सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीदान समारंभ आणि पगडी

Submitted by DJ. on 11 January, 2019 - 07:27

आज सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीदान समारंभ होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कार्यक्रमाची तयारी जोरदार केलेली दिसत होती. पण जसजशी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तसतशी प्रमुख पाहुणे, विद्यार्थी हे नेहमीप्रमाणे काळा पायघोळ झगा व त्यावर काळी गोल-चपटी-एका बाजुला काळा गोंडा लोंबणारी टोपी न घालता लग्न-समारंभात जाताना घालावेत तसे कपडे परिधान करुन आलेले दिसु लागले. चटकन लक्षात येण्याजोगी गोष्ट म्हणजे त्यापैकी बर्‍याच जणांनी स्वतःच्या डोक्यावर लालभडक पगडी घातली होती. अचानक काही विद्यार्थी उठुन व्यासपीठाकडे जाऊन पगडीच्या धिक्काराच्या घोषणा देऊ लागले. इतक्यात प्रवेशद्वारापाशी अगदी तश्शीच लालभडक पगडी घातलेले खेचर अवतीर्ण झाले. एवढी वर्षं विद्यापीठात पदवीदान समारंभ होतोय पण कार्यक्रमाची अशी शोभा कधी झाली नाही. हे असे का घडले असावे..?

khechar.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages