तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

आर्या..1 नंबर लिहिलंय..... आणि नाचणारी smily तुफान आहे >>> टोटली Lol

कुणीतरी ढकलून दिलं की दारात किंवा रस्त्यात जाऊन पडण्याची अॅक्टींग चांगली जमायला लागलिये आता इशाच्या बाबांना. >>> Lol

त्या चकल्या एपिसोड मधे ईशाला रॅण्डमली सुभा दिसतो मग ती हसते, तो इतर कोणालाच दिसत नाही - वगैरे पाहून एक आल्टरनेटिव्ह फॅक्ट जाणवली. जी आपल्या कोणालाच इतके दिवस लक्षात आली नसावी:

सरंजामे कंपनी पहिल्यापासून जयदीपच चालवतोय. सुभा चे कॅरेक्टर आस्तित्वातच नाही. लहान मुलांचे इमॅजिनरी फ्रेण्ड असतात तसा तो ईशाचा इमॅजिनरी बॉस आहे - असे तर नसेल? अ ब्युटिफुल माइण्ड ची देसी व्हर्जन.

अरे,लावा रे लग्न यांच.ती शिल्पा तुळसकर किती दिवस विंगेत बसणार?काय टायमिंग आहे सुभाच येण्ययाच आणि निमकरांच पडण्याच,ईशाबाळ तर विक्रांतने बोलावल्यावर रँपवाँक केल्यासारखी चालत गेली.आणि खाली खेळणाऱ्या आपल्या मुलाला जस बोलावतात तसच विक्रांतने बोलावल.अरे बॉस आहेस ना मग वाग ना तस.

आज व्हॉट्सॅप्वर चा जोक

सुभा : इशा मला तुला काहीतरी सांगायचे आहे.
ईशा: बोला ना सर
सुभा: हॅपी चिल्ड्रन्स डे!!
ईशा: भ्यां!!!! (तो जगप्रसिद्ध तोंडाचा चंबू)

मायरा आली रे आली की काही मिनिटांतच "अॅब्सोल्युट्ली सर" म्हणतैच म्हणते. प्रत्येक एपिसोडातला हा ठरलेला शब्द आहे.
तसंच ती नेहमी मॅनेजमेंटला सांगते की अमूक अमूक आपले फार महत्वाचे व फार जुने कस्टमर आहेत वगैरे आणि विश्वाचं रहस्य उलगडत असल्यासारख ऐकून मग सुभा रिअॅक्शन देत असतो. माझ्या बाॅसला मी असं काही भर मिटींगमधे सांगतिये असं इमॅजिन करून पाहिलं आणि त्याची व इतरांची रिअॅक्शन इमॅजिन केली. Happy

लोल मेधावि. ती मायरा कशी एसव्हीपी झाली माहीत नाही. इतकी डम्ब व्यक्ती सिनीयर मॅनेजमेण्ट मधे? कसले पोहोचलेले असतात लोक ऑफिस पॉलिटिक्स मधे. ही इतक्या वेळा तोंडघाशी पडते, तरी सर्वांसमोर उघडपणे एका ज्युनियर कर्मचारी व्यक्तीशी स्पर्धा करत बसते. एखादा तयार सिनीयर मॅनेजर तिला घोळात घेउन कधी साइडलाइन करेल कळणार पण नाही.

एखादा तयार सिनीयर मॅनेजर तिला घोळात घेउन कधी साइडलाइन करेल कळणार पण नाही.>>> अगदी, कहर म्हणजे आताही तिचा प्लॅन फसलाय. कोण मूर्ख स्वतःचे नाव सांगून माणूस पाठवेल असले फ्रॉड करायला. चकल्या का फेमस बिजनेस बघून आलो ऑर्डर द्यायला असेही सांगू शकला असताच की तो. अन ते लपवायला काहीही थाप इकडे चालतेच की, भले तो बोलला असता की मला हे कुणाला न कळू देता करायचेय कारण मला माझ्या बॉसिनला सरप्राईज द्यायचेय. हाकानाका Wink

काल इशानं सुभाला मिठी मारली तेव्हा मायराचा अभिनय झकास होता. तिच्या आईवडिलांवरही कॅमेरा टाकायला हवा होता तसाच.
सुभाही मस्त एक्स्प्रेशन्स देत होता. पण तो लगेच रडतो का? काल पण त्याचे डोळे भरून आले आणि लाल झाले होते.

सुभाची एंट्री होणार हे इथे वाचून आज बर्‍याच दिवसांनी एक भाग पाहिला.

शाळा-कॉलेजात पोराने काहीतरी घोळ घातला की त्याचे पालक ते निस्तरायला प्रिन्सि.कडे धावतात तसे इथे इशाचे आई-बाबा कंपनीत धाव घेतात Uhoh
पोराला केबिनच्या बाहेर उभं केलेलं असतं, मग प्रिन्सि. त्याला आत बोलावतात, तसंच ईशाला आत बोलावलेलं दाखवलं. Biggrin
तसंही, कंपनीतले सीन्स म्हणजे सगळा पोरखेळच चाललाय. Uhoh

सुभा एकट्या ईशाशी बोलताना तिने मिठी मारण्याचा प्रसंग दाखवायला हवा होता... तेव्हाचा सुभाचा अभिनय बघायला जास्त आवडलं असतं. Blush

वरचे सगळे मेसेज तुफान ... Rofl
<<सुभा: हॅपी चिल्ड्रन्स डे!!
ईशा: भ्यां!!!! (तो जगप्रसिद्ध तोंडाचा चंबू)<<< अगाया... Rofl Rofl

सुभाच्या मिठीत शिरुन रडण्यासाठी इबाळाने भोकाड राखुन ठेवले होते वाटते. Lol

इशाचा सुभाने हाक मारल्यानंतर चा वॉक एपिक होता.. कसं करावं हे न कळल्यामुळे तुटक तुटक..
पहिल्यांदा इशा जेवढ्या झटकन शक्य आहे तेवढ्या झटकन उठली.. मग गार्डन मधुन जॉग करतात तसं हात हालवत आणि मग दरवाजातुन आत येताना अगदी धावत आलिये असं धडपडत आत आली.. नो कंटिन्युटी..
मिठी मारल्यावरचा सुभाचा अभिनय मस्त..

अरे सोडवा रे कुणीतरी सुभाला मगरमिठीतून..... Angry आता म्हणा म्हणांव इ बाळाच्या बाबांना की '1 मिठी भी बहोत बडी चीज होती हैं बाबू'... आणि इ आई गदागदा मान हालवून म्हणेल 'बघा, बरं झालं .. वि सर आले , किती घाबरली होती माझी पोरं'.. Angry

तिच्या मिठीचं एवढं आश्चर्य का वाटतंय मायरा अन झेंडेंना? आठवा आठवा... बंगलोरहून परत येताना एक रात्र एकत्र राहिले होते आणि ते पण रोडसाईडच्या छपरी हाटेलात म्हणून नाराज होते ना झेंडे अन पताका? आता एवढं तर असूच शकेल ना मग?

इशानं काल विक्रांतला मारलेली मिठी ही प्रियकराला मारलेल्या मिठीसारखी नव्हतीच मुळी. अडचणीत असताना वडील समोर आले असते तर त्यांनाही अशीच मारली असती.

धम्माल धाग्यांच्या लिस्ट मध्ये हा धागा टाका कुणीतरी, कसली भारी चर्चा सुरुये इथे Lol
फा, तुम्ही सगळी निरीक्षण एकत्र लिहुन एक मस्त लेख का प्रकशित करत नाही ? :हहपुवा:

शाळा-कॉलेजात पोराने काहीतरी घोळ घातला की त्याचे पालक ते निस्तरायला प्रिन्सि.कडे धावतात तसे इथे इशाचे आई-बाबा कंपनीत धाव घेतात Uhoh
पोराला केबिनच्या बाहेर उभं केलेलं असतं, मग प्रिन्सि. त्याला आत बोलावतात, तसंच ईशाला आत बोलावलेलं दाखवलं. Biggrin
तसंही, कंपनीतले सीन्स म्हणजे सगळा पोरखेळच चाललाय. >>>>>> अगदी अगदी. कुठल्या ऑफिसच्या प्रोटोकॉल मध्ये चालत अस? Uhoh

धक्के मारुन एखाद्याला हाकलण, निमकरान्च सतत इतरान्च्या हातापाया पडण हे तर न-पटणेबल होत. एखाद्या मराठी ग्रामीण चित्रपटात शेतकरी अत्याचारी पाटलाच्या/सावकाराच्या हाता-पाया पडतोय, आणि त्याला सावकरान्च्या गुन्डाकडून धक्के मारुन हाकलतायत असा फिल आला होता एपिसोड बघताना.

पण तो लगेच रडतो का? काल पण त्याचे डोळे भरून आले आणि लाल झाले होते. >>>>> आधी त्याने फुशारक्या मारल्या की, 'इशा जर खरच दोषी असेल, मी तिला स्वतः टर्मिनेशन लेटर देईन.' (खरतर ह्या मागे मायरा आणि झेन्डेचा हात असावा, हे त्याला माहीत असेल.) पण नन्तर, इशाचा रडवेला चेहरा बघून त्याला रडायला आल. इशाची अवस्था बघून त्याची हवा गेली.

सुभा एकट्या ईशाशी बोलताना तिने मिठी मारण्याचा प्रसंग दाखवायला हवा होता... तेव्हाचा सुभाचा अभिनय बघायला जास्त आवडलं असतं >>>>>>> +++++++१११११११ प्रोमो मिसलीडिन्ग होता. Proud त्यात एकटी इशा सुभाला मिठी मारते अस दाखवल होत.

मिठी मारल्यावरचा सुभाचा अभिनय मस्त.. >>>>>> मम. तसच तो इशाच consoling करतो इशा इशा म्हणत ते तर लाजवाब होत.

पण हि तर सर्वान्समोर मिठीतच पडली सुभाच्या. महागळेपडू आहे ही.

काल इशानं सुभाला मिठी मारली तेव्हा मायराचा अभिनय झकास होता. >>>>>> +++++ १११११११

बाकी, सुभाची एन्ट्री मस्त झाली. एन्ग्री यन्ग मॅन स्टाईल. Happy Wink

झेंडे अन पताका >>>>>> Rofl

आज सुभा डिटेक्टीव होणार आहे.

>>पण हि तर सर्वान्समोर मिठीतच पडली सुभाच्या. महागळेपडू आहे ही.
'मी टू' मोमेंट फॉर सुभा. Wink
असो. आता मायरा पताका व झेंडे यांचे कारस्थान ऊघडकीस येते का आणि आल्यास त्यांच्यावर काय कारवाई होते हे पहाणे रंजक ठरेल.

'मी टू' मोमेंट फॉर सुभा. >>>>> कसल आलय 'मी टू' मोमेंट ? सुभाही तिच्या (आन्धळया) प्रेमात पडलाय.

झेंडे अन पताका>> Lol
शाळा-कॉलेजात पोराने काहीतरी घोळ घातला की त्याचे पालक ते निस्तरायला प्रिन्सि.कडे धावतात तसे इथे इशाचे आई-बाबा कंपनीत धाव घेतात Uhoh>>+१
इशानं काल विक्रांतला मारलेली मिठी ही प्रियकराला मारलेल्या मिठीसारखी नव्हतीच मुळी. अडचणीत असताना वडील समोर आले असते तर त्यांनाही अशीच मारली असती.>>>पण तिने बाबा आल्यावर त्यांना मिठी मारलीच नाही. फक्त विसला मारली. तेही अगदी ठरवून मारल्यासारखी, आई-बाबा तिथून गेल्यावर.

>>मिठी मारल्यावरचा सुभाचा अभिनय मस्त.. >>>>>> मम. तसच तो इशाच consoling करतो इशा इशा म्हणत ते तर लाजवाब होत.
वि स वरून विसं वर जाण्याची लक्षणे दिसताहेत सगळी. Proud

Pages