अमिताभ ची गाणी...२

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

कोणाच्याही गाण्यांचे वर्णन रफ़ीशिवाय पूर्ण होणे अशक्य आहे. रफ़ीची अमिताभसाठी गायिलेली गाणी चांगली होती, पण मला ती कधीच 'अमिताभ' स्टाईलची वाटली नाहीत. पण तशी अपेक्षा न करता ऐकली तर श्रवणीय आहेत. 'सुहाग', 'नसीब' मधे मनमोहन देसाईंनी रफ़ीचा आवाज अमिताभला देण्यास लक्ष्मीकांत प्यारेलालना भाग पाडले असावे असे वाटते, कारण रफ़ी त्यांचा आवडता गायक होता. वास्तविक त्याआधी 'अमर अकबर...' आणि 'परवरिश' मधे किशोरची गाणी गाजून सुद्धा हा बदल का केला ते आता माहीत नाही. तरीपण 'जॉन जॉनी जनार्दन','हे नाम रे सबसे बडा तेरा नाम', 'तेरी रबने बना दी जोडी' वगैरे गाणी छान होती. या व्यतिरिक्त 'मेरे देश प्रेमीयों (देश प्रेमी)', 'तेरी बिंदिया रे (अभिमान)', 'पत्ता पत्ता बूटा बूटा (एक नज़र)', 'सबसे अच्छी सबसे सुंदर बोली प्रेम की बोली (प्यार की कहानी)', 'ओ तुमसे दूर रहके (अदालत)' ही रफ़ीची गाणी सुंदर होती. पण अमिताभ, रेखा, कोठीवरचा नाच, दारूची बाटली सगळे तेच असून सुद्धा 'अठरा बरस की तू' ला 'सलाम्-ए-इश्क़' ची नशा कधी चढलीच नाही.

अमिताभला मुकेशचा आवाज कधी असू शकेल हे खरे वाटत नाही इतकी दोघांच्या गाण्याची प्रकृती वेगळी होती. मुकेशने पूर्वी प्रेम नाथला वगैरे आवाज देताना 'दुश्मन झूठे यारोंका, सच्चा यार वफ़ादारोंका (मै दीवाना मस्ताना)' अशी अमिताभच्या पिक्चर मधली वाटणारी वाक्ये म्हंटली असली तरी अमिताभच्या जमान्यातली गाणी मुकेशच्या आवाजात 'सूट' झाली नसती. खय्याम ने 'कभी कभी'त कवी अमिताभला 'मै पल
दो पल का शायर' केले तेव्हा मुकेश वापरला व पुढे तरूण पिढी दाखवताना ऋषी कपूर ला किशोर वापरला. त्याव्यतिरिक्त कल्याणजी आनंदजींनी 'अदालत' मधे पहिल्या अमिताभला 'बहना ओ बहना तेरी डोली' साठी मुकेश घेतला. आणखी कोणती मुकेशची गाणी मला आठवत नाहीत, कोणाला माहीत असल्यास कळवावीत.

हे झाले किशोर, रफ़ी आणि मुकेश या तेव्हाच्या तीन प्रमुख गायकांबद्दल. त्यावेळच्या तलत महमूद, महेंद्र कपूर, हेमंत कुमार यांचा आवाज अमिताभला कोणत्याही गाण्यांत नाही. तसेच शैलेंद्र सिंग चा आणि उदीत नारायणचाही आठवत नाही. कोणाला माहिती असल्यास दुरूस्त करीन.

बाकी गायक आता पुढच्या लेखांत...

प्रकार: 

हाही आढावा छान ..

रफी, किशोरचा आवाज मला अमिताभसाठी अर्थातच नाही पटत किशोरवरच्या अतिरीक्त प्रेमामुळे .. Happy ह्यातली काही काही गाणी तर माहितही नाहीत मला ..

अपवाद फक्त कभी कभी टायटल साँग .. मुकेश(!) चा आवाज असूनही ते मात्र आवडतं मला ..

(मन्हर उधास पुढच्या लेखात आहे का? "लुँटें कोई मनका नगर" मध्ये त्याचा आवाज वापरला आहे अमिताभसाठी त्याबद्दल मला फारच त्रास होतो ..

"उधास" नावावरून आठवण झाली , अमिताभच्या वाट्याला गजल, कव्वाली हे टाईप्स् कधी आले का?