग चा खर्च तरी झेपणार आहे का तुला??

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक ठिकाणी राजकारण काय आणतात लोक!
.
.>>>
अरे, या धाग्यात राजकीय टोमणे मारण्याची संधी आहे, मारून घेतो एक दोन.

D4XX5IqW4AAZ1B1_0.jpg

आज रात्रौ जेट एअर वेज चे विमान शेवटचे उड्डाण घेईल,
क्रांतिकारी उडान योजने नंतर एका कँपणीची udaan कायमचे बंद झाली

इकडे आपण हिप्पोक्रसी बद्दल लिहितोय की नाही?
तुम्हाला आवडत असतील पण त्याचा इकडे काय संबंध?

हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी (!) योजना जाहीर करणे, आणि एक कम्पनी बंद पडू देणे या परस्पर विरोधी गोष्टी नाही आहेत का?

मग किंगफिशर सारखं दिवाळं वाजवण्यापेक्षा बंद करणं श्रेयस्कर असेल व्यवस्थापनाला. उडान योजना म्हणजे कंपन्यांचा तोटा अंगावर घेणे आहे का.

मुळात बाजारात फेअर स्पर्धा असताना, सरकारने भाडी फिक्स करण्याचा अचरतपणा करायचा कशाला?

स्टेंट च्या किमती वर कॅप लावून काय मिळवले?
कँपन्यांनी चांगल्या quality चे स्टेंट भारतात विकणे बंद केले,

असो हिप्पोक्रसी वरून गाडी वळते आहे,
या साठी हवे तर दुसरा धागा काढा

आणि कंपन्यांनी तिकीट दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली असती तर हेच म्हणायचे सरकार काही करत नाही. पेट्रोल दरवाढ झाली त्यावेळेस हेच लोक गळे काढत होते.

बोक्याने कुत्र्याबद्दल काही लिहिलं तर कुत्रंसुद्धा फिरकत नाही तिथे. पण कुणी तैं नी इंग्रजीत लिहिलं तर मात्र चालतं, ही हिपोक्रसी नाही का?

माणसाने स्वत:च्या आनंदासाठी लिहावं. लाईक नि कॉमेंट ची अपेक्षा कशाला करायची..
>> आता यापुढे इथे काहीही लिहीणार नाही.

माझी मैत्रीण आणि तिची मेड यांचा संवाद -

मेड - दीदी, बुधवारी गणपती बसताहेत. माझ्याकडे सासरची लोक येणार आहेत, सुट्टी हवी होती.

माझी मैत्रीण - अग मी ऑफिसमधून सणाची सुट्टी घेतली ती काय भांडी घासणे आणि केर फरशी पुसणे यात घालवू का? तू लवकर येऊन काम करून जा. मी सणाच्या दिवशी असली काम करण्यात वेळ घालवणार नाही.

The phone bill was exceptionally high.. Man called a family meeting to discuss.

Dad: “this is unacceptable. I don’t use home phone, i use my work phone”.

Mum: “Me too. I hardly use home phone.”

Son: i use my office mobile i never use the home phone.

Al of them shocked n together look at the maid who’s patiently listening to them

Maid: “what? So v all use our work phones. What the Big deal?
कॉपी पेस्ट

दोन मैत्रिणीतला फ्रेंचफ्राईज-बर्गरवर ताव मारतानाचा संवाद
मला डॉक्टरांनी वजन कमी करायला सांगितलंय म्हणुन
मी डाएटवर आहे सध्या..

माणसाने स्वत:च्या आनंदासाठी लिहावं. लाईक नि कॉमेंट ची अपेक्षा कशाला करायची..
>> आता यापुढे इथे काहीही लिहीणार नाही. >>> Rofl

VB :-))

माणसाने स्वत:च्या आनंदासाठी लिहावं. लाईक नि कॉमेंट ची अपेक्षा कशाला करायची..
>> आता यापुढे इथे काहीही लिहीणार नाही.
>>>>>>>>
वेलकम बॅक शशिराम. आधीपासूनच मला संशय होता.
कशाला त्या भल्या माणसाच्या मागे लागलाय? बस झालंय आता. तुमच्यासारखेच शोधा ना, त्यांच्याशी हुस्त्या घाला.
आधी बरळ बरळ बरळून आता छुपे वार का करतायेत? गो गेट अ लाईफ!

झाला असेल तर झाला असेल, पण हे सारखं टोचण थांबवा आता. सभ्यतेच्या काही मर्यादा असतात त्या पाळा. हेच वाक्य कॉपी पेस्ट करून एका विकृताने रात्री गोंधळ घातला होता, आणि आता तुम्ही पुन्हा स्टार्ट करू नका.
शिकलेले असाल तर सायबर bullying आणि trolling च्या कन्सेप्ट एकदा वाचा.
धन्यवाद!

Pages