श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये
नुकताच श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र ऐकण्याचा योग आला. अध्यात्मातले बारकावे आणि श्रीपाद प्रभूंच्या चरित्राच रसाळ वर्णन त्यात आढळते. श्रीपाद वल्लभ हे दत्त महाराजांचेच अवतार त्यानंतर त्यांनी श्री नृसिंहसरस्वती या नावाने अवतार घेतला, त्यानंतर कर्दळीवनामध्ये गुप्त होऊन श्री स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण केला. कलीयुगामध्ये दत्त महाराजांनी इतके अवतार घेण्यामागे दीन दुबळ्यांचा उध्दार आणि आणि साधकांची अध्यात्मात प्रगती हे प्रयोजन खचितच होते. त्याच श्रीपादांच्या चारीत्रामधील काही भाग इथे देत आहे. अध्यात्माची आस असणाऱ्यांना हे लिखाण म्हणजे श्रीपादांचा कृपाप्रसादच वाटेल यात दुमत नसावं.
नामस्मरण महिमा
एक वद्धृ ब्राम्हण पोटदुखीच्या त्रासाने कुरुगड्डीस श्रीपाद प्रभुंच दर्शन घ्यायला आला हो्ता. त्याच्या वेदना एवढ्या असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी असे वाटले. त्या ब्राम्हणाने श्रीपाद प्रभुंच दर्शन घेऊन आपली व्यथा दर करण्याची आर्त स्वरात प्रार्थना केली. त्यावेळी श्रीपाद प्रभ म्हणाले“अरे विप्रा पुर्वजन्मी आपल्या कठीण वाणीने अनेक लोकांना दुखावलेस. अनेकांना आपल्या ह्र्दयभेदी कठोर शब्दांनी घायाळ केलेस त्याचेच फळस्वरूप म्हणून तुला हि पोटदुखिची व्याधी जडली आहे. रात्रि कुरुगड्डीस (कुरवपुर) राहून “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असा जप कर.” प्रभुंच्या आदेशानुसार वृद्ध ब्राम्हण रात्री कुरुगड्डीस राहीला. त्याने अत्यंत श्रद्धा भावाने जप केला. त्या ब्राम्हणाची पोटदुखी पण बरी झाली.
श्रीपाद प्रभु पढुे म्हणाले “मानवास आपल्या वाकदोषापासन मुक्त होण्याचा या कलियुगात ‘नामस्मरण’ हाच एक मार्ग आहे. भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडल शुद्ध होते. मी कुरुगड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सरुुवात करणार आहे. त्या नामाबरोबर “श्रीकार” ही जोडणार आहे. त्यामुळे चिरस्थायीपने परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी अशा चारी वाणी नियंत्रित होतील. जे भक्त "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असे” मनस्फुर्तिने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभरितिने प्राप्त होउन त्यांचा मनोकामना पूर्ण करतो.श्रीपाद प्रभु पढुे म्हणाले" वायुमंडलात आज पुर्वीसारखे वाग्जळ भरून आहे. आपण उच्चारलेले प्रत्तेक वाक्य प्रकृतीत सत्व , रज , तम या तीन गुणांनी अथवा एक किंवा दोन गुणांनी परिपूर्ण असते. या त्रिगुणात्मक सृष्टिचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो. हि पंचमहाभूते दूषित झाली की संपूर्ण अंतराळ दूषित होते. त्यामुळ मानवाकडून पापकर्म घडून तो दरिद्री होतो. या दरिद्र्यामुले पुन्हा पापकर्म घडते.या पापामुळे मन दुषित होऊन दान, धर्म, लोकसेवा अशी सत्कर्मे त्यांच्याकडून न घडल्याने पुन्हा दारिद्र्य येते. हे दुष्ट चक्र असे चालू राहते, या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी काया, वाचा, मन शुद्ध असायला हवे यालाच त्रीकरण शुद्धी असे म्हणतात. आपल्या मनात जे असते तेच वाणीतून बाहेर पडावे. मनात दुष्ट भाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुटप्पीपणा नसावा.
आपल्या वाणीप्रमाणेच आचरण सुद्धा अगदी पवित्र असावे. या कलियुगात जीवन सागर तरून जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितलेले आहेत. त्यात "नामस्मरण " हे अत्यंत सुलभ साधन आहे. नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधुर असते, त्याचा योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते.
अध्याय ४४ - श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत
घोरकष्टोद्धरण स्तोत्र अप्रतिम
घोरकष्टोद्धरण स्तोत्र अप्रतिम आहे शेवटचे कडवे - धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
हे मागणे फार कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. सगळं आलय त्यात.
|| श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये
|| श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ||
Pages