श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये
नुकताच श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र ऐकण्याचा योग आला. अध्यात्मातले बारकावे आणि श्रीपाद प्रभूंच्या चरित्राच रसाळ वर्णन त्यात आढळते. श्रीपाद वल्लभ हे दत्त महाराजांचेच अवतार त्यानंतर त्यांनी श्री नृसिंहसरस्वती या नावाने अवतार घेतला, त्यानंतर कर्दळीवनामध्ये गुप्त होऊन श्री स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण केला. कलीयुगामध्ये दत्त महाराजांनी इतके अवतार घेण्यामागे दीन दुबळ्यांचा उध्दार आणि आणि साधकांची अध्यात्मात प्रगती हे प्रयोजन खचितच होते. त्याच श्रीपादांच्या चारीत्रामधील काही भाग इथे देत आहे. अध्यात्माची आस असणाऱ्यांना हे लिखाण म्हणजे श्रीपादांचा कृपाप्रसादच वाटेल यात दुमत नसावं.
नामस्मरण महिमा
एक वद्धृ ब्राम्हण पोटदुखीच्या त्रासाने कुरुगड्डीस श्रीपाद प्रभुंच दर्शन घ्यायला आला हो्ता. त्याच्या वेदना एवढ्या असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी असे वाटले. त्या ब्राम्हणाने श्रीपाद प्रभुंच दर्शन घेऊन आपली व्यथा दर करण्याची आर्त स्वरात प्रार्थना केली. त्यावेळी श्रीपाद प्रभ म्हणाले“अरे विप्रा पुर्वजन्मी आपल्या कठीण वाणीने अनेक लोकांना दुखावलेस. अनेकांना आपल्या ह्र्दयभेदी कठोर शब्दांनी घायाळ केलेस त्याचेच फळस्वरूप म्हणून तुला हि पोटदुखिची व्याधी जडली आहे. रात्रि कुरुगड्डीस (कुरवपुर) राहून “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असा जप कर.” प्रभुंच्या आदेशानुसार वृद्ध ब्राम्हण रात्री कुरुगड्डीस राहीला. त्याने अत्यंत श्रद्धा भावाने जप केला. त्या ब्राम्हणाची पोटदुखी पण बरी झाली.
श्रीपाद प्रभु पढुे म्हणाले “मानवास आपल्या वाकदोषापासन मुक्त होण्याचा या कलियुगात ‘नामस्मरण’ हाच एक मार्ग आहे. भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडल शुद्ध होते. मी कुरुगड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सरुुवात करणार आहे. त्या नामाबरोबर “श्रीकार” ही जोडणार आहे. त्यामुळे चिरस्थायीपने परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी अशा चारी वाणी नियंत्रित होतील. जे भक्त "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असे” मनस्फुर्तिने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभरितिने प्राप्त होउन त्यांचा मनोकामना पूर्ण करतो.श्रीपाद प्रभु पढुे म्हणाले" वायुमंडलात आज पुर्वीसारखे वाग्जळ भरून आहे. आपण उच्चारलेले प्रत्तेक वाक्य प्रकृतीत सत्व , रज , तम या तीन गुणांनी अथवा एक किंवा दोन गुणांनी परिपूर्ण असते. या त्रिगुणात्मक सृष्टिचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो. हि पंचमहाभूते दूषित झाली की संपूर्ण अंतराळ दूषित होते. त्यामुळ मानवाकडून पापकर्म घडून तो दरिद्री होतो. या दरिद्र्यामुले पुन्हा पापकर्म घडते.या पापामुळे मन दुषित होऊन दान, धर्म, लोकसेवा अशी सत्कर्मे त्यांच्याकडून न घडल्याने पुन्हा दारिद्र्य येते. हे दुष्ट चक्र असे चालू राहते, या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी काया, वाचा, मन शुद्ध असायला हवे यालाच त्रीकरण शुद्धी असे म्हणतात. आपल्या मनात जे असते तेच वाणीतून बाहेर पडावे. मनात दुष्ट भाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुटप्पीपणा नसावा.
आपल्या वाणीप्रमाणेच आचरण सुद्धा अगदी पवित्र असावे. या कलियुगात जीवन सागर तरून जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितलेले आहेत. त्यात "नामस्मरण " हे अत्यंत सुलभ साधन आहे. नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधुर असते, त्याचा योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते.
अध्याय ४४ - श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत
मी देखील दत्तावधूत स्वामींची
मी देखील दत्तावधूत स्वामींची सर्व पुस्तके वाचली आहेत.( फक्त जागतिक भविष्य सोडून ) मला त्यांचे लिखाण योग्य आणि तळमळीने लिहिल्याचे जाणवले. चमत्कार दिसाला तरच नमस्कार करायचा हि वृत्ती आपणाला योग्य मार्गापासून दूर ठेवते. बाकी शिष्याची तयारी झाली कि गुरूच शिष्याला शोधात येतात हे मात्र खरे आहे. तेंव्हा भोंदू गुरूंच्या मागे जाऊ नये हेच योग्य
शिवक्रुपानन्द स्वामिनि
शिवक्रुपानन्द स्वामिनि लिहिलेली 'हिमालयातिल समर्पण योग' ( सहा भाग आहेत ). हि पुस्तके देखिल साधकानि जरुर वाचावित पण हि पुस्तके बाहेर मिळत नाहीत.
वरती के अश्विनी यांच्या
वरती के अश्विनी यांच्या धाग्याची लिंक आहे. मला एक दत्तस्तुतीपर संस्कृत स्तोत्र कधीपासून हवे आहे. के अश्विनी यांचा धागा पुष्कळच सर्वसमावेशक आहे. पण तिथेही हे स्तोत्र सापडले नाही. हे दत्तस्तुतीपर स्तोत्र अगदी महिषासुरमर्दिनी स्तोत्राच्या धर्तीवर आहे. कडव्याच्या तीन ओळींनंतर पालुपद येतें. त्यात ' अनसूयात्रिसुता तुला वंदन असो ' किंवा ' अनसूयात्रिसुता माझे रक्षण कर' अशा अर्थाची संस्कृत ओळ आहे जी अर्थात प्रत्येक कडव्याच्या शेवटी रिपीट होते. कोणीतरी एकदा सांगितले की ही प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामींची रचना आहे. पण मला सापडली नाही. हे स्तोत्र तसे बरेच प्रसिद्ध आहे. पण मला मिळत नाही . कोणी मदत करील काय?
ताई मी टेम्ब्ये स्वामींच्या
हिरा, मी टेम्ब्ये स्वामींच्या सगळ्या रचना शोधल्या पण तुम्ही म्हणता ते स्तोत्र नाही सापडले... इतरही काही स्तोत्रे पाहिली पण त्यातबी नाय सापडलं काही .. त्यानिमित्ताने कालभैरवाष्टकाच्या चालीवरील एक दत्तस्तोत्र मात्र सापडले .. मस्त आहे एकदम म्हणायला ... पाहिजे असल्यास टाकतो
जिद्दु, प्लीज़ प्लीज़ टाकाच.
जिद्दु, प्लीज़ प्लीज़ टाकाच.
हे घ्या....
हे घ्या....
वासुदेवानंद सरस्वती (टेम्ब्ये
वासुदेवानंद सरस्वती (टेम्ब्ये स्वामी ) महाराजांचे समग्र साहित्य माणगांव च्या देवस्थान ने online केले आहे. त्याची PDF उतरवून घेता येते . यात तुम्हाला हवे असलेले स्तोत्र मिळेल अशी अशा करतो. आपल्या माहिती साठी http://www.shrivasudevanandsaraswati.com/English/Literary_Works.php लिंक
हा धागा ज्यांच्या नावाने सुरु
हा धागा ज्यांच्या नावाने सुरु झाला त्या कलियुगातील प्रथम दत्तावतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा आज निजानंदगमन दिवस ... स्वामींना साजूक तुपातील शिरा फार आवडतो तर जे भक्त उपासक असतील त्यांनी याचा नैवद्य जरूर दाखवावा ...माठाची/राजगि-याची पालेभाजी व वांग्याची भाजी या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या काही आवडत्या गोष्टी आहेत.... जाता जाता एक सीक्रेट सांगतो .. दत्तसंप्रदायात प्रमुख दिवस गुरुवार नसून शनिवार हा असतो ....
श्री.थोरल्या महाराजांच्या हृदयात झालेल्या त्याच दर्शनानुसार योगिराज श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांनी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे सुंदर चित्र काढलेले आहे त्याचा फोटो खाली जोडलेला आहे ...
II दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा II
जिद्दु >^ दिलेल्या माहिती
जिद्दु >^ दिलेल्या माहिती बद्दल खुप खुप धन्यवाद.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
जिद्दु -- या पादुका कुठल्या
जिद्दु -- या पादुका कुठल्या आहेत ?
ह्या पादुका वासुदेव निवास
ह्या पादुका वासुदेव निवास पुणे इथे आहेत ..थोरले स्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती ह्यांचे शिष्य श्री. गुळवणी महाराज ह्याच्या मातोश्री ना मिळालेल्या दत्तात्रेयांच्या प्रसाद पादुका आहेत त्या..
दत्त almighty !
दत्त almighty !
Omvanitablog वर सर्व भाग
Omvanitablog वर सर्व भाग मोफतवाचायला मिळतील
नामस्मरण केल्याने इष्टदैवत
नामस्मरण केल्याने इष्टदैवत सतत कृपा करतं. मी मोटारसायकल खूप वेगाने चालवायचो. एकदा असाच वेगात जात असताना एका चौकात मोटारसायकल वर बसलेले दोघेजण अचानक आडवे आले. मी ब्रेक लावले पण टायर गुळगुळीत झाल्याने गाडी स्लीप झाली. माझा डावा पाय रस्त्यावर आपटून गाडी परत सरळ झाली व टक्कर न होता सरळ पुढे गाडी चालवू लागलो. कितीही आठवलं तरी नेमका कसा वाचलो हे समजतच नाही. देवाने वाचवलं नसतं तर ? कल्पना करु शकत नाही.
Submitted by हीरा on 2
Submitted by हीरा on 2 November, 2018 - 17:16 >>>>>
घोर-कष्ट-उद्धरण स्तोत्र का?
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधि देव ।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥ अशी सुरूवात आहे.
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती - टेंबे स्वामी महाराज यांच्या पावन स्मृतींना पुण्यतिथीनिमित्त सादर नमन
(No subject)
(No subject)
जिद्दु >>> चित्र दिसत नाहीत
जिद्दु >>> चित्र दिसत नाहीत
धन्यवाद जिद्दु भाई. फेटा व
धन्यवाद जिद्दु भाई. फेटा व बाराबंदी घातलेला फोटो कुणाचा आहे?
मलाच माहित नाही म्हणून इथं
मलाच माहित नाही म्हणून इथं टाकलेत त्यांचे फोटो. फार आधीच्या काळात होऊन गेलेत एवढं नक्की.
"अवधूत चिंतन श्री गुरुदेव
"अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त "
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे चरितामृत आता pdf app मध्ये उपलब्ध आहे. ज्यांच्या कडे पुस्तकाची प्रत नाही त्यांना सोयीचे होईल. ही लिंक पहा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.shripadshrivallabh...
धन्यवाद.
हीरा , तुम्हाला दत्तभावसुधारस
हीरा , तुम्हाला दत्तभावसुधारस स्तोत्र हवे आहे काय ?
स्वामी शुकदेव स्तुती
स्वामी शुकदेव स्तुती
निर्वासनं निराकांक्षं सर्वदोषविवर्जितम| निरालंबं निरातंकं ह्यवधूतं नमाम्यहम||१||
निर्ममं निरहंकारं समलोष्टाश्मकांचनम| समदु:खसुखं धीरं ह्यवधूतं नमाम्यहम||२||
अविनाशिनमात्मानं ह्येकं विज्ञाय तत्वतः| वीतरागभयक्रोधं ह्यवधूतं नमाम्यहम||३||
नाहं देहो न मे देहो जीवो नाहमहं हि चित| एवं विज्ञाय संतुष्टम ह्यवधूतं नमाम्यहम||४||
समस्तं कल्पनामात्रं ह्यात्मा मुक्त सनातनः| इति विज्ञाय संतुष्टं ह्यवधूतं नमाम्यहम||५||
ज्ञानाग्निदग्धकर्माणं कामसंकल्पवर्जितम| हेयोपादेयहीनं तं ह्यवधूतं नमाम्यहम||६||
व्यामोहमात्रविरतौ स्वरुपादानमात्रतः| वीतशोकं निरायासं ह्यवधूतं नमाम्यहम||७||
आत्मा ब्रह्मेति निश्चित्य भावाभावौ च कल्पितौ| उदासीनं सुखासीनं ह्यवधूतं नमाम्यहम||८||
स्वभावानैव यो योगी सुखं भोगं न वाछति| यदृष्टालाभसंतुष्टं ह्यवधूतं नमाम्यहम||९||
नैव निंदाप्रशंसाभ्यां यस्य विक्रियते मनः| आत्मक्रीडं महात्मानं ह्यवधूतं नमाम्यहम||१०||
नित्यं जाग्रदवस्थायां स्वप्नवद्योsवतिष्ठते निश्चिंतं चिन्मयात्मानं ह्यवधूतं नमाम्यहम||११||
द्वेषं नास्ति प्रियं नास्ति नास्ति यस्य शुभाशुभम| भेदज्ञानविहीनं तं ह्यवधूतं नमाम्यहम||१२||
जडं पश्यति नो यस्तु जगत्पश्यति चिन्मयम| नित्ययुक्तं गुणातीतं ह्यवधूतं नमाम्यहम||१३||
यो हि दर्शनमात्रेण पवते भुवनत्रयम| पावनं जंगमं तीर्थं ह्यवधूतं नमाम्यहम||१४||
निष्कलं निष्क्रियं शांतं निर्मलं परमामृतम| अनंतं जगदाधारं ह्यवधूतं नमाम्यहम||१५||
इति अवधूताष्टकं समाप्तं||
-- अष्टक म्हटलय पण १५ श्लोक आहेत. माहीत नाही नक्की काय नाव आहे?
https://sanskritdocuments.org
https://sanskritdocuments.org/doc_deities_misc/dattabhaavasudhaarasastot...
दत्तगुरुंच्या वाटेला मी जात
दत्तगुरुंच्या वाटेला मी जात नाही. त्रेपन्न वेळा (= अनंत वेळा), डिसकरेजिंग अनुभव आलेला आहे. "औकात मे रेहेनेका" टाइप्स
मलाही दत्तबावनी ऐकायला छान
मलाही दत्तबावनी ऐकायला छान वाटते.
गुजराथी दत्तबावनी मी दर
गुजराथी दत्तबावनी मी दर गुरुवारी म्हणते. आई बडोद्याची होती आणि आजोळचे सगळे नारेश्वरला जायचे रंगावधुत महाराजांकडे (हे मराठी मातृभाषा असणारे पण गुजराथमध्ये जन्म) , त्यांना गुरुसमान मानायचे. त्यांनी गुजराथीत लिहिलेली दत्तबावनी आई म्हणायची म्हणून मला मूळ गुजराथी जास्त आवडते (सवयीचा परिणाम).
Diggi12 यांनी दिलेलं स्तोत्र माहिती नव्हतं. वासुदेवानंद सरस्वती यांचे घोरकष्टोद्धरण (घोर कष्ट उद्धरण) मी दर गुरुवारी वाचते, छोटंसं आहे, मला आवडतं.
Pages