Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@Mandar Later -. मस्त लिहिलंय
@Mandar Katre -. मस्त लिहिलंय. हो.. माधवने दारू पिऊन का होईना आण्णा बाप म्हणून स्वीकारला यात आनंद आहेच पण माधवला आण्णा सारखं पिताड अभिनय जमत नाही त्यामुळे ते रटाळ वाटले. बाकी तुम्ही काल परवाचा भाग छान लिहिलात.
पहिल्या भागात दत्ता सरिताला आण्णा जास्त काही देत नाही यामागे दत्ता आण्णा चां बिना लग्नाचा मुलगा असतो म्हणून मिळत नसावा असे वाटते.
कालच्या भागात नाईक कुटुंबात
कालच्या भागात नाईक कुटुंबात चांगलाच हलकल्लोळ उडाला. परवा रात्री आण्णा त्याच्या गळ्यातील रुमाल पाटणकरणीच्या घरी विसरुन आला आणि वाड्याचे दार बंद असल्याने सोप्यातल्या बाकावर निजला. सकाळी माई तुळशीला पाणी घालायला बाहेर आली तर आण्णोबा बाकावर झोपलेत. विचारात पडत माई तुळशीला पाणी घालतानाच पाटणकरीण ओल्या केसाने तिच्या तुळशीला पाणी घालायला आली आणि माईला उद्देशुन कशा आहात असं विचारलं तर माईने सरळ दुर्लक्ष करुन घरात जाणं पसंत केलं. जाताना पांडबाला रात्री दार लावुन झोपला तेव्हा आण्णा घरात होते काय विचारलं तर त्याने नेहमीचं 'ईसारलंय' असं उत्तर दिलं.
त्यानंतर आण्णा तोंड धुवायला गॅलरीत जातो आणि तिथुन त्याची आणि पाटणकरणीची आखमिचौली सुरु होते. पाटणकरीण आण्णाला फ्लाईंग किस देते आणि आण्णा ते कॅच करतो हे पांडबा बघतो. पाटणकरणीने आण्णाला काहिच दिलं नाही नुसतं हवेतच "फू.." केलं हे बघुन तिने आण्णाला फसवलं असं बोलत सुटतो.. ते बघुन आण्णा हसत घरात गेला आणि पाटणकरणीने पांडबाला फ्लाईंग किस दिला तर तो कॅच करुन हातात काहिच आलं नाहे हे बघुन पांडबा "मला पन फसवल्यान.. मला पन फसवल्यान.." असं म्हणत बाजुला जातो तो सीन फार हसवुन गेला
नंतर पाटणकरीण आण्णाचा रुमाल घेऊन वाड्याच्या दारात आली तेव्हा सरिता सोबत तिची चांगलीच खडाजंगी झाली. माई, दत्ता, छाया सगळे बाहेर आले आणि पाटणकरणीने सर्वांसमक्ष काल आण्णा तिच्याकडे आले होते तेव्हा विसरलेला रुमाल द्यायला आलेय असं सांगुन सगळ्यांची विकेट घेतली. नेमकं त्याच वेळेस आण्णोबा ताकाच्या गुत्त्यातुन तिथं पोचला आणि पाटणकरणीने माईस चॅलेंज देत आण्णाला श्रीखंड्+पुरी खाण्यासाठी घरी बोलावले.
आजच्या भागाचा प्रेकॅप काल दाखवला तेव्हा आजच्या भागात चांगलेच बाँब फुटणार असं दिसलं. माझी कित्त्येक दिवसांची ईच्छा आज पुर्ण होणार. सरिताच्या कानाखाली माई खण्णकन आवाज काढणार त्यानंतर माई आण्णाच्या खोलीत जाऊन बंदुक हातात घेतलेली दाखवली आहे. आज तिने बंदुकीतुन पाटणकरणीच्या घरात खरेच बार ठोकला तर बरं नाहीतर पाटणकरणीच्या घरी जाऊन आण्णाच्या हातात ती बंदुक देऊन स्वतःवरच रोखत, पेटंट आरडाओरडा करत "मारा माका.. मारा माका.." असलं काही बोलुन अवसानघातकीपणा करु नये म्हणजे मिळवली.
कालचा भाग बघायला पाहिजे ऍपवर.
कालचा भाग बघायला पाहिजे ऍपवर. पांडू वेडा
भारी DJ... बादवे माई सरीताला
भारी DJ... बादवे माई सरीताला का मारणार?
@ सान्वी, सरिता किती वचावचा
@ सान्वी, सरिता किती वचावचा बोलते. तिला कानफाड बसावी असे मला कितीतरी दिवस वाटत होते पण २-३ दा ती माईकडुन थोडक्यात हुकली होती. माईच्या चांगुलपणाचा सर्वात जास्त तिनेच फायदा घेतला
कालच्या भागात मी प्रेडीक्ट केलं तसंच झालं. पाटणकरीण सर्व नाईकांच्या समक्ष आण्णाला हाताला धरुन तिच्या घरी घेऊन गेली आणि त्याच्याकडुन केरपाणी करुन घेतलं. इकडे नाईकांकडे नुसती धुसफुस. सरिताने नेहमीप्रमाणे वचावचा करत सगळ्या गोष्टिंचं खापर माईवर फोडलं तसं माईने एक थोतरीत ठेऊन दिली आणि तरातरा वरच्या खोलीत निघुन गेली. आण्णाच्या खोलीत गेल्यावर माईला थोडा फ्लॅशबॅक आठवला आणि आण्णाने तिच्या चांगुलपणाचा कसा गैरफायदा घेतला ते आठवले. मग तिने भिंतीवर टांगलेली बंदुक काढली आणि थेट पाटणकरणीकडे निघाली. जिन्याच्या शेवटच्या पायरीवर दत्ता आणि छायाने तिला अडवण्याचा निष्फळ प्रयत्न केला तसा माईने सरिताला चिमटा बसेल असं बोलत "ह्ये माझ्यामुळे घडताहा तर ते माकाच निसतरु लागात..!" असं बोलुन कुणीही तिला अडवु नका असं सांगुन राणा भिमादेवी थाटात पाटणकरणीच्या दारात जाऊन उभी राहिली. बंद दरवाज्यावर बंदुकीच्या नळीने 'टकटक' करुन तिने पाटणकरणीला दार उघडायला लावले. दार उघडताच माईने हातात बंदुक घेऊन आपल्यावर नेम धरलेला पाहताच पाटणकरणीची भितीने भंबेरी उडाली आणि ती आण्णाच्या मागे जाऊन लपली. मग माईने मी काल सांगितल्याप्रमाणे यथोचित अवसानघातकीपणा करत , "तुझ्याकडे माझो घो असा पण माझ्याकडे नायकांचो वाडा आसंय.. नायकांची समदी माणसां असात.. मला माझ्या घोवाचो अन ह्या बंदुकिचो कायो जरुरी नाय हां.." असलं काहीबाही ऐकवुन हातातली बंदुक आण्णाकडे फेकत पिछे मूड केलं.
प्रिकॅपमधे आज पाटणकरणीला घेऊन आण्णा वाड्यात घुसु पहातो पण माई धाडकन दार बंद करते. कालच तिने बंदुकीने पाटणकरणीच्या कानाशेजारुन बार काढला असता तर आज तिची हिंमत झाली नसती.
DJ.. , तुम्ही सांगता तो
DJ.. , तुम्ही सांगता तो प्रत्येक भागाचा सारांश अन् comments .... मस्तच !
मला एक नाही कळात, माई अगदी
मला एक नाही कळात, माई अगदी पहिल्यांदाच अण्णाचा ‘पहिलेच’ लफडे कळल्यागत का करतेय?
अण्णाची तर आधीची लफडी माहिती असात ना? एक लफड्यामुळे, माधवाला पण नकार देते ना?
—-
ह्या माका काय कळणा नाय( माईच्याच भाषेत)...
झम्पी, ती लफडी घरापर्यम्त
झम्पी, ती लफडी घरापर्यम्त आलेली नसतात. भिवरी आली तरी अण्णालाच ती पसंत नसते. ( माझा की बोर्ड आज कामातुन गेलाय ) आणी एक दत्ता घरात आल्यावर अजून किती बायका पोरे उरावर घेणार असे माईला वातत असेल.
एक दत्ता घरात आल्यावर अजून
एक दत्ता घरात आल्यावर अजून किती बायका पोरे उरावर घेणार असे माईला वातत असेल.>>
रश्मी.. वैनी बर्याच दिवसातुन आलात हो या धाग्यावर. राखेचा२ बघणं बंद केलंत की काय..??
अगदी अगदी
अगदी अगदी
अन्नूकल्या ची आधी ची झेंगट बाहेरच्या बाहेर मिटत होती,नायतर त्यांची कलम लागत होती, इथे मात्र पाटनकरिण घरी यायला बघते,अण्णा च तिच्या पुढे बिल्ली मांजर होतंय, आणि माई ला हे काय हँडल करूक येणा नाय,शाप ईटम्बना झाली असा
माई कसली नौटंकी आहे गळा
माई कसली नौटंकी आहे गळा दाबायचा सीन इतका वेळ चालू होता की असं वाटलं मारून टाक बाबा एकदाची तिला. त्या बंदुकीने कोणाला मारलंय का आधी अण्णाने की फक्त नवरा-बायको भांडण करायला वापरतात ती. पायातली वहाण काय शेवंतालाही कळायला पाहिजे अण्णाचे विचार काय आहेत ते बायकांबद्दल. शेवंता आत्महत्या का करते, सध्यातरी सगळं तिच्या मनाप्रमाणे होतंय.
चंपा, अगदी मनातलं बोललात.
चंपा, अगदी मनातलं बोललात. त्या बंदुकीने कोणाला मारलंय >>बंदुकीतुन गोळ्यो मारुन काशीला वेडा करणं, शोभाला जखमी करणं, काल निल्याच्या गुत्त्यातलं ताकाचं मडकं फोडणं अशी कामं झालेली आहेत.. बाकी बंदुकीच्या धाकाने आपल्याला हवं ते करवुन घेणं आणि पाटणकरणीला पटवणं ही महत्त्वाची कामे देखिल केली आहेत.
कालचा माईचा गळा दाबण्याचा सीन हा राखेचा१ आणि राखेचा२ मधिल सर्वात हस्यास्पद आणि वेडगळ सीन होता असे वाटले.
तर कालचा भाग अत्यंत येडचॅप होता त्याचवेळी पाटणकरणीचं खरं रुप कळल्यामुळं चोंट्याला उपरती झाल्याचा अंदाज दाखवणारा देखिल होता. काल पाटणकरणीला घेऊन आण्णा वाड्यात यायला बघतो तेव्हा माई त्याला घालुन-पाडुन बोलते आणि दणकन दरवाजा लावुन घेते. या प्रकारामुळे आण्णाची तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो बंदुक घेऊन थेट निल्याच्या ताकाच्या गुत्त्यात जातो. तिथे जाऊन एक बार काढतो आणि ताकाचं मडकं फोडतो. या प्रकारामुळे तिथे बसलेल्या रघुकाका अन नेने वकीलांची चांगलीच तंतरते. आण्णा माईमुळे चिडला हे बघुन नेने आणि रघुकाका माईच्या या वागण्याला पाटणकरीण जबाबदार आहे असं सांगतात तर आण्णा त्या दोघांना त्यांची लायकी दाखवुन देतो. नेने वकिलाला म्हणतो की त्याने त्याचे ज्ञान कोर्टात आणि रघुकाकाने त्याचे ज्ञान देवाचा कौल लावण्यात पाजळावे
गुत्त्यात ताक न पिता आण्णा पुन्हा घरी येतो आणि आक्ख्या घरात माईला शोधत फिरतो. काल वाड्याचा कोपरानकोपरा दाखवला. माई वर माडीवर असते. तिथे गेल्यावर आण्णा तिला ती त्याच्या पायातली वहाण आहे असं बोलतो, आजवर स्वतःच्या बापाने (म्हणजे नानांनी..) कधी वर तोंड करुन विचारले नाही आणि ही माई आण्णाला बोलते म्हणुन तो सरळ तिचा गळाच आवळतो
आण्णाने जवळजवळ १० मिनिटं माईचा गळा आवळून ठेवला असेल ( आण्णाला माईचा गळा आवळायची आणि माईला देखिल गळा आवळुन घेण्याची अॅक्टींग आजिबात जमली नाही ). माईला वरच्या परिच्छेदातलं सुनावुन गळ्यावर नुसता हात ठेऊन आण्णा माईकडे तांबरलेल्या डोळ्याने पहात असतो तेव्हाच दत्ता, सरिता अन छाया तिथे पोचतात. एकाला पण झिंगलेल्या आण्णाला ढकलुन द्यायची बुद्धी होत नाही. सगळेजण माईचा (न) आवळलेला गळा बघुन केविलवाणे झाल्याची अॅक्टिंग करत राहतात (सरिताला तर बरं झालं आता म्हातारी मरेल आणि सगळं सोनंनाणं आपल्याला मिळेल असं वाटुन गेलं असणार ).
वास्तविक पाहता माईची ताकद आण्णापेक्षा जास्त आहे. एका झणुट्यात आण्णाला ती सहज लोळवु शकते... पण नाही...! त्या गळा आवळलेल्या स्थितीत तिने काय करावं..? तर तिने डोळे चकणे करत कसनुसं तोंड करत "मारा माका.. मारा माका" असं नेहमीचं वाक्य फेकत आण्णाच्या परमपुज्य हस्ते गळा आवळुन वैकुंठवासी होण्याचा योग येण्यापुर्वी माईला स्वतःची खणा+नारळाने ओटी भरुन घ्यायची असते.
ओटी भरुन घेण्यासाठी ती गळा अवळलेल्या स्थितीतही डोळे चकणे करत सरिताला खणा+नारळाची ओटी आणायला लावते. सरिताही पडात्या फुलाची आज्ञा शिरसावंद्य मानुन लगेच तरातरा जिना उतरुन आणि परत चढुन पुढच्या मिनिटाला एका थाळीत ब्लाऊज पिस्+नारळ + हिरव्या बांगड्या+ हळदीकुंकवाचा करंडा इत्यादी सर्व साग्रसंगीत मांडुन ते माईपुढे धरते. गळा आवळुन घेतलेल्या अवस्थेतही माई त्या थाळीतील हळदी कुंकवाच्या करंड्यात मधलं बोट आणि अरंगळी बुडवुन स्वतःच्या कपाळावर सौभाग्यलेणं लावत सर्वांना (प्रेक्षकांना देखिल..!) उपदेश देते तो असा - "ज्या हातांनी तिच्या गळ्यात मंगळसुत्र बांधलं त्याच हातांनी तिला मरण येणं म्हणजे किती थोर भाग्य..!" तर ते भाग्य तिला मिळाल्यानंतर सरिताने पाच सवाष्णं जेवायला घाल म्हणुन उपदेशही देते..!! (आता बोला..!) आणि सरिता, दत्ता, छायासहित आपणा सर्वांना ते याची डोळा बघायला मिळतंय म्हणजे केवढा सुवर्णयोग म्हणायचा नाही का..!!
पण या उपदेशाने होतं भलतंच. ते ऐकुन आण्णा जाम गोंधळतो आणि तिचा दाबलेला गळा सोडुन तरातरा जिना उतरुन खाली जातो. माई भेलकंडण्या आधी दत्ता, सरिता आणि छाया तिला पकडतात. माईची ती अवस्था पाहुन तिच्यात अवसानघातकीपणासोबत दळभद्रीपणा देखिल पुर्ण मुरला आहे याची जाणीव होते आणि नाईकांच्या वाड्यात रहाणार्यांपैकी फक्त पांडुच काय तो शहाणा हे मनोमन पटते.
गळा आवळाण्याचा सीन एवढा हस्यास्पद झाला की माईचा ओरिजिनल स्वभाव पाहता तो सीन शूट झाल्यावर तिने तिच्या पेटंट पहाडी हसण्याने आक्खा वाडा डोक्यावर घेतला असेल यात शंका नाही
प्रेकॅप मधे माजघरात माई खाटेवर झोपली आहे, सरिता तिच्या पायाशी बसली आहे आणि माधव माईच्या डोक्यावर हात ठेवत तिच्या या अवस्थेला तोच जबाबदार आहे असं म्हणत आहे. धन्य आहे रे बाबा...!!
सरिताला खणा+नारळाची ओटी
सरिताला खणा+नारळाची ओटी आणायला लावते. सरिताही पडात्या फुलाची आज्ञा शिरसावंद्य मानुन लगेच तरातरा जिना उतरुन आणि परत चढुन पुढच्या मिनिटाला एका थाळीत ब्लाऊज पिस्+नारळ + हिरव्या बांगड्या+ हळदीकुंकवाचा करंडा इत्यादी सर्व साग्रसंगीत मांडुन ते माईपुढे धरते. गळा आवळुन घेतलेल्या अवस्थेतही माई त्या थाळीतील हळदी कुंकवाच्या करंड्यात मधलं बोट आणि अरंगळी बुडवुन स्वतःच्या कपाळावर सौभाग्यलेणं लावत सर्वांना (प्रेक्षकांना देखिल..!) उपदेश देते तो असा - "ज्या हातांनी तिच्या गळ्यात मंगळसुत्र बांधलं त्याच हातांनी तिला मरण येणं म्हणजे किती थोर भाग्य..!" तर ते भाग्य तिला मिळाल्यानंतर सरिताने पाच सवाष्णं जेवायला घाल म्हणुन उपदेशही देते..!! (आता बोला..!)>>>>>>>>>>>>>>.. सिरीयल कॉमेडी होत चाललीये म्हणजे एकंदर
डि जे..... तुम्ही धन्य आहात
डि जे..... तुम्ही धन्य आहात
काय रसभरित वर्णन केलयं.. मान गये आप को.
धन्यवाद प्रसन्नजी
धन्यवाद प्रसन्नजी
आताच फेबू वर बघितला गळा
आताच फेबू वर बघितला गळा दाबण्याचा सीन. मारा. मारा माका
मी पण बघितला झी५ वर.... हसुन
मी पण बघितला झी५ वर.... हसुन हसुन फुटलो मी.... दत्त्य्या बैल आहे साला... घोडा अर्ध्या विजारीत नुसता रडत बसतयं... बायकोने नारळ आणल्यावर, तोच द्यायचा नं ठेवुन मागच्या मागे अण्णुकल्याच्या टाळक्यावर.
(No subject)
(No subject)
ओटी भरुन घेण्यासाठी ती गळा
ओटी भरुन घेण्यासाठी ती गळा अवळलेल्या स्थितीतही डोळे चकणे करत सरिताला खणा+नारळाची ओटी आणायला लावते. सरिताही पडात्या फुलाची आज्ञा शिरसावंद्य मानुन लगेच तरातरा जिना उतरुन आणि परत चढुन पुढच्या मिनिटाला एका थाळीत ब्लाऊज पिस्+नारळ + हिरव्या बांगड्या+ हळदीकुंकवाचा करंडा इत्यादी सर्व साग्रसंगीत मांडुन ते माईपुढे धरते. गळा आवळुन घेतलेल्या अवस्थेतही माई त्या थाळीतील हळदी कुंकवाच्या करंड्यात मधलं बोट आणि अरंगळी बुडवुन स्वतःच्या कपाळावर सौभाग्यलेणं लावत सर्वांना (प्रेक्षकांना देखिल..!) उपदेश देते तो असा - "ज्या हातांनी तिच्या गळ्यात मंगळसुत्र बांधलं त्याच हातांनी तिला मरण येणं म्हणजे किती थोर भाग्य..!" तर ते भाग्य तिला मिळाल्यानंतर सरिताने पाच सवाष्णं जेवायला घाल म्हणुन उपदेशही देते..!! (आता बोला..!) आणि सरिता, दत्ता, छायासहित आपणा सर्वांना ते याची डोळा बघायला मिळतंय म्हणजे केवढा सुवर्णयोग म्हणायचा नाही का..!! Uhoh Proud Biggrin>> किती स्टुपिड माझा तर विश्वासच बसेना इतके रिग्रेसिव कसे दाखवू शकतात? पूर्वी ह्या लोकांबद्दल एक प्रकारची ममता वाटत असे, आपले पण पण कालच्या एपिसोड नंतर सर्वच बेकार लोक्स आहेत असे मत झाले. हॉरिबल वाटले मला ते जे काही आपले पण वाट्त होते ते सर्व खलास.
कॉपी पेस्ट करताना काहीत री गडब ड झालेली. लॅप्टॉपचा इशू आहे.
शांत व्हा.. शांत व्हा अमा..
शांत व्हा.. शांत व्हा अमा.. अहो थोडं दाखवलं त्यांनी तसं म्हणुन एवढं काय मनाला लावुन घ्यायचं..? टेक अ चिल पिल.. आज-उद्या होईल सर्व व्यावस्थीत. माईचं नरडं इतकं मोठं आहे की आण्णा ते आवळु शकला नाही. तसं राखेचा१ मधे ती होती म्हणुन मी तो सिन निर्धास्तपणे एंजॉय केला
काहीही म्हणा राखेचा१ आणि २ मधिल एपिसोड काउंट बघता माईनेच सर्वात जास्त पैसे कमावले असणार. येडा बनके पेडा खा रही है माई
आणि नाईकांच्या वाड्यात
आणि नाईकांच्या वाड्यात रहाणार्यांपैकी फक्त पांडुच काय तो शहाणा हे मनोमन पटते. +१००
गळा आवळाण्याचा सीन एवढा हस्यास्पद झाला की माईचा ओरिजिनल स्वभाव पाहता तो सीन शूट झाल्यावर तिने तिच्या पेटंट पहाडी हसण्याने आक्खा वाडा डोक्यावर घेतला असेल यात शंका नाही Biggrin सहमत
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/anna-and-mai-romance-in-ratris-...
डिजे , जाम हसवलत.
https://www.loksatta.com
...
कालचा सिन पाहताना मला अमांची
कालचा सिन पाहताना मला अमांची आठवण आलेली. त्यांचे माईप्रेम सगळ्यांना माहीत आहे. मला वाटलच होतं आता अमा चिडणार या सीन मुळे
वाइच चाय बटर घी.
वाइच चाय बटर घी.
झी च्या हिरविणी किती
झी च्या हिरविणी किती अभिमानाने मिरवतात मी पण इंदुमती नाइक असंय. मी पण कुमुदिनी वसंत( का काय ते इसारलंय) पाटणकर आहे.
मी राधिका गुरुनाथ सुभेदार, मी आसावरी बबड्याची आई.......... अरेच्चा अभिज्जित राजे. असे जोराजोरात ओरडून सांगत असतात. पण वेळ आली की तेच जुनाट विचार. राधिकापण अजूनही सौमित्रला सौमित्र आणि गुरू ला हे म्हणते. काये हे?! आँ
खरे तर पाटण करणीने लफडे करायचे नाये. केले तर पैसे दागिने घेउन नवर्यासक ट आधीच पोबारा कराय्ला हवा होता. तो वारल्यावर नणंदे बरोबर सरळ जता आले असते मुंबईस. नाहीतर माधव पाठवत होता तेव्हा.
माईला पण माधव बरोबर जाता येइल व सरिता दत्ता तिच्या माहेरी.
छायाला शाळेत शिकवणे किंवा काही प्रोग्रेसिव्ह उद्योग करून आरामात राहता येइल व दुसरे लग्न पण कर्ता येइल. माधवाबरोबर मुंबईस जाउन. वाड्यात काय ठेवले आहे. आण्नास एक दिवस शेवंता बरोबर पिकनिकला धाडून कपाट फोडून दागिने वाटून घेता आले असते.
हाय काय न नाय काय.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/anna-and-mai-romance-in-ratris-...
डिजे , जाम हसवलत.
नवीन Submitted by रश्मी.. on 28 February, 2020 - 04:51
>>>>
हि लिंक वाचून मला भारीच हसू आले तो लिबलिबीत डोळ्यांचा अण्णा आणि माई भारीच जोडी।
@ रश्मी.. वैनी, लोकसत्ताच्या
@ रश्मी.. वैनी, लोकसत्ताच्या लिन्क बद्दल थँक यु.
मला वाटते आता माई-आण्णाचा रोमांस सुरु झाल्यावर आण्णाचं पाटणकरणीकडॅ दुर्लक्ष होईल आणि मग सुडाच्या आगीत ती स्वतःला वाड्यासमोरच्या झाडाला टांगुन घेईल. (किंवा असंही होईल की आण्णाला माईशी संसार करण्यात रस येईल आणि तो पाटणकरणीचं कलम लावेल)
कालच्या भागात पुन्हा एकदा
कालच्या भागात पुन्हा एकदा धुमशान घडलं.
काल पोष्टे काका आले होते .त्यांच्या रिटायरमेंट बद्दल आणि मुलीच्या लग्नाबद्दल एव्हाना सर्वांना माहिती झालं आहेच. तर काल ते माईच्या घरात जाऊन बसले. माईकडुन चौकशी करवुन घेतल्यावर तिला त्यांनी मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या नव्या साड्या दाखवल्या. गरीब असलो तरी मुलीचं लग्न धुमधडाक्यात लावणर असंही बोलले. शिवाय माईस ते स्वतःची बहीण मानतात असंही ठोकुन दिलं (त्यामुळे मनातला किंतु जाऊन मी त्यांना पोष्ट्या ऐवजी पोष्टे काका म्हणु लागलो ). मग काय माई त्यांच्या बोलण्याने पाघळलीच. लगेच माजघरात जाऊन तिने सोन्याचं वेढणं लग्नासाठी आहेर म्हणुन दिलं
इकडे आण्णा पाटणकरणीला खुश करायला माईचा साज भेट देतो. पाटणकरीण तो साज घालुन रात्री पाणी भरायला बावीकडे जात असते तेव्हा तिला वाड्याच्या गॅलरीत सरलरीतुभी दिसते. तिचे लक्ष मुद्दम वेधुन घेत तिला साज दिसेल अशा पद्धतीने तिच्याशी बोलते. मग काय सरिता लगेच सासुला जाऊन सांगते.
प्रीकॅप मधे पाटणकरीण बावीवर पाणी भरायला जाते तेव्हा माई हातात कोयता घेऊन तो थेट पाटणकरणीच्या गळ्याला लावताना दाखवली आहे. आजच्या भागात फुल टू भांडण असणार ते बघायची उत्सुकता आहे
Pages