सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीदान समारंभ आणि पगडी

Submitted by DJ. on 11 January, 2019 - 07:27

आज सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीदान समारंभ होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कार्यक्रमाची तयारी जोरदार केलेली दिसत होती. पण जसजशी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तसतशी प्रमुख पाहुणे, विद्यार्थी हे नेहमीप्रमाणे काळा पायघोळ झगा व त्यावर काळी गोल-चपटी-एका बाजुला काळा गोंडा लोंबणारी टोपी न घालता लग्न-समारंभात जाताना घालावेत तसे कपडे परिधान करुन आलेले दिसु लागले. चटकन लक्षात येण्याजोगी गोष्ट म्हणजे त्यापैकी बर्‍याच जणांनी स्वतःच्या डोक्यावर लालभडक पगडी घातली होती. अचानक काही विद्यार्थी उठुन व्यासपीठाकडे जाऊन पगडीच्या धिक्काराच्या घोषणा देऊ लागले. इतक्यात प्रवेशद्वारापाशी अगदी तश्शीच लालभडक पगडी घातलेले खेचर अवतीर्ण झाले. एवढी वर्षं विद्यापीठात पदवीदान समारंभ होतोय पण कार्यक्रमाची अशी शोभा कधी झाली नाही. हे असे का घडले असावे..?

khechar.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे पक्ष हारण्याच्या भितीत आहेत ने निवडणुकांसाठी कोणतेतरी मुद्दे शोधत आहेत. सतत पहिल्या पानावर नाव दिसले पाहिजे कसेही करून.

हे सुरु राहिलं तर पहिल्या विसात असलेली सावित्रिबाइ फुले युनिवर्सिटि पहिल्या पन्नासातही उरणार नाही.

पन ते गाढव का खेचर Lol
?

काही फॅक्ट:
१ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवीप्रदान सोहळ्याचा ड्रेस कोड बदलून काळ्या गाऊन ऐवजी पांढरा कुर्ता, सलवार आणि उपरणे असा केला, त्यात पगडी कुठेही नव्हती.
२. आयआयटी मुंबईच्या पदवी प्रदान सोहळ्याचा हाच ड्रेस कोड गेली अनेक वर्षे आहे ( इतर आयआयटी मध्येही असेल, कल्पना नाही)
३ सगळ्यात महत्वाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात आपण पदवी घेतली ही कौतुकाची गोष्टच वाटत नाही. सगळ्या अभ्यास शाखांचे वेगवेगळे डेस्क टाकलेले असतात तिथून पदवी घ्यायची असते- त्यासाठी साधारण रेल्वे तिकिट काउंटरला असते तेवढी रांग असते- BA, BCom, BE, मास्टर्स, m phil, phd काहीही असो पदवी या रांगेत थांबूनच घ्यायची. Engineers ची रांग सगळ्यात लांब आणि बेशिस्त असते., स्टेजवर फक्त टॉप 5 ना पदवी देतात.

विध्यापिठा मध्ये विद्या सोडून दुसरे धंदे सुरु झाले आणि सगळी आरक्षणाची गाढवे भरली म्हणून झाले असे ...
<<
आरक्षणाची गाढवे व अर्बन नक्षली.

द्वेष.
जाणत्या राजाने मागे पगडीच्या विरोधात काडी टाकली होती.पगडी हे विद्वत्तेचे प्रतीक समजले जात असे.आता त्यातही जात आली.

विद्यापीठ म्हणजे जिथे विद्येचे पीठ होते .
पदवी मिळवली म्हणजे काय मोठी गोष्ट केलेली असते या मुर्खांनी कशाला हवाय पदवीदान समारंभ आणि त्यावर उपटणारे फूकटचे वाद

विद्यापिठाने एकतर नेहमीचा पदविदान पोषाखच ठेवायला हवा होता. ते त्यांना जमले नाही ते नाहीच निदान सर्वसमावेशक फेटा चालला असता जेणेकरुन फुकाचा वाद उफाळुन आला नसता.

सगळ्यात महत्वाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात आपण पदवी घेतली ही कौतुकाची गोष्टच वाटत नाही. सगळ्या अभ्यास शाखांचे वेगवेगळे डेस्क टाकलेले असतात तिथून पदवी घ्यायची असते- त्यासाठी साधारण रेल्वे तिकिट काउंटरला असते तेवढी रांग असते- BA, BCom, BE, मास्टर्स, m phil, phd काहीही असो पदवी या रांगेत थांबूनच घ्यायची.
Engineers ची रांग सगळ्यात लांब आणि बेशिस्त असते., स्टेजवर फक्त टॉप 5 ना पदवी देतात.+१११११११११

तिथे फोटो काढायला १००+_ रुपये द्यायचे, मोबाईल वर चालत नाही, त्या पोशाखाच भाड वेगळ..

काहीही होतंय आजकाल,
लोकांना एव्हढा वेळ कुठून मिळतो काय माहित गदारोळ वगैरे करायला,

इथे साधं भांडण कराव घरात्ल्या घरात असं म्हटलं तरी वेळेअभावी करता येत नै, क्वालीटी टाएम स्पोइल होइल म्हणून

पदवीदान समारंभ हेच खूळ वाटतं. तो काळा डगला आणि पगडी न परिधान करता गेलं तर गुण कमी होतात का ?
विद्यापीठाने त्यापेक्षा दर्जा सुधारण्याकडे लक्ष द्यावं. जेनेयू चा दौरा करावा एकदा.

Engineers ची रांग सगळ्यात लांब आणि बेशिस्त असते >>> Happy Happy Happy
हल्ली गदारोळ व्ह्यायला काही विषयच शिल्लक राहीले नाहीत. >>> +१
लोकांना एव्हढा वेळ कुठून मिळतो काय माहित गदारोळ वगैरे करायला, >>> +१

हे सुरु राहिलं तर पहिल्या विसात असलेली सावित्रिबाइ फुले युनिवर्सिटि पहिल्या पन्नासातही उरणार नाही.
>>>

आं? ही माहिती नवीन आहे. माझ्या माहितीनुसार जगात ल्या पहिल्या २०० विद्यापीथात भारतातले एकही नाही. हे पहिले २० कुठून काढलेत? महाराष्ट्रातल्या २० विद्यापीठात का?

?

कामदेव म्हराजा,

आवो भारतातली हो! आपलं रँकिंग भारतापूरत मर्यादित.

सावित्रीबाई व महात्मा फुले या जोडप्याने १८ शाळा स्थापन केल्या होत्या असं गुगल सांगतं. यातली पहिली बहुधा भिडे वाड्यात होती, पण एकूण तबब्ल १८ शाळा होत्या ही माहिती मला नव्हती. तर या शाळा अजून चालू आहेत का? पुण्यात कुठे आहेत? असा प्रश्न पडला. कोणाला माहीत असल्यास सांगावे , गुगलवर काही माहिती सापडली नाही.

पगडीचा धिक्कार हा काय विनोदी प्रकार आहे? लोकांना सक्ती केली आहे का पगडी घालायची? Happy

लोकांना त्यांच्या आवडीप्रमाणे व त्यांच्या पुरोगामीपणाच्या समजाप्रमाणे पगडी, पागोटे, मुंडासे, जिरेटोप, फेटा सर्व पर्याय ठेवावेत. जे काही डोक्यावर घालायचे ते त्यांच्या चॉईसप्रमाणे घालू द्या.

@ फारएण्ड : लोकांना त्यांच्या आवडीप्रमाणे व त्यांच्या पुरोगामीपणाच्या समजाप्रमाणे पगडी, पागोटे, मुंडासे, जिरेटोप, फेटा सर्व पर्याय ठेवावेत. >> ++१११

Pages