"तू " अधिक " मी " किती ?

Submitted by सिद्धेश्वर विला... on 28 January, 2019 - 03:45

किती सोपा प्रश्न होता माझा

"तू " अधिक " मी " किती ?

तू उत्तर दिलेस "दोन"

अंतर्मुख होऊनि शोधू लागलो

आपण आहोत तरी कोण ?

मला अपेक्षीत “एक " होते

आपल्यात मुळी अंतरच नव्हते

दोन देण्यामागे कारण काय होते?

जर तू माझ्यात होतीस

मग मी तुझ्यात का नव्हतो ?

आणि मी तुझ्यात नव्हतो

तर मी कुठे होतो ?

गणित सोपे जरी वाटले दुरून

अवघड झाले उत्तरावरून

का दिलेस तू विचित्र उत्तर ?

कुढत गेलो पुढे निरंतर

जवळ घेतला मद्याचा प्याला

शोधत गेलो मला स्वतःला

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults