रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ सान्वी, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. पाटणकरणीचं नवीन घर मला सुद्धा दिसलं नाही तिथे. बहुतेक नवीन बांधलं असावं. निदान मला तरी ते प्लायवुडचं वाटतंय. तिचं जुनं घर मात्र ओरिजिनाल आहे.

@ चंपा : >> हो ना.. मला तर तसंच वाट्त होतं की रॉकेलचा डबा आण्ण्याच्या अंगावर ओतेल पण माईने नको तिथे कच खाल्ली.

राखेचा ची गाडी आता सवती-सवतींच्या भांडणाच्या सरधोपट रस्त्याने जाईल असे वाटते. पण ह्या सवती मालवणी असल्याने बघायला मजा येईल बहुतेक. बाकी काल पोष्ट्याने दोन्ही घरचा पाहुणा होऊन फुक्कटचा चहा ढोसला.
पोष्ट्या नाईकांच्या घरात उगिच नाक खुपसतो आहे. सरिताला खोदुन-खोदुन विचारलं त्याने माईने अंगावर रॉकेल का ओतुन घेतलं ते. नंतर माई त्याच्यासाठी चहा घेऊन आली तर हापापल्या सारखा बघत तिला म्हणतो कसा - "आवशे, तु जिवाचं काही बरं वाईट करुन घेतला तर माका च्याय कोण देईल Uhoh ". रिटायरमेंटला आला तरी याची पत्रं त्याला अन त्याची पत्रं ह्याला देत असतो म्हणुन पाटणकरणीने लास्ट टाईम त्याला क्लासिफिकेशन शिकवलं होतं ते चहा पिता-पिता त्याने माईला ऐकवलं. माईला तरी काय गरज होती त्याच्या क्लासिफिकेशन शिकवणार्‍या गुरवीणीला हात जोडण्याची तरी तिने ते जोडले आणि आपल्या पोष्ट्याने पण तिला पाटणकरणीने हे शिकवलं हे सांगितलं. (कालचा भाग पाहुन पोष्ट्याचं तिकिट माईच कंफर्म करेल अस वाटतंय आता मला Proud ). नंतर पाट्णकरणीने त्याला तिच्या घरी बोलावले आणि चहा सहित (करपलेले) थालीपिठ पण दिले खायला. ते बघुन माईचा भयंकर जळफळात झाला.. (मला वाटलं पाटणकरणीने पोष्ट्याला थालिपीठ् दिलं म्हणुन माई त्याला फरफटत घरात नेऊन बांगडा खाऊ घालते की काय.. पण तसं नाही झालं..!)

त्यानंतर पाटणकरणीच्या घरासमोर कुणीतरी घाण केलेली असते ती धुवायला पाटणकरीण घरातलं सगळं पाणी ओतते. आता पाणी संपलं म्हणुन माईच्या बावीत रात्री पाणी शेंदायला जाते ते आण्णोबा माडीवरुन बघतो. काल आजचा प्रेकॅप दाखवला त्यात चोंट्या पाटणकरणीच्या घरात पाणी आणण्यासाठी माईच्या बावीवर जातो ते सरिता बघते आणि त्याने शेंदलेली पाण्याची कळशी त्याच्याच अंगावर ओतुन त्याचं भिजलं मांजर करते Biggrin

मागच्या आठवड्यात आकेरी ला जाण झालं. वाड्यात बाहेरच शूट सुरु होता. आण्णा आणि माई, माई राखेची सीमा काढत होती. भारी वाटलं. अण्णा फुल कॅरॅक्टर मध्ये होते सो ब्रेक ला पण झोपाळ्यावर त्याच अंदाजात बसलेला.
नंतर दत्ता, सरिता छाया दिसले. सेल्फी काढता आला नाही. आम्ही निघताना शेवंता आली. पटकन आत गेली सो दिसली नाही.
वच्छी आणि शेवंता चा घर बघितलं. अगदी साधं

अरे व उर्मिलास. तुम्हाला तर बरिच स्टारकास्ट सापडली तिथे. छान Bw

कालच्या भागात शेवंता आणि चोंट्याचं चहापुराण आणि माईसोबत जुगलबंदी दाखवली. माईने सकाळी सकाळी बावीत पाणी शेंदायला आलेल्या शेवंताला चांगलेच सुनावले आणि दिवसा इथे पाणि भरु नको असे सांगुन रात्रीचं पाणी भरण्याची मुभा दिली. मग काय शेवंताला आयतीच शिकार मिळणार आज Wink
सरिताला बघायला वच्छी आणि आबा आले होते. वच्छीने कसल्यातरी विड्याचे पान सरिताला ठेवायला दिले आहे जे तिचं अवदसेपासुन रक्षण करेल म्हणे Uhoh मग सरिताने पण तिला पाटणकरणीचा बंदोबस्त कर म्हणुन आवाहन केलं त्याबरहुकुम वच्छीने अजुन एक विड्याचं पान तयार करुन दत्ता करवी ते पाटणकरणीच्या घरात ठेवायला सांगितलं आहे. दत्ताला जेव्हा सरिता ते पान पाटणकरणीच्या घरी ठेवायला सांगते तेव्हा तो आधी नाही नाही करतो पण तिने मुलाची शप्पथ घालुन त्याच्याकडुन हे काम करवुन हे काम करायला भाग पाडलेच. त्यांचे बोलणे माधवने बाहेरुन ऐकले.
आज रात्री बावीत पाणी शेंदणार्‍या पाटणकरीण आणि आण्णोबाची जुगलबंदी बघायला मिळेल त्याचवेळेस दत्ता विड्याचे पान ठेवायला पाटणाकरणीच्या घरात जाणाअर असं दाखवलं प्रेकॅप मधे. बघु आता आज काय होतं ते.

आता शेवंता एकदम स्लीव्ह्लेस व रंगीत साडी क्या बात है. कालच्या भागात एकदम सुरुवातीला वच्छी व आबा घराकडे येत असतात तेव्हा मागून एक कुत्रा येतो व लेफ्टला पळून जातो. लगेच तोच कुत्रा घराच्या फा टकाच्या बाजूला झुडूप आहे त्यातून तोच कुत्रा येतो व परत लेफ्ट ला पळून जातो. आबा व वच्छीच्या मागे हे कुत्रा भूत नाट्य.

सरिता व वच्छीची दया येते. अशिक्षित अर्धशिक्षित बायका लगेच घाबरतात व असे उपाय करू लागतात. सॅड.

लगेच तोच कुत्रा घराच्या फा टकाच्या बाजूला झुडूप आहे त्यातून तोच कुत्रा येतो व परत लेफ्ट ला पळून जातो. >> हो मला पण ते जाणवलं Proud
अशिक्षित अर्धशिक्षित बायका लगेच घाबरतात व असे उपाय करू लागतात. >> अहो असं काही नसतं ...

हल्ली मला राजा राणी ची ग जोडी नी यड लावलाय.

रात्री साडे दहा ला दोन्ही सिरीयल पण राखेचा न बघता राजा रानी बघते ही सकाळी zee 5 वर बघते.

पी एच डी झालेल्या बाईचा किस्सा होता ना इथे, कुठे गेला तो, ही काय भुताटकी >> अहो दुसर्‍या धाग्यावर वाचला असेल

पी एच डी झालेल्या बाईचा किस्सा होता ना इथे, कुठे गेला तो, ही काय भुताटकी > >>>> अहो त्या निलीमाबद्दल बोलत असतील.

डीजे यांनीच टाकला होता. आता वेड घेऊन पेडगावला जाताहेत. वेधशाळेत काम करणारी, पी एच डी झालेली वैज्ञानिक बाई असे अंधविश्वास वाटावे असे उपाय करते. अमा यांच्या पोस्टला उत्तर म्हणून लिहिलं होतं त्यांनी हे. असो.
आज काय झालं ते लिहा ही विनंती. रिपीट किती वाजता असतो याचा.

रिपीट.....??? नो वे................ एकदा मिसला की कायमचा मिसला Uhoh

झी५ चा आधार घ्यावा लागतो मग.

काल जास्त काहि नाही झालं. तेच ते पाटणकरणीचं रात्री पाणी शेंदणं आणि मग आण्णाशी आखमिचौली. Wink
सरिता आणि दत्ताचं पाटणकरणीच्या घरात विडा ठेवण्यावरुन धुसफुस. मग दत्ताला पाटणकरणीच्या घरी विडा ठेवायला जाताना माधवाकडुन आडथळा . पुन्हा कसाबसा पेंगत तो दत्ता एकदाचा पाटणकरणीच्या घरात वीडा घेऊन पोचला. पाटणकरीण पाणी आणण्याच्या बहाण्याने आण्णोबाशी आखमिचौली खेळत असते म्हणुन दत्ताला तो वीडा ठेवताना यथेच्छ धांदरटपणा करायला मोकळा वेळ मिळाला. पण.. आज धांदरटपणामुळे दत्ता सापडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे Uhoh

अहो मी इतर बायकांबद्दल नव्हे त्या वच्छी व सरिताच अर्धशिक्षित व अशिक्षित असल्याने बिच्यार्‍या घाबरून काहीतरी उपाय करू बघतात. खरेतर परिस्थिती त्यांच्या हातातली नाही अस< पान बिब्बे ठेवून काही होते का. दोघींची काळजीच वा टते मला. वच्छीचे तर जीवन उध्वस्त केले
आन्णाने.

काल तर निव्वळ टीपी एपिसोड.

हो.. तसेही पाटणकरबाईला अंधारात दत्ता ओळखु येणारच नाही म्हणा..! फक्त त्याने तोंड उघडुन दात इचकावायला नको.. Biggrin

आज सरिता दत्ताला लय ठोकणार बहुतेक. Uhoh

परवाच्या भागात आण्णाला खिजवुन निल्याकडुन इंग्लिश दारुची बॉटल आणुन पाटणकरणीने ती दारासमोर ओतुन आग लावली. काय तर म्हणे ती माईच्या वाड्यात पण अशीच आग लावणार. तिला इंग्लिश दारु आवडते असे वाटुन आण्णोबाने नेने वकिलाकरवी तिच्यासाठी बॉटल पाठवली जी तिने रात्री घरासमोर आण्णाच्या देखत फोडुन टाकली. दुसर्‍या दिवशी सकाळी त्या बॉटलच्या काचांपैकी एक दत्त्ताच्या पायात घुसली. त्याला स्वतःच्या घराच्या ओसरीत बसवुन पाटणकरीण त्याच्या जखमी पायावर बँडेज बांधते आणि हा सगळा प्रकार सरिता दात-ओठ खात बघते आहे असा प्रेकॅप दाखवला Uhoh

पण ती सरिता जरा जास्तीच करते असे नाही का वाटत?! अर्धव ट स्त्री आहे. कोणत्याच प्रसंगाचा काहीही विचार न करता रिअ‍ॅक्ट होते. त्या मानाने छाया हुषार आहे. नीट अर्थ लावते घटनांचा. विचार करते, माई सोशीक आहे व देवभिरू. गप्प राहून देवासमोर सर्व मांडते. पा टण करीण चलाख आहे. व स्वार्थी. वच्छी धुमधडाका.

खरे तर घरातल्या सर्व बाप्यांना पाटण करणीची ओढ आहे. व लेडीज हे ट हर फॉर द सेम रीझन.

गच्चीत माई ने लावलेली साडी( चा पडदा) काढून टाकली अण्णू ने.

पण ती सरिता जरा जास्तीच करते असे नाही का वाटत?>> हो ना अमा. ती सरिता ओव्हरॅक्टिंग करते. माझ्या पण डोक्यात जाते ती हल्ली. माईने खुप लाडावुन ठेवली आहे तिला. अधेमधे वेळप्रसंगी एक थोतरीत ठेऊन दिली असती तर ती आता अशी वागली नसती. Proud

माईने गच्चीत लावलेल्या साड्या कोणी कधी काढल्या हे मला पण कळालं नाही.

माईने गच्चीत लावलेल्या साड्या कोणी कधी काढल्या हे मला पण कळालं नाही.>> अहो अण्नाच तो . फुकटचा शिणुमा बघायास होवा ना. जे माका जाय ते माका जायच अशी वृत्ती आहे लंपटाची.

तो अण्णा कानामागचा बोळा काढून हुंगतो ते मला इतकं किळसवाणं वाटतं :यक्क: सरिता सांगत असते छायाला की माझा नवरा कोणत्या बाईकडे चुकूनही बघत नाही आणि तेव्हाच पाटकरिण त्याला मलमपट्टी करत असते Happy

होय सरिता अतिच करतेय हल्ली.
खर तर काही ही घडत नाहीये सध्या सिरियलमध्ये.
आता शेवंता लटकलेली दाखवायची आहे पण सगळा trp शेवंताच खेचून आणतेय म्हणून तिला सम्पवता पण येत नाहीये . म्हणून काही ही टाईम पास चाललाय .

परवा माई, छाया आणि सरिता खूप दिवसांनी स्वयपाक घरात कामं करता करता एकमेकींना कोपरखळ्या देत होत्या. सरिता शेवग्याची हिरवीगार पाने निवडत बसली होती तेव्हा पांडु आला आणि बाहेर कुणालातरी पायाला काच लागली म्हणुन सांगु लागला.. तिघींनी कोणाला काच लागली म्हणुन त्याला विचारलं तर तो नेहमीप्रमाणॅ 'इसारलं' म्हणुन मोकळा

अपेक्षेप्रमाणे सरिताने भयानक आरडाओरडा केला. पाटणकरणीला आणि दत्ताला अगदी घालुन-पाडुन बोलली.

काल आण्णा पाटणकरणीला शोधत होता पण तिचा थांगपत्ता लागलाच नाही. सकाळी उठल्याबरोबर आण्णाने कपाट उघडुन तीर्थ प्राशन केले तेव्हा माई हातात गरम चहा घेऊन आलेली. आण्णा पाठमोरा घुटके घेत असतानाच ती आल्यापावली माघारी फिरली आणि चहा पातेल्यात ओतुन सरिताशी बोलत बसली. त्यानंतर सरिताचे आई-वडील आले तर आण्णाने तिच्या वडिलांचा अपमान केला. गावच्या जत्रेसाठी न्यायला आलेल्या वडिलांचा अपमान सरिताला सहन झाला नाही आणि तिने सर्वांसमक्ष आण्णाला चांगलेच सुनावले. मग आण्णा काहीही न बोलता घरातुन ताकाच्या गुत्त्यात गेला. चोंट्याला ताक आणि पैशांचे आमिष दाखवुन पाटणकरणीचा पत्ता विचारला पण त्याला ते माहित नसल्याने सांगितले नाही तेव्हा त्याला कानफाड देऊन हाकलले.
इकडे वाड्यात सगळे सरिताच्या माहेरी जत्रेसाठी गेलेत. फक्त माधव घरी थांबलाय. आज घरात कोणी नाही असे बघुन आण्णा पाटणकरणीला घरी आणण्यासाठी तिच्या घराकडे जातो पण घराला कुलुप असते असा प्रेकॅप दाखवला. आज आण्णा माधवला तीर्थ पाजणार आहे असेही प्रेकॅप मधे दाखवले.

धन्यवाद डीजे. तुमच्या तपशीलवार प्रतिसादामुळे काय झाले ते कळते आणि बघायला मिळत नसले तरी रुखरुख लागत नाही. झीचे अँप फार डेटा खाते.

धन्यवाद DJ, तपशीलवार सांगितल्याबद्दल . सध्या घरात furniture चे काम सुरू असल्यामुळे काही दिवस tv बंद आहे. राखेचा ची रोज आठवण येते.

चंपा आणि सान्वी, काही काळजी करु नका. मी इथे सांगत राहीन काल काय काय झालं ते Proud

काल माई, दत्ता, सरिता, छाया सर्वजण सरिताच्या माहेरी गेले होते. हसतखेळत मस्त जेवले. सरिता अन माईच्या आणि सासु+सासरा अन दत्ताच्या गोडुगोडु च्या नात्यांची छायाने "कुणीतर माका पण दत्तक घेवा" असे म्हणुन मस्त टर उडवली Proud . त्यानंतर सरिता अन तिची आई स्वयपाक घरात जेवणासाठी गेली तेव्हा सरिता आण्णाच्या कागाळ्या सांगु लागली तशी तिच्या आईने तिला स्पष्ट शब्दात सांगितले की आता तु नाईकांची सून आहेस. घरातल्या गोष्टी मला सांगितल्या तसे आता इतर कुणालाही सांगु नको. तुझ्या सासुने जसा संसार केला आणि घरावर माया केली तशीच तु पण कर. साशीच्या पावलावर पाऊल ठेव असे सांगुन तिला गप्प केले.

इकडे वाड्यात आण्णा घरभर फिरला. घरात कोणीच नाही हे पाहुन पाटणकरणीला वाड्यात आणण्यासाठी तिच्या घरी गेला तर घराला कुलुप. मग आल्या पावली माघारी आला तर माधव घरात होता. माधवाला आपल्यावर वॉच ठेवुन माई बाहेर गेली असे त्याला वाटले. कावेबाज आण्णाने मग जेवणाचे ताट माडिवर घेऊन आलेल्या माधवाला भरपूर दारु पाजली. फार रटाळ सीन होता तो. कधी एकदा माई, दत्ता, सरिता अन छाया घरी येऊन या सीन मधुन बाहेर येतो असं झालं होतं पण तेवढ्यात माधव लुडकला आणि आण्णाला मागच्या बावीवर पाटणकरीण पाणी शेंदताना दिसली Wink
आजच्या प्रेकॅप मधे आण्णा आणि पाटणकरणीची भेट होते असं दाखवलं आहे.. पण त्याचवेळी घरचे सर्वजण येतील आणि दोघांना रंगेहात पकडतील असं वाटतंय.. बघु आता आज काय होतं ते.

फार रटाळ सीन होता तो. असं काही नाही हो. उलट मला तो सीन खूप आवडला . पहिल्यान्दाच अण्णा आणि माधवचं बाप-मुलगा म्हणून जिव्हाळ्याचं नातं दर्शवणारं बोलणं होतं ... " माधवा , मी एवढा वायट नसंय रे ... अरे मेल्या बाप असंय तुझा" असं जेव्हा अण्णा म्हणतो तेव्हा कुठेतरी अण्णाच्या राकट स्वभावाच्या काळ्या ढगाला मायेची रूपेरी किनार असल्याचे जाणवले . भले दारु पिउन का असेना , अण्णाला पोरगा आता स्वतः बाप होतोय याची जाणीव झालीय . त्या भागातले (१९ फेब २०२०) संवादलेखन मला प्रचंड भावले !

काल अण्णाने शक्कल लढवून माई, दत्ता, छाया अन सरिता ला गुंगारा देवून गुपचूप घरात प्रवेश मिळवला . त्याआधी माधव अण्णाच्या बेडवर दारु पिवून झोपला , पण तो अण्णाच झोपलाय असं समजून सरिताने माधववर संशय घेतला आणि त्याला बघायला शेवन्ताच्या घरात गेली ! पण तिथे कोणीच नव्हते कारण अण्णा गुपचूप शेवन्ताकडून निघून घरामागे लपला होता . शेवन्ताने सरिताची खूप खिल्ली उडवली आणि फणफणत सरिता घरी आली . दत्ताला परत माधवच्या खोलीत पाठवले तर तोपर्यन्त अण्णाने माधवला जागे करुन त्याच्या खोलीत पाठवलेले असते, पण तो नशेत असल्याने पलंगाखाली जाउन झोपतो . दत्ताला वाटते की माधव पलंगाखाली असल्यानेच आपल्याला अगोदर दिसला नसेल ... पण माधव दारु प्याल्याचे बिंग शेवटी सकाळी विहिरीवर फुटतेच !

होय सरिता अतिच करतेय हल्ली. सरिताच्या आततायी स्वभावाचे दुष्परिणाम नन्तर तिला भोगावे लागतात. आपल्याला सून अद्वातद्वा बोलते याचा राग अण्णाने मनात धरलेला असतो . पहिल्या सीझन मध्ये दाखवलंय की अण्णाच्या मॄत्युपत्रात दत्ता अन सरिता याना फारसे काही मिळत नाही , याचे कारण सरिताने वेळोवेळी अण्णाला उलट उत्तरे द्लेली असतात त्याचा परिणाम म्हणून अण्णा असा सूड उगवतो !

Pages